Maharashtra

Ahmednagar

CC/16/125

Prakash Dada Kalokhe - Complainant(s)

Versus

Branch Manager,The New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Pathan M. H.

01 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/16/125
( Date of Filing : 12 Apr 2016 )
 
1. Prakash Dada Kalokhe
Don Bosco Society,Cottage Corner,Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,The New India Assurance Co.Ltd.
Branch Ahmednagar,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Pathan M. H., Advocate
For the Opp. Party: Adv.s.P.Meher, Advocate
Dated : 01 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०१/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडुन त्‍याचे वाहन तवेरा कार एमएच-१७-एजे-६४२७ याचेकरीता वाहनाचा इन्‍शुरन्‍स दिनांक १४-११-२०१४ ते १३-११-२०१५ या कालाधीकरीता प्रिमीयम भरून उतरविला होता. दिनांक ०४-०४-२०१५ रोजी पहाटे १४५ वाजेच्‍या सुमारास पुणे ते चाकण असा प्रवास करीत असतांना चाकण पासून एक किलोमीटरवर असलेल्‍या रासेगाव हद्दीत स्‍पीडब्रेकर असल्‍याने समोरच्‍या ट्रकने अचानक ब्रेक मारले असल्‍याने सामनेवालेचे गाडीला पाठीमागुन धडकली. तसेच मागच्‍या  बाजुनेही तक्रारदाराच्‍या वाहनावर एक ट्रक येवून आदळली व तक्रारदाराचे वाहनाचा अपघात झालेला होता. तक्रारदाराचे वाहन श्री. गारूडकर आकाश अनिल  हे वाहन चालवित होते. सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे रितसर अपघात विम्‍याची मागणी केली. अपघातानंतर   श्री. मनोज के. मेहेर नामक सर्व्‍हेअरची नियुक्‍ती करण्‍यात आली. सदर वाहनाच्‍या दुरूस्‍तीकरीता एकूण रक्‍कम रूपये २,७२,८२२/- इतका खर्च झाला. सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा वाहनाचे मालक गणेश लक्ष्‍मण सोनवणे आहे असे दर्शवुन दिनांक १८-०९-२०१५ रोजी विमा दावा नाकारला. म्‍हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले यांच्‍याकडुन अपघातात वाहनाची झालेले नुकसान भरपाई म्‍हणुन रक्‍कम रूपये २,७३,८८२/- द्यावी तसेच तक्रारदाराला शारीरिक, मानसिक त्रासापोटी तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी १२ वर त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल केलेले आहे. सदर लेखी उत्‍तरात सामनेवालेने असे मान्‍य केलेले आहे की, तक्रारदाराने वादातील वाहनाचा विमा सामनेवाले कंपनीकडून उतरविला होता, तसेच दिनांक ०४-०४-२०१५ रोजी वादातील वाहनाचा अपघात झालेला होता. सामनेवालेने असेही मान्‍य केलेले आहे की, सदर विमा दावाबाबत सामनेवाले कंपनीने निरीक्षक नियुक्‍त केलेला होता. नमुद निरीक्षकाने वाहनाचाचे अपघाताविषयी पडताळणी करतांना त्‍यांना असे आढळुन आले की, तक्रारदाराने सदर वाहन श्री.गणेश लक्ष्‍मण सोनवणे यांना विकलेले आहे. तक्रारदाराचे विमा दाव्‍यात कोणताही संबंध राहिला नसल्‍याने विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीनुसार तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर करण्‍यात आला, त्‍यात सामनेवालेची कोणतीही सेवेत त्रुटी नाही. सबब तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आली आहे.

५.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज सामनेवालेने दाखल केलेला जबाब, दस्‍तऐवज, उभयपक्षांचे शपथपत्र पाहता व तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमक्ष खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवालेने तक्रारदाराचा विमा दावा नाकारून अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब  केलेला आहे काय ?

नाही

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

 

मुद्दा क्र.१ -    

६.   तक्रारदाराने त्‍याचे चारचाकी वाहनाचेकरीता सामनेवालेकडुन दिनांक १४-११-२०१४ ते १३-११-२०१५ या कालावधीकरीता विमा उतरविला होता. ही बाब उभयपक्षांना मान्‍य असुन, तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.२ -    

७.   निशाणी १८ ची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, श्री.प्रसाद दिलीप गांगुर्डे हे सामनेवाले कंपनीतर्फे निरीक्षक (सर्व्‍हेअर) असे नियुक्‍त करण्‍यात आलेले होते व त्‍यांचे काम तक्ररदाराने दाखल विमा दावा संदर्भातची पडताळणी करण्‍याचे होते. निरीक्षकाने अपघाताविषयी पडताळणी करतांना त्‍यांना असे आढळुन आले की, तक्रारदाराने श्री.गणेश लक्ष्‍मण सोनवणे यांना सदर वाहन विकलेले होते व त्‍या संदर्भात निरीक्षकाने तक्रारीत जबाबही नोंदविलेला होता. सदर वाहन दिनांक ०४-०७-२०१३ रोजी श्री.गणेश लक्ष्‍मण सोनवणे यांना विकण्‍यात आलेले होते व त्‍याचे कराराची प्रत ही निशाणी २० वर लावण्‍यात आलेली आहे. निशाणी १८ वर निरीक्षकाचे शपथपत्रही आहे. सदर वाहन विकुनसुध्‍दा तक्रारदाराने त्‍यासंदर्भात सामनेवाले कंपनीला वाहनाचे मालकाविषयी कळविले नाही व वाहनाचे मालकाची आर.टी.ओ. मध्‍ये पडताळणी करण्‍यात आलेली नाही. सदर वाहन दिनांक ०४-०७-२०१३ ला श्री.गणेश लक्ष्‍मण सोनवणे यांना विकल्‍यानंतरही तक्रारदारचे स्‍वतःचे नावावर सदरील वाहनावर दिनांक १४-११-२०१४ रोजी विमा स्‍वतःचे मालकीचा दर्शवुन उतरविण्‍यात आला आहे, असे दिसुन येते. मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली  यांनी Bhushan P. Thapar Vs. Banch Manager, National Insurance Co. Ltd. And Ors. – 2017 (3) CPR 152 (NC) – ‘ Repudiation by OP on ground that complainant did not have any insurable interest for car is justified.’     

          सदरील न्‍यायनिवाड्याचे हवाला घेऊन तसेच तक्रारदाराचे वाहनाचे अपघाताचा विमा वाहनाच्‍या मालकीचे नावावर नोंदविण्‍यात आलेला होता म्‍हणुन वाहनाचा विमा दावा तक्रारदाराला मिळण्‍याचा कोणताही अधिकार नव्‍हता. सबब सामनेवालेने विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदाराचा विमा दावा नाकारून कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही, असे सिध्‍द होत आहे. सबब सामनेवालेने तक्रारदाराप्रती कोणतीही अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंबीली नाही, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्र.२ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  

मुद्दा क्र.३ -    

८.  मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.