जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 114/2012 दाखल तारीख :01/08/2012
निकाल तारीख :14/05/2015
कालावधी :02 वर्षे 09 म.13 दिवस
पृथ्वीराज हरिभाऊ तत्तापुरे, (मो.क्र.9422470848)
वय 40 वर्षे, धंदा व्यापार,
रा. शिवनी (बु.) ता. औसा जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) शाखा व्यवस्थापक,
बजाज अलायन्स जनरल इंशुरन्स कंपनी लि.
नावंद आर्केड दु.नं. 32 व 34,
मंठाळे नगर, कव्हा रोड, लातूर.
2) बजाज अलायन्स जनरल इंशुरन्स कंपनी लि.
नोदणीकृत कार्यालय, जी.ई.प्लाझा,
एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे 411 006. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे : अॅड. अनिल क.जवळकर.
गै.अ.क्र.1 व 2 तर्फे :अॅड.एस.जी.दिवाण.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा मौजे शिवनी (बु.) ता. औसा जि. लातूर येथील रहिवाशी असून त्यांनी स्वत:च्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार चाकी वाहन घेण्याचे ठरवले. अर्जदाराने सदरचे वाहन 2008 साली खरेदी केले. अर्जदाराने सदरचे वाहन आर.टी.ओ. लातूर यांचेकडून नोंदणी करुन घेतले. आर.टी.ओ. लातूर यांनी अर्जदाराचे वाहनास एम.एच. 24 एफ 3660 असा क्रमांक दिला. अर्जदाराने खरेदी केलेल्या वाहनाचा गैरअर्जदार यांच्याकडे विमा काढला होता. सदर विम्याचा कालावधी दि. 29.08.2009 ते 28.08.2010 असा होता. सदर विम्याचा पॉलिसी क्र. ओ.जी.- 10-20-10 – 1803 – 00000241असा होता. अर्जदाराच्या वाहनाची किंमत 5 टक्के वजा करु रु. 5,48,307/- एवढी होती. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वाहनाची किंमत 5,48,307/- धरुन सदरचा विमा काढला होता. सदर विम्याचा हप्ता रक्कम रु. 20,465/- असा होता.
दि. 12.05.2010 रोजी अर्जदार व त्याचा भाऊ शिवशंकर हरिभाऊ तत्तापुरे हे कामदार रोड लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा येथे त्यांच्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी आले. साधारणत: दुपारी 12.00 ते 12.30 च्या दरम्यान अर्जदाराने त्यांचे वाहन कामदार रोडवर असलेल्या पार्किंकमध्ये लावुन गडबडीने रक्कम काढण्यासाठी गेले. जवळपास अर्धा ते पावुन तासानंतर बँकेतील रक्कम काढुन त्यांच्यावाहनाची जागी येवुन पाहिले असता, अर्जदाराचे वाहन ज्या ठिकाणी लावले होते त्या ठिकाणी नव्हते. अर्जदाराने दि. 14.05.2010 रोजी पोलिसात तक्रार दिली, त्या प्रमाणे अर्जदाराने महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स तसेच गैरअर्जदारास वाहन चोरी झाल्या बद्दल कळविले. गांधी चौक लातूर येथील पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्हा नोंदकरुन घेवुन चौकशी केली व सदरचे वाहन शोध घेऊन ही सापडून येत नाही म्हणुन अंतिम अहवाल दिला. जवळपास अडीच महिन्यांनी शोध घेतला, सदरचे वाहन व चोर सापडून आला नाही म्हणुन (ऐ) समरी केली.
अर्जदाराने पोलिसस पेपर्स, वाहनाची कागदपत्रे व वाहनाचा विमा मिळण्यासाठी लागणारी संपुर्ण आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदाराला देऊन विमा रक्कमेची मागणी केली. दि. 27.07.2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा अर्जदाराने आपले वाहन चोरी व्हावे या उद्देशाने जानुन बुजुन वाहनाची चावी वाहनातच ठेवुन गेले व वाहन योग्य ती काळजी न घेतल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे विमा रक्कम देता येत नाही म्हणुन विमा दावा नाकारला. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात ग्राहक व सेवा पुरविणार हे नाते निर्माण झाले.
अर्जदाराने विनंती केली की, अर्जदारास सर्व गैरअर्जदारांनी रक्कम रु. 5,48,307/- व त्यावर 15 टक्के दराने व्याज दि. 12.05.2010 पासुन संपुर्ण रक्कम अर्जदाराचे पदरी पडे पर्यंत देण्याचा आदेश सर्व गैरअर्जदारांना करण्यात यावा, तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 20,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
2012 (3)CPR 46 (NC)
Insurance company bound to prove grounds of repudiation of insurance
claim.
विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराची गाडी महिंद्रा DLS लोगन कार MH 24 F 3660 ही चोरी झाल्याची तक्रार दिलेली आहे व खरोख्र वाहनाची चोरी ही दि. 12.05.2010 रोजी झालेली आहे. सदरचा FIR देण्याचा उशीर हा 1 महिना 5दिवसाचा झालेला आहे. अर्जदाराने सदरची घटना वाहन चोरी झाल्याबरोबर गैरअर्जदारास कळवायला पाहिजे होती. 1 महिना 5 दिवस अर्जदार हा केवळ आपली गाडी शोधत होता ही बाब कायदेशीर दृष्टया चुकीची आहे. जर ताबडतोब सदरच्या घटनेची सुचना विमा कंपनीस दिली असती तर गैरअर्जदाराने सदरची गाडी शोधण्याचा प्रयत्न केला असता तसेच दि. 12.05.2010 रोजी अर्जदाराने सदरची कार ही पार्क करुन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पैसे काढायला गेला होता, व पार्क करतांना त्याने स्वत:ची गाडीला चावी लावुन तसाच ठेवुन बँकेत गेला होता. त्यामुळे चोरी करण्यात आली. बँकेतून आल्यावर पाहीले तर तेथे गाडी नव्हती. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे पोलीस स्टेशनला कळवलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या पॉलिसीच्या अट क्र.5 चा भंग केला आहे. त्याने आपल्या गाडीची काळजी घेतलेली नाही. अर्जदाराने स्वत:च गाडीची चावी गाडीला लावुन विसरलेली आहे याचाच अर्थ यात अर्जदाराचा निष्काळजीपणा दिसून येतो . म्हणुन सदरची अर्जदाराची मागणी बेकायदेशिर असल्यामुळे फेटाळण्यात यावी.
मुद्दे _ उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे विमा उतरविला होता ही बाब गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्य आहे व गाडी क्र.एम.एच.24 एफ 3660 पॉलिसी क्र. OG-10-2010-18-3-00000241 असा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे असून, अर्जदाराने सदरची गाडी ही दि. 12.05.2010 रोजी चोरी झाली होती, त्यानंतर अर्जदाराने FIR पोलिस स्टेशन गांधी चौक लातूर येथे दि. 14.05.2010 रोजी केलेला आहे. तसेच दि. 24.05.2010 राजी महिंद्रा फायनान्सला गाडी चोरी झाल्या बाबत कळवलेले आहे. तसेच सदर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दि. 17.06.2010 या दिवशी चोरी झाल्याचे कळवले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ही सदर गाडीचा विमा उतरविलेल्या कंपनीस अर्जदाराच्या गाडीची चोरी झाल्याची माहिती 24 तासात न देता त्यास 1 महिना 5 दिवस एवढा वेळ लागलेला ओ. यावरुन गैरअर्जदार गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम परत केला दि. 27.07.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या म्हणण्यानुसार अर्जदार व त्याचा भाऊ असे दोघेजन गाडीत बसलेले होते त्यापैकी एकजन बँकेत गेला असता व एकाने गाडी सांभाळली असती तर अशी घटना घडलीच नसती तसेच सदर गाडी चालवित असतांना अर्जदाराने स्वत:च्या गाडीची चावी ज्यावेळेस आपण बाहेर कुठेही गाडी पार्क करताना आपल्या जवळ ठेवायला हवी परंतु चावी गाडीलाच लावुन ठेवल्यामुळे चोरांनाएक प्रकारे गाडी चोरुन नेण्यासमदतच केल्या सारखे दिसते असे गैरअर्जदाराचे म्हणणे लक्षात घेतले असता, यात अर्जदाराची गाडी चोरी होण्यास स्वत: अर्जदारच जबाबदार आहे, असे दिसून येते. म्हणुन सदरचा अर्ज नामंजुर करत आहोत, सदर अर्ज नामंजुर करण्याचे कारण अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने त्रूटी केलेली नाही हे निष्पन्न होते. उलटपक्षी अर्जदारानेच स्वत:ची गाडी चोरी झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना तात्काळ घटनेची माहिती न देता 1 महिना 5 दिवसाचा विलंब लावलेला आहे. त्यामुळे सदर चोरीला गेलेल्या गाडीस पहिल्या 24 तासात शोधने विमा कंपनीस व पोलिस यास शक्य झाले असते. मात्र त्यात विलंब लागल्यामुळे अर्जदाराची चोरी गेलेली गाडी मिळु शकली नाही. तसेच याबाबतची माहिती ताबडतोब गैरअर्जदारास दिलेली नाही त्यामुळे ही बाबही नजरेआड करता येत नाही. ज्या विमा कंपनीने सदरील गाडीचा विमा काढलेला आहे, गैरअर्जदारालाच सदर चोरीची घटना घडल्याची माहिती 1 महिना 5 दिवसाच्या विलंबाने मिळते ही बाब खरोखरच योग्य वाटत नाही, मग गैरअर्जदार सेवा देण्यात त्रूटी केली हे कसे काय म्हणता येईल, म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे म्हणणे मंचाला योग्य वाटते. कारण घटना घडल्यानंतर पहिल्या 24 तासात जो पुरावा गोळा करता येतो त्यात जी सत्यता असते ती विलंबा नंतर त्यात सत्यता येवु शकत नाही. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज फेटाळत आहे..
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2. खर्चा बाबत काही आदेश नाही.
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**