निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 13/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 09/09/2011 कालावधी 07 महिने 27 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सौ.शकुंतला भ्र.रंगनाथ माळी. अर्जदार वय 48 वर्ष.धंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.एन-9, प्लॉट नं.85,हारी निवास. सिडको औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद. विरुध्द शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि.दयावान कॉम्पलेक्स. अड.जी.एच.दोडिया. स्टेशन रोड परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या विमा दाव्याचा कमी रक्कमेचा क्लेम मंजूर करुन गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या मालकीची फोर्स मोटले लिमिटेड एच.एच. – 20, ए वाय / 6590 ही गाडी आहे व ज्याचा विमा क्रमांक 230601/31/09/01/00008620 दिनांक 14/09/2009 ते 18/09/2010 या कालावधीसाठी गैरअर्जदाराकडून घेतलेला होता.दिनांक 15/02/2010 रोजी अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाला.अपघाता बाबत गैरअर्जदारास सर्व कागदपत्रांसह अर्जदाराने माहीती दिली.त्यानंतर गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरने अपघात ग्रस्त वाहनाची पहाणी केली व रु.1,63,813/- चे एस्टीमेट गैरअर्जदाराकडे दिले.त्यानंतर दिनांक 20/10/2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराचा रु.78,317/- चा दावा मंजूर केला.अर्जदाराने सदर रक्कम नाराजीने उचलली. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून त्याच्या वाहनाचे प्रायव्हेट पासिंग असतांना देखील व्यावसायिक वाहन म्हणून विमा काढला व जास्त प्रिमियम घेतला. अर्जदारास गैरअर्जदाराने रु.85,496/- कमी देवुन दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली असून रु.50,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी व रु.85,496/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने मिळावेत व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, क्लेम सेटलमेंट अंडर प्रोस्टेस्ट लेटर,हे कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात सदर तक्रार खोटी, तथ्यहीन व ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरुध्द असल्यामुळे फेटाळण्यात यावी असे म्हंटले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कमर्शियल व्हेईकल पॅकेज पॉलिसी घेतली व आर.टी.ओ. कडून प्रायव्हेट व्हेईकल पासींग घेतले त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नॉन स्टँडर्ड बेसिसवर रु.78,317/- इतका दिला अशा प्रकारे अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, सेटलमेंट ईंटीमेशन व्हाऊचर,मोटर ओडी क्लेम नोट, पॉलिसी, बील चेक रिपोर्ट, इ.कागदपत्रे दाखल केले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र वकिलांचे युक्तीवाद यावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदार ही वान क्रमांक MH 20/AY – 6590 ची मालक असून त्यांनी गैरअर्जदाराकडून सदरील वाहनाची पॉलिसी क्रमांक 230601/ 31/ 09 /01 / 00008620 ही दिनांक 19/09/2009 ते दिनांक 18/09/2010 या कालावधीसाठी घेतलेली आहे.ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या वाहनाचा दिनांक 15/02/2010 रोजी अपघाता झाला वाहनाचा अपघात हा पॉलिसीच्या मुदतीत झाला असल्यामुळे अर्जदाराने सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा दावा गैरअर्जदाराकडे दाखल केला व त्यानंतर गैरअर्जदाराने सर्व्हेअरची नियुक्ती केली व सर्व्हेअर के.बी.परमार यांनी दिलेला बील चेक रिपोर्ट नि. 17/8 वर दाखल केलेला आहे. या बील चेक रिपोर्ट नुसार अर्जदार हा रु.1,05,000/- मिळणेस पात्र आहे. परंतु, नि.17/2 वरील गैरअर्जदाराच्या डिव्हीजनल ऑफिस नांदेड यांच्या मोटार ओडी क्लेम नोटनुसार अर्जदार हा वानाच्या चुकीच्या पासिंग आणि पॉलिसीमुळे त्याचा विमा दावा नॉन स्टँडर्ड बेसिस वर मान्य करण्यात आला व त्याला रु.26,106/- कमी देण्यात आले.गैरअर्जदारांच्या विकास अधिका-याने गैरअर्जदारांच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्राव्दारे असे कळवले आहे (नि.17/3) की, अर्जदाराने 14 + 1 पासिंगची गाडी घेतलेली आहे व 14 + 1 पासिंग असल्यामुळे परभणी R.T.O. च्या नियमानुसार कमर्शियल व्हेईकल म्हणून विमा काढला परंतु अर्जदाराने औरंगाबाद येथे सदरील वाहनाचे प्रायव्हेट पासिंग केलेले आहे. परंतु 9 + 1 पेक्षा जास्त पासिंग असल्यामुळे सदरील गाडीस कमर्शिअल पॉलिसी देण्यात आली व प्रिमिअम देखील प्रायव्हेट पासिंग पेक्षा जास्त घेण्यात आला आहे. नि.17/7 वरील RTO रजिस्टेशनवर सिटींग कॅपेसिटी 15 व्यक्तिंची आहे व LMV NON TRANSPORT असा उल्लेख आहे. अर्जदाराने औरंगाबाद येथे 14 +1 वाहनाचे पासिंग करतांना तेथील RTO ने NON Tr. पासिंग दिले व परभणी येथील RTO नियमानुसार विमा अर्जदाराच्या नि. 17/6 वरील टॅक्सच्या पावतीवरुन अर्जदार हा दरवर्षी टॅक्स भरतो जो कमर्शिअल वाहना प्रमाणे आहे. अर्जदाराने विमा पॉलिसी ही कमर्शिअल घेतलेली आहे त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नॉन स्टँडर्ड बेसिसवर मंजूर करुन अर्जदाराला त्रुटीची सेवा दिलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत रु. 85,496/- ची मागणी केलेली आहे.परंतु नि.17/8 वरील बिलचेक रिपोर्ट वरुन अर्जदार हा रु.1,05,000/- मिळण्यास पात्र आहे.त्यापैकी रु.78,317/- तिने स्वीकारलेला आहे म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 26,683/- दिनांक 20/10/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.4,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |