निकाल
दिनांक- 05/08/2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्य क्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्व ये, दाखल केली आहे. तक्रारदार यांची तक्रार खालील येणेप्रमाणे.
तक्रारदार हा अॅटो क्रमांक एम.एच.44 सी-5509 याचा मालक आहे. सदरील अॅटो तक्रारदार यांचे नावे आर.टी.ओ. कार्यालयात नावे नोंदलेले आहे. सदरील अॅटो चा विमा तक्रारदार यांनी, सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला होता व त्यातची मुदत दि.10.12.2010 ते 01.12.2011 पावेतो होता. दि. 04.02.2011 रोजी सदरील अॅटोचा अपघात यशवंतराव चव्हाीण चौक, अंबाजोगाई येथे झाला. अॅटोचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सदरील अॅटो दुरुस्ती,साठी तक्रारदार यांनी बजाज सर्व्हिस स्टेठशन जीत मोटार्स यांचेकडे नेले. सदरील अॅटो दुरुस्तस करण्या स रु.11,956/- इतका खर्च आला, तो खर्च अर्जदाराने स्वेतः केला आहे. जीत मोटार्स यांनी कॅश मेमोरी व रिपेअर बाबत सविस्तरर कागदपत्र दिले. सदरील अॅटो सामनेवाला हा इन्शु रन्से कंपनीकडे नोंदविला
(2) त.क्र.61/2012
असल्या मुळे पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार नुकसान भरपाई देण्यातची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदार यांनी, त्यां्नी केलेला खर्च रक्क2म रु.11,956/- ची मागणी सामनेवाला यांचेकडे केली. सामनेवाला यांनी सदरील खर्च किरकोळ असल्या मुळे तक्रार देण्यााची गरज नाही असे सांगितले व नुकसान भरपाई देण्याअची हमी दिली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे क्लेजम प्रपत्र दाखल केले. परंतू सामनेवाला यांनी खोटे कारण दाखवून तक्रारदार यांचा अर्ज खारीज केला. तक्रारदार यांच्या वाहनाचा रंग काळा पिवळा नसून पांढरा आहे व वाहन खाजगी वापरासाठी वापरल्याा जाते व आर.टी.ओ.मध्येग तशाच प्रकारची नोंद झालेली आहे. सर्व कागदपत्र सामनेवाला यांच्यारकडे दिलेली असतानाही सामनेवाला यांनी सदरील अॅटो काळी पिवळी आहे, या कारणास्त्व क्लेलम नाकारलेला आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तक्रारदार यांच्याल अॅटोचे झालेले नुकसान देण्याहची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्यासकडे मागणी प्रपत्र दिले असतानाही कोणत्यारही संयुक्तिक कारणाशिवाय सामनेवाला यांनी, तक्रारदार यांची मागणी नामंजूर केलेली आहे. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्या्स कसूर केला आहे. सबब तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.5,000/- , नुकसान भरपाई रु.11,956/-, व अर्जदाराची फसवणूक केल्या बाबत रु.10,000/- ची मागणी केली आहे.
सामनेवाला मंचासमोर हजर झाले. त्यां0नी दि.16.10.2012 रोजी लेखी म्हनणणे दाखल केले. सामनेवाला यांच्याी मते कव्ह0र नोट, पॉलीसीमध्येल वाहन क्रमांक एम. एच.44 सी-5509 ही पांढ-या रंगाची आहे व ती वैयक्तिक कारणासाठी वापरावी अशी अट आहे. सामनेवाला यांच्या5 अधिका-यांनी सर्व्हे केला त्यावेळेस सदरील अॅटोचा रंग काळा पिवळा आढळून आला. त्याामुळे सदरील वाहन व्याेवसायिक कामासाठी वापरल्या चे आढळून आले. सदरील बाब ही पॉलीसीच्याु अटी व शर्तीचा भंग असल्या मुळे तक्रारदार यांची मागणी नामंजूर करण्याबत आलेली आहे. सदरील वाहन वैयक्तिक कारणासाठी वापरावयाचे होते परंतू तक्रारदार यांनी ते वाहन व्याहवसायिक वापरासाठी वापरले. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचा ग्राहक होऊ शकत नाही. सामनेवाला यांनी सेवा देण्यारस कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही, सबब तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केलेली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन, शपथपत्र, कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्यााय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात, व त्याोचेसमोरच त्या्ची उत्तआरे दिलेली आहेत.
(3) त.क्र.61/2012
मुददे उत्त र 1. सामनेवाला यांनी सेवा देण्या स त्रुटी केली आहे, ही
बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? होय.
2. सामनेवाला यांनी, तक्रारदार याने पॉलीसीच्या अटी
व शर्तीचा भंग केला आहे, ही बाब सिध्दी केली काय ? नाही.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी हजर केलेल्या् कागदपत्रावरुन व शपथपत्रावरुन तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्यार कागदपत्रावरुन तक्रारदार यांचा अॅटो क्रमांक एम. एच.44 सी-5509 हे डेप्युुटी आर.टी.ओ. अंबाजोगाई या कार्यालयात नोंदलेले असून ते तक्रारदार यांच्याख नावे आहे. सदरील अॅटोचा रंग नोंदणी दस्तरऐवजात पांढरा असा दिलेला आहे. तसेच सामनेवाला यांच्या कडे सदरील वाहनाचा विमा उतरविलेला आहे व सदरील वाहनाचा रंग हा पांढरा नमुद केलेला आहे. सदरील वाहन हे वैयक्तिक कारणासाठी वापरावे अशी नोंद आहे.
तक्रारदार यांचे कथन की, दि.04.02.2011 रोजी वाहन यशवंतराव चव्हाईण चौक अंबाजोगाई येथे आले असता, समोरुन येणा-या काही जनावरांना वाचविण्याहच्या प्रयत्नाजमुळे अॅटो पलटी झाली व त्याुमध्येी अॅटोचे बरेच नुकसान झाले. तो अॅटो दुरुस्तीजसाठी जीत मोटार्स यांच्यायकडे दिले, दुरुस्तीर खर्च रु.11,956/- आला. सदरील रक्कसम सामनेवाला यांच्या्कडे मागणी केली असता वाहनाचा रंग काळा पिवळा आहे, या कारणास्तव तक्रारदार यांचा क्ले्म नामंजूर केला आहे. तक्रारदार यांचे कथन की, सदरील वाहनाचा रंग पांढरा आहे. सर्व्हेडअर यांनी चुकीच्याा माहितीच्याा आधारे व क्लेीम द्यावे लागू नये म्हपणून चुकीचा रंग आहे असे निवेदन केलेले आहे.
सदरील अॅटो हा सामनेवाला यांच्याहकडे नविन वेहिकल म्ह णून विमा काढलेला आहे. त्याा विम्यााचा कालावधी दि.10.12.2010 ते 01.12.2011 असा आहे. सदरील अॅटोस अपघात होऊन त्यााचे नुकसान झाले व तक्रारदार यांनी दुरुस्ती1 केली ही बाब सामनेवाला यांनी स्पतष्ट पणे नाकारलेली नाही. सामनेवाला यांचे कथन की, सदरील अॅटोरिक्षा याचा रंग काळा पिवळा आढळून आला, त्यालबाबत सर्व्हेमअरने रिपोर्ट दिला आहे. सबब सदरील अॅटो हा व्याळपारी कारणासाठी वापरला त्यालमुळे इन्शुहरन्स पॉलीसीच्या अटी व
(4) त.क्र.61/2012
शर्तीचा भंग होतो. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्ले म नामंजूर केला ही बाब समर्थनीय आहे असा युक्तिवाद सामनेवाला यांच्या वकीलांनी केला.
सामनेवाला यांनी दाखल केलेल्याा कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, अॅड.एस पी.पांडे यांनी दि.23.01.2012 रोजी तपास करुन आपला अहवाल दिला व त्याे अहवालामध्यें स्प ष्ट2पणे नमुद केलेले आहे की, अॅटोरिक्षा नं. एम.एच.44 सी-5509 ही पांढ-या रंगाची आहे व ती वैयक्तिक कारणासाठी वापरली जाते. सदरील माहिती चौकशी अधिका-यांनी आर.टी.ओ. ऑफीस मधून मिळविलेली आहे. तसेच वैभव पाटील यांनी सदरील वाहनाच्याा नुकसानीबाबत सर्व्हे केलेला आहे, तो सर्व्हेे रिपोर्ट कागदपत्रात सामील आहे. सदरील सर्व्हेक रिपोर्टची बारकाईने अभ्यास केला असता, त्याकमध्येन अॅटोचा रंग काळा पिवळा आहे याबाबत कोठेही नमुद केलेले नाही. सर्व्हेअअर वैभव पाटील यांनी अॅटोचे फोटो काढले आहे व त्याम फोटोमध्येर सदरील वाहन काळया पिवळया रंगाचे असल्या चे निष्प न्नय होते. तसेच सामनेवाला यांनी काही फोटो हजर केलेले आहे. फोटो सोबत निगेटीव्हच दाखल केलेले नाही. सदरील फोटोचे अवलोकन केले असता, एक काळया पिवळया रंगाची अॅटो दाखवलेली आहे, त्यालवर रजिस्ट्रेाशन नंबर लिहीलेला नाही. काही फोटोमध्यें रजिस्ट्रे शन नंबर MH 24-TR 455 असा लिहीलेला आहे. केवळ या कारणावरुन सामनेवाला हे तक्रारदार यांचे वाहन फोटोत नमुद केलेले वाहन आहे असे म्हणणतात. तक्रारदार यांच्याो वाहनाचा नं. एम.एच.44 सी-5509 असा आहे. त्या मुळे सामनेवाला यांच्याल सर्व्हेद अधिका-यांनी कोणत्या वाहनाचे फोटो काढले व ते वाहन तक्रारदाराचेच आहे ही बाब सिध्द होत नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्यार कागदपत्रावरुन असे निष्प न्नब होते की, तक्रारदार यांच्या अॅटोचा रंग पांढरा असून तो अॅटो वैयक्तिक कारणासाठी वापरल्याे जात आहे व त्यााच अॅटोची सामनेवाला यांच्या कडे विमा पॉलीसी काढलेली आहे. सदरील वाहनाचा अपघात झाल्या स व नादुरुस्तॅ झाल्याास त्यामच्याय दुरुस्तीनला लागणारा खर्च देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्यालकडे संपूर्ण कागदपत्राची पुर्तता करुनही सामनेवाला यांनी कोणत्यानही सबळ कारणाशिवाय तक्रार यांचा क्लेदम नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांनी कोणताही विश्वाासार्हता पुरावा हजर केलेला नाही. सदरील अॅटोचा सामनेवाला यांच्याोकडे विमा उतरवलेला आहे. त्याा अॅटोचा अपघात होऊन त्यााचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी जीत मोटार्स यांच्या.कडून अॅटो दुरुस्तच करुन घेतला त्याा कामी त्याेला
(5) त.क्र.61/2012
रु.11,956/- द्यावे लागले. सदरील अॅटोचा विमा सामनेवाला यांच्याघकडे तो कालावधीत उतरवलेला होता तेव्हा दुरुस्तीा खर्च देण्या ची जबाबदारी सामनेवाला यांच्याघवर आहे. सामनेवाला यांनी दुरुस्ती खर्च देण्या्स नकार देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तसेच तक्रारदार यांना या मंचापूढे तक्रार दाखल करावी लागली त्याचा खर्च रु.2,000/- व त्यााला झालेल्याढ मानसिक त्रासापोटीही सामनेवाला यांच्याचकडून रु.3,000/- मिळण्यादस तक्रारदार पात्र आहे. सबब मंच खालीलप्रमाणे मुददा क्र.1 चे उत्तेर होकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्त र नकारार्थी देत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्याेत येते. 2. सामनेवाला यांनी, तक्रारदार यांना अॅटो दुरुस्तीेस झालेल्याा खर्चाची रक्क म
रु.11,956/- व त्याक रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के
व्या ज 30 दिवसात द्यावे.
3. सामनेवाला यांनी, तक्रारदारास झालेल्याक मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.3,000/- व तक्रारीच्याा खर्चापोटी रु 2000/- द्यावे.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांयचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्या अध्योक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.