Maharashtra

Parbhani

CC/17/2014

PRAMABAI KANTICHAND @ KANTILAL GOLLECHA - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER,UNITED INDIA INSURANCE COM.LTD.PARBHANI - Opp.Party(s)

ADV.C.V.RAJURE

13 May 2014

ORDER

 
CC NO. 17 Of 2014
 
1. PRAMABAI KANTICHAND @ KANTILAL GOLLECHA
R/O FATEPUR TQ.BASMAT
HINGOLI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER,UNITED INDIA INSURANCE COM.LTD.PARBHANI
UNITED INDIA INSURANCE CO.LTD.DAAYAWAN COMPLEX,STATION ROAD,PARBHANI
PARBHANI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MRS. Anita Ostwal Member
 
PRESENT:
 
ORDER
निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2014 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2014 तक्रार निकाल दिनांकः- 13/05/2014 कालावधी 02 महिने. 29 दिवस. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी अध्‍यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B. सदस्‍या सौ.अनिता ओस्‍तवाल.M.Sc. L.L.B. --------------------------------------------------------------------------------------------------------- प्रेमाबाई कांतीचंद उर्फ कांतीलाल गोलेच्‍छा, अर्जदार वय 65 वर्षे. धंदा.व्‍यापार. अॅड.पी.एम.कुलकर्णी. रा.फतेपूर, ता. वसमत जि.हिंगोली. विरुध्‍द शाखा व्‍यवस्‍थापक, गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया. दयावान कॉम्‍पलेक्‍स, स्‍टेशन रोड,परभणी. ______________________________________________________________________ कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्‍यक्ष. 2) सौ.अनिता ओस्‍तवाल. सदस्‍या. (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्‍यक्ष.) गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा ताटकळत ठेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्‍याबद्दलची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही फतेपूर ता. वसमत येथील रहिवाशी असून तिच्‍याकडे मालकीचा एक टँकर आहे. ज्‍याचा क्रमांक MH-22-1231 असा आहे. अर्जदाराचा सदर वाहनावर उदरनिर्वाह चालतो. सदरचे टँकर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमाकृत केले होते व सदर विम्‍याचा कालावधी 18/11/2011 ते 17/11/2012 पर्यंत वैध होता व विम्‍याचा क्रमांक 230601/31/11/01/00009974 असा आहे. अर्जदाराचे म्‍हणणे की, दिनांक 11/02/2012 रोजी अर्जदाराचा सदर टँकर डिझेल भरुन ढोकी मार्गे जिंतूरकडे येत होता, व सदरचा टँकर ढोकी – कळंब रोडवर देवळाली पाटीचे पूढे आला असता, समोरुन टिप्‍पर क्रमांक MH-25-U-331 ही भरधाव वेगात आली व अर्जदाराच्‍या टँकरला जोराची धडक दिली व अपघात झाला व अर्जदाराच्‍या टँकरचे आतोनात नुकसान झाले. सदरचा अपघात हा टिप्‍परच्‍या चालकाच्‍या हलगर्जीपणामुळे व निष्‍काळजीपणाने वाहन चालवल्‍यामुळे झाला. अर्जदाराचे म्‍हणणे की, सदर अपघाता बद्दल ताबडतोब त्‍यांनी पोलीस स्‍टेशन शिराढोण ता. उस्‍मानाबाद येथे माहिती दिली. व तसेच सदर अपघाता बद्दल अर्जदाराने विमा कंपनीस माहिती दिली. व विमा कंपनीने अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर सदर वाहनाची पहाणी करणे करीता सर्व्‍हेअर म्‍हणून एस.एम. दुधानी यांची नियुक्‍ती केली. व सदर वाहनाची घटनास्‍थळी तपासणी केली व त्‍यानंतर अर्जदाराने त्‍याचे टँकर दुरुस्‍तीसाठी युनायटेड मोटार्स, लातूर फाटा नांदेड येथे लावले. त्‍यानंतर विमा कंपनीने श्री मनोहर तोतला यांचेकडून अंतीम सर्व्‍हे केले. अर्जदाराने सदर वाहनाची सर्व कागदपत्रे वाहन चालकाचा परवाना, वाहन दुरुस्‍तीचा अंदाज खर्च, इ. कागदपत्रे ताबडतोब विमा कंपनीस दिली. व अंदाजपत्रक देण्‍यात आले. व ते गैरअर्जदार यांचेकडे दिले. अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदाराने सदरचे टँकर दुरुस्‍त करुन घेतल्‍यानंतर वाहन दुरुस्‍तीचे मुळ बिले, विमा कंपनीस दिले व वाहन नुकसान भरपाईसाठी चौकशी केली असता, लवकरच नुकसान भरपाई देण्‍यात येईल. असे सांगीतले, पंरतु वेळोवेळी विमा कंपनीस चौकशी केली असता, विमा कंपनीने उडवाउडवीचे उत्‍तरे दिली. व अर्जदाराचा विमादावा 2 वर्षांपासून ताटकळत ठेवला. व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्‍हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश द्यावा की, त्‍याने अर्जदाराची वाहन नुकसान भरपाई म्‍हणून 2,00,000/- रु. द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह घटनेच्‍या तारखे पासून अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासपोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदाराने पुराव्‍याबाबत नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्राच्‍या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्‍यामध्‍ये फिर्याद, घटनास्‍थळ पंचनामा, वाहन दुरुस्‍तीचे बिले, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, आर.सी.बुक, वाहनाचे परमीट नक्‍कल, पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्‍यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व ती खारीज होणे योग्‍य आहे. तसेच विमा कंपनीने अर्जदारास कसल्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, विमा कंपनीचे म्‍हणणे की, अर्जदाराचे टँकर क्रमांक MH-22-1231 च्‍या अपघाताची माहिती विमा कंपनीस दिल्‍यानंतर विमा कंपनीने ताबडतोब सदर वाहनाची पहाणी करणे करीता सर्व्‍हेअर म्‍हणून श्री. एम.आर.तोतला यांची नियुक्‍ती केली होती, परंतु अर्जदाराने दुरुस्‍तीचे बिल विमा कंपनीकडे सादर न केल्‍यामुळे संबंधीत सर्व्‍हेअर Final Bill Check Report तयार करु शकला नाही. त्‍यामुळे अर्जदाराने वेळेत बिल दाखल न केलेमुळे व ड्रायव्‍हरचे ड्रायव्‍हींग लायसेंस न दाखल केलेमुळे विमा कंपनीने शेवटी दिनांक 11/09/2012 रोजीच्‍या पत्राव्‍दारे अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला. आम्‍ही अर्जदारास सेवेत त्रुटी दिली नाही. म्‍हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी. विमा कंपनीने लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयार्थ नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. विमा कंपनीने पुराव्‍याबाबत नि.क्रमांक 15 वर 1 कागदपत्राच्‍या यादीसह 1 कागदपत्र दाखल केली आहेत. ज्‍यामध्‍ये Copy Of Surveyor Report ची प्रत दाखल केली आहे. दोन्‍ही बाजुंच्‍या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत. मुद्दे. उत्‍तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे टँकर क्रमांक MH-22-1231 चा अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्‍याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय. ‍ 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1. अर्जदार ही टॅंकर क्रमांक MH-22-1231 ची मालक आहे. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमाक 4/6 वरील आर.सी.बुकच्‍या प्रतीवरुन सिध्‍द होते. अर्जदाराने सदर टॅंकर गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केला होता, व सदर विम्‍याचा कालावधी 18/11/2011 ते 17/11/2012 पर्यंत वैध होता व पॉलिसी क्रमांक 230601/31/11/01/00009974 होता, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 4/9 वरील पॉलिसीच्‍या प्रतीवरुन सिध्‍द होते. अर्जदाराच्‍या सदर टँकरचा दिनांक 11/02/2012 रोजी ढोकी कंळब रोडवर देवळाली पाटी जवळ टिप्‍पर क्रमांक MH-25-U-331 च्‍या चालकाने वाहन निष्‍काळजीपणे भरधाव चालवुन अर्जदाराच्‍या टँकरला जोरदार धडक दिली व अपघात झाला होता. व त्‍यात अर्जदाराच्‍या टॅंकरचे नुकसान झाले होते. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 4/1 वरील शिराढोण पोलीस ठाणेच्‍या क्राईम नं. 14/12 च्‍या एफ.आय.आर. प्रतीवरुन सिध्‍द होते. अर्जदाराच्‍या टँकरचा अपघात हा विम्‍याच्‍या वैध कालावधी मध्‍येच झाला होता, ही बाब सदर कागदपत्रावरुन दिसून येते. अर्जदाराचे सदरचे टँकर अपघाता वेळी चालक गंगाधर चव्‍हाण चालवत होता. ही बाब देखील सदर एफ.आय.आर. च्‍या प्रतीवरुन सिध्‍द होते. सदरचा अपघात हा टिप्‍पर क्रमांक MH-25-U-331 च्‍या वाहन चालकाने भरधावपणे व निष्‍काळजीपणे वाहन रॉंगसाईडने चालवुन अर्जदाराच्‍या टँकरला जोरदार धडक दिली. ही बाब देखील सदर एफ.आय.आर. च्‍या प्रतीवरुन दिसून येते. अर्जदाराचे तक्रारी मध्‍ये म्‍हणणे की, त्‍याच्‍या सदर वाहनाची अपघात नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विमादावा विमा कंपनीकडे दाखल करुन दोन वर्षे झाली, परंतु विमा कंपनीने आज पर्यंत अर्जदाराचा विमादावा निकाली काढला नाही, याबद्दल विमा कंपनीचे लेखी जबाबत म्‍हणणे की, सदर अपघाताची माहिती अर्जदाराकडून विमा कंपनीस मिळाल्‍यानंतर विमा कंपनीने ताबडतोब सर्व्‍हेअर नियूक्‍त करुन वाहनाची पाहणी केली, परंतु अर्जदाराने विमा कंपनीकडे दुरुस्‍ती खर्च व ड्रायव्‍हींग लायसेंस कागदपत्रे दाखल न केलेमुळे विमा कंपनीने Final Bill Check Report तयार करता आला नाही, त्‍यामुळे विमा कंपनीने दिनांक 11/09/2012 च्‍या पत्राव्‍दारे अर्जदाराचा विमादावा फेटाळला सदरचे पत्र विमा कंपनीने अर्जदारास पाठविले होते, या बद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा विमा कंपनीने मंचासमोर आणला नाही. तसेच विमा कंपनीने नि.क्रमांक 15 वर सर्व्‍हेअर रिपोर्ट दाखल केला आहे व त्‍यामध्‍ये अर्जदाराच्‍या वाहनाचे 1,08,253/- रु. चे नुकसान झाले आहे. असे स्‍पष्‍टपणे म्‍हंटले आहे. व ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 15 वरील सर्व्‍हेअर रिपोर्ट वरुन सिध्‍द होते. अर्जदाराचे म्‍हणणे की, सदर अपघाता मध्‍ये त्‍याच्‍या टँकरचे 2 लाख रु. चे नुकसान झाले होते, हे मंचास योग्‍य वाटत नाही. कारण याबद्दल अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. व संबंधीताचे शपथपत्र मंचासमोर दाखल केले नाही. व तसेच विमा कंपनीच्‍या सर्व्‍हेअर रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्‍या वाहनाचे 1,08,253/- रु. चे नुकसान झाले होते, केवळ अर्जदाराने वाहन दुरुस्‍ती खर्चाच्‍या पावत्‍या दाखल केले नाही. व त्‍यामुळे Final Bill Check Report तयार करता आले नाही. म्‍हणून विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारणे मंचास योग्‍य वाटत नाही. अशा परिस्थिती मध्‍ये विमा कंपनीने अर्जदाराच्‍या वाहनाचे नुकसान भरपाई म्‍हणून सर्व्‍हेअर रिपोर्टच्‍या 1,08,253/- रु. च्‍या Non Standard Basis प्रमाणे 75 % रक्‍कम रु.81,190/- अर्जदारास देणे योग्‍य होते. व ते न देवुन निश्चित विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे ठाम मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्‍तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्‍या आत अर्जदाराचे वाहन क्रमांक MH-22-1231 चे अपघातात झालेली वाहन नुकसान भरपाई म्‍हणून रु. 81,190/- फक्‍त ( अक्षरी रु. एक्‍याएैंशी हजार एकशे नव्‍वद फक्‍त ) अर्जदारास द्यावेत. 3 तक्रारीचा खर्च ज्‍याचा त्‍यांनी सोसावा. 4 आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात. सौ.अनिता ओस्‍तवाल. श्री. पी.पी.निटूरकर मा.सदस्‍या. मा.अध्‍यक्ष.
 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Anita Ostwal]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.