Maharashtra

Nanded

CC/10/81

Hanmantrao Marotirao Pomde - Complainant(s)

Versus

Branch Manager,United India Insurance Com. Ltd. - Opp.Party(s)

Adv. V.A. Nandedkar

24 Jun 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/81
1. Hanmantrao Marotirao Pomde Hadgaon,Tq.Hadgaon, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager,United India Insurance Com. Ltd. Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 24 Jun 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/81.
                          प्रकरण दाखल तारीख - 09/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 24/06/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री. सतीश सामते,                 - सदस्‍य.
हाणमंतराव पि. मारोतीराव पोमदे
वय 50 वर्षे, धंदा व्‍यापार
रा.हदगांव ता.हदगांव जि. नांदेड                              अर्जदार
विरुध्‍द
ब्रॅच मॅनेजर
यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी                           गैरअर्जदार
नांदेड, ता.जि.नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही.भूरे
गैरअर्जदार    तर्फे वकील           - अड.श्रीनिवास मद्ये.
                               निकालपञ
                (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेच्‍या ञूटीबददल अर्जदार यांनी तक्रार नोंदविली ती खालील प्रमाणे आहे.
              अर्जदार यांचे राज पेट्रोलियम या नांवाने हदगांव येथे पंप आहे. पंपावर विक्रीसाठी पेट्रोल व डिझेल आणण्‍यासाठी एक टँकंर ज्‍यांचा रजिस्‍ट्रेशन क्र.एम.एच.-26-एच-5717  असून गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलिसी नंबर 2306000/31/08/01/00003410 असे असून त्‍यांची मूदत 15.10.2008 ते 14.10.2009 पर्यत होती. दि.2.6.2009 रोजी टॅक्‍टर मधील अर्धे डिझेल व अर्धे पेट्रोल राज पेट्रोलियम या पंपावर हदगांव येथे ट्रक्‍टर खाली केला व परत अकोल्‍याला जाण्‍यासाठी वापस नीघाला राञी 12.00 वाजता पन्‍हाळा गावांजवळ आलेवर ड्रायव्‍हरचा डोळा लागल्‍यामूळे टँकर रोडच्‍या बाजूला झाडावर जाऊन आदळला, अपघातामूळे अर्जदाराचे टँकरचे जवळपास रु.3,12,646/- चे नूकसान झाले. सदरील घटनेची माहीती गैरअर्जदार यांना दिली. त्‍यानंतर त्‍यांनी सर्व्‍हेअर यांना पाठविले व त्‍यांनी
 
घटनास्‍थळवर येऊन वाहनाची पाहणी केली. यानंतर सव्‍हेअर व गैरअर्जदारयांचे सांगणेप्रमाणे सदरील वाहन घटनास्‍थळापासून काढून घेऊन क्रेनच्‍या साहयाने टोचन करुन नांदेड येथे बाफना मोटार्स यांच्‍याकडे आणले. टोचनचा खर्च रु.11500/- इतका आला. सदरील टॅकरची दूरुस्‍ती करुन घेतली त्‍यांस रु.2,20,737/- खर्च आला व टँकरची कॅबीन नवीन टाकली त्‍यांचा खर्च रु.80,000/- आला असे एकूण रु.3,12,646/- नूकसान झाले. गैरअर्जदार हे नूकसान भरपाई देण्‍यास जबाबदार असताना त्‍यांनी नूकसान भरपाई दिली नाही व क्‍लेम फेटाळण्‍याचे कारण ड्रायव्‍हरच्‍या लायसंसवर हाझारडस चा शेरा मारलेला नाही म्‍हणून अर्जदार हा फायदा घेण्‍यास अपाञ आहे या सबबीवर क्‍लेम नामंजूर केला. अर्जदाराची मागणी आहे की, वाहनाच्‍या नूकसान भरपाई बददल रु.3,12,646/- व त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज दि.2.67.2009 पासून तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5000/- असे एकूण रु.3,67,646/- गैरअर्जदाराकडून मिळावेत.
               गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. यात अर्जदारांची तक्रार ही खोटी असून ती फेटाळण्‍यास योग्‍य आहे. गैरअर्जदाराने काही अटी व शर्तीवर विमा सरंक्षण दिले आहे. दि.2.6.2009 रोजीला टॅक्‍टर एम.एच.-26-एच-5717 पोलिस स्‍टेशन खंडाळा यांचे क्षेञात अपघात झाला यावेळी सयद फेरोज मुसा हे वाहन चालवित होते. वाहनाचे नूकसान रु.3,12,646/- चे झाले ही न्‍यायमंचाची दीशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न आहे, त्‍यांना ते मान्‍य नाही. गैरअर्जदाराने हेतूपूरस्‍कर कोणताही विलंब केलेला नाही. त्‍यांनी दि.5.1.2010 ला दावा नाकारला आहे. गैरअर्जदार यांना पॉलिसी मान्‍य आहे. त्‍यांचा एकच आक्षेप आहे की, अर्जदाराने टँकर वापरताना अटी व शर्तीचा भंग केलेला असून एम.व्‍ही. अक्‍ट व सेंट्रल व्‍हेईकल रुल्‍स या प्रमाणे टॅंकरमध्‍ये पेट्रोल व डिझेल किंवा स्‍प्रींट भरुन टँकर चालवित असताना अशा ड्रायव्‍हर जवळ वाहन चालविण्‍यासाठी हजर‍डस ऑफ गूडस असे आरटीओ कार्यालयाचा वेगळा परवाना आवश्‍यक आहे.परंतु टँकर नंबर एम.एच.-26-एच-5717 या वाहनाच्‍या ड्रायव्‍हर जवळ दि.2.6.2009 रोजी अशा प्रकारचा वीशेष परवाना आरटीओ ने इंडॉसमेंट केलेला नव्‍हता. त्‍यामूळे त्‍यांचा क्‍लेम नामंजूर करण्‍यात आला असे करुन सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. गैरअर्जदार यांना जेव्‍हा अपघाताची सूचना मिळाली त्‍यांनी सर्व्‍हेअरला पाठविले, जायमोक्‍यावर जाऊन वाहनाची तपासणी केली असता शेवटी वाहनाचे नूकसान पाहिल्‍यावर रु.1,83,599/- एवढे असल्‍याचे सर्व्‍हे रिपोर्ट व बिल चेक
 
 
रिपोर्ट सर्व्‍हेअरने दिलेले आहे. हजारडस ऑफ गूडस वाहून नेण्‍यासाठी ड्रायव्‍हरकडे असा वीशेष परवाना नसताना वाहन चालवीणे म्‍हणजे अटी व शर्तीचा भंग आहे. तेवहा अर्जदार यांना अशी तक्रार करण्‍याचा अधिकार नाही. गैरअर्जदाराने वाहनाचे नूकसान रु.2,37,737/- व टोचन करण्‍यासाठी रु.11500/- लागली व केबीन दूरुस्‍तीसाठी रु.80ञ,000/- लागले हा खर्च त्‍यांना मान्‍य नाही असे म्‍हटले आहे. या अनूषंगाने त्‍यांनी काढलेला मानसिक ञास व दावा खर्च त्‍यांना मान्‍य नाही. सबब अर्जदाराची तक्रार खोटी असून त्‍यांचा दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार
   सिध्‍द करतात काय ?                             होय.
2.   काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              दि.2.6.2009 रोजी अर्जदार यांचा हदगांव येथून रिकामा टॅंकंर घेऊन ड्रायव्‍हर परत अकोला येथे जाण्‍यासाठी नीघाला असताना राञी 12.30 वाजता पन्‍हाळा गांव जवळ ड्रायव्‍हरचा डोळा लागल्‍यामूळे टँकर क्र.एम.एच.-26-एच-5717 चा त्‍यामूळे अपघात झाला. अपघाता बददल एफ.आय.आर. घटनास्‍थळ पंचनामा, इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. या बददल गैरअर्जदार यांनाही आक्षेप नाही. आक्षेप एवढाच आहे की, अर्जदार यांचे टँकर क्र. एम.एच.-26-एच-5717 पेट्रोल व डिझेल हे हजारडस गूडस मध्‍ये येतात व हजारडस गूडस हे टँकर चालविण्‍यासाठी ड्रायव्‍हरकडे वीशेष प्रकारचे आरटीओ चे इंडासमेंट केलेले वाहन चालविण्‍यासाठी परवाना आवश्‍यक आहे.येथे गैरअर्जदार यांनी आरटीओ चे Notification ज्‍यात एझारडस गूडस मध्‍ये काय काय येते ते दाखल केले नाही. अर्जदार म्‍हणतात याप्रमाणे हा टँकर घेऊन जो ड्रायव्‍हर नीघाला होता त्‍यांचेकडे जे लायसन्‍स होते ते लायसन्‍स अब्‍दूल अबरार अब्‍दूल नबी  हे प्रकरणात दाखल केलेले आहे. परंतु हे ट्रान्‍सपोर्टचे जरी लायसन्‍स असले तरी या संबंधी हजारडस गूडस टँकर चालविण्‍यासाठी वीशेष परवाना नव्‍हता. या सबबीवर दि.5.1.2010 रोजी अर्जदाराच्‍या नांवाने पञ पाठवून AT THE TIME OF ACCIDENT HAZARDANSE ENDT. NOT MANTAIONED ON MOTOR
 
 
DRIVING LICENCE.  या सबबीवर  No Claim   म्‍हणून  क्‍लेम  नाकारला आहे.   ही बाब खरी जरी असली व नियमाप्रमाणे हे आवश्‍यक जरी असले तरी यात एम.व्‍ही. अक्‍ट 1988 rules  14 Currency of licences to drive motor vehicles :-
 
2.     Provided that in the case of licence to drive a transport vehicle carrying goods of dangerous or hazardous nature be effective for a period of one year and renewal thereof shall be subject to the condition that the driver undergoes one-day refresher course of the prescribed syllabus ;
 
 अशा प्रकारची ड्रायव्‍हरने ट्रेनिंग घेऊन आरटीओ चा इंडौसमेंट वीशेष परवाना जो की एक वर्षासाठी असणे आवश्‍यक आहे. या संबंधी त्‍यांनी सेक्‍शन 13 चा उतारा दाखल जरी केला असला तरी सत्‍य व सद्य परिस्थिती अशी आहे की, यात स्‍पष्‍ट असे म्‍हटले आहे अशा प्रकारचा टॅकर डेजंरस अन्‍ड हजारडस गूडस वाहून नेण्‍याचा असा परवाना आवश्‍यक आहे परंतु येथे सत्‍य परिस्थिती पाहिली असता रिकामा टँकर हा हदगांव हून चालेला आहे म्‍हणजे तो टँकर पूर्णतः रिकामा होता यात कोणत्‍याही प्रकारचे डिझेल किंवा पेट्रोल नव्‍हते. या वाहनात दोन ड्रायव्‍हर होते त्‍यांचे नांव सयद फेरोज मूसा व अब्‍दूल अबरार अब्‍दूल नबी  असे होते. या दोन्‍ही ड्रायव्‍हरकडे ट्रान्‍सपोर्ट वाहन चालविण्‍याचा परवाना होता व तो व्‍हॅलिंड होता. आता ही बाब खरी असली तरी यांचेकडे हा हजारडस गूडस वाहून नेण्‍याचा वीशेष परवाना नव्‍हता तरी देखील हा टँकर रिकामा असल्‍यामूळे त्‍या परवान्‍याची येथे त्‍या परिस्थितीत आवश्‍यकता नव्‍हती. कारण  रिकामा टॅकर हा ट्रान्‍सपोर्ट लायसन्‍स असलेले ड्रायव्‍हर NOTIFICATION UNDER M.V. ACT/ CENTRAL M.V. RULES NOTIFICATIONS  337 यातील टेबल मध्‍ये ट्रान्‍सपोर्ट व्‍हेईकल जे नमूद केलेले आहे त्‍यात खाली 6 वर  Goods carrier trucks/tankers/mail carriers.  यात असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे. म्‍हणजे हा रिकामा टॅकर चालविण्‍याचा किंवा ट्रान्‍सपोर्ट  लायसन्‍स दोन्‍ही ड्रायव्‍हरकडे असल्‍यामूळै ते हे टॅकर चालवू शकतात व त्‍या टॅकरचा अपघात झाल्‍यास गैरअर्जदार कंपनीने स्विकारलेली टँकरची जबाबदारी येते. म्‍हणून गैरअर्जदार हे नूकसान भरपाई देण्‍यासाठी सर्वस्‍वी जबाबदार आहेत. यात
 
 2008(4) CPR 453 HIMACHAL PRADESH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SHIMLA     National Insurance Co. Ltd. Vs. Sunil Sood,    (i) Consumer Protection Act, 1986 – Sections 12 and 17 – Insurance Claim – Truck insured met with accident -- Claim repudiated on ground that drivee was not holding valid driving licence – Driver was holding licence to drive LMV -- Whether claim could not be
 
 
 
repudiated on ground that licence did not have endorsement whereby he was licensed to drive a transport vehicle ? No. 
 
प्रस्‍तूत प्रकरणात देखील दोन्‍ही ड्रायव्‍हर जवळ ड्रायव्‍हींग लायसन्‍स होते व
त्‍यांनी रिकामा टँकर चालविला पण तो टँकर भरलेला असता तर ते अपाञ ठरले असते. आता प्रश्‍न राहीला की अर्जदार यांचे टँकरचे नूकसान झाल्‍यानंतर त्‍यांना नूकसान भरपाई किती मिळाली पाहिजे. हे स्‍पष्‍ट आहे की, त्‍यांना सूचना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी सर्व्‍हेअर पाठविला व ते पहिले व्‍यक्‍ती आहे व त्‍यांनी जायमोक्‍यावर जाऊन अपघातग्रस्‍त टँकरची पाहणी केली व नंतर त्‍याचे काय काय नुकसान झाले हे ठरवून त्‍यांचे इस्‍टीमेंट तयार केले व याप्रमाणे अर्जदाराने त्‍यांचे वाहन बाफना मोटार्स नांदेड यांचेकडे जाऊन दूरुस्‍त केले. यात बाफना मोटार्सचे टॅक्‍स इन्‍व्‍हाईस व इतर बिले दाखल केलेले हे सर्व देऊन फायनल सर्व्‍हे रिपोर्ट तयार केला. यात त्‍यांनी टोटल इस्‍टीमेंटच्‍या नवीन पार्ट बदलल्‍या बददल रु.1,98,590/- वर 25 टक्‍के डिप्रिसिऐशन धरलेले आहे व रबर फायबर पार्टवर 50 टक्‍के डिप्रिसिऐशन धरलेले आहे. हे लक्षात घेतल्‍यानंतर अंतीम जबाबदारी रु.1,93,854/- दर्शवलेली आहे. यात रु.1500/- पॉलिसी एक्‍सेस व सालव्‍हेज घेतल्‍यास रु.10,000/- कमी करावेत असाही अभिप्राय दिलेला आहे. म्‍हणून सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्ट प्रमाणे अर्जदार हे रु.1,93,854/- मिळण्‍यास पाञ आहेत. पण यात सालव्‍हेज त्‍यांनी गैरअर्जदार यांना दिले पाहिजे.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                              आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                          गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना टँकर नंबर एम.एच.-26-एच-5717 यांचे नूकसानी बददल रु.1,93,854/- व त्‍यावर क्‍लेम नाकारल्‍याची दि.05.01.2010 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत, असे न केल्‍यास यानंतर दंड व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के याप्रमाणे पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
3.                                          मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2000/- मंजूर करण्‍यात येतात.
4.                                         संबंधीताना निर्णय कळविण्‍यात यावा.
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                           श्रीमती सुवर्णा देशमूख                                   श्री. सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                              सदस्‍या                                                          सदस्‍य