निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07.01.2011 तक्रार नोदणी दिनांकः- 13.01.2011 तक्रार निकाल दिनांकः- 07.05.2009 कालावधी 3 महिने 24 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ सुरेश गुणासा आळसपूरे अर्जदार वय 43 वर्षे धंदा अशोक रिवांयडींग वर्क्स, ( अड शिरीष वेलणकर ) रा.काळी पेठ बसमत ता.बसमत, जि.हिंगोली विरुध्द शाखाधिकारी ( अड.आर.बी.वांगीकर ) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड परभणी शाखा दुसरा मजला दयावान कॉम्पलेक्स, स्टेशन रोड, परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदार बसमत येथील रहिवाशी आहे. स्पेलंडर सन 2009 मध्ये त्याने हिरो होंडा मोटार सायकल रजि.नं. एम.एच.38/के 2180 रुपये 38400/- ला खरेदी केली होती. तिचा गैरअर्जदाराकडून दिनांक 04.04.2009 ते 03.04.2010 मुदतीचा विमा उतरविलेला होता. दिनांक 01.09.2009 रोजी अर्जदार मित्राला बरोबर घेवून बाईकवरुन कामानिमीत गेला होता. दुपारी 1.30 च्या सुमारास दतात्रय फर्निचर व वेल्डींग शॉपसमोर बाईक उभी केली होती काम आटोपून अर्जदार परत बाईकजवळ आला असता ती चोरीस गेल्याचे दिसले त्याबाबत तिचा शोध घेतला परंतू मिळून न आल्यामुळे बसमत पोलीस स्टेशनला फीर्याद दिली. त्यानंतर पोलीसानी घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्जदाराने गैरअर्जदारास देखील बाईक चोरीस गेल्याचे कळविले होते. पोलीसानी तपास करुन ही बाइक न सापडल्यामुळे न्यायालयाचा अंतिम अहवाल देखील गैरअर्जदारास पाठविला होता. मोटार सायकलची मुळ कागदपत्रे डिकी मध्ये होती ती चोरीला गेल्यामुळे गैरअर्जदारास देता आली नव्हती. त्याच्या डूप्लीकेट प्रती आर.टी.ओ.कडून मिळवून गैरअर्जदारास दिल्या त्यानंतर वर्षे होवून गेले तरी नुकसान भरपाई मंजूर न करता अचानक 30.12.2010 रोजी पत्र पाठवून घटनाचे वेळी वाहनास लॉक न केल्यामुळे निष्काळजीपणा केल्याने क्लेम देता येत नाही असे कळविले. व नुकसान भरपाई नामंजूर करुन सेवा त्रूटी केली म्हणून त्याची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 38,400/- द.सा.द.शे. 12 % व्याजासह मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व अर्जाचा खर्च रुपये 2000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 4 लगतएकूण7कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर दिनांक 29.03..2011 रोजी लेखी म्हणणे प्रकरणात (नि.10) ला सादर केले. अर्जदाराच्या मालकीच्या एम.एच.38/ के. 2180 मोटार सायकल बाबतचा आणि विमा पॉलीसी संबंधी तक्रार अर्जातील मजकूर त्यानी नाकारलेला नाही बाकीची संपूर्ण विधाने वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारली आहेत. तक्रार अर्जातील परीच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केले प्रमाणे क्लेम मंजूर करण्यासाठी त्याचेकडे दिलेल्या कागदपत्राबाबतचा मजकूर गैरअर्जदारास मान्य आहे गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, अर्जदाराने वाहान पार्कींग करताना सुरक्षीत ठिकाणी वाहन पार्कींग करुन लावण्याची जबाबदारी असताना त्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यामुळे बाइक चोरीला गेली होती नियमाप्रमाणे अशा बाबतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही. त्यामुळेच विमा क्लेम नामंजूर केलेला आहे. अर्जदाराने चोरीची फीर्याद देखील उशीरा दिली होती . सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.11) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 13 लगत सर्व्हेअर परळीकर यांचा असेसमेंट रिपोर्ट, विमा पॉलीसीची झेरॉक्स, तपास अधिकारी एन.व्हि.कोकड यांचा अहवाल, बाईकचे रजिष्ट्रेशन सर्टीफीकेट, ज्यूडिशियल मॅजेस्ट्रेट फस्टक्लास, बसमत यांचा फायनल रिपोर्ट, गु.,र.नं.158/09 ची एफ आय आर, घटनास्थळ पंचनामा, अर्जदाराचे ड्रायव्हींग लायसेन्स, गैरअर्जदाराचे 30.12.2010 चे क्लेम नामंजूरीचे पत्र ही कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड वेलणकर यांचा युक्तिवाद ऐकला गैरअर्जदारातर्फे युक्तिवादासाठी कोणीही हजर नसल्यामु1ळे प्रकरणाचा मेरीटवर निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदाराची चोरीस गेलेल्या बाईकची विमा क्लेमची नुकसान भरपाई बेकायदेशीररित्या देण्याचे नाकारुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचे मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल रजि.नं. एम.एच.38 के 2180 रुपये 38400/- ला खरेदी केली होती. तिचा गैरअर्जदाराकडून दिनांक 04.04.2009 ते 03.04.2010 मुदतीचा विमा उतरविलेला होता. ही अडमिटेड फॅक्ट आहे. गैरअर्जदाराने पुराव्यात अनुक्रमे नि. 13/4 ला बाईकचे आर.टी.ओ.रजिष्ट्रेशन सर्टीफीकेट आणि नि. 13/2 ला विमा पॉलीसीची छायाप्रत ही दाखल केली आहे. दिनांक 01.09.2009 रोजी अर्जदाराची बाईक . दुपारी 1.30 च्या सुमारास बसमत येथील दतात्रय फर्निचर व वेल्डींग शॉपसमोर उभी केली होती. ती अर्जदाराचे नकळत चोरीस गेली होती. तपास करुनही सापडली नसल्याने त्याने दिनांक 06.09.2009 रोजी पोलीसात फीर्याद दिली होती. ही बाब देखील गैरअर्जदारानीच पुराव्यात दाखल केलेल्या गु.र. 158/9 मधील एफ.आय.आर. ( नि.13/6 ) घटनास्थळ पंचनामा, (नि 13/7 ) या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबात असा बचाव घेतलेला आहे की, चोरीची घटना 01.09.2009 रोजी घडली असताना पोलीसात अर्जदाराने फीर्याद सहा दिवसानी उशीरा दिली त्यामुळे घटनेबाबत शंका घेतलेली आहे गैरअर्जदाराने या संदर्भात चौकशी करण्यासाठी अड. एन.व्ही.कोकड यांची नेमणूक केलेली होती संबधीत चौकशी अधिका-याचा दिनांक 24.09.2010 चा चौकशी अहवाल व त्या सोबतची कागदपत्रे गैरअर्जदाराने पुराव्यात नि. 13/3-सी ला दाखल केली आहेत. चौकशी कामी संबधीत अड कोकड यानी अर्जदाराचा 23.09.2010 रोजी घेतलेल्या जबाबाची कॉपी ही दाखल केलेली आहे त्यामध्ये अर्जदाराने असे सांगितले होते की, गाडी चोरीला गेल्यावर तिचा स्वतःहून शोध घेतला पण सापडली नाही त्याच वेळी पोलीसात फीर्याद देण्यासाठी गेला असता पोलीसानीच तीन चार दिवस शोध घ्या असे सुचवून फीर्याद घेतली नाही त्यामुळे फीर्याद देण्यास उशीर झाला होता असे स्पष्टपणे नमूद केले आहे त्यामुळे अर्जदाराने जाणुनबुजून उशीरा फीर्याद दिली याबाबतीती शंका घेण्याचे करण उरत नाही. क्लेम मंजूर करण्याचे बाबतीत अर्जदाराने आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिली होती ही अडमिटेड फॅक्ट आहे परंतू क्लेम मंजूर न करता विमा कंपनीने नेमलेल्या चौकशी अधिका-याच्या अहवालावर विसंबून राहून पार्कीग केली त्यावेळेस बाईकला कुलूप लावले नव्हते व सुरक्षीत ठेवली नव्हती त्याने निष्काळजीपणा केला त्यामुळे पॉलीसी नियमानुसार नुकसान भरपाई देता येत नाही असे 23.12.2010 रोजी च्या क्लेम नामंजूरीच्या पत्रात ( नि. 4/7 ) कारण नमूद करुन अर्जदाराचा क्लेम जो नाकारण्यात आला होता ते कारण कायदेशीररित्या ग्राहय धरता येइल का ? हा एकच मुद्या निर्णयाचे कामी महत्वाचा ठरतो. या संदर्भात मा. राष्ट्रीय आयोगाने रिपोर्टेड केस 2007 (3) सी.पी.आर पान 1 ( राष्ट्रीय आयोग ) या अर्जदारा सारख्याच घटने संबधीच्या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, ‘’ विमा कंपनीने चौकशी अधिका-याची नेमणूक करणे हे अधिकारीतेच्या व पॉलीसी नियमाचे विरुध्द आहे. ‘’ अर्जदाराचे प्रकरणालाही हे मत लागू पडते. तसेच रिपोर्टेड केस 1998 (2) सी.पी.आर पान 48 (मा. राज्य आयोग ) यासमध्ये ही वरीलप्रमाणेच मत व्यक्त केले आहे. अर्जदारातर्फे सादर केलेली महत्वाची रिपोर्टेड केस 2008 (4) सी.पी.जे. पान 506 ( मा. कलकत्ता राज्य आयोग ) यानी असे मत व्यक्त केले आहे की, Insurance- Repudiation of claim- Origional key set stolen alongwith motorcycle – ground of repudiation shows total non application of mind. हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते. अर्जदाराच्या बाईकची पॉलीसी मुदतीत चोरी झाली होती ही वस्तूस्थिती आहे. अर्जदाराने गाडी पार्क करताना लॉक केली नव्हती या कारणास्तव गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा क्लेम नामंजूर करुन निश्चीतपणे त्याचेवर अन्याय केलेला आहे. क्लेम नाकारण्याचे दिलेले कारण पॉलीसी नियम व अटीत बसते असा कोणताही ठोस व सबळ पुरावा गैरअर्जदारातर्फे दाखल केलेला नाही त्यामुळे क्लेम नामंजूरीचे दिलेले कारण निश्चीत बेकायदेशीर आहे असे मंचाचे मत आहे. अर्जदाराची बाईक खरेदी केल्यानंतर केवळ पाच महिन्यात चोरीला गेली असल्यामुळे अर्जदाराला बाइकची खरेदीची रक्कम रुपये 38,400/- मिळाली पाहीजे अशी अर्जदाराने तक्रार अर्जातून मागणी केलेली आहे परंतू गैरअर्जदारानी पुराव्यात दाखल केलेल्या कागदपत्रातून सर्व्हेअर परळीकर यांचा असेसमेंट रिपोर्ट नि. 13/1 मध्ये बाजार भावाने बाईकची किंमत रुपये 36,500/- चे असेसमेंट केले असल्यामुळे तेवढीच नुकसान भरपाई अर्जदार मिळण्यास पात्र आहे. क्लेम दाखल केल्यानंतर तीन ते चार महिन्यात क्लेम मंजूरी अथवा नामंजूरीचा निर्णय विमा कंपनीने घेतला पाहिजे असे मत मा. सर्वोच्च न्यायालयाने व मा. राज्य आयोगाने अनेक प्रकरणात दिलेले आहे ते विचारात घेता दिलेले आहे. अर्जदाराने नोव्हेंबर 2009 मध्ये क्लेम फॉर्मसह सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वास्तविकपणे मार्च 2010 पर्यंत क्लेम मंजूरीचा निर्णय अर्जदारास कळविला पाहीजे होता परंतू गैरअर्जदाराने त्याबाबतीत विलंब करुन क्लेम नामंजूरीचे पत्र डिसेंबर 2010 मध्ये दिले फार उशीरा दिले असल्यामुळे एप्रील 2010 पासून चे व्याज अर्जदार मिळण्यास पात्र आहे. वरील सर्व बाबी विचारात घेवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार यानी अर्जदाराची चोरीस गेलेली मोटर सायकल रजि.नं. एम.एच.38 के. 2180 ची नुकसान भरपाई रुपये 36,500/- द.सा.द.शे. 9 % दराने 1 एप्रील 2010 पासून होण-या व्याजासह दयावी. 3 याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |