Maharashtra

Nanded

CC/10/38

Mukhatarshing Kashmirshing Dharival - Complainant(s)

Versus

Branch Manegar,Bajaj Alliance General Insurance com. Ltd. - Opp.Party(s)

ADV P.S. Bhakkad

30 Jun 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/38
1. Mukhatarshing Kashmirshing Dharival Tarasingh Market, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manegar,Bajaj Alliance General Insurance com. Ltd. Adalt Road, Aurangabad.Aurangabad.Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Jun 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2010/38
 
                    प्रकरण दाखल तारीख -   04/02/2010     
                    प्रकरण निकाल तारीख    30/06/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.           -   सदस्‍या
                मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य
 
मुख्‍तारसिंग पि.काश्मिरसिंग धरीवाल,                        अर्जदार.
रा. 4, गोविंद कॉम्‍प्‍लेक्‍स,तारासिंग,मार्केट,
नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,         गैरअर्जदार.
     तर्फे शाखाधिकारी,दुसरा माळा,राजेंद्र भवन,
अदालत रोड, औरंगाबाद.
 
2.   बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     तर्फे शाखाधिकारी, कोठारी कॉम्‍प्‍लेक्‍स, शिवाजीनगर,
     नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील                 - अड.पी.एस.भक्‍कड
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील       - अड.जी.एस.औंढेकर.
 
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्‍य)
 
          गैरअर्जदार बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार यांची तक्रार असून त्‍यानुसार अर्जदार यांचा एम.एच 26/एच-5812 हा मालकीचा ट्रक असुन याच्‍या सुरक्षीतेसाठी गैरअर्जदार कंपनीकडुन दि.07/01/2009 ते दि.06/01/2010 या कालावधीसाठी विमा घेण्‍यात आला. सदरील गाडी ही दि.28/07/2009 रोजी लोहयाहुन नांदेडकडे येत असतांना रात्री 12.00 वाजता सदरील ट्रक समारे अचानक म्‍हशी आल्‍यामुळे त्‍या म्‍हशींना वाचविण्‍यासाठी ड्रायव्‍हरने ब्रेक मारल्‍यामुळे गाडी पलटी झाली व गाडीचे बरेच नुकसान झाले. याची सुचना गैरअर्जदार यांना दिल्‍यानंतर त्‍यांनी सर्व्‍हेअरला पाठवून सर्व्‍हे केला व त्‍यांच्‍या सांगण्‍यावरुनच गाडी घटनास्‍थळावरुन हलविण्‍यात आली. अर्जदाराने संधू मोटर्स गॅरेज नांदेड यांचेकडे गाडी नेली व त्‍याचे अंदाजपत्र केले, यानुसार गाडीचे अंदाजे नुकसान लाख ते सव्‍वा लाख सांगीतले व नुकसानीचा अहवाल हा क्‍लेम फॉर्मसोबत जोडले. सर्व्‍हेअरच्‍या अनुमतीने गाडीचे काम केले. अर्जदाराची  गाडी वेगवेगळया गॅरेज मध्‍ये दुरुस्‍तीसाठी लावण्‍यात आल्‍यामुळे
व एकुण रु.1,73,100/- चे नुकसान झाले. गैरअर्जदार कंपनीने क्‍लेम सेटल केले नाही व शेवटी दि.05/10/2009 ला पत्राद्वारे कळविले की, रु.750/- चा क्‍लेम मंजुर केलेला आहे. तेंव्‍हा अर्जदाराने दि.16/12/2009 ला वकीला मार्फत नोटीस पाठविली व मला सर्व्‍हे रिपोर्ट द्यावा अशी विनंती केली. सर्व्‍हे रिपोर्ट नसल्‍यामुळे काय केले हे अर्जदाराला कळाले नाही, असे करुन गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केली आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, रु.1,73,100/- व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत.
          गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदाराची तक्रार खोटी आहे. गैरअर्जदारांनी सेवेत कुठेही त्रुटी केलेली नाही ते सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे अर्जदारास रक्‍कम देण्‍यास तयार होते. गैरअर्जदारांना एम.एच.26/एच-8512 या वाहनाचा विमा मान्‍य आहे. गैरअर्जदारांनी खालेद हाशमी या सर्व्‍हेअरला नेमले होते, त्‍यांनी जागेवर जाऊन स्‍पॉट सर्व्‍हे केला व रिपोर्ट दिला पण अपघातग्रस्‍त वाहन हलविण्‍या विषयी कधी सांगीतले नव्‍हते. त्‍यामुळे गैरअर्जदारांना हे मान्‍य नाही की, संधू मोटर्सकडे वाहन दिले व ते ऑथोराईज्‍ड डिलर नाहीत व रुपये लाख ते सव्‍वा लाखाचे नुकसान झाले हे ते अमान्‍य केले. अर्जदाराने जे बोगस बिल दाखल केले आहे, त्‍यावर सर्व्‍हीस टॅक्‍स क्रमांक व इनकम टँक्‍स क्रमांक नाही. गैरअर्जदारंना क्‍लेम सेटल करावयाचे होते व ते त्‍यासाठी तयार आहेत. सर्व्‍हेअरने जी मंजुरी दिली ती रु.750/- ची असून सर्व्‍हे रिपोर्ट यासोबत जोडलेले आहे व ते अर्जदारांना कळविले होते व त्‍यांनी ती रक्‍कम स्विकारली नाही. त्‍यांनी अवास्‍तव रक्‍कमेची मागणी केली. यासाठी Ravneet singh Bagga v/s KLM Royal Dutch Airlines (2000) 1 सुप्रिम कोर्ट 66, मा.सुप्रिम कोर्ट यांनी असे सांगीतले आहे की, समोरच्‍याचा फॉल्‍ट दाखविल्‍या शिवाय सेवेत त्रुटी आहे, असे म्‍हणता येणार नाही. आम्‍हीच सेवा देतांना पुर्ण गोष्‍टीची काळजी घेतलेली आहे व शेवटचा निर्णय हा गुडफेथवर घेतलेला आहे उलट अर्जदार हा स्‍वच्‍छ हाताने मंचा समोर आलेले नाहीत त्‍यांनी बोगस बिले, इस्‍टीमेट,लेबर चार्जेस, अतीशय अवास्‍तव दाखविलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असून ती खारीज करण्‍यात यावी, असे म्‍हटले आहे.
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                        उत्‍तर.
 
 
1.   गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय?               होय.
2.   अर्जदार किती रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत? अंतीम आदेशा प्रमाणे.
3.   काय आदेश?                                                     अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                                                कारणे
मुद्या क्र. 1
 
        एम.एच.26/एच- 2812 हा माल ट्रक अर्जदाराच्‍या मालकीचा असुन त्‍याबद्यल आर.सी.बुक दाखल केलेले आहे. पॉलिसी क्र.OG-09-9995-18003-00151960 ही पॉलिसी दाखल केलेले आहे, हे सर्व गैरअर्जदारांना मान्‍य आहे. दि.28/07/2009 रोजी अर्जदाराचा ट्रक लोहयाहून नांदेडकडे येत असतांना रात्री 12.00 सदरील ट्रक समोर अचानक म्‍हशी आल्‍यामुळे त्‍या म्‍हशींना वाचविण्‍याकरीता ड्रायव्‍हरने ब्रेक मारल्‍यामुळे गाडी पलटी झाली व पलटी झाली व अपघात झाला त्‍यामध्‍ये वाहनाचे बरेच नुकसान झाल्‍याचे म्‍हटले आहे. यासंबंधी एफ.आय.आर.दाखल केलेले नसून घटनास्‍थळ पंचनामा दाखल केलेला आहे जो की, दि.29/07/2009 चा आहे. अपघाताचे कारण ब्रेक लावल्‍यामुळे गाडी पलटी असे लिहीले आहे. अपघात हा महामार्ग क्र.2 नांदेडवर झालेले आहे, यात वाहनाची परिस्थितीबद्यल कॅबीन तुटलेले आहे, समोरचे काचा फुटलेले आहे, शो खराब झालेला आहे, बॉडी वाकलेली आहे, इतर नुकसान झालेले आहे, असे घटनास्‍थळ पंचनाम्‍यात नोंद केलेले आहे व पोलिसांचा अंदाज नुकसान रुपये  40 ते 50 हजाराचा असावा असे म्‍हटलेले आहे. वाहनाचा जो रिपेअर करण्‍यासाठी इस्‍टीमेट बनविलेला आहे ते संधू मोटर्स गॅरेज यांचे असून याप्रमाणे एक लाखाचे इस्‍टीमेट तयार केलेले असून बाकीचे बिल दाखल करण्‍यात आलेले आहे. गाडीचे फोटोग्राफ देखील दाखल करण्‍यात आलेले आहे. गाडी पलटी झालेले फोटो नाहीत. अर्जदाराने जो आक्षेप घेतला आहे की, गैरअर्जदारांना सर्व्‍हे रिपोर्टची कॉपी त्‍यांना दिली नाही त्‍यामुळे त्‍यांना किती रक्‍कम मंजूर केले हे कळाले नाही. त्‍यामुळे त्‍यांनी दि.16/12/2009 ला वकीला मार्फत नोटीस पाठविली व तुम्‍ही असेस केलेले रु.750/- त्‍यांना मान्‍य नसुन या विरुध्‍द ते मंचात दाद मागणार आहेत. गैरअर्जदाराने दि.05/10/2009 ला अर्जदाराने नोटीस पाठवून रु.1,750/- चा क्‍लेम घेण्‍या विषयी कळविलेले आहे. अर्जदाराने आपल्‍या बिलाचा संबंधी लोकांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सर्व्‍हेअर खालीद हाशमी यांचा सर्व्‍हे रिपोर्ट गैरअर्जदारांना हे प्रकरण दाखल चालू असतांना दाखल केले त्‍यानुसार या सर्व्‍हे प्रमाणे फ्रंट शो/डॅशबोर्ड/कॅबीन यात समोरील दोन ग्‍लास फूटलेले आहे व कॅबीनचा लॉस काय झाला हे व्‍हेकल तेथून उचलल्‍यावरच कळेल असे लिहलेले आहे. वाहनाची बॉडीबद्यल त्‍याचे बोल्‍ट लूज झालेला असून उडन बॉडी ही वाकलेली आहे बाकी स्‍टेरिंग,कुलींग पीस्‍टन चांगले आहे. एक्‍सेल आणी व्‍हील हे चांगले आहेत सस्‍पेन्‍शन सिस्‍टीम चांगले आहे, इंजीन असेब्‍ली चांगली आहे, इलेक्‍ट्रीक सिस्‍टीम, बॅटरीमधील असीड निघुन गेले आहे. यात नुकसान फक्‍त समोरील ग्‍लासचे नुकसान झालेले असून त्‍याची किंमत रु.1750/- बिडींगबद्यल रु.500/- व लेबर चार्जेस असे एकुण रु.2,200/- असेस केलेले असून यातुन कंपलसरी एक्‍सेस रु.1,500/- कमी करुन नेट लॉस रु.750/- दाखविलेले आहे. सर्व्‍हेअर खालीद हाशमी यांनी दि.29/07/2009 रोजी सर्व्‍हे केला व दि.04/08/2009 रोजी त्‍यांचा अहवाल दिला, याप्रमाणे त्‍यांनी अनुक्रमांक 12 वर लॉस अण्‍ड डॅमेजेस मध्‍ये
 
1.       Front show/Dashboard/cabin   : Front both w/s glass broken. Front  show panel bent. Cain seats uprooted. LHS Cabin loss can be         ascertain after Lifting the vehicle.
 
2.       LOAD BODY AND CHASSIS FRAME :     Load body its joints loosened & its wooden base planks uprooted. LHS load body actual loss can be ascertain after Lifting the vehicle. Load body.
 
3.       STEERING SYSTEM                   :     Intact.
 
4.       COOLING SYSTEM                    :             Intact.
 
5.       AXLES AND WHEEL RIMS       :    RHS Discs found safe. LHS
discs to be checked after lifting 
the vehicle.
6.       SUSPENSION SYSTEM                        :    Intact.
 
7.       ENGINE ASSY.AND GENERAL :    Engine Assy.intact.
8.       ELECTRICAL SYSTEM              :    Battery local make its acid  
                                                                        drain out.         
                   
सर्व्‍हेअर हा पहीला व्‍यक्‍ती आहे व तो तांत्रिक व्‍यक्ति आहे ज्‍याने अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी करुन काय नुकसान झाले हे पाहीले यात सर्व्‍हेअरने स्‍वतः कबुल केले आहे की, वाहनाचे पुढचे दोन्‍ही ग्‍लास फुटले आहेत, फ्रंटशो, स्‍टेरिंग सिस्‍टीम या नुकसानीबद्यल त्‍यांनी कुठलीही रक्‍कम दिलेली नाही या शिवाय लोड बॉडी नटबोल्‍ड लूज झालेले आहे असे म्‍हटलेले आहे या दोन्‍ही गोष्‍टीसाठी ट्रक उचलल्‍यावरच त्‍याचे नुकसान कळू शकेल असे म्‍हटले असतांना गैरअर्जदारांनी फायनल सर्व्‍हे दाखल केला नाही व  उचलल्‍यानंतर याचेवर काय स्थिती होती हे सांगीतले नाही. जेंव्‍हा वाहन पलटी खाले तेंव्‍हा त्‍याचा उडन बॉडी व फ्रंटशोचे निश्चितच नुकसान झाले असणार व त्‍याबद्यल मुवायजा देणे आवश्‍यक असतांना सर्व्‍हेअरने ते दिलेले नाही. घटनास्‍थळ अहवालाचा जो पंचनामा करण्‍यात आला त्‍यात देखील समोरील काचा फूटलेले, कॅबिन तुटलेली, शो खराब झालेले, बॉडी वाकलेली व इतर नुकसान झाले असे म्‍हटले आहे. या विषयी सर्व्‍हेअरने कुठलीच रक्‍कम दिलेली नाही.  समोरील विंडशिल्‍ड ग्‍लास, बिडींग व त्‍यांचे फिटींग त्‍याबद्यल रु.2,250/- सर्व्‍हेअरने असेस केले आहे. समोरचा डॅश बोर्ड वाकलेले आहे व उडन बाडी खराब झालेली आहे, त्‍याबद्यल केजीएन समोर मोटर बॉडी बिल्‍डींग अण्‍ड रिपेअरींग याचे बिल दाखल केले असुन डॅशबोर्ड रिपेअरींग रु.21,000/-, लोकल बॉडी रिपेअरींग रु.38,000/- कॅबीनबद्यल रु.33,000/- असे एकुण रु.1,22,000/- चे बिल दाखविण्‍यात आले आहे हे काम अर्जदाराने प्रायव्‍हेट करुन घेतलेले आहे व याची दखल सर्व्‍हेअरने घेतलेले नाही. त्‍यामुळे गाडी पलटी खाल्‍यानंतर एवढे नुकसान झाल्‍याचे वाटत नाही व डॅश बोर्ड, बॉडी रिपेअरींग ही काही प्रमाणात नुकसान झालेले आहे हे गृहीत धरुन याचे अंदाजीत खर्च 25 टक्‍के म्‍हणजे 1,22,000/- च्‍या रु.30,500/- ग्‍लास चार्जेस रु.2,250/- + नट बोल्‍ट फिटींग रु.2,000/- + असीड रु.300/- = 35,050/- यामधुन रु.1,500/- पॉलिसी एक्‍सेस वजा केल्‍यास नेट लासॅ रु.33,550/- नुकसान भरपाई होईल व ही रक्‍कम अर्जदार मिळण्‍यास पात्र आहे. गैरअर्जदार यांनी रु.33,550/- रक्‍कम न देऊन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली आहे व सर्व्‍हेअरने देखील सेवेत त्रुटी कबुल केले आहे.
 
 
 
 
 
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                         आदेश.
 
1.   अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजुर करण्‍यात येते.
2.   गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रु.33,550/- एक महिन्‍याचे
आंत द्यावे. सदर रक्‍कमेवर दि.05/10/2009 पासुन पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत 9 टक्‍के व्‍याज द्यावे.
3.   गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासाबद्यल रु.2,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकालाच्‍या प्रती देण्‍यात याव्‍यात.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                  (श्रीमती.सुवर्णा.देशमुख)                                   (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                                सदस्‍या                                                             सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक.