ORDER | ( आदेश पारित व्दारा -श्री नितीन घरडे, मा.सदस्य ) - आदेश - ( पारित दिनांक –28 आक्टोबर 2015 ) - तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष क्रं.1 यांचे बुटीबोरी शाखेत खाते असुन त्याचा खाते क्रं.871510010009365 असा आहे त्याचप्रमाणे सदर खात्यावर तक्रारकर्तीस एटीएम ची सुविधा दिली आहे.
- दिनांक 28/5/2014 रोजी तक्रारकर्ता सहकुटुंब वैयक्तीक कामाकरिता भद्रावती येथे गेले असता त्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता भासल्याने त्यांनी जवळपास असलेल्या बँक आफ महाराष्ट्रचे भद्रावती येथील एटीएम मधुन रुपये 5000/- काढण्यास गेले असता संपूर्ण प्रक्रीया पार पाडून देखिल एटीएम मशीन मधुन रक्कम निघालीच नाही म्हणुन तक्रारकर्ता एटीएम मशीन जवळ 15 मिनीटे तिथेच थांबला. परंतु एटीएम मधुन रक्कम तर निघालीच नाही शिवाय रसिद सुध्दा निघाली नाही. परंतु तक्रारकर्त्यास पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी भद्रावतीतील दुस-या एचडीएफसी च्या एटीएममधुन रुपये 10,000/- काढले व दुस-यांदा रुपये 5000/- असे रुपये 15000/- काढले. त्यावेळी पैसे काढल्याबाबत रसिद प्राप्त झाली असता त्यात एकुण रुपये 20,000/- खात्यातुन कमी झाल्याबद्दलची माहिती मिळाली.
- तक्रारकर्त्याने याबाबत विरुध्द पक्ष क्रं.1 कडे दिनांक 3/6/2014 रोजी सविस्तर माहिती दिली परंतु विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी आम्हाला सदरबाबत योग्य ती चौकशी करावी लागेल असे असमाधानकारक उत्तर दिले. तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतात की सदरबाबत कोणतेही पाऊल विरुध्द पक्षाने याबाबत कोणतीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 17/6/2014 रोजी त्यांना लिखीत तक्रार दिली त्यानंतर विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी तक्रारर्त्यास रिचेकींग फार्म भरण्यास सांगीतला व या प्रकरणात सखोल चौकशी करुन 8 दिवसात माहिती देऊ असे सांगीतले परंतु 10 दिवसानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक 27/6/2014 रोजी तक्रारकर्त्याने स्वतः विरुध्द पक्ष क्रं.1 कडे गेले असता रिचेकींग फार्मवर बँकेचे कर्मचा-याने चुकीचा ट्रझॅक्शन आय डी मारल्यामुळे तुम्हाला पुन्हा फार्म भरुन विरुध्द पक्ष क्रं.2 कडे पाठवावा लागेल असे सांगीतले.
- त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.2 ने विरुध्द पक्ष क्रं.1 यांचेकडे या प्रकरणाबाबत दिनांक 18/7/2014 रोजी उत्तर पाठविले की No excess cash was found BOM ATM ID DA 018101 , location at Bhadrawati , Nagpur on dt. 28/5/2014 against THE TXN NO.022280.there is detail of full day transction of withdrawal and balance of ATM of Bank of Maharashtra.
- त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 6/8/2014 रोजी मुख्य शाखा येथे भेट देऊन स्वतःची चुक नसतांना आर्थिक नुकसान झाले त्यामुळे पुन्हा या प्रकरणात योग्य ती चौकशी करण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली व कुठल्याही न्यायालयात दावा दाखल करण्यास तुम्ही मोकळे आहात असे सांगीतले. या सर्व वागणुकीमुळे हताश होऊन दिनांक 25/9/2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं.1 ने त्यावर समाधानकारण उत्तर न दिल्यामुळे सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी तक्रारर्त्यास एटीएम मधुन प्रत्यक्ष रक्कम न मिळता खात्यातुन वजा झालेले रुपये 5000/- द.सा.द.शे.21 टक्के व्याजासह परत करावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 25,000/- मिळावे अशी मागणी केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारसोबत एकुण 11 दस्तऐवज दाखल केले त्यात बँकेस दिलेली तक्रार व त्याचे उत्तर, कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोवपावती, नोटीस चे उत्तर, बँक खाते, एटीएम कार्डच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
- यात विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 2 यांना मंचातर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष मंचामसमक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्ष क्रं.1 आपले लेखी जवाबात तक्रारकर्त्याच्या सर्व बाबी नाकारल्या असुन तक्रारकर्ता यांनी दिनांक 17/5/2014 रोजी लिखीत तक्रार केली व पुर्नेतपासणी फार्म भरुन दिला ही बाब अर्धसत्य आहे असे नमुद केले, तसेच या मंचाला ही तक्रार चालविण्याचे अधिकार नाही असाही आक्षेप घेतला व तक्रारकर्त्याने हेतुपुरस्सर विरुध्द पक्ष क्रं.1 ला या प्रकरणात सहभागी केले. तक्रारकर्त्याने केवळ बॅकेला बदनाम करण्याचे हेतुने ही तक्रार दाखल केली आहे. तरी तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज होण्यास पात्र आहे असा उजर घेतला.
- विरुध्द पक्ष क्रं.2 आपले जवाबात नमुद करतात की, विरुध्द पक्ष क्रं.1 ने तक्रारकर्त्याचे एटीएम संबंधी व्यवहाराचा अहवाल हा कार्ड सेल यांनी दिला. ही कंपनी संगणकामधे असलेल्या माहितीच्या आधारावर माहिती देते व ही स्वतंत्र संस्था असुन ती बॅक ऑफ महाराष्ट एटीएम कंपनी संबंधी मदत करते त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं.2 ने तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.
- पुढे त्यांनी आपल्या विशेष कथनात असे नमुद केले की , तक्रारकर्त्याने बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मधुन पैसे काढण्याचा व्यवहार केला असता योग्य ते वापर करता येत नसल्यामुळे चुकीचे बटन दाबले, किंवा पैसे एटीएम मधुन बाहेर येण्यापुर्वीच बटन दाबले, या सर्व तांत्रिक चुका तक्रारकर्त्याने केल्या असव्यात, त्याच बरोबर विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी मागीतलेल्या माहितीनुसार कार्ड सेल व्दारा दिलेली माहिती बरोबर होती. कारण विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी आमच्याकडे तक्रारकर्त्याचा एटीएम कार्ड नं.5264951750119897 असतांना चुकीचा एटीएम कार्ड नं.4052388715001937 असा पाठविला त्यामुळे कार्ड सेल व्दारे जी माहिती पाठविली होती ती बरोबर होती, ही चुक विरुध्द पक्ष क्रं.1 ची आहे.
- तसेच तक्रारकर्त्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्यावर तक्रारीची प्रत मिळताच योग्य ती चौकशी करण्यात आली व हे लक्षात आले की अतिरिक्त रक्कम त्यांच्या संगणकात दिसल्यावर आम्ही युटीआर नं.MAHBH15108234692 व्दो बँक ऑफ इंडिया, बुटीबोरी शाखेत जमा करण्यात आली. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 ची मंचास विंनती आहे की विरुध्द पक्ष क्रं.1 यांचे कडुन प्राप्त माहिती नुसार ही माहिती पाठविण्यात आली. त्यात विरुध्द पक्ष क्रं.2 ची काहीही चुक नाही. तसेच तक्रारकर्त्यास त्यांची रक्कम रुपये 5000/- प्राप्त झाल्याने आता कोणताही उजर रहिला नाही त्यामुळे सदरच्या तक्रारीतुन त्यांना वगळण्यात यावे अशी मागणी केली.
- तक्रारीत दाखल कागदपत्र, तक्रारकर्त्याचे पुरसिस, उभयपक्षकारांचा लेखी युक्तीवाद, वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो.
- तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं.1 बॅक ऑफ इंडिया, बुटीबोरी शाखा, नागपूर येथील ग्राहक असुन या शाखेत त्याचे बचत खाते आहे व त्यांनी त्यामधे एटीएमची सुविधा घेतलेली आहे. तक्रारकर्ता व त्याचे नातेवाईक कुटुंबासह भद्रावती येथे गेले असता त्यांना पैशाची आवश्यकता पडल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्रं.2 यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या भद्रावती येथील एटीएम मधुन पैसे काढण्याचा एटीएम मशीचा उपयोग केला. परंतु व्यवहार करुनही पैसे एटीमएम मधुन बाहेर आले नाही. पुढे तिथे 15 मिनीटे तिथे थाबुंनही काही उपयोग झाला नाही म्हणुन एचडीएफसी चे एटीएम दोनदा वापरुन एकदा 10,000/- व दुस-यांदा रुपये 5000/- काढले असता एकुण रुपये 20,000/- खात्यातुन कपात झाल्याचे तक्रारकर्त्यास समजले.
- विरुध्द पक्ष क्रं.2 ने ही बाब सत्या असल्याचे आपल्या लेखी युक्तीवादात व उत्तरात नमुद केले व त्यांनी असेही नमुद केले की जर एखादे एटीएम पैसे काढण्याचा प्रक्रीया काही तांत्रिक कारणाने अर्धवट राहिले तर लगेच 12 दिवसात आपोआपस त्या खातेधारकाच्या खात्यात पैसे जमा होतात. परंतु या प्रकरणात असे झाले नाही. त्याच प्रमाणे विरुध्द पक्ष क्रं.1 यांचे कडे याबाबत तक्रार केली त्यावेळे तक्राकर्त्याला समाधानकारक उत्तर दिले नाही. किंवा चौकशी करतांना तक्रारकर्त्याचा एटीएम कार्ड नंबर चुकीचा पाठविला त्यामुळे तक्रारकर्त्याला त्रास झाला.
- परंतु विरुध्द पक्ष क्रं.2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होता त्यांनी चौकशी करुन रुपये 5000/- दिनांक 20/4/2015 म्हणजेच तब्बल एक वर्षानंतर तक्रारकर्त्याचे खात्यात जमा करण्यात आले आहे. विरुध्द पक्षाचे सदर वर्तनावरुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत असल्याचे मंचाचे निदर्शनास येते.करिता हे मंच पूढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अं ती म आ दे श - 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने प्रत्येकी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/-(रुपये पाचशे फक्त) असे एकुण 3,500/- रुपये तक्रारकर्त्यास अदा करावे. 4. सदर आदेशाचे पालन विरुध्द क्रं.1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावे. 5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या. | |