निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 03/11/2010 तक्रार निकाल दिनांकः- 09/02/2011 कालावधी 03 महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. बालासाहेब पिता नारायणराव पाथरकर. अर्जदार. वय 46 वर्षे.धंदा.नोकरी. अड.सुजीत देशमुख. रा.जायकवाडी पाट बंधारे,शाखा नं.13. दैठणा. विरुध्द शाखा प्रबंधक. गैरअर्जदार. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद. अड.बी.एन.जोशी. शाखा.दैठणा.ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) गैरअर्जदार बँकेने त्रुटीची सेवा दिल्याबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा दैठणा येथे जायकवाडी पाटबंधारे विभागात कारकुन या पदावर नोकरी करत आहे. अर्जदाराचे गैरअर्जदाराच्या बँकेत खाते आहे. व त्याने गैरअर्जदाराकडून वैयक्तीक कर्ज घेतले.अर्जदाराने या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले आहेत.गैरअर्जदार बँकेत असलेल्या बचत खात्यात अर्जदाराचा पगार जमा होतो. व गैरअर्जदार त्यातुनच अर्जदाराच्या कर्जाचा हप्ता कपात करतो. गैरअर्जदार बँकेने सहा महिन्यात अर्जदाराच्या पगारातून दुहेरी हप्ता कपात करुन तो खात्यावर तसाच ठेवुन कर्ज खात्यात जमा केला जात नाही. सप्टेंबर 2010 चा 100 टक्के पगार कपात केला. अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडे वैयक्तिक लोन चे हप्ते बचत खात्यातुन कपात न केल्याबाबत अर्ज दिला. त्यावर गैरअर्जदार बँकेने कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. व नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जासोबत शपथपत्र,बँकेशी केलेला पत्रव्यवहार,ए.टी.एम ग्राहक सुचना,इ. कागदपत्र दाखल करण्यात आले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने ख-या घटना विद्यमान न्यायमंचापासून दडवुन ठेवून ही खोटी तक्रार दाखल केली आहे.अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे असलेले बचत खाते व वैयक्तीक कर्ज खाते गैरअर्जदाराला मान्य आहेत कोणत्याही कर्ज खात्याला पासबुक देण्यात येत नाही बचत खात्याला पासबुक देण्यात येते व बाकीच्या खात्यांना ग्राहकाच्या मागणी वरुन पासबुक देण्यात येते.अर्जदाराच्या पगार करणा-या authority ने त्यांच्या पगारातून हप्ता कपात करुन गैरअर्जदाराकडे जमा करण्याचे शपथपुर्वक सांगीतले होते. त्यांनी कर्जाचा हप्ता आणि पगार असे दोन वेगवेगळे चेक गैरअर्जदाराकडे द्यावयास हवे होते.अर्जदार जुन 2008 पासुन बचत खात्यात पगाराचे पैसे जमा झाल्याझाल्या ए.टी.एम. कार्डाने कर्जाच्या हप्त्याची रक्कम खात्यात शिल्लक न ठेवता सर्व रक्कम काढुन घ्यायचा. त्यामुळे गैरअर्जदाराला अर्जदाराच्या बचत खात्यातून कर्जाचा हप्ता घेताच आला नाही. अर्जदाराने त्याच्या बचत खात्यात ठेवायला लागणारी किमान रक्कम सुध्दा बचत खात्यात शिल्लक ठेवण बंद केले.गैरअर्जदाराने ही बाब अर्जदाराच्या व त्याच्या अधिका-याच्या लक्षात आणुन दिली.त्यानंतर अर्जदाराने पगार घेण्यासाठी दुसरी बॅंक निवडली व त्यामुळे त्याचा कर्जाचा हप्ता वसुल करणे अवघड झाले.कर्जाची परतफेड टाळण्यासाठी अर्जदाराने हा खोडसाळपणा केला आहे. व ही खोटी तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे सदरील तक्रार रु.5000/- च्या नुकसान भरपाईसह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने तक्रारी सोबत शपथपत्र,पर्सनल लोन अग्रीमेंट, कर्जखाते व बचत खात्याचे खाते उतारे, ही कागदपत्रे दाखल केली आहेत. अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकीलांचे युक्तीवाद व तक्रारीस दाखल कागदपत्रांवरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराला गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा पमाणे कारणे अर्जदाराने गैरअर्जदार बँकेत बचत खाते क्रमांक 52149529381 व कर्ज खाते क्रमांक 62053882182 आहेत ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून “ पर्सनल लोन ” घेतले हे नि.14/1 वरील “ पर्सनल लोन – अग्रीमेंट ” वरुन सिध्द होते व अर्जदारानेही शपथेवर पर्सनल लोन घेतल्याचे मान्य केले आहे. गैरअर्जदाराने दाखल केलेलया नि.14/3 वरील अर्जदाराच्या बचत खात्याच्या खाते उता-या वरुन दिनांक 05/03/2008 पासुन अर्जदाराकडून रु.1900/- चे 16 हप्ते दिनांक 01/11/2010 पर्यंत गैरअर्जदाराने घेतलेले आहेत.रु.60,000/- कर्जाचे दरमहा रु.1900/- हप्ता भरण्याचे अर्जदाराने पर्सनल लोन अग्रीमेंट (नि.14/1 ) वर कबुल केलेले आहे. तसेच याच लोन अग्रीमेंट मध्ये क्लॉज 11 मधील (iii) खाली That the Bank shall have a paramount right of set off & in exercise of the Bank’s lien under law, the Bank shall also have a paramount right of lien & all monies securities, deposits goods & other assets & properties belonging to the Borrower standing to the Borrower’s credit. असे स्पष्ट लिहिलेले आहे.अर्जदाराने त्याचा पगार खात्यात जमा झालेल्या दिवशीच खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवता ATM व्दारे सर्व रक्कम काढलेली दिनांक 09/05/2008 पासून बचत खाते उता-यावरुन सिध्द होते. अर्जदाराला दिनांक 30/06/2008 पासुन दिनांक 30/11/2010 पर्यंत 13 ते 14 वेळा मिनिमम बॅलेंन्स चार्जेस लागलेले दिसतात. सप्टेंबर 2010 मध्ये अर्जदाराच्या बचत खात्यातून कर्ज खात्यात 3 वेळा रु.1900/- रु. 4000/- रु.1900/- जमा केलेले नि.14/3 वरील बचत खात्याच्या व नि.14/2 वरील कर्ज खात्याच्या खाते उता-यावरुन सिध्द होते. परंतु ऑक्टोबर 2010 पर्यंत त्याच्याकडे कर्जाची बरीच थकबाकी असल्यामुळे गैरअर्जदाराने नि.14/1 वरील पर्सनल लोन अग्रीमेंट पमाणे गैरअर्जदाराने बचत खात्यातून कर्जाचे हप्ते घेतलेले आहेत.त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हांस वाटत नाही.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |