::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे बचत खाते क्र. ९६०३१०१०००१४३६४ ची सुविधा घेतली. सामनेवाले यांनी तक्रारदारास दिनांक १३.०९.२०१३ रोजी पत्र पाठवून सदर खात्यामध्ये दिनांक ०५.१०.२०१२ रोजी रक्कम रू. ३३,७५०/- अनावधानाने जमा झाले असून सदर रक्कम दिनांक ०५.१०.२०१२ पासून ३०% व्याजासह वसूल करण्यात येईल असे कळविले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी अर्जदारास कोणतीही पूर्वकल्पना न देता दिनांक १६.०९.२०१३ व दिनांक २१.११.२०१३ रोजी रक्कम रु. १०,०००/- व रक्कम रु. १३,७५०/- अनुक्रमे वळते केले. त्याबाबतची नोंद खाते पुस्तकामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांस करुन दिली. उर्वरित रक्कम ATM मशीनमधून काढण्याचा प्रयत्न केला असता सदर रक्कम संपूर्णपणे वसूल होत नाही तोपर्यंत बचत खात्यावरुन रक्कम काढता येणार नाही असे सामनेवाले यांनी तक्रारदारास सांगीतले. दिनांक 04/10/2013 रोजी तक्रारदारांनी वकीलांमार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठवून बचत खात्याचे व्यवहार करु देण्याबाबतची विनंती केली. व सदर रक्कम व्याजासह वसुल करण्यात येवू नये असे कळविले. सामनेवाले यांनी नोटीस प्राप्त होऊन देखील कोणतीही न्यायोचीत कार्यवाही न केल्याने तक्रारदारांनी सदर बाबीस आक्षेप घेऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी तक्रारदारांस बचत खात्याचे व्यवहार करु देण्याबाबत आदेश पारीत करावे व व्याजसह तक्रारदारांस सामनेवाले यांनी रक्कम अदा करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे.
३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केला नसून तक्रारीतील मुद्द्याचे खंडन केले. सामनेवाले यांनी दिनांक 13/09/2013 रोजीचे पत्रानुसार सदर रक्कम त्यांचे नावे जमा केली असून, दिनांक 05/10/2013 रोजी रक्कम रु.33,750/- तक्रारदार यांचे नावे यांनी जमा केली असून त्याबाबतची कागदपत्रे सामनेवाले यांनी सादर केली असून तक्रारदार यांचे बचत खत्यावरुन सदर रक्कम नावे करुन व्याजासह वसुल करण्याचा हक्क सामनेवाले यांना आहे. त्याप्रमाणे सामनवाले यांनी सदर रक्कम वळती केली असून सदरची बाब कायदेशीर आहे. सबब तक्रार खर्चासह अमान्य करावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व सामनेवाले याचे लेखी म्हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण
अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब तक्रारदार सिध्द करतात कायॽ होय.
२. सामनेवाले तक्रारदारास नुकसान भरपाइ
देण्यास पात्र आहेत काय? होय.
3. आदेश तक्रार मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १
५. तक्रारदार व सामनेवाले यांच्यातील वादाचे स्वरूप पाहता तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून अनावधानाने जमा झालेल्या रक्कमेच्या व्याजासह वसुली बाबत आक्षेप घेतला असून सामनेवाले यांनी देखील सामनेवाले यांचे चुकीमुळे सदर रक्कम तक्रारदार यांचे खत्यात जमा झाली असून त्याबद्दल लेखी म्हणणे माडले आहे. सामनेवाले यांनी लेखी पत्र पाठवून तक्रारदार यांच्या खात्यामधील रककम वळती केली असून सदर पत्रावर तक्रारदार यांचे म्हणणे न घेतल्याची बाब सिध्द होते. त्यानंतर तक्रारदार यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे सामनेवाले यांनी कोणत्याही न्यायोचीत कारणाशिवाय तक्रारदारांकडून व्याजाची मागणी केली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी केलेली व्याजाची मागणी न्यायोचीत नसल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवासुवीधा पुरविण्यास कसूर केल्याची बाब सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा सुवीधा न देऊन केलेली कृती आक्षेपार्ह असल्याने सदर आक्षेपाबाबत ग्राहक तक्रार, मंचाकडे दाखल करता येईल, असे न्यायतत्व असल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदारास बचत खात्यावरील रक्कम सामनेवाले यांच्या चुकीने जमा झाली असल्याने सदर रक्कमेची व्याजासह वसुली करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नसल्याने व सामनेवाले केवळ सदर जमा रक्कम वळती करण्यास पात्र असल्याने सामनेवाले तक्रारदारास न्यायोचीत नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यास पात्र आहेत. सबब मुद्दा क्रं. १ व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3
६. मुद्दा क्रं. १ व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. 136/2013 अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले यांनी या आदेशप्राप्ती दिनांकापासून अखंडपणे वचत खाते क्रमांक ९६०३१०१०००१४३६४ चा वापर तक्रारदारास करु द्यावा.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरीक व मानसीक त्रासापोटी, नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी एकत्रीत रक्कम रुपये 25,000/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसात अदा करावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)