जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/95. प्रकरण दाखल तारीख - 26/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. यादवराव गोपाळराव इंगोले वय सज्ञान वर्षे, धंदा शेती रा. वाडी मुक्त्यारपूर ता.मुदखेड जि. नांदेड अर्जदार विरुध्द. यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी शाखा गुरु कॉम्ल्पेक्स, गैरअर्जदार जि.जि.रोड, तारासिंग मार्केट नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एस.भोसले गैरअर्जदार तर्फे वकील - अड.श्रीनिवास मद्ये. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांनी गायीच्या विम्याच्या रक्कमेचे रु.25,000/-न देऊन सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली सून अर्जदार यांनी मराठवाडा विकास पॅकेज योजने अंतर्गत रु.25,000/- किंमतीची गाय दि.23.9.2009 रोजी विकत घेतली. गाय सशक्त असताना गैरअर्जदाराकडे दि.6.10.2009 रोजी विमा काढला व दि.21.10.2010 रोजी सदरील गायीचा मृत्यू झाला. गायीच्या मृत्यू बाबत पशूधन अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यांनी तपासून नंतर गायीचे पी.एम.केले. गायीच्या कानास टॅग नंबर 26390होता. सदरील गायीचा मृत्यू हा त्यांचा श्वाच्छोश्वास प्रक्रिया बंद पडल्यामूळे झाला असे कळविण्यात आले. गायीचे पंचासमक्ष पंचनामा त्यादिवशी करण्यात आला. सदर गाय ही विमा काढल्यानंतरच 15 दिवसांतच मृत्यू पावली म्हणून गैरअर्जदाराने रक्कम देण्यास नकार दिला म्हणून सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदाराने मानसिक ञासापोटी रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.2000/- मागितले आहत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रार ही खोटया माहीतीवर आधारित असून नियमात बसत नसल्याकारणाने खारीज करण्यास योग्य आहे. तक्रारदाराने तक्रारीत केलेले सर्व आरोप त्यांना अमान्य आहेत. पॉलिसी नबर 230600/47/09/01/00000498 गैरअर्जदार हे मृत गायीचे इन्शूरन्स दि.6.10.2009 ते 5.10.2010 या कालावधीसाठी होता. गायीचा मृत्यू हा निमोनिया या रोगाने दि.20.10.2009 रोजी झालेला आहे. त्याचे कारण अपघात नसून आरोग्य आहे. तक्रारदार हे मा. मंचाची दीशाभूल करीत आहेत. गायीचे आरोग्य चांगले असल्याबददलचे प्रमाणपञ पशू वैद्यकीय अधिका-याचे त्यांनी दाखल केलेले नाही.गायीचा मृत्यू हा दि.20.10.2009 रोजी झालेला असून तो दि.21.10.2009 रोजी झालेला नाही. तक्रारदार हा स्वतः त्यांचे कार्यालयात येऊन त्यांने दि.21.10.2009 रोजी या बददलची सूचना दिली व त्यावेळेस असे सांगितले की, मृत गायी तिचा टॅग नंबर 26390 असून तिचा मृत्यू दि.20.10.2009 रोजी मंगळवारी राञी 10 वाजता झालेला आहे. या सूचना पञाचे आधारे पाहिले असता व यानंतर जी उपलब्ध कागदपञे आहेत त्यात गायीचा मृत्यू हा दि.21.10.2009 रोजी झालेला आहे. त्यामूळे तक्रारदार जे म्हणतात ते खोटे आहे व त्यांना गायीची किंमत रु.25,000/- मागण्याचा अधिकार नाही. गायीची किंमत देण्यास गैरअर्जदार हे जबाबदार नाहीत. या अनुषंगाने गाय ही ACUTE PNEUMONIA या रोगाने मृत्यू झालेला आहे. त्यामूळे तक्रारदाराने पॉलिसीच्या अटी व नियमाचे उल्लंघन केलेले आहे त्या अनुषंगाने दि.4.1.2010 रोजी गैरअर्जदाराने त्यांचा दावा नांमजूर केले ते बरोबर आहे. तक्रारदाराने सर्व कागदपञे मॅन्यूपूलेट केलेले आहेत ती खरे नाहीत व तो स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. पी.एम. रिपोर्ट देखील पशूवैद्यकीयक अधिका-याने ACUTE PNEUMONIA या रोगाने गाय मेल्याचे स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामूळे तक्रारदाराला क्लेम मागण्याचा अधिकार नाही सबब खर्चासह तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात स्पष्ट म्हटले आहे की, त्यांनी गैरअर्जदाराकडे पॅकेज योजने अंतर्गत घेतलेल्या गायीचा रु.25000/- चा विमा दि.6.10.2009 ते 5.10.2010 या कालावधीसाठी घेतलेला आहे. ज्यावेळेस गायीचा विमा घेतला त्यावेळेस ती सशक्त होती असे जरी त्यांचे म्हणणे असले तरी त्या बददलचे पशूवैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपञ ज्यामूळे गाय मृत्यू पावली या बदलचा कोणताही पूरावा त्यांनी दिलेला नाही. अर्जदाराने दि.21.10.2009 रोजी पशू विकास अधिकारी यांना एक पञ लिहीले व त्या पञात अर्जदार यांची गाय दत्ताञायप्रभू दूध उत्पादक सहकारी संस्था या संस्थेचे लाभार्थी असून त्यांची गाय आजारपणाने मृत पावलेली आहे असे कळविण्यात येते. असे दोन पञ लिहीलेले आहे. दि.9.11.2009 रोजी गैरअर्जदार कंपनी जिल्हा दूध विकास अधिकारी यांना पञ लिहून यात गायीचा टँग नंबर UII 26390 ची अर्जदाराची गाय दि.21.9.2009 रोजी मृत पावल्याचे कळविले आहे व कागदपञाची खाञी करुन घेऊन पॉलिसीचा लाभ दयावा असे म्हटले आहे. दि.21.10.2009 रोजी पंचासमक्ष गायीचा पंचनामा करण्यात आलेला आहे. ती दि.21.10.2009 रोजी मृत पावल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिस पाटील, संरपच यांनी देखील गाय मृत पावल्याचे म्हटले आहे. गायीच्या किंमतीबददल दाखला जोडलेला आहे. पी.एम. रिपोर्ट मध्ये गायीचा मृत्यू हा ACUTE PNEUMONIA असा अभिप्राय पशू वैद्यकीय अधिका-यानी दिलेला आहे. हया सर्व कागदपञावर आक्षेप घेताना, अर्जदार यांचा अर्ज ज्यात अर्जदार यांनी सूचना देते वेळेस गायीचा मृत्यू दिनांक 20 म्हटले आहे व गैरअर्जदार यांनी आक्षेप घेत गायीचा मृत्यू दि.20.10.2009 म्हटले आहे. कागदपञात दि.21.10.2009 अशी तारीख आहे. तेव्हा दोन्ही तारखेमध्ये फरक असल्याचे व अर्जदार खोटे सांगत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये अर्जदार यांच्या को-या कागदावर गैरअर्जदार यांनी सहया घेतल्या असून नंतर हा कागद बनावट तयार केला असा यूक्तीवाद अर्जदार यांनी केला आहे. गैरअर्जदार यांनी दि.5.2.2000 चे पञ यात असे म्हटले आहे की, दि.04.01.2010 ला अर्जदाराला एक पञ दिले व याही पञात ते असे म्हणतात की, पॉलिसीच्या नियमात अर्जदाराचा क्लेम बसत नाही म्हणून त्यांचा क्लेम नाकारण्यात आलेला आहे. यामध्ये गैरअर्जदार यांनी पॉलिसी दाखल केलेली आहे. या पॉलिसीत नियम 10 वर विमा केलेले जनावर विमा केल्यानंतर 15 दिवसांचे आंत अपघात व्यतिरिक्त कोणत्याही कारणाने दगावले तर विमा रक्कम देता येणार नाही या नियमा अंतर्गत गैरअर्जदार यांनी क्लेम नाकारला आहे. अर्जदार यांनी एक पञ गैरअर्जदार यांना लिहीलेल्या दाखल केलेले आहे त्यात अर्जदाराचे अक्षर नसून मजकूराच्या नंतर बराच गॅप सोडून अर्जदार यांनी यादव म्हणून सही केलेली आहे. या सहीवरुन अर्जदार यांना लिहीता येत नाही व वाचता येत नाही असे दिसून येते व मजकूराच्या खाली व सही मध्ये बराच गॅप सोडण्यात आलेला आहे त्यामूळे हे कागदपञ बनावट असल्याचे वाटते. नियम नबंर 10 याप्रमाणे “ “ विमा केलेले जनावर हे विमा केल्यानंतर 15 दिवसांच्या आंत अपघाताव्यतिरिक्त कोणत्याही कारणाने दगावल्यास नूकसान भरपाई देण्यात येणार नाही ”” असे स्पष्ट म्हटलेले जरी असले तरी कागदपञाच्या आधारे व तक्रार अर्जामध्ये व बाकी अनेक प्रमाणपञामध्ये तसेच पंचनाम्यात, पी.एम. रिपोर्ट, यात गायीचा मृत्यू हा दि.21.10.2009 रोजी झाल्याचे सबळ पूरावा उपलब्ध आहे म्हणजे गायीचा मृत्यू हा 16 व्या दिवशी झाला आहे. त्यामूळे ज्या नियमाचे आधारे गैरअर्जदार यांनी क्लेम नाकारला आहे त्या नियमात हे प्रकरण बसत नाही. गायीचा मृत्यू हा गाय पूर्वी असे म्हणण्यासाठी कोणत्याही पशूवैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपञ गैरअर्जदार सादर करु शकलेले नाहीत. विम्याची रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांची गाय ज्यांचा टॅग नंबर UII 26390 हिच्या मृत्यू बददल रु.25,000/- व त्यावर दि.04.01.2010 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.3000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्या. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |