निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/07/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 19/07/2011 तक्रार निकाल दिनांकः- 06/01/2012 कालावधी 5 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अब्दुल खयुम पि. अब्दुल हलीम अर्जदार वय 57 वर्षे.धंदा व्यापार, अड.एस.बी.धुळे रा.रोशन मोहल्ला, गंगाखेड, ता.गंगाखेड, जिल्हा परभणी. विरुध्द शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया. दयावान कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल सदस्या) गैरअर्जदाराने ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार याने इंडिका कार नो.क्र.एम.एच.22-डी-2333 सुरेश पि. गंगाप्रसाद लाहोटी, रा.लोकमान्य नगर परभणी यांचेकडून दिनांक 06.01.2011 रोजी विकत घेतली होती. सदरची कार ही गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 24.02.2010 ते 23.03.2011 पर्यन्त विमाकृत होती. पुढे दिनांक 20.01.2011 रोजी अर्जदाराचा मुलगा नामे शेख नयुम पि. शेख खयुम हा सदर वाहन चालवीत असतांना जीप चालकाने त्याचे वाहन निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविल्यामुळे सदर कारला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली व गैरअर्जदार यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. तदनंतर गैरअर्जदाराच्या वतीने नियुक्त सर्व्हेअरने सदर वाहनाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर सदरचे वाहन दुरूस्त करून घेतले. अर्जदार यांना वाहन दुरूस्तीसाठी जवळपास रक्कम रूपये 75000/- खर्च आला. अर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाईची मागणी केली असता गैरअर्जदाराने ती देण्यास टाळाटाळ केली. तदनंतर अचानक दिनांक 05.05.2011 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास पञ पाठवुन घटनेचे वेळी अर्जदार हा सदर वाहनाचा नोंदणीकुत मालक नव्हता व विमा पॉलिसी ही त्याच्या नावाने नसल्यामुळे त्याचा नुकसान भरपाईचा दावा नामंजुर करण्यात येत असल्याचे कळविले. वास्तवीक पाहता सदर वाहनाच्या पुर्वीच्या मालकाने गैरअर्जदारास वाहन विकल्याबददल व विमा नविन मालकाच्या नावाने करण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते व इंडियन मोटर टेरीफ रेग्युलेशन प्रमाणे वाहनाचा विमा आपोआप नवीन मालकाचे नावाने होतो. परंतु गैरअर्जदाराने तकलावु कारणांचा आधार घेवुन अर्जदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला. म्हणुन अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करून गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रूपये 75000/- घटना घडली त्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने दयावे. तसेच मानसीक, शारीरीक ञासापोटी व ञुटीची सेवा दिल्याबद्दल रक्कम रूपये 20000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रूपये 5000/- दयावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.4/1 ते नि.4/5 वर मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.8 वर दाखल करून अर्जदाराचे कथन बहुतांशी अमान्य केलें आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दिनांक 20.01.2011 रोजी सदर वाहनास अपघात झाला त्यावेळेस अर्जदार हा जरी त्या वाहनाचा रजीस्टर्ड मालक होता तरी विमा पॉलिसी ही जुन्या मालकाच्या नावे होती. तसेच सदर वाहनास झालेल्या अपघाताची सुचना दिनांक 04.02.2011 रोजी गैरअर्जदारास देण्यात आली. एवढया कालावधीनंतर सुचना दिल्यामुळे ती सहेतुपुर्वक देण्यात आल्याचे स्पष्ट होंते. सर्व्हेअरने दिलेल्या अहवालानुसार क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रूपये 29,800/- एवढेच होते शिवाय अर्जदाराच्या नावे विमा पॉलिसी नसल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. म्हणुन वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.9 वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरून खालील मुददे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने ञुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुददा क्र.1 व 2 -
अर्जदाराने इंडिका कार नो.क्र. एम.एच.22 डी-2333 सुरेश लाहोटी यांचेकडुन दिनांक 06.01.2011 रोजी विकत घेतली होती व दिनांक 20.01.2011 रोजी सदर वाहनास अपघात झाला. क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदारकडे दावा दाखल केला असता अपघातासमयी सदर वाहनाची विमा पॉलिसी जुन्या मालकाच्या नावे असल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचे गैरअर्जदाराने नाकारले, अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. त्यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अपघतासमयी सदर वाहनाचा मालकी हक्क अर्जदाराकडे असला तरी पॉलिसी जुन्या मालकाच्या नावेच अस्तीत्वात होती व अर्जदाराने पॉलिसी त्याच्या नावे ट्रान्सफर करून घेण्यासाठी गैरअर्जदाराशी संपर्क साधला नाही. त्यामुळे अर्जदारास क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई देण्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनी बांधील नाही. निर्णयासाठी महत्वाचा मुददा असा की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम योग्य कारणास्तव नाकारलेला आहे कायश् याचे उत्तर होकारार्थी दयावे लागेल. कारण अर्जदाराच्या नावे दिनांक 06.01.2011 रोजी सदरचे वाहन हस्तांतरीत झाले होते व तदनंतर दिनांक 20.01.2011 रोजी सदर वाहनास अपघात झाला होता. त्या दरम्यान अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे वाहनाची पॉलिसी त्याच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठीचा अर्ज देणे आवश्यक होते. यासंदर्भात अर्जदाराचे म्हणणे असे की, विमाकत वाहन हस्तांतरीत झाल्यानंतर त्या वाहनाचा विमा देखील आपोआपच हस्तांतरीत होतो. परंतु अर्जदाराच्या कथनात तथ्य नसल्याचे मंचाचे मत आहे. कारण टॅरीफ अॅडव्हायझरी कमीटी यांचा जी.आर.10 हा दिनांक 01.04.1990 ते 30.06.2002 या कालावधीसाठी लागू होतो. तदनंतर जी.आर.10 ऐवजी जी.आर.17 दिनांक 01.07.2002 पासून लागू झाला. जी.आर.17 नुसार “On transfer of ownership the liability only cover either under a liability only policy or under a package police is deemed to have been transferred in favour of the person to whom the moter vehicle is transferred with effect from the date of transfer. The transferee shall apply within 14 days from the date of transfer in writing under recorded delivery to the insurer.” यावरून अर्जदाराने सदरचे वाहन त्याच्या नावे हस्तांतरीत झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत गैरअर्जदाराशी संपर्क साधुन सदर वाहनासंदर्भातत सविस्तर माहिती देवुन सदर वाहनाची विमा पॉलिसी स्वताच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज करणे गरजेचे होते. परंतु अर्जदाराने त्या संदर्भात काहीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. त्याने मोघमपणे जुन्या मालकाने या संदर्भात गैरअर्जदारास कळविलेले होते असे तक्रार अर्जातुन नमुद केले आहे. परंतु त्या संदर्भात कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. म्हणुन अपघातासमयी जरी वाहन विमाकृत असले तरी विमा पॉलिसी हमी पोटी अर्जदारास नुकसान भरपाई मिळणार नाही. तसेच मोटर व्हेईकल कायदा 1988 च्या कलम 157 हे फक्त थर्ड पार्टीकरिता लागू आहे. विमाकृत वाहन खरेदी करणारा हा थर्ड पार्टी असू शकत नाही. त्यामुळे उपरोक्त कलम सदर प्रकरणाला लागू होणार नाही. अर्जदाराने मंचासमोर मा.राष्ट्रीय आयोगाचे सायटेशन 2008(1) टीएसी 237 National Commission New Delhi दाखल केले आहे. यात वाहनास अपघात हा 5 दिवसात झाल्यामुळे पॉलिसीचा हस्तांतरीत करण्याचा कालावधी संपत नसल्याने त्याचा फायदा अर्जदारास देण्यात आलेला होता. म्हणुन उपरोक्त प्रकरणात मा.राष्ट्रीय आयोगाने व्यक्त केलेले मत सदर प्रकरणाला लागू पडणार नाही. रिपोर्टेड केस जी.गोविंदन विरूध्द न्यू इंडिया अश्युरंस कं. लि. आणि इतर मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, When the vehicle was met with an accident insurance policy was continued in the name of earlier owner. It was not transferred in the name of complainant who had purchased the vehicle. The complainant could not claim the insurance amount as per ratio in M/s. complete insulation (P) Ltd.(Supra). मा.सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले उपरोक्त मत हे सदर प्रकरणाला तंतोतंत लागु पडते. म्हणुन वरील सर्व बाबीचा सारासार विचार आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अर्ज नामंजुर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा. 3 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |