निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 31/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 14/11/2011 कालावधी 07 महिन 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दिपक पिता मधुकरराव मांजरमकर. अर्जदार वय 40 वर्ष.धंदा.व्यापार आणि पेट्रोलपंप मालक. अड.एस.आर.पडोळे. रा.मांजरमकरपेट्रोलियम कंधार,ता.कंधार,जि.नांदेड रा.रिसाला बाजार,हिंगोली.ता.जि.हिंगोली. विरुध्द 1 शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. दि युनायटेड इंडीया इन्शुरंस कं.लि. अड.जी.एच.दोडीया. शाखा परभणी.रा.दयावान कॉम्पलेक्स.स्टेशनरोड.परभणी. ता.जि.परभणी. 2 श्री रमाकांत पिता.गंगाधरराव दवंडे. वय 45 वर्षे.धंदा विमा प्रतिनिधी. रा.गौतम नगर,परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने अर्जदाराची नुकसान भरपाई नाकारुन दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचा कंधार जि नांदेड येथे मांजरमकर पेट्रोलियम म्हणून पेट्रोलपंप आहे.गैरअर्जदाराकडे आपल्या पेट्रोलपंपाचा पॉलिसी क्रमांक 230601/46/08/04/00000596 अन्वये अर्जदाराने विमा काढला होता. अर्जदाराच्या पेट्रोलपंपावर मॅनेजर वॉचमन व इतर कर्मचारी कामावर होते.मॅनेजर रोज डिझेल व पेट्रोल टाक्यांची तपासणी करुन अर्जदारास डिझेल व पेट्रोल साठयासंबंधी माहिती देत दिनांक 25/08/2009 रोजी डिझेल टाकीतील 1941 लीटर डीझेल चोरी झाल्याबाबत अर्जदारास मॅनेजरने फोनव्दारे कळवले.दिनांक 24/09/2009 रोजी अर्जदाराने पोलिस स्टेशन कंधार येथे चोरी बद्दल फिर्याद दिली.गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सदरील घटनेची माहिती दिली.त्यावरुन त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना झालेल्या चोरी बद्दल माहिती दिली.त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 च्या सर्व्हेअरने पेट्रोलपंपाची तपासणी करुन अहवाल गैरअर्जदाराकडे दिला.दिनांक 25/08/2010 रोजी गैरअर्जदाराकडून अर्जदारास पत्र आले कि,तुमच्या कर्मचा-यांनी मालाचे नुकसान केलेले आहे.त्यामुळे आपणास नुकसान भरपाई देता येत नाही, गैरअर्जदाराने तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. व नुकसान भरपाई रु.73,000/- व रु.10,000/- शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.15,000/- व रु.2,000/- दावा चालविण्याचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, फिर्याद, रेप्युडेशन लेटर हे कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 त्याला न्यायमंचाची नोटीस मिळून नेमल्या तारखेला हजर होवुन लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्याच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी, तथ्यहीन व ग्राहक तक्रार निवारण कायद्याच्या विरुध्द आहे म्हणून फेटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.एफ.आय.आर. नुसार अर्जदाराच्या मॅनेजर व 3 कर्मचा-यांनीच अर्जदाराला फसवले आहे व विमाधारकाच्या कर्मचा-यांनीच त्याला फसवले असेल तर पॉलिसीच्या अटीनुसार गैरअर्जदार अर्जदारास नुकसान भरपाई देवु शकत नाही.अर्जदारास दावा फेटाळून गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, क्लेम फॉर्म, एफ.आय.आरची कॉपी, सर्व्हे रिपोर्ट, रेप्युडेशन लेटर व पॉलिसी शेड्युल इ.कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने त्याच्या पेट्रोल पंपाचा पॉलिसी क्रमांक 230601/46/08/04/00000596 दिनांक 05/01/2009 ते दिनांक 04/01/2010 या कालावधीसाठी घेतलेली आहे.ही बाब सर्वमान्य आहे. नि.4/1 वरील पोलिसांत दिलेल्या दिनांक 27/09/2009 च्या पहिल्या खबरी वरुन घटना दिनांक 24/08/2009 ते दिनांक 25/08/2009 च्या दरम्यान घडल्याचे सिध्द होते तसेच त्यात आरोपी म्हणून अर्जदाराने त्याच्या कर्मचा-यांची नावे दिलेली आहेत व कर्मचा-यांनीच 1941 लिटर डिझेलचा अपहार केल्याचे म्हंटले आहे.गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.15/5 वरील अर्जदाराच्या पॉलिसीवर असलेल्या Exclusion क्लॉज मध्ये The Company shall not be liable in respect of (ii) Loss or damage where any inmate or member of the insured s household or of his business staff or any other person lawfully in the premises in the business is concerned in the actual theft or damage to any of the articles or premises or where such loss or damage have bean expedited or any way assisted or borough about by any such person or persons. असा स्पष्ट उल्लेख आहे. सदरील तक्रारीत अर्जदारानेच पोलिसांत त्याच्या कर्मचा-यांनीच अपहार केल्याचे म्हंटलेले आहे.त्यामुळे नि4/2 वरील पत्रान्वये गैरअर्जदार क्रमांक 1 ने फेटाळलेला अर्जदाराचा विमा दावा योग्य त्या कारणानेच नाकारला आहे.असे मंचाचे मत आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |