निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/11/2011 कालावधी 07 महिने 22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सिंधु भ्र.बालाजी मिसे. अर्जदार वय 28 वर्ष.धंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.मसनेरवाडी.ता.गंगाखेड.जि.परभणी विरुध्द शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडीया इन्शुरंस कं.लि. अड.जी.एच.दोडीया. दुसरा मजला, दयावान कॉम्पलेक्स.स्टेशनरोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या पतीचा मृत्यू नंतर त्याची वैयक्तिक विमा पॉलिसीची रक्कम देण्याचे नाकारुन गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीची मोटारसायकल क्रमांक एम.एच.22 एम./1190 होती.ज्याची पॉलिसी क्रमांक 230601/31/09/01/00016911 गैरअर्जदाराकडून दिनांक 06/01/2010 ते 05/01/2011 या कालावधीसाठी घेतलेली होती.दिनांक 24/05/2010 रोजी अर्जदाराच्या पतीचे ट्रक क्रमांक MH 12 – AQ/3125 च्या चालकाने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवुन दिलेल्या धडकेने अपघाती निधन झाले.त्यानंतर अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला.नंतर दिनांक 10/01/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे क्लेमची चौकशी केली असता विमा कंपनीने अपघताच्यावेळी मयत ट्रीपल सीट असल्यामुळे विमा पॉलिसीचा भंग होतो.म्हणून क्लेम फेटाळला असल्याची माहिती दिली,परंतु ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला असल्यामुळे विमा पॉलिसीचा भंग होत नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे.अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन वैयक्तिक अपघात विमा रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने मिळावेत, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र F.I.R.ची कॉपीप्रत, पोस्टमार्टेम रिपोर्ट, इन्शुरंसची कव्हरनोट,ड्रायव्हींग लायसेन्स, R.C.book,गैरअर्जदाराचे पत्र, क्राइम डीटेल फॉर्म इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराची तक्रार ही खोटी तथ्यहीन ग्राहक संरक्षण कायद्याविरुध्द आहे.म्हणून फेटाळण्यात यावी.असे म्हंटले आहे.अर्जदाराचा विमादावा योग्य त्या कारणानेच फेटाळला आहे.कारण मोटारसायकलवर अपघाताच्या वेळी 3 जण होते.त्यामुळे पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन झाले. अर्जदारास दिनांक 07/03/2011 रोजी विमादावा फेटाळल्याचे पत्र देवुन विमा कंपनीने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही.म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केलेली आहे. आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, मोटारसायकल पॉलिसी,आरोपपत्र, बील चेक रिपोर्ट, रेप्युडेशनलेटर दाखल केलेली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादा वरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराचा मयत पती नामे बालाजी हरी मिसे याच्या मालकीची मोटार सायकल क्रमांक MH 22-M/1190 ही होती व तिचा पॉलिसी क्रमांक 230601/31/09/01/00016911 दिनांक 06/01/2010 ते दिनांक 05/01/2011 या कालावधीसाठी होता ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या पतीचे दिनांक 24/05/2010 रोजी MH 12 AQ 3125 क्रमांकाच्या ट्रकची धडक लागुन अपघाती निधन झाले.ट्रकचालकाने हलगर्जीपणे भरधाव ट्रक चालवुन हा अपघात झाल्याचे नि.5/1 व 5/2 वरील पोलिस तपासातील कागदपत्रांवरुन सिध्द होते. अर्जदाराच्या पतीचा मोटारसायकलचा ड्रायव्हींग लायसेन्स (नि.5/6) होता.तसेच अपघात ग्रस्त मोटारसायकलचे रजिस्ट्रेशन (नि.5/7) ही होते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.16/5 वरील रेप्युडेशन लेटर मध्ये विमा दावा फेटाळल्याचे कारण अपघाताच्या वेळी मोटारसायकलवर 3 व्यक्ती होत्या ज्यामुळे पॉलिसी अटींचे उल्लंघन झाले. असे दिलेले आहे.तक्रारीत पॉलिसी अटी दाखल नसल्यामुळे कोणत्या अटींचे उल्लंघन झाले हे समजत नाही.तसेच मोटारसायकलचा अपघात त्यावर 3 व्यक्ती असल्यामुळे झालेला नाही तर समोरील ट्रकड्रायव्हरने ट्रक निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवुन दिलेल्या धडकेमुळे झालेला आहे.त्यामुळे अर्जदाराच्या मृत पतीचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हांस वाटते. अर्जदाराच्या पतीचा मोटार सायकलचा विमा पॉलिसी क्रमांक 230601/31/09/01/00016911 मध्ये “ Compulsory PA to owner cum driver ” Amount Rs.1,00,000/- व त्याचा हप्ता रु. 50/- आहे हे नि.16/1 वरील पॉलिसी वरुन सिध्द होते. सदरील तक्रारीत खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्या पासून 30 दिवसांच्या आत तक्रार दाखल तारखे पासून संपूर्ण रक्कम देय होई पर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने रु.1,00,000/- द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,500/- द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |