निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/08/2012
तक्रार निकाल दिनांकः- 08/01/2014
कालावधी 01 वर्ष. 04 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मंगेश पिता रमेश बंगाळे. अर्जदार
वय सज्ञान. धंदा.व्यापार. अॅड.एस.एन.व्यवहारे.
रा. वसमत ता.वसमत.जि.परभणी.
विरुध्द
ब्रँच मॅनेजर. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. अॅड.आर.बी.वांगीकर.
दयावान कॉम्प्लेक्स, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीचा ग्राहक असून अर्जदाराने त्याच्या गाडीचा क्रमांक MH-20-BC 1595 चा गैरअर्जदाराकडे विमा काढला होता. अर्जदाराचे म्हणणे की, त्याचे वाहन MH-20-BC 1595 चा दिनाकं 24/12/2012 रोजी अपघात झाला होता व त्या अपघातामध्ये अर्जदाराच्या गाडीचे 1,00,000/- रु. चे नुकसान झाले होते, व सदर अपघाता बद्दल अर्जदाराने विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने त्यांच्या कंपनीचे सर्व्हेअरनी वाहनाची पहाणी केली व तसा अहवाल विमा कंपनीकडे पाठविला, त्यात त्यांनी अर्जदाराच्या गाडीचे 75,000/- रु. चे नुकसान झाले होते, असा अहवाल दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास विश्वासात न घेता केवळ 54,770/- रु. चे नुकसान भरपाईचा धनादेश दिला व सदरचा धनादेश हा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 29/03/2011 रोजी अर्जदारास दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या सदर वाहनाचा गैरअर्जदार विमा कंपनीकडे संपुर्ण नुकसान भरपाईची जोखीम विमा कंपनीकडे विमा काढला होता, म्हणून अर्जदार संपूर्ण नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने संपूर्ण नुकसान भरपाई रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे सदरची तक्रार अर्जदारास दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, त्याने अर्जदाराच्या वाहनाची नुकसान भरपाई म्हणून 1 लाख रु. व मानसिक त्रासापोटी 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 2000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला, व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्याच्या वाहन क्रमांक MH-20-BC 1595 चा विमा त्यांच्या विमा कंपनीकडे काढला होता व गैरअर्जदार विमा कंपनीने मान्य केले आहे की, अर्जदाराच्या सदर वाहनाचा अपघात दिनांक 24/12/012 रोजी झाला होता.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या सदर वाहनाचा अपघाता मध्ये 1 लाख रु. चे नुकसान झाले नव्हते. उलट नुकसानीची योग्य व खरी माहिती व्हावी म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने सरकारी सर्व्हेअर नियुक्त करुन अहवाल मागवला होता व त्याप्रमाणे 25 टक्के रक्कम कमी करुन अर्जदारास दिनांक 29/03/2011 रोजी 54,770/- रु. चा धनादेश दिला होता व सदर धनादेश अर्जदाराने स्वखुशीने स्विकारला व कंपनीच्या पावतीवर सही दिली. गैरअर्जदाराने हे अमान्य केले आहे की, अर्जदाराने त्याच्या सदर वाहनाचा संपूर्ण नुकसान भरपाईची जोखीमेचा विमा उतरविला होता.
गैरअर्जदार विमा कंपनीचे अतिरिक्त लेखी निवेदन मध्ये असे म्हणणे आहे की, एकदा नुकसान भरपाई अर्जदारानी उचलली तर त्यांना परत तक्रार दाखल करुन जास्तीची रक्कम मागण्याचा कायद्याने अधिकार नाही, तसेच अर्जदाराचे दावा दाखल करण्याचे योग्य कारण नाही व विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा व अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केली, म्हणून अर्जदाराकडून 3000/- रु. वसुल करण्यात यावे.
गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 12 वर 5 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये बिलचेक रिपोर्ट, सर्व्हेअर बिल, सर्व्हे रिपोर्ट, रिपेअर इस्टीमेट, रक्कम मंजूरी प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या वाहनाची
नुकसान भरपाई कमी रक्कम देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे वाहन क्रमांक MH-20-BC 1595 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती व अर्जदाराच्या सदर वाहनाचा अपघात दिनांक 24/12/2012 रोजी झाला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, सदर अपघाता मध्ये अर्जदाराच्या वाहनाचे किती रु. चे नुकसान झाले होते ? व विमा कंपनीने अर्जदारास कमी रक्कम दिली काय ?
अर्जदाराने त्याच्या वाहनाची सदर अपघाताची माहिती त्याने विमा कंपनीस कळविल्यानंतर विमा कंपनीच्या अधिकृत सर्व्हेअरने 75,200/- रु.चे नुकसान झाले होते असा पहाणी अहवाल विमा कंपनीकडे सर्व्हेअरने सादर केला ही बाब नि.क्रिमांक 12/1 वरील बिल चेक रिपोर्ट वरुन सिध्द होते व तसेच नि. क्रमांक 12/5 वरील गैरअर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता गैरअर्जदार विमा कंपनीच्या नांदेड येथील प्रमुख शाखेने 75,200/- रु. पैकी 54,770/- रु. Payable असे म्हंटले व र्अदाराचा Claim Settle केला.
Settlement Tyep: Non Standard Remark. खालील प्रमाणे लिहिला.
Remark: CLAIM SETTLED AND APPROVED BY DO NANDED ON NON-STANDARD BASIS DUE TO NON CONDUCTED OF SPOT SURVEY / SPOT POLICE PANCHANAMA. RS. 20431/- DEDUCTED FROM CLAIM AMOUNT AS 25 %
व अर्जदारास त्याच्या वाहनाचे नुकसान भरपाई म्हणून 54,770/- रु. चा धनादेश दिला व 20,431/- रु. कमी दिले.
गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराच्या सदर वाहनाचे नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 29/03/2011 रोजी 54,770/- रु. चा धनादेश दिला व अर्जदाराने सदर चेक स्वखुशीने घेतला व कंपनीच्या पावतीवर सही दिली ( Discharge Voucher ) व अर्जदारास परत तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही हे गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण गैरअर्जदाराने पुरावा म्हणून अर्जदाराने सही केलेली कोणतीही पावती ( Discharge Voucher ) मंचासमोर दाखल केली नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहनाचे अपघाता मध्ये सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे 75,200/- रु. चे नुकसान झालेले असतांना विमा कंपनीच्या मुख्य शाखेने अयोग्य कारण दाखवुन अर्जदारास फक्त 54,770/- रु. दिले व 20,431/- रु. कमी दिले.गैरअर्जदार विमा कंपनीचे सदरचे कृत्य हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे. असे मंचाचे ठाम मत आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या वाहनाचे सदर अपघातामध्ये 1 लाख रु. चे नुकसान झाले होते हे मंचास वरील कारणास्तव योग्य वाटत नाही वा अर्जदाराने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या वाहनाचे अपघातात 75,200/- रु. चे नुकसान झालेले असतांना केवळ 54,770/- रु. चा धनादेश देवुन व 20,431/- रु. कमी देवुन निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे ठाम मत आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या वाहनाची नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम
आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत रु. 20,431/- फक्त (अक्षरी रु.
विसहजार चारशे एकतीस फक्त ) द्यावेत.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 1,000/- फक्त( अक्षरी रु.
एकहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.