निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/03/2010 तक्रार नोदणी दिनांकः-18/03/2010 तक्रार निकाल दिनांकः-20/09/2010 कालावधी 06 महिने02दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मुजीब खान पिता वजीर खान पठाण अर्जदार वय 30 वर्षे धंदा शेती व्यापार रा.पठाण गल्ली, अड.शेख जाहेद अहेमद पालम ता.पालम जि.परभणी. --विरुध्द – शाखा व्यवस्थापक गैरअर्जदार दि.ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड अड.बि.ए.मोदानी शाखा परभणी दौलत बिल्डींग शिवाजी चौक, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्रीमती अनिता ओस्तवाल सदस्या ) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रूटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे अर्जदाराने त्याच्या मालकीच्या ट्रक नोंदणी क्रमांक एम.एच.22 एन 622 चा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडून उतरविला होता. सदर विम्याचा पॉलीसी क्रमांक 182003/31/2008/1411 व कालावधी दिनांक 16.10.2007 ते 15.10.2008 पर्यत होता. सदर वाहन दिनांक 14.05.2008 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अर्जदाराच्या घरा समोरुन चोरुन नेले. त्यानंतर अर्जदाराने रितसर पोलीस स्टेशन पालम येथे सि.आर.क्रमांक 38/08 अन्वये तक्रार नोदविली. त्यानंतर अर्जदाराने सदर वाहनाचा विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह क्लेम दाखल केली परंतू अद्याप पावतो गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा मंजूर केलेला नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने विमा दाव्यापोटी आर्थिक मानसिक व शारीरीक त्रासापोटी व सेवा त्रूटी बदल रक्कम रुपये 500000/- दयावे. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2000/- द्यावे अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) दाखल केले आहे. पुराव्यातील कागदपत्रात नि.4/1 ते नि.4/6 व नि. 20 व नि.22/1 ते नि.22/3 नि 24 ते 26 मंचासमोर दाखल केले आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर तारीख 29/06/2010 रोजी प्रकरणात लेखी जबाब ( नि.14) दाखल केला. अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, मुजीबखान मंजीरखान पठाण याच्या नावाने पॉलीसी देण्यात आलेली आहे व सदरचा तक्रार अर्ज हा मुजीबखान वजिरखान पठाण याने दाखल केलेला असल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर चे वाहन चोरी गेल्याचे कळल्यानंतर लागलीच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इनव्हेस्टीगेटर बळवंतराव बि-हाडे यांची नियुक्ती केली होती त्याने या सदर्भात अर्जदार व त्याचे शेजारी व साक्षीदाराचे जबाब घेतले त्यावरुन सदरचे वाहन चोरीला गेले त्यावेळेस ते अर्जदाराच्या घरासमोर उभे होते व सदर वाहनाच्या केबीनचे दार उघडेच असल्याचे शाबीत झाले. इन्शुअर्ड वाहनाची आवश्यक काळजी घेतली नसल्यामुळे विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग अर्जदाराने केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी अर्जदाराचा विमा दावा मंजूर करण्यास बाधील नाही तसेच अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली नाही म्हणूनच दिनांक 19.02.2010 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला. पुढे गैरअर्जदार विमा कंपनीने Ravneet Singh Bagga V/s KLM Royal Dutch Airlines (200) 1SCC 66 मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, The deficiency in service can not be alleged without attributing fault, imperfectiojn short coming or inade avacy in the quality nature and manner of performance which required to be performed by a person in pursance of a contract or otherwise in relation to any service याचा दाखला दिला आहे. म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज रक्कम रुपये 15000/- च्या कॉम्पेनसेटरी कॉस्ट सह फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.15 वर व पुराव्यातील कागदपत्रात नि.18/1 ते नि. 18/9 मंचासमोर दाखल केले. निर्णयासाठी उपस्थितीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 सदरचा वाद या मंचासमोर चालण्यास पात्र आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 अर्जदाराने त्याच्या मालकीच्या ट्रकचा ( नोंदणी क्रमांक एम.एच.22 एन 622 चा विमा पॉलीसी क्रमांक 182003/31/2008/1411 ) उतरविला होता त्याचा कालावधी दिनांक 16.10.2007 ते 15.10.2008 पर्यंत होता. सदर वाहन दिनांक 14.05.2008 रोजी चोरीला गेले. अर्जदाराने रितसर पोलीस स्टेशन पालम येथे दिनांक 18.05.2008 रोजी गुन्हा नोंदविला. अर्जदाराने सदर वाहनाचा विमा दावा मिळण्यासाठी. गैरअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्र सूपर्त केली परंतू गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा अद्याप पावेतो मंजूर केला नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदाराच्या वतीने सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी इनव्हेस्टीगेटर म्हणून बळवंतराव बि-हाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याने या प्रकरणात अर्जदार त्याचे शेजारी व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविले ( नि.18/3 ते नि.18/8 ) यात अर्जदारासहीत अन्य साक्षीदारांनी दिनांक 14.05.2008 रोजी ट्रक अर्जदाराच्या घरापुढे उभी होता परंतू ट्रक कॅबीनला कुलूप लावण्यासाठी कडी कोंडयाची व्यवस्था नसल्याने ते उघडेच असल्याचे मान्य केल्यामुळे अर्जदाराने इन्शुअर्ड वाहनाची आवश्यक ती काळजी घेतलेली नसल्याने अर्जदाराने विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्याचे शाबीत झाल्यामुळे व इतर आवश्यक कागदपत्र गैरअर्जदाराकडे दाखल केले नसल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा विमा दावा नामंजूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. मंचासमोर दाखल करण्यात आलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता अर्जदाराने व गैरअर्जदाराने परस्पर विरोधी मत व्यक्त करणारे व एकमेकांच्या कथनाला छेद देणारे शपथपत्र दाखल केले असल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या इनव्हेस्टीगेटर बळवंतराव बि-हाडे याने अर्जदार व इतर साक्षीदारांचे जबाब ( नि. 18/3 ते नि. 18/8 ) नोंदविले आहेत यात दिनांक 14.05.2008 रोजी सदर वाहनाच्या कॅबीन दाराला कुलून लावण्याची व्यवस्था नसल्याने ते उघडेच असल्याचे नमूद केले आहे तदनंतर अर्जदार व इतर साक्षीदारानी शपथपत्र ( अनुक्रमे नि. 20, नि.24, नि.25,नि.26 ) देऊन वर नमूद केलेल्या कथनाचा इनकार करुन गैरअर्जदाराने नियुक्त केलेल्या इनव्हेस्टीगेटर बळवंतराव बि-हाडे याने खोटा अहवाल दिल्याचा आरोप इनव्हेस्टीगेटर वर केला आहे तर इनव्हेवस्टीगेटर बळवंतराव बि-हाडे याने ( नि.18/9) शपथपत्र देऊन त्याने दिलेला अहवाल सत्य असल्याचे नमूद केले आहे या सर्व प्रकारामुळे सदरचे प्रकरण गुंतागुतीचे असल्याचे स्पष्ट होते तसेच सदर प्रकरणात महत्वाची बाब अशी की, नि.18/1 वर विमा पॉलीसीची ( पॅकेज पॉलीसी एनडॉर्समेंट ) ची सत्यप्रत लावली आहे त्याची पाहणी केली असता Total premium-O, Endosorment या कॉलमखाली Cover description, original sum insured, Endorsement sum assured, Revised sum insured, Endorsement premium या खाली काहीही नूमुद करण्यात आलेले नाही तसेच Total amount in fig and words- o असे दर्शविण्यात आले आहे . यावरुन सदर वाहनाची घेण्यात आलेली विमा पॉलीसी नेमक्या किती जोखमीसाठी ( IDV) घेण्यात आली होती हे स्पष्ट होत नाही म्हणून सदरचा प्रकरणाचा निर्णय घेताना दिर्घ व सखोल तोंडी पुराव्याची आवश्यकता असल्यामुळे असे प्रकरण मंचाच्या संक्षीप्त चौकशीचा विषय होउ शकत नाही असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराच्या वतीने मा. महाराष्ट राज्य आयोग, मा. राष्ट्रीय आयोग यांचे सायटेशन दाख्ंल करण्यात आलेले आहे परंतू मंचाने सदर प्रकरणाचा मेरीटवर अंतिम निकाल दिलेला नसल्यामुळे ते केस लॉ विचारात घेतलेले नाही. वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश करीत आहोत. आ दे श 1 अर्जदारास प्रस्तूतचा तक्रार अर्ज परत करण्यात यावा. 2 अर्जदाराने योग्य त्या न्यायालयात प्रकरण दाखल करुन दाद मागावी 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |