जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/236. सुरेंद्रकूमार शिवप्रसादजी मालीवाल वय, 66 वर्षे, धंदा शेती, रा. मनाठा ता.हदगांव जि. नांदेड अर्जदार विरुध्द 1. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मनाठा ता. हदगांव जि. नांदेड मार्फत मूख्य कार्यालय, नांदेड. गैरअर्जदार 2. कार्यकारी संचालक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, नांदेड. विलंब माफी नि.1 च्या अर्जावर आदेश दि.04.11.2009 (श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) अर्जदार यांनी मूळ तक्रार अर्ज गैरअर्जदार यांचे विरुध्द अर्जदारास पिक कर्ज घेण्यास वंचित ठेवल्यामूळे झालेल्या नूकसान भरपाईची रक्कम मिळणेसाठी दाखल केलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे ऊस बिलाची रक्कम गैरअर्जदार बँकेने कपात करुन शिवा उपसा जलसिंचन संस्था मनाठा यांचे कर्ज खाती जमा केलेले अर्जदार यांनी नांदेड येथील मा. सहकार न्यायालय येथे दावा क्रंमाक 284/2002 हा दावा दाखल केलेला होता. सदर दाव्याचा निकाल दि.07.04.2004 रोजी अर्जदार यांचे हक्कात झालेला आहे. सदर मा. सहकार न्यायालयाच्या निकाला विरुध्द गैरअर्जदार यांनी मा. अपिलेट सहकार न्यायालय औरंगाबाद येथे अपिल क्र.125/2004 हे दाखल केलेले होते.सदर अपिलाचा निकाल दि.25.07.2005 रोजी झालेला आहे. गैरअर्जदार यांचे अपिल फेटाळण्यात आलेले आहे. अर्जदार यांनी दि.25.07.2005 पासून या ग्राहक मंचात दोन वर्षाचे मूदतीमध्ये तक्रार दाखल करणे आवश्यक व कायदेशीर असे होते. परंतु अर्जदार यांनी सदरची तक्रार ही दि.14.10.2009 रोजी दाखल केलेली आहे. सदर अर्जासोबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिलेल्या पञाच्या प्रति दाखल केलेल्या आहेत परंतु सदरचा पञव्यवहार हा सन 2005 मधील असल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पञावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दि.3.8.2009 चे गैरअर्जदार यांना दिलेले एक पञ दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना सन 2009 मध्ये पञ दिले म्हणजे अर्जदार यांना ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24 (ए) नुसार मूदत येते असे म्हणता येणार नाही कारण अर्जदार यांनी सन 2005 ते सन 2009 पर्यत गैरअर्जदार यांचे सोबत त्यांचे रक्कमे बाबत कोणताही व्यवहार केल्याचे स्पष्ट होत नाही अगर अर्जदार यांनी तसा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी अर्जदार यांचा अर्ज मूदतीत असले बाबत दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी सन 2005 पासून दोन वर्षाचे मूदतीमध्ये प्रस्तूतचा अर्ज या न्यायमंचामध्ये दाखल केलेला नाही अगर विलंब माफीच्या अर्जामध्ये प्रस्तूतचा अर्ज दाखल करण्यास वास्तविक किती दिवसांचा उशिर झाला हे नमूद केलेले नाही अगर प्रस्तूतचा अर्ज दाखल करण्यास उशिर का झाला या बाबतचे कोणतेही योग्य व संयूक्तीक असे कारण नमूद केलेले नाही. त्यामूळे अर्जदार यांचा अर्ज विलंबाच्या मूददयावर रदद बातल होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. सदर अर्जाचे कामी 2009 सी.टी.जे.सूप्रिम कोर्ट पान नंबर 481 स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द बी.एस. अग्रीकल्चरल इंडस्ट्रीज The compliant should be filed within two years from the date of accrual of cause of action -- No sufficient grounds for delay – Complaint timebarred. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञे, वकिलाचा यूक्तीवाद व वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24 (ए) नुसार मूदतीत दाखल केला नसल्याने फेटाळण्यात येतो. सदस्य सदस्या अध्यक्ष |