Maharashtra

Akola

CC/16/49

Kuntabai Arvind Burange - Complainant(s)

Versus

Branch Manager,Vidarbha Kokan Gramin Bank - Opp.Party(s)

Nakat

18 Jan 2017

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/16/49
 
1. Kuntabai Arvind Burange
At.Post.Rajanda,Tq.Barshitakali,
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Vidarbha Kokan Gramin Bank
Branch Rajanda,Tq.Barshitakali,Dist.Akola
Akola
Maharashtra
2. Manager,Agricultural Insurance Co.of Insurance Ltd.Mumbai.
Stock Exchange Towers,2o th floor,Dalal Street,Fort, Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:Nakat, Advocate
For the Opp. Party: A Awachar G H jain, Advocate
 G H jain, Advocate
Dated : 18 Jan 2017
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :18.01.2017 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.

         तक्रारकर्तीची मौजे राजंदा -2, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथे गट नं. 43/3, क्षेत्र 3 हे.21 आर. शेतजमीन आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्र. 2 चा पिक विमा हा विरुध्‍दपक्ष क्र. 1 मार्फत जुलै 2014 मध्‍ये सोयाबिन या पिकासाठी घेतला होता व त्‍यापोटी विम्‍याचा हप्‍ता     रु. 1866/- दि. 30/7/2014 रोजी भरला.  अत्‍यल्‍प पावसामुळे तक्रारकर्ती व परिसरातील इतर शेतक-यांचे संपुर्ण पिक पावसा अ‍भावी उध्‍वस्‍त झाले, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे विम्याची रक्‍कम तक्रारकर्तीस देय आहेत.  परंतु विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी सोयाबिन या पिकासाठी जी रक्‍कम, पिक विमा म्‍हणून मंजूर केली, त्‍यामध्‍ये रु. 11,408/- कमी जमा केले, या बाबत विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांच्‍याकडे तक्रारकर्ते व परिसरातील इतर शेतकरी गेले असता,त्‍यांनी देय रक्‍कम खात्‍यात जमा होईल, असे सांगितले.  परंतु आज पर्यंत तक्रारकर्तीच्‍या  खात्‍यात सदर रक्‍कम जमा झाली नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 28/12/2015 रोजी विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांना सुचनापत्र पाठवून व्‍याजासह रकमेची मागणी केली. परंतु विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने जबाब पाठवून सर्व गोष्‍टी नाकबुल केल्‍या, तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी जबाब पाठवून, स्‍पष्‍टपणे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी चुकीची माहीती पाठविल्‍यामुळे तक्रारकर्तीचे नुकसान झाले, विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी सुधारीत दावे मुदतीनंतर प्रस्‍तुत केले, तसेच चुकीमुळे संबंधीत कास्‍तकाराचे नुकसान झाले असेल तर ती संबंधीत शाखा, संस्‍था हे त्‍या  कास्‍तकराची नुकसान भरपाई करुन देण्‍यास जबाबदार राहील. अशा प्रकारे विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 हे त्‍यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीचा चुकीचा दावा विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे प्रस्‍तुत केल्‍यामुळे तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी पिक विम्‍याची संपुर्ण रक्‍कम न दिल्‍यामुळे, तक्रारकर्तीचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे विरुध्‍दपक्षांनी सेवा देण्‍यात न्‍युनता दर्शविली आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करावी व विम्याची कमी मिळालेली रक्‍कम रु. 11,408/-, सुचनापत्र पाठविण्‍याचा खर्च रु. 2000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 25,000/- व प्रस्‍तुत तक्रारीचा खर्चापोटी रु. 10,000/- विरुध्‍दपक्षाकडून व्‍याजासह मिळावे.        

            सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 07 दस्तऐवज   पुरावा म्हणून  जोडण्‍यात आले आहे.

विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-

2.        विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी त्‍यांचा लेखी जबाब दाखल केला असून त्‍यानुसार त्‍यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल केले व असे नमुद केले की, सदरहु तक्रार ही वि मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येत नाही, कारण विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे कार्यक्षेत्र हे मुंबई येथे आहे व तक्रारकर्तीच्‍या तक्रारीतील सर्व व्‍यवहार विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे झालेला आहे.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी पिक विम्‍याची संपुर्ण रक्‍कम विरुध्दपक्ष क्र. 2 कडे जमा केली आहे व तक्रारकर्तीची संपुर्ण माहीती विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे पाठविली आहे. विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांना कोणतीही चुकीची माहीती पुरविली नाही. विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी, तक्रारकर्तीने जेवढा प्रिमियम भरला, त्‍या संबंधी जी पिक विम्‍याची रक्‍कम पाठवायची आहे, ती पाठविली नाही. विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्र. 2 च्‍या निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणामुळे तक्रारकर्तीला अपुरी पिक विम्याची रक्‍कम मिळाली आहे व त्‍याला विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे जबाबदार आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

   

विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-

        विरुध्‍दपक्ष क्र. 2  यांनी त्‍यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.  त्‍यानुसार त्‍यांनी तकारीतील आरोप नाकबुल करुन, असे नमुद केले की,     ते केवळ केंद्र सरकार व राज्‍य सरकारच्‍या योजना राबवणारी संस्‍था  आहे.  ही संस्‍था बँक व इतर तत्‍सम वित्‍तीय संस्‍थेकडून प्रिमियम गोळा करते. विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी, राजंदा सर्कल मधील विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना ज्‍या शेतक-यांचे प्रिमियम प्राप्‍त झाले, अशा शेतक-यांचे मुदतीत पाठवलेले प्रस्‍ताव मंजुर केले आहे.  सदर योजनेनुसार विरुध्‍दपक्ष क्र. 1 त्‍यांच्‍या शाखा पातळीवर शेतक-यांनी जमा केलेल्‍या पिकानुसार व महसुल भागानुसार फॉर्मचे रेकॉर्ड तयार करते व त्‍यातील माहीती विरुध्‍दपक्ष क्र. 2 ला विहीत मुदतीत पुरविते.  त्‍या प्रमाणे माहीती प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्तीचा प्रस्‍ताव मंजुर करुन‍ मिळालेल्‍या  माहीतीनुसार खरीप 2014 च्‍या पिकाची विमा रक्‍कम प्रदान केली.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी दि. 1/12/2015 रोजी पत्र पाठवून राजंदा सर्कलमधील तक्रारकर्तीसह इतर शेतक-यांच्‍या सुधारीत घोषणापत्रांचा विचार करण्‍याची विनंती केली.  सदर पत्रात विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने असे नमुद केले की,

    In Kharif 2014 we had sent you declaration of crop Soyabean, Udid, Cotton, Mung, Tur, ad Sesamum.  But inadvertently the branch has written less area in hectares for these crops due to which sum insured was less valued

      यावरुन, विरुध्‍दपक्ष क्र. 1 असलेल्‍या बँकेची शेतक-यांचे विमा प्रस्‍ताव पाठविण्‍यात चुक झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या सदर पत्राला विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने दि. 8/12/2015 ला उत्‍तर पाठविले.  सदर पत्रात असे नमुद केले की, ‘ बँकेकडून सुधारीत घोषणा पत्रांचा विचार करण्‍याची विनंती, क्‍लेम सेटल झाल्‍यानंतर फार उशीराने केल्‍या गेली असल्‍याने सदर विनंतीचा विचार करता येणार नाही.विशेष अटी शर्तीनुसार संबंधीत बँकेकडून काही चुक झाल्‍यास अथवा काही राहुन गेल्‍यास संबंधीत बँकच सदर नुकसानीस व नुकसान भरपाईस जबाबदार राहील. त्‍यामुळे सक्षम सरकारी अधिका-यांकडे सदर प्रस्‍ताव विचारासाठी पाठवावा.  आपली विनंती नामंजुर करुन आपला प्रस्‍ताव परत पाठवित आहोत.’ विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने पात्र दावे मंजुर करुन त्‍याची संपुर्ण रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे RTGS  द्वारे जमा केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या नुकसानीस विरुध्‍दपक्ष क्र. 2 जबाबदार नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी.  

3.    त्यानंतर तक्रारकर्तीतर्फे प्रतिज्ञालेख,प्रतिउत्‍तर  व लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 तर्फे प्रतिज्ञालेखावर पुरावा व लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍यात आला तसेच, तोंडी युक्तीवाद करण्‍यात आला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.         सदर प्रकरणात उभय पक्षांतर्फे दाखल केलेले दस्‍तऐवज व तक्रारकर्ती व विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या लेखी युक्‍तीवादाचे अवलोकन करुन तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 चा युक्‍तीवाद ऐकुन काढलेल्‍या निष्‍कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्‍यात आला.

  1. दाखल दस्‍तांवरुन, तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांची ग्राहक असल्‍याचे निदर्शनास येते व या मुद्दयावर विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांचा आक्षेप नसल्‍याने तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 ची ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्‍यात येत आहे. तसेच तक्रारकर्तीचा व्‍यवहार विरुध्‍दपक्ष क्र. 1 मार्फत विरुध्‍दपक्ष क्र. 2 शी झाल्‍याने विरुध्‍दपक्ष क्र. 2 चे ऑफीस जरी मुंबईला असले तरी, सदर तक्रार या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात येत आहे.
  2. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीनुसार तक्रारकर्तीने तिच्‍या मालकीच्‍या मौजे राजंदा -2 येथील शेत गट नं. 43/3 क्षेत्रफळ 3 हे.21 आर, शेतातील सोयाबीन या पिकाचा पीक विमा, विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या  मार्फत विरुध्‍दपक्ष क्र. 2 ह्यांचे कडून काढला होता.  दुष्‍काळामुळे तक्रारकर्तीचे पुर्ण पीक उध्‍वस्‍त झाले.  विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्तीच्‍या खात्‍यात विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांच्‍याकडे रु. 11,408/- इतकी अपुरी पीक विम्याची रक्‍कम जमा केली. तक्रारकर्ती, गावातील इतर शेतक-यांबरोबर विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे वेळोवेळी गेली असता, विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचे सोबत संवाद साधुन आश्‍वासन दिले की, लवकरच तक्रारकर्तीच्‍या खात्‍यात उर्वरित देय रक्‍कम खात्रीलायक जमा होईल, परंतु सदर आश्‍वासन पाळले न गेल्‍याने,तक्रारकर्तीने उभय विरुध्‍द पक्षांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली असता, विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने नोटीसच्‍या उत्‍तरात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी त्‍यांचे तर्फे सर्व कार्यवाही पुर्ण केली असून, विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांच्‍याकडे तक्रारकर्तीचा दावा प्रलंबीत आहे.  विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी दिलेल्‍या  नोटीसच्‍या  उत्‍तरात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी चुकीची माहीती पाठविल्‍यामुळे तक्रारकर्तीचे नुकसान झाले आहे.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी ठरलेल्‍या मुदतीत तक्रारकर्तीचा व इतर योग्‍य ते दावे विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे प्रस्‍तावित करणे अपेक्षीत होते, परंतु विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी अर्धवट माहीती पाठवून चुकीचे दावे प्रस्‍तुत केले व नंतर विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीचे व इतर शेतक-यांचे सुधारीत दावे मुदतीनंतर प्रस्‍तुत केले, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांना पैसे देणे बंधनकारक नाही, तर विरुध्‍दपक्ष क्र. 1 हे त्‍यासाठी जबाबदार राहतील. उभय विरुध्‍दपक्षाच्‍या  बेजबाबदारपणामुळे तक्रारकर्तीचे नुकसान झाले व तिला त्रास सोसावा लागला.  म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली.
  3. विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने त्‍यांच्‍या जबाबात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचे कार्यक्षेत्र मुंबई येथे आहे व तक्रारकर्तीच्‍या  तक्रारीतील सर्व व्‍यवहार विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांचेकडे झाला असल्‍याने, सदर तक्रार खारीज करावी. विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी पीक विम्‍याची संपुर्ण रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 2 कडे जमा केली आहे व तक्रारकर्तीची संपुर्ण माहीती विरुध्‍दपक्ष क्र. 2 ला पाठविलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांची ही जबाबदारी आहे की, त्‍यांनी शेतक-यांचे किती प्रिमियम आहे व त्‍यांनी प्रिमियमची किती रक्‍कम पाठविली, याची शहानिशा करुन तक्रारकर्तीला पिक विम्याची रक्‍कम द्यायची होती. परंतु विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारर्तीने जेवढा प्रिमियम भरला, तेवढी पीक विम्‍याची रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे, तक्रारकर्तीला द्यायला पाठविली नाही.  त्‍यामुळे सर्व बाबींची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांची आहे.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 1 हे तक्रारकर्तीच्‍या कोणत्याही नुकसानीला जबाबदार नाही.
  4. विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी त्‍यांचा जबाब इंग्रजीतुन सादर केला, त्‍याचा थोडक्‍यात सारांश येणे प्रमाणे..
  5.      विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांच्‍या म्हणण्‍यानुसार ते केवळ केंद्र सरकार व राज्‍य सरकारच्‍या योजना राबवणारी संस्‍था आहे.  ही संस्‍था बँक व इतर तत्‍सम वित्‍तीय संस्‍थेकडून प्रिमियम गोळा करते.  हे म्‍हणणे खरे आहे की, विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी, राजंदा सर्कल मधील विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांना ज्‍या शेतक-यांचे प्रिमियम प्राप्‍त झाले, अशा शेतक-यांचे मुदतीत पाठवलेले प्रस्‍ताव मंजुर केले आहे. सदर योजनेनुसार विरुध्‍दपक्ष क्र. 1 त्‍यांच्‍या शाखा पातळीवर शेतक-यांनी जमा केलेल्‍या पिकानुसार व महसुल भागानुसार फॉर्मचे रेकॉर्ड तयार करते व त्‍यातील माहीती विरुध्‍दपक्ष क्र. 2 ला विहीत मुदतीत पुरविते.  त्‍या प्रमाणे माहीती प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्तीचा प्रस्‍ताव मंजुर करुन‍ मिळालेल्‍या माहीतीनुसार खरीप 2014 च्‍या पिकाची विमा रक्‍कम प्रदान केली.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी दि. 1/12/2015 रोजी पत्र पाठवून राजंदा सर्कलमधील तक्रारकर्तीसह इतर शेतक-यांच्‍या सुधारीत घोषणापत्रांचा विचार करण्‍याची विनंती केली.  सदर पत्रात विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने असे नमुद केले की,

    In Kharif 2014 we had sent you declaration of crop Soyabean, Udid, Cotton, Mung, Tur, ad Sesamum.  But inadvertently the branch has written less area in hectares for these crops due to which sum insured was less valued

      यावरुन, विरुध्‍दपक्ष क्र. 1 असलेल्‍या बँकेची शेतक-यांचे विमा प्रस्‍ताव पाठविण्‍यात चुक झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  विरुध्‍दपक्ष क्र. 1 च्‍या सदर पत्राला विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने दि. 8/12/2015 ला उत्‍तर पाठविले.  सदर पत्रात असे नमुद केले की, ‘ बँकेकडून सुधारीत घोषणा पत्रांचा विचार करण्‍याची विनंती, क्‍लेम सेटल झाल्‍यानंतर फार उशीराने केल्‍या गेली असल्‍याने सदर विनंतीचा विचार करता येणार नाही.विशेष अटी शर्तीनुसार संबंधीत बँकेकडून काही चुक झाल्‍यास अथवा काही राहुन गेल्‍यास संबंधीत बँकच सदर नुकसानीस व नुकसान भरपाईस जबाबदार राहील. त्‍यामुळे सक्षम सरकारी अधिका-यांकडे सदर प्रस्‍ताव विचारासाठी पाठवावा.  आपली विनंती नामंजुर करुन आपला प्रस्‍ताव परत पाठवित आहोत.’ विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने पात्र दावे मंजुर करुन त्‍याची संपुर्ण रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्र. 1 कडे RTGS  द्वारे जमा केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या नुकसानीस विरुध्‍दपक्ष क्र. 2 जबाबदार नाही.

  1. उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्‍यावर मंचाने दाखल दस्‍तांचे अवलोकन केले.  विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने त्‍यांच्‍या जबाबात उल्‍लेख केलेल्‍या  पत्रांचे अवलोकन केल्‍यावर मंचाला विरुध्‍दपक्ष क्र. 2 च्‍या  म्‍हणण्‍यात तथ्‍य आढळते. (पृष्‍ठ क्र. 60 ते 62, दस्‍त क्र. D &E ) तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 2 ने, विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने प्रस्‍ताव पाठविलेल्‍या  शेतक-यांचा क्‍लेम मंजुर करण्‍यापुर्वी, सदर माहीती / क्लेम मध्‍ये  काही चुका असल्‍यास दुरुस्‍ती करुन पाठवण्‍याचे सुचना देणारे पत्र दि. 10/2/2015 ला विरुध्‍दपक्ष क्र. 1 ला पाठविले होते ( पृष्‍ठ क्र. 63 दस्‍त क्र. F ) सदर पत्रात भुतकाळात नोडल बँक व तत्‍सम वित्‍तीय संस्‍थांकडून झालेल्‍या  चुकांमुळे अनेक शेतकरी योग्‍य  लाभांपासून वंचीत राहील्‍याचे व त्यामुळे वाद, कायदेशिर दावे दाखल झाले असल्याचेही नमुद केले आहे. परंतु सदर पत्राचा तातडीने विचार करुन विरुध्‍दपक्ष क्र. 1 ने कुठलीही कारवाई विहीत मदतीत केलेली दिसत नाही.  त्‍यामुळे प्राप्‍त  असलेल्‍या माहीतीच्‍या आधारे विरुध्‍दपक्ष क्र 2 ने तक्रारकर्ती व इतर शेतक-यांचा विमा दावा मंजुर केल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास आले आहे.

     त्‍याच प्रमाणे, विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांना भारत सरकारने पाठविलेल्‍या ‘पत्र क्र. 11017/01/2016-Credit II dated 5/12/2016या पत्राचा संदर्भ घेऊन विरुध्‍दपक्ष क्र. 1 ला पाठविलेले पत्र मंचात दाखल केले.  त्‍या पत्रात....

   “ Decision of the Committee :- The declaration and premium from the bank were received within cutoff date. However, while sending the declarations of AIC, bank has committed the mistake due to which the Sum Insured has been increased after settlement of claims of the season. It is noticed that the non-payment of claims to the farmers are due to lapses on the part of banks. Keeping in view of the interest of the farmers who paid the premium well within the cut-off date to the bank, Committee decided for the settlement of claims of the farmers but the concerned bank should bear entire liabilities of claims as stipulated in the guidelines of the scheme.”

    ... असे नमुद केले आहे.

    वरील सर्व परिस्थीतीवरुन व दाखल दस्‍तांवरुन विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनीच तक्रारकर्तीला सेवा देतांना निष्‍काळजीपणा केल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास आले आहे. सबब तक्रारकर्तीच्‍या झालेल्‍या  नुकसानीस विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनाच जबाबदार धरुन,त्‍यांचेवर तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईची जबाबदारी मंचाने निश्चित केली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केलेल्‍या ‘ खात्रीलायक पिक विम्‍याची कमी मिळालेली रक्‍कम ’ रु. 11,408/- या बद्दल उभय विरुध्‍दपक्षांनी आक्षेप न घेतल्‍याने, सदर रक्‍कम पुर्णपणे द.सा.द.शे. 8 टक्‍के  व्‍याजासह मंजुर करण्‍यात येते. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व प्रकरणाचा खर्चापोटी रु. 3000/- विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तकारकर्तीला देण्‍याचे आदेश, हे मंच करित आहे.

     सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे...

  •  
  1. तक्रारकर्ती यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
  2. विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीस रु. 11,408/- ( रुपये अकरा हजार चारशे आठ फक्‍त ) प्रकरण दाखल तारखेपासून म्‍हणजे दि. 5/3/2016 पासून प्रत्‍यक्ष अदायीपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्‍के  दराने, व्‍याजासह द्यावेत.
  3. विरुध्‍दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्तीस शारीरिक,मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- (रुपये पांच हजार फक्‍त ) व प्रकरणाच्‍या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्‍त ) द्यावे.
  4. सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसात करावे.
  5.   सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 
 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.