Maharashtra

Beed

CC/13/1

Dnaynoba Dashrath Ghumre - Complainant(s)

Versus

Branch manager,United INdia Insuracne Co Ltd - Opp.Party(s)

Kakde

03 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/1
 
1. Dnaynoba Dashrath Ghumre
R/O Pargaon Ta Patoda Dist Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch manager,United INdia Insuracne Co Ltd
Chatrapati Sankul Frist Floor,Subash Road Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 03.01.2014
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष)
तक्रारदार ज्ञानोबा दशरथ घुमरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांनी ट्रॅक्‍टर व दोन ट्रॉली शेतीकामासाठी बँकेचे कर्ज काढून विकत घेतलेले आहे. ट्रॅक्‍टरचा क्रमांक एम.एच.23/बी-9132 व ट्रॉलीचा क्रमांक एम.एच.23/क्‍यू-1012 व 1013 असा आहे. दि.29.07.2012 रोजी तक्रारदार यांचे ट्रॅक्‍टर कडबा खाली करुन गावी परत येत होते. सायंकाळी 06.00 वाजेच्‍या सुमारास पाठीमागून ट्रक क्रमांक एम.एच.31/सी.बी.-4285 वेगात आले व ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली, सदर अपघातामध्‍ये ट्रॉलीचे रु.80,000/- चे नुकसान झाले. सदरील अपघाताची माहिती तक्रारदार यांनी विमा कंपनीस दिली. सामनेवाला यांच्‍या सांगण्‍यानुसार अपघात स्‍थळाचा पंचनामा तयार करण्‍यात आला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे आवश्‍यक ती सर्व कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाला यांच्‍या सांगण्‍यावरुन तक्रारदार यांनी ट्रॉलीची दुरुस्‍ती करुन घेतली. खर्चाची मुळ बिले, पोलीस पेपर, सामनेवाला यांच्‍याकडे सुपूर्द केले, सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई दिलेली नाही. सदरील ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचा सामनेवाला यांच्‍याकडे इन्‍शुरन्‍स काढलेला आहे. दि.30.11.2012 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यास नोटीस पाठविली, ती नोटीस मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास पोस्‍टाद्वारे लेखी पत्र देऊन केवळ रु.28,050/- एवढी नुकसान भरपाई मंजूर केल्‍याचे कळवले व त्‍याबाबत व्‍हाऊचरवर सहया मागितल्‍या. दि.21.12.2012 रोजी तक्रारदार यांनी सदरचे व्‍हाऊचरवर सहया करुन सामनेवाला यांना दिले. तसेच तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम हरकत ठेवून स्विकारली आहे याबाबत सामनेवाला यांना कळवले आहे.तक्रारदार यांना ट्रॉली दुरुस्‍तीचा खर्च रु.80,000/- आला आहे. सामनेवाला यांनी फक्‍त रु.28,050/- एवढी अल्‍पशी रक्‍कम मंजूर केलेली आहे. सामनेवाला यांनी संपूर्ण नुकसान भरपाईची रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जाण्‍यायेण्‍याचा खर्च करावा लागला आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून रु.98,950/- व त्‍यावर व्‍याज मिळावे अशी मागणी केली आहे.

सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले त्‍यांनी निशाणी 8 अन्‍वये आपली लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचा सामनेवालाकडून इन्‍शुरन्‍स काढला आहे ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांचे झालेले सर्व नुकसान सामनेवाला यांनी दिलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम फुल अण्‍ड फायनल सटिसफॅक्‍शन म्‍हणून स्विकारलेली आहे आणि त्‍याबाबत तक्रारदार यांनी व्‍हाऊचरही करुन दिलेले आहे. सामनेवाला यांचे कथन की, त्‍यांनी नुकसान भरपाईचा अंदाज घेण्‍यासाठी सर्वेअरची नियुक्‍ती केली, सर्वेअर यांनी रिपोर्ट सादर केला. सदरील वाहन दुरुस्‍त झाल्‍यानंतर सदरच्‍या वाहनाचे निरीक्षण करण्‍यात आले. सामनेवाला यांना सर्वेअर आणि लॉस असेसर यांचा रिपोर्ट मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी रक्‍कम रु.28,050/- मंजूर केलेली आहे, सदरील रक्‍कम ही योग्‍य आणि वाजवी असून सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी ठेवलेली नाही, सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 3 अन्‍वये अपघात ठिकाणचा पंचनामा, प्रथम खबर, पोलीस रिपोर्ट, विमा पॉलीसीची झेरॉक्‍स प्रत, ट्रॉली दुरुस्‍त केल्‍याबाबत खर्चाच्‍या पावत्‍या हजर केलेल्‍या आहेत. सामनेवाला यांनी निशाणी 10सोबत दस्‍तऐवज हजर केलेले आहे. तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र तसेच सामनेवाला यांनी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सर्व पुराव्‍याचे काळजीपूर्वक अवलोकन केले.तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे आणि सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्‍तर 1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे झालेले पूर्ण नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम
मिळण्‍यास पात्र आहे काय? होय. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.

कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ट्रॅक्‍टर व ट्रॉलीचा त्‍यांच्‍याकडे इन्‍शुरन्‍स काढलेला आहे ही बाब मान्‍य केलेली आहे. तसेच अपघातामध्‍ये तक्रारदार यांचे ट्रॉलीचे नुकसान झालेले आहे ही बाब ही मान्‍य केलेली आहे. सामनेवाला यांनी नुकसान भरपाई म्‍हणून रु.28,050/- तक्रारदार यांना दिलेले आहेत. सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम स्विकारताना त्‍यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळाली आहे, सामनेवाला कंपनीकडे कोणतीही मागणी नाही असे फुल अण्‍ड फायनल सेटलमेंटचे व्‍हाऊचर करुन दिलेले आहे. त्‍यामुळे सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनी तक्रारदार यांना काही रक्‍कम देणे लागत नाही. सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदार यांच्‍या वकीलांनी त्‍यांच्‍या युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खाली नमुद केलेल्‍या केसेसचा संदर्भ दिलेला आहे.
1) IV (2012) CPJ - 641 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI. NIRMAL SINGH V/s ORIENTAL INSURANCE COMPANY LTD.

सदरील केसमध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी, (i) Insurance – Discharge Voucher – Though signed as ‘full and final’ may not be treated as final if the consumer can satisfy Court that it was obtained through undue influence, fraud or misrepresentation.

2) 2002 (3) CPR 251 (NC)
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI. Jayajothi & Co. Ltd. V/s The Oriental Insurance Co. Ltd.

सदरील केसमध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी, Complainant received amount in full and final settlement of claim – Complaint claiming Rs.26,77,430/- towards interest and Rs.93,94,095/- towards balance amount of insurance claim – Complainant had accepted the amount settled by Insurance Company without protest – No correspondence under which complainant might have expressed some reluctance to accept the amount – No deficiency in service could be said made out against Insurance Company.
वर नमुद केलेल्‍या केसेसचा आधार घेऊन सामनेवाला यांच्‍या वकीलानी तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे असा युक्‍तीवाद केला.

तक्रारदार यांचे वकील श्री.काकडे यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम अंडर प्रोटेस्‍ट स्विकारलेली आहे व ज्‍यावेळेस सहया केल्‍या, त्‍याच वेळेस सामनेवाला यांना सदरील बाबत लेखी कळविलेले आहे. सदरील अमाऊंट ही अंडर प्रोटेस्‍ट व हक्‍क अबाधित राहून स्विकारल्‍यामुळे तक्रारदार हे उर्वरीत रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे.

वर नमुद केलेला युक्‍तीवाद लक्षात घेता तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचा पुरावा व कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्‍या वाहनाचे अपघातामध्‍ये नुकसान झाले. सदरील वाहन दुरुस्‍त करण्‍यासाठी तक्रारदार यांनी सोबत दाखल केलेल्‍या पावत्‍याप्रमाणे सुमारे रु.71,000/- खर्च आल्‍याचे दिसते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्‍कम पाठविली त्‍यावेळेस तक्रारदार यांनी व्‍हाऊचरवर सहया केल्‍या, त्‍यावेळेस सामनेवाला यांना सदरील रक्‍कम त्‍याचे हक्‍क अबाधित ठेऊन स्विकारत आहे हे कळविलेले आहे. त्‍या संदर्भात तक्रारदार यांनी कागदपत्र हजर केलेले आहे. सदरील कागदपत्र सामनेवाला यांना मिळाले ही बाब वादात नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र यावरुन असा निष्‍कर्ष काढण्‍यात येतो की, तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम फुल अण्‍ड फायनल सेटलमेंट म्‍हणून स्विकारलेली नव्‍हती. सदरील व्‍हाऊचरवर सहया करत असताना लगेचच तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदरील रक्‍कम त्‍यांचे हक्‍क अबाधित ठेऊन स्विकारत आहे असे कळविले आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांचा युक्‍तीवाद की, तक्रारदार यांनी फुल अण्‍ड फायनल सेटलमेंट करुन ती रक्‍कम स्विकारली आहे हा युक्‍तीवाद मान्‍य करता येत नाही. तक्रारदार यांनी अपघातात नुकसान झालेले ट्रॉलीचे दुरुस्‍ती कामी जवळपास रक्‍कम रु.71,000/- खर्च केल्‍याचे दिसते. सामनेवाला यांनी सर्वेअरची नियुक्‍ती केली होती, सर्वेअरच्‍या रिपोर्ट प्रमाणे इन्‍शुरन्‍स कंपनी रु.35,000/-देणे लागते असे नमुद केलेले आहे. तसेच त्‍या संबंधी बिल चेक रिपोर्ट दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराला प्रत्‍यक्ष खर्च किती आला याबाबत विचार करुन नुकसान भरपाई देणे गरजेचे होते. सर्वेअर यांनी दिलेली रक्‍कम कोणत्‍या आधारे आली याबाबत सामनेवाला यांनी कोणताही दस्‍तऐवज सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व दुरुस्‍तीसाठी करावा लागणारा खर्च व घसारा या सर्व बाबी लक्षात घेतल्‍या असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रु.61,000/- नुकसान भरपाईपोटी मंजूर करणे गरजेचे होते. प्रत्‍यक्षात सामनेवाला यांनी रक्‍कम रु.28,050/- एवढी नुकसान भरपाई दिलेली आहे, ती वजा जाता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रु.32,950/- एवढी रक्‍कम देणे लागते असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2) सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनी यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी
रक्‍कम रु.32,950/- (अक्षरी रु.बत्‍तीस हजार, नऊशे पन्‍नास)
तक्रारदार यांना निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावी.
सदर रक्‍कम विहीत मुदतीत न दिल्‍यास संपूर्ण रकमेवर तक्रार
दाखल तारखेपासून रक्‍कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के
प्रमाणे व्‍याज द्यावे.
3) सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार यांना
झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/- व
तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.


श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्‍य अध्‍यक्ष

 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.