निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 21/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 29/10/2012 कालावधी 09 महिने, 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- - सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
मे.श्रध्दा एजन्सीज. अर्जदार
“ श्रध्दा ” लक्ष्मीनारायण मंदीरा जवळ, अड.एस.एन.वेलणकर.
स्टेशन रोड,परभणी, व्दारा
प्रोप्रा.दिलीप विठ्ठलराव दुधाटे
वय 38 वर्षे,धंदा व्यापार रा.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं लि.
परभणी शाखा, दयावान कॉम्प्लेक्स, दुसरा मजला,
स्टेशन रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.माधुरी विश्वरुपे.सदस्या.)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार औषधी होलसेल डिलर्स असून व्यापाराच्या व्यवहारा संबंधी होणा-या आर्थिक व्यवहारा करीता गैरअर्जदार विमा कंपनीतर्फे “ Money Insurance Policy ” 26/04/2011 ते 25/04/2012 या कालावधीकरीता रक्कम रु. 3,00,000/- काढली होती.
तक्रारदारांचे सेल्समन श्री भिवाजी अभिमान चव्हाण हे ता. 02/05/2011 रोजी जवळा बाजार येथून रु. 32,440/- एवढया रक्कमेची वसुली करुन परभणी कळमनुरी या बसने प्रवास करत असतांना लेदरबॅगच्या मध्ये सदरील रक्कम, पावतीबुक, ऑर्डरबुक इ.होते ती चोरी गेली, सदर चोरीची तक्रार पोलीस स्टेशन औंढा येथे दिली, परंतु पोलीसांना बॅग सापडली नाही. या संदर्भात पोलीसांनी ता. 26/05/2011 रोजी श्री चव्हाण यांना कळवले. तक्रारदारांनी ता. 26/05/2011 रोजी या संदर्भात विमा प्रस्तावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल केला. तक्रारदारांनी सदर घटने संदर्भात गैरअर्जदार यांना या पूर्वीच माहीती दिली असून त्यांचे सर्व्हेअर श्री. एम.आर. तोतला यांनी तक्रारदारांच्या दुकानास भेट देवुन प्रस्तावा सोबत दाखल करावयाच्या कागदपत्राबाबत माहीती दिली होती, परंतु गैरअर्जदार यांनी ता. 10/08/2011 रोजीच्या पत्रान्वये सदर गुन्हा पोलीसांनी कायम व पक्का न केल्यामुळे प्रस्ताव नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी लेखी म्हणणे दाखल केले असून गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना बॅग चोरीस गेल्याबाबतची माहीती दिल्यानंतर कंपनीने मनोहर रामनारायण तोतला सर्व्हेअर यांची नेमणुक केली. सदर प्रकरणात पोलीस एफ.आय.आर. आवश्यक आहे.तक्रारदारांची बॅग प्रवासात चोरीला गेल्याबाबतची तक्रार औंढा नागनाथ येथील पोलीसांकडे दिली नाही. पॉलीसीच्या अटी व शर्ती मधील कलम 4(a) नुसार विमाधरकाने घटनेनंतर पोलीसांना तसेच विमा कंपनीला तात्काळ देवुन आरोपी विरुध्द योग्य ती स्टेप घेणे आवश्यक आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री. वेलणकर आणि गैरअर्जदार यांचे विव्दान वकील श्री.दोडीया. यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचे सेल्समन भिवाजी चव्हाण यांच्या जवळची बॅग परभणी – कळमनुरी प्रवासात बसमध्ये हरवली.त्याबाबत ता. 02/05/2011 रोजी पोलीस इन्सपेक्टर औंढा येथे अर्ज दिल्याचे दिसून येते.तक्रारदारांनी सदर चोरी बाबतची माहीती पोलीसांना तसेच गैरअर्जदार विमा कंपनीला पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील कलम 4 ( a ) नुसार दिलेली असून पोलीसांनी या संदर्भात F.I.R. ची नोंद करणे आवश्यक होते, परंतु संबंधित पोलीस स्टेशन यांनी F.I.R. ची नोंद न करता ता. 26/05/2011 रोजी सदर बॅग मिळून न आल्याबाबत सांगितले सदर अटी नुसार F.I.R. आवश्यक असल्याबाबत नमुद नाही.त्यामुळे गैरअर्जदार यांनी अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते, असे मंचाचे मत आहे.त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर पॉलिसी अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.32,440/- देणे न्यायोचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना Money-in-transit विमा पॉलिसी अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.32,440/-(अक्षरी रु. बत्तीसहजार चारशे चाळीस फक्त ) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात द्यावी.
2 वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदरासहीत द्यावी.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.