जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/219. प्रकरण दाखल तारीख - 01/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 31/12/2009 समक्ष – मा.श्री. सतीश सामते - अध्यक्ष (प्र) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या नागनाथ पि. शांतीदास गाढे वय, 23 वर्षे, धंदा खाजगी नौकरी रा. बोथी, ता.उमरी जि. नांदेड अर्जदार विरुध्द. शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, ए.डि.बी.ब्रँच, पेट उमरी रेल्वे स्टेशन, उमरी ता. उमरी गैरअर्जदार जिल्हा नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.उपासे गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.एन.चितंलवार निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार भारतीय स्टेट बँक यांच्या सेवेच्याञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, त्यांचे गैरअर्जदार यांचे बँकेत खाते असून अर्जदार हा क्लरीस लाईफ सायन्स लि. अहमदाबाद या कंपनीत नौकरीला आहे. कंपनीने दि.2.6.2007 रोजी रु.9426/- हा पगारीसाठीचा धनादेश क्र.743632 दिला होता. तो धनादेश अर्जदाराने गैरअर्जदार यांचे बँकेत वटविण्यासाठी आपल्या खात्यात जमा केला. गैरअर्जदार बँकेने क्लीरिंग साठी सैंच्यूरिअन बँक ऑफ पंजाब लि. शाखा नागपूर यांचेकडे पाठविला होता. परंतु गैरअर्जदार यांचे म्हणण्यानुसार त्या बँकेने तो चेक कूठे तरी गहाळ केला आहे. अर्जदारास अद्यापही त्या चेकची रक्कम गैरअर्जदार यांनी दिली नाही व या बाबत त्यांचेकडून कोणतेही उत्तरही आले नाही. या घटनेस जवळपास दोन वर्ष होऊन गेले तरी ही चेकची रक्कम मिळाली नाही. त्यामूळे अर्जदाराचे मानसिक, आर्थिक नूकसान झाले. धनादेशा बाबत विचारणा करण्यासाठी अर्जदार यांना रु.10,000/- खर्च आला आहे. गैरअर्जदार व नागपूर शाखा कडे अनेक वेळा चौकशी केली परंतु आजपर्यत त्यांचा नीर्णय आला नाही. त्यामूळे शेवटी दि.1.09.2009 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली, ती त्यांना मिळूनही त्यांनी त्यांचे उत्तर दिले नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास योग्य सेवा न दिल्यामूळे अर्जदाराचे नूकसान झाले आहे. म्हणून अर्जदाराने ही तक्रार नोंदविली आहे. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना गैरअर्जदार यांचेकडून रु.9426/- चेकची रक्कम व त्यावर 12 टक्के व्याज, शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.20,000/- व तक्रार खर्च म्हणून रु.3,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली, त्यांना नोटीस तामील होऊन ते वकिलामार्फत हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे न दिल्याकारणाने त्यांचे विरुध्द नो से आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच काही दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. दस्ताऐवज पाहून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी त्यांचे पगाराचा क्लरीस लाईफ सायन्स लि. अहमदाबाद यांनी दिलेला रु.9426/- चा धनादेश क्र.743632 गैरअर्जदार यांचे बँकेत खाते असल्याकारणाने वटवीण्यासाठी दिला. गैरअर्जदार बँकेने हा चेक क्लीरिंगसाठी सैच्यूरिअन बँक ऑफ पंजाब शाखा नागपूर यांचेकडे पाठविला. या चेकची रक्कम अर्जदारास मिळाली नाही म्हणून त्यांने अनेक वेळा गैरअर्जदार बँकेत या बददलची चौकशी केली. या बाबतचा पञव्यवहार अर्जदाराने दाखल केलेला आहे. याप्रमाणे दि.4.10.2008 रोजीच्या पञात अर्जदाराने गैरअर्जदार बँकेस चेक संबंधी चौकशी केली आहे. त्याबददल गैरअर्जदार बँकेने सदरचा चेक हा नागपूर बँकेकडून गहाळ झालेला आहे असे म्हटले आहे. तो चेक व त्यांची रक्कम त्यांना मिळत नाही या बददल पूरावा पाहिला असता गैरअर्जदार बँकेने दि.2.11.2007 रोजी अर्जदारास पञ लिहून अर्जदाराचा चेक हा सैच्यूरिंअन बँक शाखा नागपूर यांचेकडे पाठविला असून तो चेक कूठेतरी मिसप्लेस झालेला आहे. त्यामूळे त्यांचे पेमेन्ट मिळत नाही किंवा तो चेकही वापस आलेला नाही असे म्हटले आहे. या घटनेस जवळपास दोन वर्ष होऊन गेले. गैरअर्जदार बँकेने सदरील सैच्यूरिअन बॅंक ऑफ पंजाब शाखा नागपूर यांचे विरुध्द विचारणा करणेशिवाय कोणतीही कारवाई केली नाही. या बाबत गैरअर्जदार बँकेने दि.31.10.2007 रोजी नागपूर यांना पञ ही लिहीलेले आहे. सदरचा चेक त्या बँकेने हरवला असेल तर गैरअर्जदार बँक यांची चूक जरी नसली तरी अर्जदाराचा चेक हा वटवीण्यासाठी त्यांनीच स्विकारला आहे तेव्हा एक तर चेकची रक्कम अदा केली पाहिजे किंवा तो चेक वापस केला पाहिजे. पूढील बॅंकेने हरवला असेल तर त्यांचे विरुध्द त्यांनी कारवाई करुन ती रक्कम त्यांचेकडून रक्कम वसूल करणे आवश्यक आहे परंतु अशी कोणतीही कारवाई गैरअर्जदार बॅंकेने केलेली नाही. परंतु गैरअर्जदार यांचे दि.31.10.2007 रोजीच्या पञानुसार त्यांनी परत सैच्यूरिअन बँक ऑफ पंजाब शाखा नागपूर यांना पञ लिहीले आहे व यात चेक नंबर 743632 दि.2.6.2007 रु.9426/- हा चेक उमरी बँकेकडे क्लीरिंग साठी आला होता परंतु तो चेक त्यांचेकडून मिसप्लेस झालेला आहे (गहाळ झालेला आहे) त्यामॅळे त्यांना तो चेक क्लीरिंगसाठी पाठविण्यात आला नाही. त्यामूळे तो चेक अजूनही आऊटस्टॅडींग मध्ये असून नागपूर बँकेला त्यांनी विनंती केली आहे की, या बाबतची रक्कम अदा न करता नॉन पेमेन्ट अडव्हाईस त्यांना पाठविण्यात यावे. ज्यामूळे त्यांना नवीन चेक अर्जदाराकडून मागवून घेता येईल असा उल्लेख केला आहे. गैरअर्जदाराच्या पञावरुन असे दिसते की, एकदा म्हणतात की, सैच्यूरिंअन बँक ऑफ पंजाब शाखा नागपूर यांचे कडे चेक पाठविला असता तो गहाळ झाला. या पञानुसार म्हणतात की, हा चेक त्यांचेकडून गहाळ झाला म्हणजे नेमका कोणाकडून चेक गहाळ झाला हे गैरअर्जदार यांनाच माहीत आहे. चेक गहाळ झाला तर त्या सोबत त्यांनी नॉन पेमेन्टचे पञ लिहून व अडव्हाईस जोडून त्याप्रमाणे अर्जदार यांचे कंपनीस पञ लिहून तो चेक सोबत वादग्रस्त चेक गहाळ झाला असून त्याबददल अर्जदारास नवीन चेक इश्यू करण्यात यावा असा पञव्यवहार कंपनीशी व अर्जदाराशी करणे आवश्यक होते. तर तो चेक वटला नाही यांची खाञी करुन घेणे भाग होते. या घटनेस जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर व अर्जदाराने कायदेशीर नोटीस पाठविल्यावर ही त्या नोटीसला गैरअर्जदार यांनी उत्तर दिले नाही. गैरअर्जदाराने चेक स्विकारल्यानंतर चेकची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा होईपर्यतची जबाबदारी त्यांची आहे. ही जबाबदारी त्यांनी नीभावली नाही म्हणून सेवेत ञूटी केलेली आहे. आता यापूढे गैरअर्जदार चेक संबंधी अजून काही करतील असे आम्हास वाटत नाही. म्हणून त्यांनीच चेकची रक्कम देण्याचा आदेश करणे हे उचित होईल. यानंतरही गैरअर्जदार हे क्लरीस लाईफ सायन्स लि. अहमदाबाद यांचेशी पञव्यवहार करुन जर तो चेक त्यांचे खात्यातून क्लीअर झाला नसेल तर त्यांचेकडून ते पैसे मिळण्यासाठी कारवाई करुन ती रक्कम त्यांना घेता येईल. ती रक्कम अर्जदाराच्या खात्यात नवीन चेक जमा करुन बँकेस घेता येईल. हे सर्व कसे करायचे ते गैरअर्जदार यांनी ठरवावे. आजमितीस अर्जदार यांना चेकची रक्कम दिली पाहिजे. दोन वर्ष रक्कम अडकल्यामूळे अर्जदार यांना मानसिक ञासही झालेला असणार तो ही देणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना चेक नंबर 743632 बददलची रक्कम रु.9426/- व अर्जदार यांना व्याज गैरअर्जदाराच्या पञाच्या दिनांकापासून म्हणजे दि.02.11.2007 पासून 10 टक्के व्याजाने दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |