निकाल
दिनांक- 05.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार ललिता विश्वनाथ करडे हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही परळी वैजनाथ येथील रहिवाशी असून शेतीवरच तिची उपजिविका अवलंबून आहे. सामनेवाले क्र.1 ही विमा कंपनी असून सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे विमा प्रतिनिधी आहेत. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराकडे येऊन सामनेवाले क्र.1 विमा कंपनीकडे वार्षिक हप्त्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांचे अनेक फायदे होता व त्यानुसार तीन वर्षात दुप्पट रक्कम विम्यासह मिळते अशी माहीती व हमी दिली. तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 व भरोसा ठेऊन सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा पॉलिसी काढली. सामनेवाले क्र.2 यांचेवर विश्वास ठेऊन सामनेवाले क्र.2 कडे रु.3,00,000/-वार्षिक हप्ता म्हणून जमा केले. त्याबाबत सामनेवाले क्र.1 यांनी पावत्या देखील दिलेल्या आहेत. अशा प्रकारे तीन वर्षाचे रु.9,00,000/- सामनेवो क्र.2 कडे पॉलिसी क्र.12266456 नुसार जमा केलेले आहेत.
तक्रारदाराने तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सामनेवाले क्र.1 कडे चौकशी केली असता, एकूण रु.9,00,000/- जमा केली असताना सुध्दा सामनेवाले क्र.1 सांगितले की, पॉलिसी रककम परत पाहिजे असल्यास रु.8,66,052/- एवढीच रक्कम मिळेल. तक्रारदार हिला मानसिक धक्काच बसला, त्यामुळे तक्रारदाराने दि.24.03.2012 रोजी पॉलिसी रदद करुन पुर्ण रक्कम परत मिळणेची मागणी केली. सामनेवाले क्र.1 ने रक्कम रु.8,22,750/- एवढी रक्कम जमा होऊन परत मिळेल या बाबत लेखी पावती तक्रारदारास दिली. सामनेवाले क्र.2 यांनी चुकीची माहीती देऊन त्यांना अधिक आर्थिक लाभ कमीशन रककमेतून मिळण्याचे उददेशाने तक्रारदाराची फसवणूक केली आहे. सामनेवाले क्र.1 यांनी प्रत्यक्षात रक्कम रु.8,10,325/- एवढया रककमेचा धनादेश तक्रारदारास पाठविला आहे. तक्रारदारास त्यामुळे मानसिक धक्का बसला आहे. तक्रार दाखल करण्यास कारण दि.15.05.2012 रोजी घडलेले आहे.सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या खालील प्रमाणे नुकसान भरपाई दयावी.
1. तक्रारदाराची सामनेवाले क्र.1 कडून येणे असलेली रक्कम रु.89,675/-
2. तक्रारदारास झालेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक
त्रासापोटी नूकसान भरपाई रु.10,000/-
---------------
एकूण रु.99,675/-
सदर रक्कमेवर 18 टक्के व्याज देण्यात यावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
सामनेवाले क्र.1 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते सातत्याने गैरहजर राहिले. म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा हूकून झाला आहे.
सामनेवाले क्र.2 हे स्वतः हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दि.08.08.2012 रोजी दाखल केले.हे मान्य आहे की, मी सामनेवाले क्र.1 यांचे कार्यालयाचा विमा प्रतिनिधी आहे. सामनेवाले क्र.1 यांच्या पॉलिसीची माहीती व प्लॉन व कागदपत्र तक्रारदार यांना दाखवून समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने प्लॅनची माहीती समजावून घेऊन पॉलिसी काढली होती. तक्रारदार हिने प्लॅन समजावून घेतलेला होता. त्यांनी कोणत्या को-या फॉर्मवर तक्रारदाराच्या सहया घेतलेल्या नाहीत. सामनेवाले क्र.2 यांनी एक मध्यस्थ म्हणून काम केलेले आहे. म्हणून त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही. त्यांचे विरुध्द तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीचे पृष्टयर्थ त्यांचे शपथपत्र, पॉलिसीची प्रत, रक्कमेची पत्र, बँकेची पावती, चेक नं.455395, तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद दाखल केला आहे, इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रत दाखल केल्या आहेत.सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे यांचे अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्यामध्ये त्रूटी केली आहे काय होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय होय.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदारांनी तक्रारीसोबत तक्रारदाराचे शपथपत्र पुरावा म्हणून दाखल केले आहे. तसेच कागदपत्र पोहच पावती, पेमेंटचे पत्र, बॅकेची पावती, एच.डी.एफ.सी.बँकेचा धनादेश, तक्रारदाराने पॉलिसीच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी केलेला अर्ज, वर नमुद केलेल्या कागदपत्राच्या छायाकिंत प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारदार यांचे कथन असे की,तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून वार्षिक हप्ता रु.3,00,000/- असे तिन वार्षिक हप्त्याचे एकूण रक्कम रु.9,00,000/- भरले आहेत. सामनेवाले क्र.1 यांचेकडे तक्रारदाराने रक्कम रु.9,00,000/- गुंतवले आहेत ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
सामनेवाले क्र.1 यांना नोटीस बजावूनही ते सतत गैरहजर राहीले त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे. सामनेवाले क्र.2 शिवाजी उत्तमराव चाटे हे हजर झाले. त्यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांचे कथन असे की, तो सामनेवाले क्र.1 यांचा विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.
सामनेवाले क्र.2 ने कथन केले आहे की, तक्रारदारांच्या अर्जातील मजकूर अमान्य आहे. ते सामनेवाले क्र.1 यांचे विमा प्रतिनिधी आहे. कंपनी तर्फे ज्या प्लॅनची स्कीम असते. त्यांची माहीती सामनेवाले क्र.2 हे विमाधारकास देतात व त्याबददल त्यांना मिळणारे फायदे हयांची माहिती देतात. त्यामुळे विमा प्रतिनिधी हे सामनेवाले क्र.1 हयांची मध्यस्थ म्हणून भुमिका पार पाडतात. त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांनी कोणतीही सेवेमध्ये त्रुटी केली नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
तक्रारदारांचे पुराव्यातील कथन असे की, सामनेवाले क्र.1 ही विमा कंपनी असुन सामनेवाले क्र. 2 हे त्यांचे विमा प्रतिनिधी आहे. सामनेवाले क्र.2 हयांनी सामनेवाले क्र.1 हयांच्याकडे वार्षिक हप्त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अनेक फायदे होतात. या मोहात बळी पडून तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे कंपनीची विमा पॉलिसी घेतली. विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु.3,00,000/- होते. असे तिन वार्षिक हप्ते म्हणजे एकूण रु.,9,00,000/- तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे गुंतवले आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले कडे रक्कमेची मागणी केली असता रु.8,66,052/- मिळतील असे सामनेवाले यांनी सांगितले. अजून रक्कम कमी होईल या भितीपोटी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पुर्ण रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी रक्कम रु.8,22,750/- मिळतील या बाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास लेखी पावती दिली होती. पावती असताना सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदाराला रु.8,10,325/- एवढीच रककम दिली आहे. उर्वरित रककम आजपर्यत दिलेली नाही.
तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र, कागदपत्र तसेच सामनेवाले क्र.2 यांचा लेखी जवाब यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदाराची उर्वरित रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी रक्कम सुरक्षीत ठिकाणी राहावी व त्यांची रक्कम वेळेवर परत मिळावी तसेच त्यांस बोनस व व्याज मिळावे म्हणून सामनेवाला यांच्या विमा कंपनीत विमा प्रतिनिधीने दिलेल्या प्लॉनच्या माहीतीनुसार तक्रारदारांनी रक्कम गुंतविली होती परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या वारंवार मागणी नंतर सुध्दा त्यांला उर्वरित रक्कम रु.89,675/- आजपर्यत दिली नाही. तसेच रक्कम न देण्याबाबत कोणतेही स्पष्ट असे कारण दिले नाही किंवा कोणताही असा विश्वास दाखवला नाही. सामनेवाले क्र.2 यांनी सुध्दा तक्रारदारास योग्य असा सल्ला दिला नाही व रक्कम न देण्याबाबत कोणतेही कारण दिले नाही. स्वतःचे पैसे असताना सुध्दा योग्य वेळी त्यांचा उपयोग होत नाही तसेच योग्य वेळी मिळत नाही तसेच जेवढी रक्कम गुंतविली तेवढी सुध्दा मिळत नाही त्यामुळे तक्रारदारास प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे. म्हणून तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत व रक्क्म न दिल्यामुळे मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदार दाखल करण्यास लागलेला खर्च रु.2,000/- देण्यात यावा असे मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराला उर्वरित
रक्कम रु.89,675/-(अक्षरी रुपये एकोण्णनंवद हजार सहाशे
पंच्याहत्तर फक्त)निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत द.सा.द.शे.
9 टक्के व्याज दराने तक्रार दाखल दि.07.06.2012 पासून संपुर्ण
रक्कम मिळेपर्यत दयावेत.
3. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराला
मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फकत) व
तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त)
दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.