निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 22/09/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2011 तक्रार निकाल दिनांकः- 09/02/2012 कालावधी 04 महिने. 17 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सय्यद हारुन सय्यद जाफर अर्जदार वय.48 वर्षे, धंदा सह शिक्षक, अड.एस.एन वेलणकर डॉ.मोहम्मद इक्बाल उर्दु हायस्कुल, ललीत कला भवन जवळ, परभणी. विरुध्द शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. अड.एस अडकीने. शहर शाखा, दौलत बिल्डींग, पहिला मजला, शिवाजी चौक, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री सी.बी.पांढरपट्टे, अध्यक्ष ) अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे. अर्जदार हायस्कुल शिक्षक म्हणुन नौकरी करतो. त्याचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते क्रमांक 6817 आहे. तारीख 04/09/2010 रोजी बँकेतील पैसे काढण्यासाठी गेला होता. खात्यात त्या दिवशी रुपये 17,035/- शिल्लक होते. म्हणुन रुपये 7,000/- ची पैसे काढण्याची स्लीप भरुन बँकेच्या कर्मचा-यास पास बुकसह ताब्यात दिली. कर्मचा-याने टोकन दिले. बँकेत खुप गर्दी असल्याने अर्जदारास दुसरे काम असल्याने तोपर्यन्त बाहेर गेला. परत आल्यावर बँकेच्या कर्मचा-याने अर्जदारास त्याची स्लीप सापडत नाही असे सांगुन दुसरी withdrawal स्लीप भरुन देण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुसरी स्लीप भरुन दिली. त्यावर पुर्वी दिलेलाच टोकण नंबर टाकुन अर्जदारास रुपये 7,000/- दिले. पास बुकवर त्याची नोंद करुन रुपये 10,035/- शिल्लक दाखवुन पास बुक परत केले. त्यानंतर सहा महिन्यापेक्षा जास्त अर्जदाराने खात्यावर व्यवहार केला होता आणि तारीख 23/05/2011 रोजी त्याच्या खात्यात रुपये 9,485/- शिल्लक होती. पुन्हा दिनांक.28/05/2011 रोजी अर्जदार पैसे काढण्यासाठी गेला असता कर्मचा-याने त्याच्या खात्यात रक्कम कमी आहे असे सांगितले व पासबुक घेवुन सी.बी.(करेक्ट बॅलन्स) अशी नोंद करुन रुपये 7,000/- वजा दाखवुन 485/- रुपये शिल्लक दाखविली म्हणुन अर्जदाराने लगेच गैरअर्जदाराकडे व त्याच्या वरीष्ठ अधिका-याकडे लेखी तक्रार देवुन त्याबाबत सखोल चौकशीची मागणी केली होती, परंतु त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर पुन्हा त्याबाबत पाठपुरावा केल्यावर असे सांगण्यात आले की, अर्जदाराने एकाच दिवशी दोन स्लीप वापरुन 7,000/- नंतर 14,000/- रुपये उचलले होते. म्हणुन सी.बी. (करेक्ट बॅलन्स) ही एन्ट्री करुन ती रक्कम वजा केली आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्या त्याच्या खात्यातुन 7000/- रुपये कपात केली आहे. म्हणुन त्याने दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तुतचा अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराने त्याचे बचत खाते क्रमांक 6817 मधील तारीख दि.23/05/2011 नंतरच्या सी.बी. (करेक्ट बॅलेन्स) म्हणुन बेकायदेशीररित्या रुपये 7,000/- कपात केल्याची नोंद रद्द करुन ती रक्कम सहा टक्के व्याजासह त्याला मिळाली किंवा त्याच्या खात्यात जमा दाखवुन खाते उतारा दुरुस्त करण्याचा आदेश व्हावा याखेरीज मानसीक ञास व सेवाञुटीची रक्कम रुपये 2,500/- व अर्जाचा खर्च रुपये 1,500/- मिळावे अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपञ नि.2 आणि पुराव्यातील कागदपञ नि.4 लगत पासबुकची एन्ट्री व पासबुकातील व्यवहार नोंदीच्या छायाप्रती, गैरअर्जदारास तारीख 28/05/2011 रोजी दिलेल्या तक्रारीची स्थळप्रत दाखल केली आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्याने दिनांक 17/11/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.9) दाखल केला आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्याच्या विरुध्द खोटी व बनावट तक्रार केली असल्याने सत्य बाब लपविली आहे. बँकेत तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे अर्जदाराचे खाते आहे हे त्याला मान्य आहे. तसेच दिनांक 04/09/2011 रोजी त्याच्या खात्यातुन 7,000/- रुपये मिळण्यासाठी स्लीप भरुन दिली होती व कर्मचा-याने टोकण दिले होते हे त्याने नाकारले नाही. त्यापुढील तक्रार अर्जातील मजकुर अमान्य करुन त्याबाबत असा खुलासा केला आहे की, अर्जदार दिनांक 04/09/2010 रोजी पैसे काढण्यास आला होता. त्या दिवशी शनिवार होता व बँकेचे अर्धा दिवस कामकाज चालणार होते. त्या दिवशी पगारदार कर्मचा-यांची बँकेत पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी होती. एकुण 220 खातेदारांचे रुपये 29,47,000/- इतका त्या दिवशी पगार झाला. अर्जदाराने withdrawal स्लीप भरुन दिली त्यामुळे 199 नंबरचे टोकण दिले होते. त्याने सहायक कॅश काउंटर वरुन रुपये 7,000/- घेतले होते व आपल्या जवळील टोकण कॅशिअरला दिले नव्हते आणि गर्दी असल्यामुळे कॅशिअर कडुनही ते टोकण मागवुन घेण्याचे अनावधानाने राहुन गेले होते. त्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने अर्जदाराने त्याच्याकडील टोकण बँक अधिका-यास दाखवुन माझा पेमेंट कळला नाही म्हणुन तक्रार केली. गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, बँकेत झालेल्या अर्जाच्या व्यवहाराची वेगवेगळया ठिकाणी नोंद होती. बँकेत दोन कॅश काउंटर आहेत. दोन कॅशिअरकडे कॅशबुक असते. कॅशबुकवर क्रेडीट व डेबीट दोन्ही नोंदी होत्या. तारीख 04/09/2010 रोजी हेडकॅशिअरच्या कॅशबुकला अनुक्रमांक 123 वर खाते क्र.6817 व टोकण क्र.199 व रुपये 7,000/- चे पेमेंट केल्याची नोंद आहे. तसेच सहायक कॅशिअर यांनी त्यांच्या कॅशबुकवर अनुक्रमांक 66 ला टोकण क्रमांक 199 ची नोंद घेवुन 7,000/- रुपये पेमेंट दिल्याची नोंद केली आहे. दोन्ही कॅशिअर कॅशबुकातील नोंदीप्रमाणे झालेल्या पेमेंटच्या नोंदी खातेदारांच्या लेजरला तसेच सबसिडी रजीष्टरला घेतली जाते. त्याप्रमाणे तारीख 04/09/2010 रोजी अर्जदारास खाते क्रमांक 6817 लेजर क्रमांक 18 पान 114 नुसार रुपये 7,000/- दोन वेळा पेमेंट केल्याची नोंद केली आहे. अर्जदाराने 7,000/- रुपये तारीख 04/09/2010 रोजी दोन वेळा उचलले होते, परंतु त्याची नोंद लेजर बुकला नव्हती. म्हणुन दिनांक 23/05/2011 रोजी जेंव्हा अर्जदार बँकेत 2000/- रुपये उचलण्यासाठी बँकेत आला होता तेंव्हा निश्चितच शिल्लक रक्कम रुपये 487/- त्यांच्या खाते पुस्तकावर करण्यात आली. याबाबत अर्जदाराला समजावुन सांगुन देखील त्याचे समाधान झाले नाही आणि त्याने जाणुनबुजुन गैरअर्जदारा विरूध्द प्रस्तुतची खोटी तक्रार केली आहे. म्हणुन रुपये 5,000/- च्या खर्चासह ती फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पृष्टयर्थ शपथपत्र नि.10 आणि पुराव्यातील कागदपत्र नि.11 लगत Withdrawal Sleep च्या दोन पावत्या, खाते उतारा, दोन्ही कॅशिअरकडील कॅशबुकच्या नोंदीकरिता 6 कागदपञांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत. प्रकरणाच्या अंतीम सुणावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.वेलणकर यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदारतर्फे अड. श्री अडकिने यांनी लेखी युक्तीवाद सादर केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराने तारीख 04/09/10 रोजी त्याच्या बचत 1खात्यातील फक्त रुपये 7,000/- काढले असतांना गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्या सी.बी.(करेक्ट बॅलेन्स) एन्ट्री करून खात्यात 7,000/- रुपये वजा करून फक्त 485/- रुपये शिल्लक दाखवुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवाञुटी केली आहे काय ? होय 2 तक्रार अर्जातील मागणी केलेल्या निधीस अर्जदार पाञ होय आहे काय ? असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते क्रमांक 6817 आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या तक्रारीत दिनांक 04/09/2010 रोजी रु.7,000/- काढले असे आहे अर्जदाराच्या पासबुकावर तशी नोंद आहे. त्यानंतर दिनांक 23/05/2011 ला पासबुकात व बँकेच्या लेजरमध्येही Corrected Balance लिहून अर्जदाराच्या खात्यातून रु.7,000/- वजा केलेले आहेत. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्याने 199 क्रमांकाचे टोकन विथड्रॉवल स्लीप देवुन घेतले व गर्दी असल्यामुळे तो टोकन घेवुन बाहेर गेला.नंतर अर्जदार परत आल्यावर संबंधित कर्मचा-यांनी विथड्रॉवल स्लीप सापडत नाही व दुसरी स्लीप लिहून देण्यास सांगीतले.त्यावर पहिलाच टोकन नंबर टाकून अर्जदारास रु.7,000/- देण्यात आले. गैरअर्जदारांच्या लेखी जबाबात दिनांक 04/09/2010 रोजी बँकेत प्रचंड गर्दी असल्यामुळे गैरअर्जदाराच्या सहाय्यक रोखपालाकडून अनावधानाने अर्जदाराकडून टोकन घ्यावयाचे राहून गेले.अर्जदाराने प्रत्यक्षात रु.7,000/- घेतले होते.तशी पासबुकावर नोंदही करण्यात आली, परंतु अर्जदाराने गर्दीचा फायदा घेतला व तो बँकेत परत आला व अधिका-याकडे जावुन अजुन माझे पेमेंट केले नाही म्हणून तक्रार केली.कर्मचा-यांनी स्लीपची शोधाशोध केली, परंतु स्लीप सापडली नाही म्हणून अर्जदाराकडून परत स्लीप भरुन घेतली व त्यावर टोकन नंबर 199 च घालून परत रु.7,000/- चे पेमेंट हेडकॅशिअरच्या काउंटर वरुन करण्यात आले. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार दोन्ही कॅशिअरांच्या रजिस्टरवर पेमेंट केल्याची नोंद आहे. त्या रजिस्टरची कॉपी त्यांनी नि.11/4 व नि.11/5 वर दाखल केलेली आहे.त्यानुसार अर्जदार जेव्हा पेमेंट घेण्यास आला व गैरअर्जदारांनी स्लीप शोधण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॅशिअरांच्या रजिस्टरवर सुध्दा नोंद बघायला हवी होती कारण पासबुकामध्ये नोंद झाल्यानंतर विथड्रॉवल स्लीप कॅशिअरकडेच जात असल्यामुळे त्या स्लीपच पेमेंट झालेले तरी असेल किंवा झालेल नसेल.त्यामुळे अर्जदार जेव्हा गैरअर्जदारांकडे पेमेंट झाल नाही म्हणून गेला तेव्हा त्यांना कॅशिअरकडे पेमेंट न झालेली विथड्रॉवल स्लीप सापडली नाही तेव्हा त्यांनी पेमेंटच रजिस्टर व टोचणला लावलेल्या स्लीपस् तपासूनच दुसरी विथड्रॉवल स्लीप भरुन घ्यावयास हवी होती. गैरअर्जदारांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकी बद्दल अर्जदाराच्या खात्यातून रक्कम वजा करुन त्याला त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते.व अर्जदाराने दिनांक 04/09/2010 रोजी त्याच्या बचत खात्यातील फक्त रु.7,000/- काढले असतांना गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्या सी.बी.( करेक्ट बॅलेन्स ) एन्ट्री करुन खात्यात रु.7,000/- वजा करुन फक्त रु.485/- शिल्लक दाखवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारानी अर्जदारास रु.7,000/- दिनांक 23/05/2011 पासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजाने निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ.सुजाता जोशी. श्रीमती अनिता ओस्तवाल. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |