निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः-17/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 16/09/2013
कालावधी 04 महिने. 14 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मनिष पिता सुभाषराव पांचाळ. अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.पेडगांव रोड, परभणी मु.पो.ता.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचागाडीचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून त्याने त्याची इंडीका कार एम.एच.23 ई 8822 चा मालक व ताबेदार आहे व अर्जदाराने सदरच्या कारचा विमा गैरअर्जदाराकडे उतरवला होता. ज्याचा पॉलिसी क्रमांक 230601/31/12/01/00001159 असा असून त्याचा कालावधी 07/05/2012 ते 06/05/2013 असा होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 15/12/2012 रोजी तरोडा पाटीवर त्याचा ड्रायव्हर सदरची कार रस्त्याच्या बाजुला लावुन चहा पीन्यासाठी गेला असता परभणीकडून एक वाहन भरधाव येवुन सदर कारला धडक दिली व त्यामुळे कारचे पुष्कळ नुकसान झाले.
सदर घटनेची माहिती त्याच दिवशी गैरअर्जदार विमा कंपनीस कळवण्यांत आले व दुरुस्तीसाठी प्रेम मोटर्स येथे नेले. नंतर 17/12/2012 रोजी विमा कंपनीस सदर घटने बाबत लेखी कळवण्यांत आले.
नंतर 18/12/2012 रोजी सेलमोकर नावाचे सर्व्हेअरनी गाडीचा सर्व्हे केला व तसेच कंपनीकडे इस्टीमेंट व क्लेमफॉर्म, ड्रायव्हींग लायसेंससह आर.सी.बुक, पॉलिसीच्या नकला देण्यांत आल्या. प्रेम मोटर्स यांनी सदर गाडीच्या दुरुस्तीचा खर्च 61,939/- रुपये असे इस्टीमेंट दिले, पण सर्व्हेअर यांनी त्यांच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये गाडीचे नुकसान 25,837/- रुपयाचे झाले असे सांगीतले आहे.
अर्जदाराने सदरच्या गाडीच्या अपघाताच्या नुकसान भरपाईपोटी गैरअर्जदाराकडे 61,939/- रुपये मागीतले असता गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 03/03/2013 रोजी ड्रायव्हींग लायसेंस अपघाताच्या दिवशी व्हॅलिड नव्हते, असे कारण देवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळला, म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, अपघातात झालेल्या नुकसान भरपाईपोटी अर्जदारास 61,939/- रुपये 18 टक्के व्याजासह देण्यांत यावे.व तसेच मानसिकत्रसापोटी रुपये 25,000/- व खर्चापोटी रुपये 5000/- देण्यांत यावे.
अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 14 कागदपत्रांच्या यादीसह 14 कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये अर्जदाराचे गैरअर्जदारास दिलेले पत्र, क्लेमफॉर्म, आर.सी.बुक, पॉलिसी कॉपी, ड्रायव्हींग लायसेंस, बील चेक रिपोर्ट, टॅक्स इन्व्हॉईस, सर्व्हे रिपोर्ट, प्रेम मोटर्सचे बील, गैरअर्जदाराचे पत्र,R.C. Particulars,आर.टी.ओ.रिसीप्ट, रेप्युडेशन लेटर, ई.चा सामावेश आहे.
गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर होवुन नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब सादर केला.
त्यात त्यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी असून गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेतत्रुटी दिलेली नाही, म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी व तसेच त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या गाडीचा अपघाताची माहिती मिळताच गैरअर्जदार विमा कंपनीने ताबडतोब सर्व्हेअर नियुक्त करुन त्याचा रिपोर्ट घेतला व त्याच्या रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या गाडीचे 25,837/- रुपयांचे नुकसान झाले.
गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, सदरच्या गाडीच्या अपघाताच्या वेळी ड्रायव्हरचे लायसेंस व्हॅलिड नसल्यामुळे अर्जदाराचा विमादावा नाकारण्यांत आला, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व म्हणून मंचास विनंती केली आहे की, तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या गाडीचे अपघातात झालेली
नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली
आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा इंडीका कार क्रमांकएम.एच. 23 ई 8822 चा मालक होता व सदरच्या गाडीचा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे ऊतरवला होता व त्याचा कालावधी 07/05/2012 ते 06/05/2013 असा होता हि बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. व तसेच सदरच्या गाडीचा अपघात दिनांक 15/12/2012 रोजी झाला होता ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त विवादीत मुद्दा हा की, सदरच्या अपघाताच्या वेळी संबंधीत ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस व्हॅलिड होते किंवा नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अपघाताच्या वेळी ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेंस इनव्हॅलिड होते व म्हणून विमादावा नाकारला हे म्हणणे मंचास चुकीचे वाटते, कारण अपघात हा ड्रायव्हर गाडी चालवत असतांना झालेला नसून सदरचे वाहन अपघाताच्या वेळी रस्त्याच्या बाजुला उभे होते. वत्यावेळी दुस-या वाहनाने वेगाने येवुन सदर गाडीस धडक देवुन निघुन गेले हे दाखल केलेल्या पुराव्या वरुन सिध्द होते. ड्रायव्हींग लायसेंस बाबत मा.राष्ट्रीय आयोगाने कुलदिप राणा विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी प्रकरणात रिव्हीजन पिटीशन नं. 3425/11 अन्वये 2013 (1) सी.पी.आर. 409 ( एन.सी.) मध्ये म्हंटले आहे की,“ When vehicle was damaged at that time when it was in stationery condition question of having valid driving license by driver of vehicle of petitioner is not all material ”
सदरचे निकाल या तक्रारीस लागु पडते. म्हणून सदरच्या प्रकरणात ड्रायव्हींग लायसेंसचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या अपघाता मध्ये त्याच्या गाडीचे 61,939/- रुपयांचे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही व त्या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही, परंतु सदरच्या अपघाता मध्ये अर्जदाराच्या गाडीचे नुकसान 25,837/- रुपयांचे झाले होते ही बाबत नि.क्रमांक 5/7 वरील दाखल केलेल्या सर्व्हेअर रिपोर्ट वरुन सिध्द होते व गैरअर्जदाराने अर्जदारास झालेली नुकसान भरपाई 25,837/- रुपये देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे. वास्तविक अर्जदार तेव्हढी रक्कम मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
रुपये 25,837/- फक्त (अक्षरी रु.पंचेविसहजार आठशे सदोतीस फक्त) द्यावेत.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- फक्त (अक्षरी
रु.तीनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आंत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.