Maharashtra

Parbhani

CC/13/16

Jinkusalsuri Dadawadi Jain - Complainant(s)

Versus

Branch Manager,Shri Kishoar Davedas Bhambale - Opp.Party(s)

Shirish N.Welankar

09 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/16
 
1. Jinkusalsuri Dadawadi Jain
Sawtambar Seva Trust,Parbhani Through Autherised Representative Jayprkash Kishenlalji Mutha
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Shri Kishoar Davedas Bhambale
Aditya Arthik Neyogen MalteState Co-perative Kredat Sosity Ltd.Pune Branch Parbhani New Mondha,Parbhani.
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MRS. Anita Ostwal Member
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                  तक्रार दाखल दिनांकः- 27/02/2013

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 05/03/2013

                        तक्रार निकाल दिनांकः- 09/12/2013

                                                                              कालावधी   09 महिने.  04  दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                               श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                      सदस्‍या

सौ.अनिता ओस्‍तवाल. M.Sc.LLB.

---------------------------------------------------------------------------------------------------------       

    

      श्री.जिनकुशलसूरी दादावाडी जैन.                              अर्जदार

      स्‍वेतांबर सेवा संस्‍था (ट्रस्‍ट) परभणी.                               अॅड.एस.एन.वेलणकर.

      तर्फे अधिकृत प्रतिनिधी जयप्रकाश

किशनलालजी मुथा, वय 44 वर्षे.

      धंदा.व्‍यापार,रा. वसमत रोड,परभणी.

     

               विरुध्‍द

      शाखाधिकारी श्री किशोर देवीदास भोसले.                     गैरअर्जदार.

      आदित्‍य आर्थिक नियोजन मल्‍टीस्‍टेट                  अॅड.व्‍ही.डी.जाधव.                                    

      को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,पूणे.

      परभणी शाखा, नवा मोंढा,परभणी.

______________________________________________________________________        

     कोरम  -    1)    श्री.पी.पी.निटूरकर.       अध्‍यक्ष.

                  2)    सौ.अनिता ओस्‍तवाल.                     सदस्‍या.   

                                

             (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्‍यक्ष.)

अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही एक सेवाभावी संस्‍था असून व्‍यवहाराबाबत  वाद उत्‍पन्‍न झाला, त्‍या वादाबाबत कृती करण्‍याचे सर्व अधिकार संस्‍थेच्‍या अधिका-यांनी अधिकृत प्रतिनिधी म्‍हणून अर्जदारास नियुक्‍त केलेले आहे व त्‍या अधिकाराने अर्जदार आपली तक्रार दाखल करत आहे.

अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार संस्‍थेने दिनांक 06/12/2012 रोजी 5,00,000/- रु. 5 वर्षासाठी गैरअर्जदाराकडे मुदत ठेवी मध्‍ये गुंतवले, ज्‍याचा पावती क्रमांक 609 असा आहे. सदर मुदत ठेवीवर गैरअर्जदाराने 14 टक्‍के द.सा.द.शे. दराने व्‍याज देण्‍याचे मान्‍य केले होते, सदर ठेवीची ड्यू डेट दिनांक 06/12/2017 अशी होती. अर्जदाराचे म्‍हणणे की, काही महत्‍वाच्‍या कामानिमित्‍त ही मुदतठेव पावती तोडायचे ठरविले व त्‍याच प्रमाणे गैरअर्जदाराकडे असलेले चालू खातेही बंद करायचे ठरवले, त्‍या प्रमाणे सदर ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सचिव व संचालक या तिघांच्‍या सहीचे संयुक्‍त पत्र दिनांक 19/01/2013 रोजी मुदतठेव मुळ रक्‍कम त्‍यावर होणारे व्‍याज व चालू खात्‍याची खातेबंद करुन मिळणारी रक्‍कम असा एकत्र चेक अर्जदारास द्यावा अशी विनंती गैरअर्जदारास केली.

      अर्जदाराचे म्‍हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेतून 2 टक्‍के रक्‍कम म्‍हणजे 10,000/- रु. वजा करुन उर्वरित 4,90,000/- व चालू खात्‍याची 4500/- रु. असे एकूण 494500/- चा चेक देण्‍यात येईल, असे तोंडीच सांगीतले. अर्जदाराने त्‍यावेळी गैरअर्जदाराचे तोंडी म्‍हणणे लेखी स्‍वरुपात द्यावे अशी मागणी गैरअर्जदारास केली, परंतु लेखी देण्‍यास गैरअर्जदारानी नकार दिला. अर्जदारास पैशाची नितांत गरज असले कारणाने नाविलाजाने मुदतठेव पावतीवर Received Payment under Protest रक्‍कम उचलत असल्‍याचे नमुद केले रशिद तिकीटावर सही करुन पावती  Discharge करुन घेतली. त्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने दिनांक 28/01/2013 रोजी I.D.B.I. बँकेचा शाखा परभणी येथील 4,94,500/- रु.चा चेक क्रमांक 299442 गैरअर्जदाराने अर्जदारास दिला.

      अर्जदाराचे म्‍हणणे की, वस्‍तुस्थितीप्रमाणे अर्जदाराची सदर मुदत ठेव ही 06/12/2012 पासून ते 28/01/2013 पर्यंत अशी 54 दिवस होती. गैरअर्जदाराच्‍या नियमा प्रमाणे 46 ते 90 दिवसचा मुदत ठेव कालावधीचा व्‍याजदर  7.5 टक्‍के आहे. गैरअर्जदाराच्‍या नियमा प्रमाणे मुदतठेव पूर्वीच उचलल्‍यास 2 टक्‍के व्‍याजात कपात होते. अर्जदाराचे म्‍हणणे की, गैरअर्जदारानी 500,000/- चे 54 दिवसाचे व्‍याज 5.5 टक्‍के दराने देणे आवश्‍यक होते जे की, 4068= 49 पैसे येते म्‍हणजेच गैरअर्जदाराने मुळ रक्‍कम 5,00,000/-  + व्‍याज 4068 +  चालू खात्‍यातील 4500/- अशी एकूण  5,08,568/- अर्जदारास देणे आवश्‍यक होते, परंतु गैरअर्जदाराने बेकायदेशिरपणे 4,94,500/- चा चेक दिला. गैरअर्जदाराने अर्जदारास 14,068/- रक्‍कम कमी देवून अर्जदारास त्रुटीची व निष्‍काळजीपणाची सेवा दिली व मानसिकत्रास दिला व त्‍यास गैरअर्जदार जबाबदार आहेत.

       अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदारास 14068/- रु. मिळण्‍याकरीता वकीला मार्फत 01/02/2013 रोजी नोटीस पाठविली, परंतु आजपर्यंत गैरअर्जदाराने उत्‍तर दिले नाही. म्‍हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार अर्ज मंजूर करावा गैरअर्जदारास असा आदेश करावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास 14068/- रु. दिनांक 28/01/2013 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम देई पर्यंत 7.5 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा व तसेच गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. व मानसिक त्रासाबद्दल 5,000/- रु. अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावा.

अर्जदाराने तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.

      अर्जदाराने पुराव्‍यासाठी नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्राच्‍या यादीसह 5 कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केले आहेत. ज्‍यामध्‍ये अर्जदारास दिलेले अधिकारपत्र, मुदतठेवची पावती प्रत, गैरअर्जदाराने अर्जदारास 4,94,500/- चा चेक, मुदतठेव योजना व्‍याजदरा बाबतची नियमावली प्रत, अर्जदाराने गैरअर्जदारास वकीला मार्फत पाठविलेल्‍या नोटीसीची प्रत, कागदपत्रे दाखल केली आहेत, तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 14 वर तिन कागदपत्रांच्‍या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्‍यामध्‍ये गैरअर्जदाराच्‍या दिनांक 18/02/2013 रोजीच्‍या गैरअर्जदारानी पाठविलेल्‍या पत्रास अर्जदाराने दिलेले उत्‍तर, अर्जदाराचे खात्‍याचे गैरअर्जदाराकडे 13 सप्‍टेंबर 2012 ते 12 जानेवारी 2013 पर्यंतचा खाते उतारा, अर्जदार ट्रस्‍टने जयप्रकाश मुथा यांना दिलेले अधिकार पत्र दाखल केले आहेत.

     तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्‍यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना   नोटीसा काढण्‍यात आल्‍या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यात त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराची सदरची संपूर्ण तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्‍य आहे. तसेच अर्जदारास ग्राहक या नात्‍याने सदरची तक्रार विद्यमान मंचात दाखल करण्‍याचा अधिकार नाही. गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, आदित्‍य आर्थिक नियोजन मल्‍टी स्‍टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पूणे ही नियमा प्रमाणे नोंदणीकृत असून सदरच्‍या सोसायटीचे कार्यक्षेत्र महाराष्‍ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्‍यात आहे. त्‍याच प्रमाणे परभणी येथेही गैरअर्जदाराची शाखा उघडलेली आहे.

      गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, सुरवातीच्‍या काळापासून जयप्रकाश किशनलाल मुथा यांची शाखाधिकारी म्‍हणून नियुक्‍ती केलेली होती. अर्जदाराने तक्रार अर्जामध्‍ये किशोर देवीदास भोसले याची शाखाधिकारी म्‍हणून जे निर्देशित केलेले आहे ते चुकीचा आहे किशोर देवीदासराव भोसले हे सदरील सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत व ते पूणे येथून सर्व शाखाचे नियोजन करतात. गैरअर्जदाराची सोसायटी कोअर बँकींग प्रणालीवर कार्य करते. गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार संस्‍थने अधिकृत केलेले प्रतिनिधी जयप्रकाश मुथा हे त्‍या काळात गैरअर्जदार सोसायटीच्‍या परभणी येथील शाखेत शाखाधिकारी म्‍हणून नियुक्‍त केले होते. अर्जदार ट्रस्‍टने गैरअर्जदार सोसायटीकडे जे 5 लाख रु. गुंतवलेत ते शाखाधिकारीने ऑनलाईन बँकींग प्रणाली मध्‍ये MIP योजनेत गुंतवलेत व त्‍या प्रमाणे शाखाधिकारी जयप्रकाश मुथाने त्‍या संदर्भाचेच प्रमाणपत्र द्यावयास हवे होते, परंतु अर्जदार ट्रस्‍ट याना FDR योजनेचे प्रमाणपत्र दिले व त्‍यावर नसलेले व्‍याजदर 14 टक्‍के टाकून स्‍वतः सही करुन अर्जदारास दिली, परंतु बँकीग प्रणाली मध्‍ये 06/12/2012 पासून दिनांक 31/12/2012 पर्यंत MIP योजने प्रमाणे 13.2 टक्‍के दराने 4159/- रु. अर्जदाराच्‍या बचत खात्‍यामध्‍ये जमा झालेले आहेत. जयप्रकाश मुथा याने अर्जदाराना चुकीची माहिती देवुन दिशाभूल केली.गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, जयप्रकाश मुथा यानी गैरअर्जदाराच्‍या परभणी शाखेत अनेक निष्‍काळजीपणाचे व चुकीचे व्‍यवहार केले आहेत. त्‍यामुळे गैरअर्जदाराने मेमो दिला त्‍यामुळे जयप्रकाशने असे चुकीचे प्रकार केले आहेत जयप्रकाश मुथा हे पूर्वी गैरअर्जदार बँकेचे शाखाधिकारी होते व अर्जदाराचे अधिकारपत्र घेता येत नाही.

      गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार ट्रस्‍टची रु. 5 लाख ही शाखाधिकारी मुथा यानी एम आय पी योजनेत गुंतवली व त्‍यास 13.2 टक्‍के व्‍याजदर होते व सदरची योजना कमीत कमी 13 महिन्‍यासाठी गुंतवावीच लागते व त्‍यापूर्वीच रक्‍कम काढल्‍यास मुळ रक्‍कमेतून 2 टक्‍के वजा करण्‍यात येते व सदर ठेवीवरील रक्‍कमेवरचे व्‍याज ठेवीदाराच्‍या बचत खात्‍यात महिन्‍याच्‍या शेवटी जमा होते व सदर अर्जदाराच्‍या खात्‍यात 06/12/2012 पासून 31/12/12012 पर्यंतचे 4159/- रु. अर्जदाराच्‍या खात्‍यात व्‍याजापोटी जमा झाले आहेत. गैरअर्जदाराचे म्‍हणणे की, बँकेच्‍या व्‍यवहारामध्‍ये Under Protest पैसे उचलण्‍याचे कोठेही तरतुद नाही जयप्रकाश मुथा हे दिनांक 18/02/2013 रोजी पर्यंत गैरअर्जदार बँकेत शाखाधिकारी होते सदरची तक्रार खोटी आहे व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.

      गैरअर्जदाराने नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.

      गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वर 9 कागदपत्राच्‍या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केली आहेत ,ज्‍यामध्‍ये अध्‍यादेशाची प्रत, प्रमाणपत्र व चेकची प्रत, अर्जदार ट्रस्‍टची खाते उतारा, चालू खाते उतारा, इमेल संदेश, करारपत्र, नियुक्‍तीपत्र, मेमो, निलंबनपत्र कागदपत्रे दाखल केले आहेत.

                        दोन्‍ही बाजुंच्‍या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.

                          मुद्दे.                                                                  उत्‍तर.

1      गैरअर्जदाराने अर्जदाराची 5 लाख ठेवची रक्‍कम मुदतपूर्व

       देताना अर्जदारास कमी रक्‍कम देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.

2     आदेश काय ?                                                           अंतिम आदेशा प्रमाणे.

 

कारणे.

मुद्दा क्रमांक 1.

           अर्जदार ट्रस्‍टने गैरअर्जदाराकडे दिनांक 06/12/2012 रोजी 5 लाख रुपये ठेव स्‍वरुपात 5 वर्षाकरीता गुंतवली होती व त्‍याची ड्यु डेट 06/12/2017 पर्यंत होती ही बाब अॅडमिटेड फॅक्‍ट आहे. वादाचा मुद्दा हा आहे की, सदरची ठेव FDR स्‍वरुपाची होती का MIP स्‍वरुपाची होती ? अर्जदाराने या बाबत पुराव्‍या बद्दल दाखल केलेल्‍या नि.क्रिमांक 4/2 वरील ठेव पावतीच्‍या झेरॉक्‍स प्रत वरुन हे दिसून येते की, सदरची 5 लाख रु.ची ठेव ही FDR  स्‍वरुपाची होती व त्‍याचा व्‍याजदर 14 टक्‍के होता.

           गैरअर्जदाराने त्‍याच्‍या लेखी जबाबात सदरची ठेव ही FDR होती हे स्‍पष्‍टपणे इन्‍कार केला आहे. गैरअर्जदाराने सदरची अर्जदाराची 5 लाखाची ठेव ही MIP स्‍वरुपाची होती व ती पाच वर्षाकरीता होती म्‍हणजेच 06/12/2012 ते 06/12/2017 पर्यंत होती म्‍हंटले आहे. याबाबत गैरअर्जदाराने दाखल केलेले पुराव्‍या मधील कागदपत्रा मध्‍ये म्‍हणजेच नि.क्रमांक 9/4 वरील कागदपत्रा वरुन दिसून येते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 9/4 वरील अवलोकन केले असता अर्जदार ट्रस्‍टची 5 लाख रु.ची ठेव ही Fix Deposit MIP स्‍वरुपाची होती व त्‍याचा कालावधी 60 महिन्‍याचा होता म्‍हणजेच डिसेंबर 06/2012 ते डिसेंबर 06/2017 पर्यंत होती हे दिसून येते. अर्जदार ट्रस्‍टचे खाते क्रमांक 614000002 असा आहे हे देखील सदरील कागदपत्रावरुन दिसून येते.

           हे की, नि.क्रमांक 9/4 वरील दाखल केलेल्‍या अर्जदार ट्रस्‍टच्‍या खाते उताराचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने अर्जदार ट्रस्‍टच्‍या 5 लाख रु.च्‍या ठेवीपोटी डिसेंबर 31, 2012 रोजी अर्जदाराच्‍या खात्‍यात 4159/- रुपये व्‍याज म्‍हणून क्रेडीट केलेले आहे व सदरची रक्‍कम 4159/- रुपये डेबीट स्‍लीप 6649 अन्‍वये दिनांक जानेवारी, 04,2013 रोजी अर्जदाराचा स्‍लीप 8045 अन्‍वये 5 लाखावर 2 टक्‍के दराने 10,000/- रु. डेबीट केलेले आहे व दिनांक जानेवारी 28, 2013 रोजी डेबीट स्‍लीप 8046  अन्‍वये 490000/- अर्जदाराच्‍या खात्‍यातून डेबीट केलेले आहे. सिध्‍द होते. अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार ट्रस्‍टचे 5 लाख रु. गैरअर्जदाराकडे FDR स्‍वरुपात पाच वर्षाकरीता गुंतवले होते व त्‍यावर 14 टक्‍के व्‍याज ठरले होते. हे म्‍हणणे मंचास योग्‍य वाटत नाही, कारण अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्रिमांक 4/4 वरील  कागदपत्रांमध्‍ये गैरअर्जदाराचे ठेव योजना व्‍याजदर तक्‍ताचे अवलोकन केले असता 14 टक्‍के व्‍याजदर कोठेही आढळून येत नाही, याचाच अर्थ असा होते की, अर्जदाराच्‍या ठेव पावतीवर व्‍याजदर 14 टक्‍के दर्शविला आहे तो एकदम चुकीच्‍या पध्‍दतीने दर्शविला आहे. सर्वात महत्‍वाची बाब म्‍हणजे अधिकृत प्रतिनिधी म्‍हणून जयप्रकाश किशनलालजी मुथा  याने अर्जदार ट्रस्‍टच्‍या वतीने सदरची प्रस्‍तुत तक्रार गैरअर्जदार विरुध्‍द दाखल केली आहे ते गृहस्‍थ गैरअर्जदार बँकेत शाखाधिकारी म्‍हणून काम करत होते ही बाब नि.क्रमांक 9/6 वरील जयप्रकाश मुथा व गैरअर्जदारा मध्‍ये झालेल्‍या कारारपत्रा वरुन दिसून येते तसेच जयप्रकाश मुथा यांची गैरअर्जदार परभणी शाखेमध्‍ये दिनांक 28/08/2012 रोजी शाखाधिकारी म्‍हणून नेमणुक झाली होती, ही बाब सदर कागदपत्रावरुन आढळून येते. तसेच जयप्रकाश मुथा याचे कडून गैरअर्जदार परभणी शाखे मध्‍ये काही प्रामाणात चुका आढळून येत असल्‍यामुळे गैरअर्जदार बँकेने दिनांक 03/01/2013 रोजी जयप्रकाश मुथास मेमो दिला होता, ही बाब नि.क्रमांक 9/8 वरील कागदपत्रावरुन आढळून येते. तसेच जयप्रकाश मुथा याना दिनांक 18/02/2013 रोजी गैरवर्तनामुळे  व कामकाज ठिक नसल्‍यामुळे गैरअर्जदार बँकेच्‍या पूणे येथील कार्यकारी संचालक किशोर देवीदासराव भोसले याने सेवेतून तात्‍काळ निलंबीत केले होते, ही बाब नि.क्रमांक 9/9 वरील कागदपत्रावरुन दिसून येते.याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदार ट्रस्‍टच्‍या वतीने दिनांक 06/12/2012 रोजी ठेव ठेवते वेळी जयप्रकाश मुथा हेच परभणी शाखेमध्‍ये शाखाधिकारी म्‍हणून कार्यरत होते. व त्‍यावेळेस जयप्रकाश मुथा यानेच अर्जदार ट्रस्‍टच्‍या ठेव पावतीवर 14 टक्‍के व्‍याजदर दर्शवून अर्जदारास सदरची ठेव पावती दिली वास्‍तविक अर्जदारानेच दाखल केलेल्‍या पुराव्‍यातील नि.क्रमांक 4/4 वरील ठेव योजना व्‍याजदर तक्‍त्‍यामध्‍ये 14 टक्‍के व्‍याजदर हा कोठेही आढळून येत नाही. सदरच्‍या चुकीस जयप्रकाश मुथा हेच जबाबदार आहेत, असे मंचास वाटते. अर्जदार ट्रस्‍टची 5 लाख रु.चे ठेव ठेवते वेळी व रक्‍कम काढते वेळी अर्जदाराचे Power of Attorney holder हे जयप्रकाश मुथाच गैरअर्जदार बँकेचे शाखाधिकारी होते हे आलेल्‍या पुराव्‍यातून दिसून येते.

            अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार ट्रस्‍टची 5 लाख रु. ठेव ही गैरअर्जदाराकडे 54 दिवस होती व गैरअर्जदाराच्‍या नियमा प्रमाणे 46 ते 90 दिवसा करीता 7.5 टक्‍के व्‍याजदर आहे व मुदतपूर्व ठेव उचलल्‍यास 2 टक्‍के व्‍याजदर कपात होतो. त्‍यामुळे गैरअर्जदाराने 54 दिवसाचे 5 लाखावर 5 टक्‍के दराने व्‍याज 4068= 49 येवढे देणे आवश्‍यक होते व गैरअर्जदाराने अर्जदारास 5 लाख + 4068 +  चालू खात्‍याचे 4500/- असे एकूण 5,08,568/- रु.देणे आवश्‍यक होते, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास 4,94,500/- रु. एवढेच दिले व अर्जदारास गैरअर्जदाराने 14,068/- रु. कमी दिले व गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची व त्रुटीची सेवा दिली हे मंचास योग्‍य वाटत नाही, कारण गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या अर्जदार ट्रस्‍टच्‍या खात्‍याचे उताराचे कागदपत्राचे अवलोकन केले असता ( नि.क्रमांक 9/4) अर्जदाराच्‍या ठेवीवर मुदतपूर्व काढलेमुळे नियमा प्रमाणे 2 टक्‍के वजा करुन अर्जदारास 4,90,000/- दिल्याचे दिसून येते. व अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे 5 लाख रु. जे 06/12/2012 ते 31/12/2012 पर्यंत होते त्‍यावर गैरअर्जदाराने अर्जदारास व्‍याजाच्‍या स्‍वरुपात 4159/- रु. दिल्‍याचे आढळून येते व सदरची रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात म्‍हणजेच खाते नं. 607000009 मध्‍ये दिनांक जानेवारी 04, 2013 रोजी जमा केल्‍याचे आढळून येते, यावरुन हे सिध्‍द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास व्‍याजापोटी दिलेली रक्‍कम योग्‍यच आहे. असे मंचास वाटते.

            अर्जदाराचे म्‍हणणे की, अर्जदार ट्रस्‍टला पैशाची नितांत आवश्‍यकता होती, म्‍हणून मुदतपूर्व ठेव काढली व गैरअर्जदाराने दिनांक 28/01/2013 रोजी 4,94,500/- रु. चा चेक अर्जदारास दिला. त्‍यावेळेस अर्जदाराने नाविलाजाने मुळ मुदत ठेव पावतीवर Received Payment under protest  असे लिहून दिले व गैरअर्जदाराकडून 4,94,500/- रु. चा चेक स्विकारला व पावती  Discharge  करुन दिली हे म्‍हणणे मंचास योग्‍य वाटत नाही. कारण अर्जदाराची ही ट्रस्‍ट आहे व सदरची Discharge पावती करुन देताना अर्जदार ट्रस्‍टच्‍या कोणत्‍या पदाधिका-याने वा संबंधीत व्‍यक्‍तीने

Received Payment under protest लिहिले या बद्दल अर्जदाराने आपल्‍या तक्रारी मध्‍ये कोठेही उल्‍लेख केलेला आढळून येत नाही वा त्‍या व्‍यक्‍तीचे शपथपत्र देखील अर्जदाराने मंचासमोर दाखल केला नाही, वरील सर्व चर्चेवरुन हे सिध्‍द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास त्‍याची 5 लाख रु. ची ठेव पावती मुदतपूर्व मोडत असल्‍यामुळे नियमा प्रमाणे 2 टक्‍के दंड व्‍याज आकारुन 4,90,000/- व अर्जदार ट्रस्‍टच्‍या चालू खात्‍यातील 4500/- असे एकून  4,94,500/- रु. दिले ते योग्‍यच आहे व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्‍याचे कोठेही दिसून येत नाही असे मंचास वाटते. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे  नकारार्थी उत्‍तर देवून मंच  खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                            आदेश

1     अर्जदाराचा तक्रार अर्ज  नामंजूर करण्‍यात येत आहे.

2     तक्रार अर्जाचा खर्च ज्‍याचा त्‍यांनी सोसावा.

3     आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

 

  सौ.अनिता ओस्‍तवाल.                            श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्या.                                                                     मा.अध्यक्ष.

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Anita Ostwal]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.