निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/11/2010 तक्रार निकाल दिनांकः- 24/03/2011 कालावधी 04 महिन 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मोतिराम पिता रामा मस्के. अर्जदार वय. 60 वर्षे. धंदा.व्यापार. अड.पि.ए.शिंदे. रा.किल्ले धारुर ता.माजलगांव जि.बिड. सध्या रा.वांगी रोड.परभणी ता.जि.परभणी. विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार. तर्फे ब्रँच मॅनेजर. अड.नरवाडे.जी.व्ही. दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,परभणी. ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने महिंद्रा मॅक्स जीप क्रमांक एम.एस.-28-सी/2335 ची खरेदी केली होती. 05/12/2007 ते 04/12/2008 या कालावधीसाठी गैरअर्जदाराकडून सदर वाहनाचा विमा अर्जदाराने घेतला होता. दिनांक 28/08/2008 रोजी परभणी येथून पाथरीकडे जात असतांना जीपचे मागील बाजुचे डाव्या साईडचे टायर फुटल्यामुळे सदर वाहनास अपघात झाला.या अपघाताची माहिती पोलीस स्टेशन मानवत येथे दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 105/2008 कलम 279, 338 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविला. त्याच प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदारा विमा कंपनीस सदर वाहनास अपघात झाल्याचे कळविल्यानंतर गैरर्जदाराने नियुक्त केलेल्या सर्व्हेअर बस्वराज बारबंडे याने सर्व्हे करुन क्षतीग्रस्त वाहनाचे रक्कम रु.3,45,130/- चे नुकसान झाल्याचे गैरअर्जदारास कळविले तदनंतर अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह क्षतीग्रस्त वाहनाची विमा हमी पोटी नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे क्लेम दाखल केला.पुढे अर्जदाराने त्याच्या नातेवाईका कडून कर्ज घेवुन सदर वाहनाची दुरुस्ती केली.त्यात दुरुस्तीपोटी एकुण रक्कम रु. 3,00,000/- पेक्षा जास्त खर्च करावा लागला.पुढे गैरअर्जदाराने दिनांक 19/03/2009 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदारास काही कागदपत्राची पुर्तता करण्याविषयी सुचीत केले होते त्याप्रमाणे अर्जदाराने सर्व कागदपत्र दाखल केली होती, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई रककम देण्याचे नाकारले म्हणून अर्जदाराने हि तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.3,00,000/- द्यावे.तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/25 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर गैरअर्जदाराने लेखी निवेदन नि.13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर अपघाताची घटना अर्जदाराने कळविल्या नंतर क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी गैरअर्जदाराने नेमलेल्या सर्व्हेअर श्री.बस्वराज जी.बारबंडे याने सर्व्हे करुन सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदाराकडे दाखल केला.त्या रिपोर्ट मध्ये अससमेंट अमाऊंट रक्कम रु. 1,43,666/- दाखल केले असून त्या मधून घसारा वजाजाता जी नेट अमाऊंट येते ती रक्कम रु. 92,518/- एवढी होते.परंतु अपघाताच्या वेळी सदर वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 14 ते 15 प्रवाशांची वाहतुक होत असल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन अर्जदाराने केल्याचे शाबीत होते.तसेच अर्जदाराने निष्काळजीपणा केल्यामुळे सदर वाहनाला अपघात झालेला आहे.याला सर्वस्वी अर्जदार जबाबदार आहे.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अपघाताच्या वेळी संबंधीत ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा कायदेशिर परवाना नव्हता.तसेच दिनांक 19/03/2009 रोजी अर्जदाराला पत्र पाठवुन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्या विषयी कळविले होते.अनेक वेळा विनंती करुन देखील अर्जदाराने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे शेवटी दिनांक 10/11/2009 रोजी गैरअर्जदार याने अर्जदाराची फाईल No Claim या सदराखाली बंद केली व तशी सुचना अर्जदाराला देण्यात आली होती.म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा. अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.14 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.16/1 ते नि.16/7 मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत 1झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे. ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराने महिंद्रा अँड महिंद्रा मॅक्स जीप क्रमांक एम.एच. -28-सी/2335 ची दिनांक 05/12/2007 ते 04/12/2008 या कालावधीसाठीचा विमा गैरअर्जदाराकडून उतरविला होता.दिनांक 28/08/2008 रोजी सदर वाहनाला अपघाता झाला या अपघाताची माहिती गैरअर्जदारास कळविल्यानंतर गैरअर्जदाराने नियुक्त कलेल्या सर्व्हेअर बस्वराज बारबंडे याने सर्व्हे केला.पुढे क्षतीग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने क्लेम दाखल केला,परंतु गैरअर्जदाराने कोणत्याही ठोस कारणा शिवाय विमादावा नामंजूर केला.अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन गैरअर्जदाराने नियुक्त केलेल्या सर्व्हेअर श्री बस्वराज बारबंडे याने रक्कम रु.92,518/- एवढे केलेले आहे, परंतु अपघाताच्या वेळी सदर वाहनाला 14 ते 15 प्रवाशांची अवैध वाहतूक होत असल्याचे शाबीत झाल्याने अर्जदाराने पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे.तसेच संबंधित ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा कायदेशिर परवाना नसल्याचे आढळून आलेले आहे.तसेच गैरअर्जदाराने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराने न केल्यामुळे शेवटी दिनांक 10/11/2009 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराची फाईल No Claim या सदराखाली बंद केली.सर्व्हेअरने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसार अर्जदारास क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रककम देण्यास गैरअर्जदार विमा कंपनी बांधील नाही. निर्णयासाठी मंचासमोर मुद्दा असा उपस्थित होतो की, अर्जदाराने पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे शाबीत झाले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, अपघाताच्या वेळी सदर वाहनातून 14 -15 अवैध प्रवाशांची वाहतूक होत होती,परंतु या सबंधिचा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही.सदर वाहनातून नेमके किती प्रवाशी होते.याचा तपशिल देण्यात आलेला नाही तसेच जे कोणी तथाकथीत प्रवाशी होते त्यांचे जबाब देखील घेण्यात आलेले नाही तसेच दुसरा बचाव गैरअर्जदाराने असा घेतला आहे की, सदर वाहनाच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा कायदेशिर परवाना नव्हता.परंतु अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या ( नि.5/5 ) Certificate of driving license issued by RTO च्या झेरॉक्स प्रतीची पाहणी केली असता ड्रायव्हींग लायसेन्स हे दिनांक 05/02/2008 ते दिनांक 04/02/2028 पर्यंत व्हॅलीड असल्याचे स्पष्ट होते.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, मागणी करुनही अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नो क्लेम या सदराखाली बंद करण्यात आला. दिनांक 10/10/2009 (नि.16/7) ला गैरअर्जदाराने पत्राव्दारे काही कागदपत्रांची पुर्तता करण्याविषयी अर्जदाराला सुचविले होते.अर्जदाराने मंचासमोर संबंधित सर्व कागदपत्र दाखल केली आहेत त्या अर्थी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सर्व कागदपत्र दाखल केल्याचे मानावे लागेल तसेच अर्जदाराने शपथपत्र देवुन त्याने सर्व कागदपत्राची पुर्तता केल्याचे सांगितले आहे.त्याबद्दल अविश्वास दाखविता येणार नाही.वर विवेचन केल्याप्रमाणे गैरअर्जदाराने घेतलेले सर्व बचाव तकलादु असल्याचे व केवळ अर्जदाराचा न्याय हक्क डावलण्यासाठी अनावश्यक मुद्दे उपस्थित केलेले आहे असे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. मुद्दा क्रमांक 2 अर्जदाराने तक्रार अर्जातून क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.3,00,000/- ची मागणी केलेली आहे.ती मंचास मान्य करता येणार नाही सर्व्हेअर श्री.बस्वराज बारबंडें यांचा सर्व्हे रिपोट नि.16/4 मंचासमोर गैरअर्जदाराने दाखल केला आहे.तज्ञाचा रिर्पोट म्हणून त्याचा स्वीकार करणे न्यायसंगत होईल म्हणून त्यानुसार क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु.92,518/- व त्यातून सॅलव्हेज व्हॅल्यु रक्कम रु. 1,500/- वजाजाता एकुण रक्कम रु.91,018/- मिळण्यास अर्जदार पात्र आहे. अर्जदाराने व गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या सायटेशन मधून मा.वरिष्ठ न्यायालय व राज्य आयोगाने व्यक्त केलेल्या मतांचा ही या ठिकाणी अभ्यास करण्यात आलेला आहे.गैरअर्जदाराने दाखल केलेल्या रिपोर्ट केसेस मधील प्रकरणे व प्रस्तुत प्रकरण वेगळे असल्यामुळे मा.वरिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेले मत प्रस्तुत प्रकरणाला लागु होत नाही म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळल्यापासून 30 दिवसांच्या आत क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.91,018/- दिनांक 10/11/2009 पासून पूर्ण रक्कम पदरीपडे पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावी. 3 तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चा पोटी रक्कम रु. 1,500/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सा.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |