Maharashtra

Ahmednagar

CC/16/118

Amit Vallabhrai Pandit - Complainant(s)

Versus

Branch Manager,United India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

S.B.Mule

04 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/118
( Date of Filing : 01 Apr 2016 )
 
1. Amit Vallabhrai Pandit
Near to Sangamner College,Nashik Road,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,United India Insurance Co.Ltd.
Hotel Karam Building,Near S.T.Stand,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:S.B.Mule, Advocate
For the Opp. Party: A.K.Bang, Advocate
Dated : 04 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने त्‍याचा टाटा एलपीटी कंपनीचा टँकर नं.एम.एच.39/सी.312 याचेसाठी सामनेवालाकडून विमा पॉलीसी क्रमांक 1629003115एन100087403 काढली आहे. सदर विमा पॉलीसीचा कालावधी तारीख 15.06.2015 ते 14.06.2016 पर्यंत आहे. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे पॉलीसीचा हप्‍ता रक्‍कम रुपये 28,902/- अदा केलेला आहे. दिनांक 02.07.2015 रोजी तक्रारदार यांचे मालकीचे वाहन हे त्‍यावरील ड्रायव्‍हर हे पुणे सोलापूर हायवेने सोलापूर बाजुकडे जात असतांना उरळी कांचन ता.हवेली जि.पुणे गावाचे हद्दीत जात असतांना पुढे चाललेल्‍या ट्रेलर नं.एम.एच.12/एफझेड.3408 या वाहनास जोराचा धडक दिली, त्‍यात सदर टँकरचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. टँकरवरील  ड्रायव्‍हर व क्लिनर यांना किरकोळ जखमा झाल्‍या. घटना घडतेवेळी सदरचे टँकरमध्‍ये डिझेल / पेट्रोल नव्‍हते. (रिकामे होते) या अपघातात तक्रारदाराचे टँकरचे मोठया प्रमाणात नुकसान झाले व त्‍यासाठी तक्रारदाराने सामनेवालाकडे अपघाताविषयी कळवून इतर कागदपत्राची पुर्तता करुन विमा दाव्‍याप्रमाणे नुकसानीची मागणी केली. सामनेवाला विमा कंपनीने सर्व्‍हेअर मार्फत सदर वाहनाचा सर्व्‍हे करुन नुकसानीबाबतची पडताळणी करुन सर्व्‍हेअरने सामनेवाला विमा कंपनीकडे अहवाल दिला. तक्रारदाराचे सदर वाहन दुरुस्‍तीकरीता एकुण 2,50,000/- रुपये खर्च झाला. याबाबत तक्रारदाराने सामनेवाला कंपनीतर्फे तोंडी कळविण्‍यात आले त्‍यात  तुम्‍ही  टँकरची दुरुस्‍ती करुन घ्‍या, तुमचा क्‍लेम पास होईल. म्‍हणून अर्जदाराने सदर वाहनासाठी 2,50,000/- रुपये तक्रारदाराने खर्च करुन सदरचे वाहन दुरुस्‍त केले. सदर वाहनाचे दुरुस्‍तीसाठी संपदा अॅटोमोटिव्‍ह, पुणे यांचेकडून इस्‍टीमेट मागविले. वाहनाची दुरुस्‍ती करुन घेतली. सामनेवाला यांनी तक्रारदार यांनी दिनांक 27.12.2015 रोजी पत्र देऊन अपघातादिवशी ड्रायव्‍हर जवळ ज्‍वलनशिल पदार्थाची वाहतुक करण्‍यासाठी आवश्‍यक असलेबाबतची कागदपत्राचे प्रमाणपत्र व नोंद नसल्‍यामुळे सामनेवाला यांनी खोटे व बनावट कारण नमुद करुन अर्जदार यांचा क्‍लेम नाकारला. म्‍हणून तक्रारदाराने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.

3.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहनाची नुकसानीपोटी व क्‍लेमपोटी एकूण रक्‍कम रुपये 3,00,000/- तक्रारदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा. व तक्रारदाराला शारीरीक व मानसिक त्रासापोटी व नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळावा अशी विनंती केली आहे.

4.   तक्रारदाराने तक्रारीसोबत सामनेवाला कंपनीने क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र, संपदा ऑटोमोटीव्‍हचे इस्‍टीमेट, लाईसन्‍स कॉपी, इन्‍शुरन्‍सची प्रत, दिपक मोटर्सची बिले, संपदा ऑटोमोटीव्‍हचे बिल, सुधीर अॅटो इलेक्‍ट्रीकलचे बिल चे झेरॉक्‍स प्रती जोडलेले आहेत.

5.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचे आदेश करण्‍यात आला. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले व निशाणी 17 ला लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केले आहे की, सामनेवाला यांचे विरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून तक्रारदार यांचे ड्रायव्‍हर यांचेकडे आवश्‍यक योग्‍य ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते. तसेच सामनेवाला यांनी सदरील अपघातग्रस्त टँकरचे ड्रायव्‍हरकडे ज्‍वलनशिल पदार्थ वाहतूक करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले लायसन टँकर ड्रायव्‍हरकडे नव्‍हते. तसेच तक्रारदाराचे वाहनाचा वादातील अपघात दिनांक 02.07.2015 रोजी झाला. त्‍यावेळी वाहन आवश्‍यक त्‍या ड्रायव्‍हींग लायसन्‍स परवान्‍याशिवाय त्‍या वाहनातील ड्रायव्‍हर रोडवर चालवत होते ही बाब पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग केला असल्‍याने तक्रारदाराचा सदरचा विमा दावा नामंजूर केला. यात सामनेवालाने तक्रारदारप्रति कोणतीही न्‍यूनत्‍तम सेवा दर्शविलेली नाही. तक्रारदार यांचेकडून अपघाताविषयी माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाला कंपनीने अपघाताविषयी सर्व्‍हेअर नियुक्‍त केला. सदर सर्व्‍हेअरने अपघाताविषयी अंतिम अहवालात वाहनाचे निरीक्षण केल्‍यानंतर सर्व्‍हेअरने एकूण रक्‍कम रु.1,59,572/- चे नुकसान झाले आहे असा अहवाल दिला.   

6.   तक्रारदाराचे वादातील वाहन हे आवश्‍यक त्‍या परवान्‍याशिवाय वाहनावरील ड्रायव्‍हर अपघातावेळी चालवत होता. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग केला असल्‍याने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर केला. सामनेवालाने तक्रारदाराप्रति कोणतीही न्‍यूनत्‍तम सेवा दर्शविलेली नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

7.   सामनेवाला कंपनीने निशाणी 18 ला व निशाणी क्र.21 ला मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायीक निवाडे दाखल केले आहेत.

I) 2013 (4) CPR 266 (&NC) Alok Waghe V/s. Bajaj Allianz General Insurance Co.Ltd. Through; Branch Manager.

“ Consumer Protection Act,1986-Sections 15,17,19 and 21-Insurance-Accident-Claim repudiated on ground that driver of vehicle was not holding valid driving licence at the time of accident which amounted to violation of terms of insurance policy-Complaint dismissed by State Commission-If driver of vehicle was not possessing valid driving licence to drive that particular type of vehicle at the time of accident, Insurance Company is not liable to reimburse damages to vehicle-When drivers licence was not valid and was not renewed at the time of accident, petitioner is not entitled to 75 % of claim on non-standard basis and respondent has not committed any error in repudiating claim-No illegality, irregularity or jurisdictional error in impugned order-Revision Petitions dismissed. ”

II) 2015(1) CPR 425 (NC) Ishwar Singh V/s. ICICI Lombard General Insurance Co. Ltd, Through its Divisional Manager.

“ (A)  Consumer Protection Act, 1986-Section 15,17,19 and 21-Insurance-Road accident-Damage to vehicle-Complaint dismissed by State Commission in appeal-state Commission having noticed that driver of subject vehicle was not holding valid driving licencse came to conclusion that it is a case of vilation of terms and conditions of insurance policy and dismissed complaint-Said order is in consumer nance with powers of Appellate Court while hearing appeal from original decree which cannot be faulted-Revision Petition dismissed.

(B) Civil Procedure Code, 1908-Order 41 Rule33-Power of Appellate Court-This provision gives very wide power to Appellate Court to do complete justice between parties-Provision enables appellate Court to pass such decree or order as ought to have been passed under the circumstances notwithstanding that party in whose favour order is sought to be exercised has not filed any appeal or cross objection.”

सामनेवाला यांनी निशाणी 21 ला National Insurance Co.Ltd. V/s. Mehraj-ud-din Bagwa. 2018 ACJ 1645 Jammu & Kashmir High Court. न्‍याय निवाडा दाखल केला आहे. तसेच तक्रारदाराने निशाणी 20 ला मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे दाखल केले आहेत. 

I) 2016 STPL 1047 NC

Bajranglal  Vs. United India Ins.

II) 2017 STPL 9393 NCDRX

National Insurance co.Ldt v/s. Mata Naina Devi fuel ceutre

III) 2010 STPL 9870 SC

Amalendu Sahoo V/s.Oriental Insurance Company

8.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, सामनेवालाने दाखल केलेली कैफियत/ जबाब, कागदपत्रे, उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद यावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हे सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदाराप्रति न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे काय. ?

 

... होय.

3.

तक्रारदार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय.?

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

9.   मुद्दा क्र.1  –  तक्रारदाराने त्‍याचे मालकीचा टाटा एलपीटी कंपनीचा टँकर नंबर एम.एच.39/सी-312 या वाहनाकरीता सामनेवाला कडून विमा पॉलीसी क्रमांक 1629003115एन100087403 ही विमा पॉलीसी काढली आहे. सदर विमा पॉलीसीचा कालावधी तारीख 15.06.2015 ते 14.06.2016 पर्यंत आहे. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे नमूद पॉलीसीचा विमा हप्‍ता रक्‍कम रुपये 28,902/- अदा केला आहे ही बाब उभय पक्षांना मान्‍य असून तक्रारदार हे सामनेवालचे ग्राहक आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

10.   मुद्दा क्र.2 व 3 – सामनेवाला यांनी त्‍यांचे बचाव पक्षात अशी बाजु मांडली आहे की, अपघातावेळी तक्रारदाराकडे योग्‍य परवाना नव्‍हता म्‍हणून तक्रारदाराचा वादातील विमा दावा नामंजूर करण्‍यात आला आहे. सामनेवाला यांनी त्‍याकरीता मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी दिलेल्‍या Alok Waghe V/s. Bajaj Allianz General Insurance Co.Ltd. Through; Branch Manager.  या न्‍याय निवाडयाचा आधार घेतला आहे. सदर न्‍याय निवाडयाचे अवलोकन केले असता असे दिसून आले आहे की, ड्रायव्‍हरकडे योग्‍य ड्रायव्‍हींग लायसन्‍स नसल्‍यामुळे विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. त्‍यामुळे अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई देणे शक्‍य नाही. म्‍हणून तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर करण्‍यात आला. सामनेवाला यांनी मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी दिलेल्‍या Ishwar Singh V/s. ICICI Lombard General Insurance Co. Ltd, Through its Divisional Manager.  या न्‍याय निवाडयाचा आधार घेतला आहे. सदर न्‍याय निवाडयाचे अवलोकन केले असता असे दिसून आले की, त्‍यामध्‍ये अपघाताचे वेळी नमुद चालकाकडे योग्‍य परवाना नसल्‍यामुळे विमा दावा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन झाले त्‍यामुळे सदरचा विमा दावा नाकारुन तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात आली आहे.

    यातील व निशाणी 21 वरील नमुद न्‍याय निवाडयातील तथ्‍य सदर प्रकरणात लागू पडत नाही, कारण तक्रारदाराचे तक्रारीप्रमाणे तक्रारदाराचा वादातील वाहनाधारकाकडे योग्‍य लायसन्‍स होते व त्‍यासाठी, तक्रारदाराने सदरील अपघातग्रस्‍त वाहनधारकाचा ड्रायव्‍हर विश्‍वनाथ बाबुराव दिघे यांनी त्‍यांचे प्रतिज्ञापत्रात (निशाणी 17) अपघाताचे वेळी त्‍याचे कडील वाहनामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे ज्‍वलनशिल पदार्थ (पेट्रोल / डिझेल रिकामे) नव्‍हते. सदरचा टँकर रिकामा होता असे म्‍हंटले आहे. सदरील वाहनाचा कुठल्‍याही प्रकारचे अतिज्‍वलनशिल पदार्थ नव्‍हता असे तक्रारदाराने त्‍यांचे तक्रारीत म्‍हंटलेले आहे. तसेच तक्रारदाराने निशाणी 20 ला दाखल केलेले न्‍याय निवाडा यांचे अवलोकन केले असता, या प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाही असे मंचाचे मत आहे. मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द धार्विंन के डेवीड यात दिलेले न्‍याय निर्णयानुसार   

 “ Consumer Protection Act, 1986-Sections 2(1)(g),2(1)(o),15,17,19 and 21-Motor Vehicle Act, 1988-Section66(3)(p)-Insurance-Damage to vehicle in accident-Insurance claim repudiated on the ground that vehicle was being plied without valid permit-State Commission directed petitioner-Insurance Company to reimburse amount of Rs.1,39,000/- as assessed by Surveyor with 9 % interest in addition to cost of Rs.5000/- Under Section 66(3)(p) of M.V.Act use of a vehicle without permit as mandated under Section 66(1), M.V.Act will not apply in case empty vehicle plies on road for the purpose of repair-At the time of accident complainant was returning from workshop after getting defective lights etc. repaired-No material irregularity or jurisdictional error in impugned order. ”

    वरील न्‍याय निर्णय या प्रकरणास लागू पडत आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहन हे पुणे सोलापूर हायवेवरुन जात असताना अपघात झाला. योग्‍य कारण नसताना तक्रारदाराचा विमा दावा नाकारला ही बाब सामनेवालाचे तक्रारदारप्रति न्‍यूनत्‍तम सेवा दर्शविते व सिध्‍द होते, तक्रारदाराने त्‍यांची संपुर्ण तक्रार दाखल कागदपत्रांवरुन सिध्‍द केली आहे. प्रस्‍तूतचे प्रकरणात दाखल असलेल्‍या सर्व्‍हेअरच्‍या अंतिम तपासणी अहवालाचे मंचाने अवलोकन केले, यावरुन तक्रारदार तपासणी अहवालाप्रमाणे असलेली रक्‍कम रु.1,59,572/- रुपये मिळणेस पात्र ठरतो या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

11.  मुद्दा क्र.4 – सामनेवाला यांनी निशाणी 15 वर दाखल दस्‍त क्र.1,4,5,6 चे अहवालाची पडताळणी व अवलोकन केलेवरुन आणि मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,59,572/- (रक्‍कम रुपये एक लाख एकोणसाठ हजार पाचशे बाहत्‍तर फक्‍त) द.सा.द.शे.9 व्‍याज दराने दिनांक 27.12.2015 पासून रक्‍कम अदा होईपावेतो तक्रारदारास दयावी.

3.   सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारदाराला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.