Maharashtra

Ahmednagar

CC/17/52

Shri Raviraj Dilip Labade - Complainant(s)

Versus

Branch Manager , Reliance Genral Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv Sachin Ithape

24 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/52
( Date of Filing : 09 Feb 2017 )
 
1. Shri Raviraj Dilip Labade
Maulicha Mala Gondhvani Shrirampur
Agmadnagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager , Reliance Genral Insurance Co. Ltd.
Reliance Centre,4th floor south wing near Prabhat Colony East Highway Santacruz (E) Mumbai
Mumbai
Maharashtra
2. Manager Reliance Genral Insurance Co ltd
135 B Pushpam Plaza Tadiwala Rd. Pune Station Rd. Pune Station Pune
Pune
Maharashtra
3. Branch Manager Reliance Genral Insurance Co Ltd
215 to 217 A wing Ambar Plaza Station Rd.
Ahmadnager
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv Sachin Ithape, Advocate
For the Opp. Party: Adv.Sujata Gundecha, Advocate
Dated : 24 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार राहणार श्रीरामपुर,   जि. अहमदनगर येथील रहिवासी आहेत. सामनेवाले क्रमांक १ ही विमा कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ व ३ करीता क्‍लेमची विमा धारकाकडुन पुर्तता करून घेतली, तो शाखेचा शाखाधिकारी आहे. सामनेवाले क्र.३ हे सदर शाखेत अहमदनगर येथील शाखेचे शाखा‍धिकारी असून तक्रारदार यांनी  फेब्रुवारी २०१५ मध्‍ये टाटा कंपनीची इंडिगो मांझा एम.एच.१७-अे.ई.-००९५ असे जुने चारचाकी वाहन इंद्रसेन रामनारायण राजपाल, रा. श्रीरामपुर यांच्‍याकडुन खरेदी केली. त्‍यानंतर तक्रारदाराने वाहनाचा वेळोवेळी विमा उतरविला होता.     मे २०१६ मध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदाराचे सदर वाहन विमा रक्‍कम रूपये १८,२०७/- हप्‍त्‍यापोटी भरून रक्‍कम रूपये ३,९५,८०३/- एवढ्या किंमतीचा विमा  उतरविला.  सदर विम्‍याचा कालावधी १९-०५-२०१६ ते १८-०५-२०१६ असा होता.  दिनांक  १२-०७-२०१६ रोजी तक्रारदार हे त्‍यांच्‍या खाजगी कामासाठी श्रीरामपुरहुन राहुरी येथे जात होते. तक्रारदाराचे वाहन हे बेलापुर खुर्द शिवारातील नरसाळी येथील ओढ्यावर आले असतांना रात्री ११.३० वाजेच्‍या सुमारास मालवाहु ट्रकने धडक दिली व तक्रादाराचा त्‍याच्‍या वाहनावरील ताबा सुटल्‍याने त्‍यामध्‍ये अपघात  झाला. अपघाताबाबत तक्रारदाराने श्रीरामपुर शहर पोलीस स्‍टेशनल येथे दिनांक  १६-०७-२०१६ रोजी, तसेच सामनेवाले विमा कंपनीला या अपघाताबाबत कळविले. पोलीस स्‍टेशनला तक्रार दिल्‍यानंतर गुन्‍हा रजिस्‍टर नंबर II १२१/२०१६ अन्‍वये गुन्‍हा नेांदविला. सदरील अपघाताबाबत विमा कंपनीस दिनांक १२-०७-२०१६ रोजी तक्रारदाराने कळविले. त्‍यामुळे सामनेवाले विमा कंपनीने सर्व्‍हेअरची नेमणुक केली व त्‍यांनी वाहनाची १८-०७-२०१६ रोजी पहाणी केली व सदरील वाहनाचे नुकसान भरपाईसाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन नुकसान भरपाई रकमेची मागणी सामनेवाले यांच्‍याकडे तक्रारदाराने केली. विम्‍याची रक्‍कम प्राप्‍त व्‍हावी म्‍हणुन तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीशी संपर्क साधला.  सामनेवाले यांनी दिनांक १९-०८-२०१६ रोजी पत्र पाठवुन तक्रारदारास कळविले की, तक्रारदाराने विमा उतरविण्‍यापुर्वी विमाकंपनीस तपासणीसाठी सादर केलेले वाहन व‍ विम्‍याचा परतावा मिळावा म्‍हणुन दर्शविण्‍यात आलेले अपघातग्रस्‍त वाहन ही दोन्‍ही भिन्‍न आहेत. सदरील पत्रात सामनेवाले यांनी सदरील निष्‍कर्षाचे पुष्‍ट्यर्थ (१) वाहनाचे व्‍हर्जन (२) आतील सिट व डॅश (३) वेअर अॅण्‍ड टिअर डॅमेजेस आणि (४) स्‍टेअरींग कव्‍हर हे वाहनाचे भाग भिन्‍न दिसत असल्‍याबाबतचा दावा करून त्‍यावर तक्रारदाराचा खुलासा मागिविला. तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांशी दुरध्‍वनीवरून संपर्क साधला असता, त्‍यांनी बेकायदेशीररित्‍या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने सदरची मागणी मान्‍य केली नाही. त्‍यानंतर सामनेवाले यांनी दिनांक १४-०९-२०१६ रोजी पत्राद्वारे तक्रारदाराच्‍या वाहनाचा विमा दावा नाकारून निश्चितच दुषीत सेवा दिली आहे.  म्‍हणुन तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. तक्रारदाराने तक्रारीतील कलम ११ प्रमाणे मागणी केली आहे.

३.    सामनेवाले यांनी त्‍यांची कैफीयत नि.१२ वर दाखल केली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रादाराच्‍या वाहनाचा विमा उतरविला व त्‍या विमा पॉलिसीचा नंबर व कालावधी मान्‍य केला आहे. तसेच सामनेवाले यांच्‍यावर लावलेले आरोप त्‍यांनी अमान्‍य केले.  सदरची घटना घडल्‍यानंतर तक्रारदाराने पोलीस स्‍टेशनला दिनांक १६-०७-२०१६ रोजी फिर्याद नोंदविली व घटना ही दिनांक १२-०७-२०१६ रोजीची आहे, अशा प्रकारे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला आहे. तक्रारदाराने सामनेवालेंना  कळविल्‍यानंतर सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या सर्व्‍हेअरला तक्रारदाराच्‍या  वाहनाची तपासणी करण्‍यासाठी पाठविले. सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार जो अपघात झालेला आहे ते व ज्‍या वाहनाची विमा रक्‍कम मागीतली ते वाहन हे भिन्‍न  आहे, असे निदर्शनास आले. त्‍यानंतर ही बाब तक्रारदाराला सामनेवाले यांनी कळविली. पंरतु त्‍यांनी त्‍याचे योग्‍य ते स्‍पष्‍टीकरण दिले नाही. यासाठी तक्रारदाराला दि.१४-०९-२०१६ रोजी रिमाईंडर पत्र पाठवुन दिेलेले आहे आणि त्‍यानंतर सदरचा विमा दावा हा पॉलिसीची अट क्रमांक ८ नुसार नाकारला आहे. तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा हा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार देय नसल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारला, यामध्‍ये  सामनेवाले यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

४.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यात दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्री.इथापे यांनी केलेला युक्तिवाद, सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्रीमती गुंदेचा यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

नाही

(३)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

५.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार यांनी एम.एच.१७-अे.ई.-००९५ हे जुने चारचाकी वाहन श्रीरामपुर येथुन खरेदी केले होते. सदरहु वाहनाचा सामनेवाले विमा कंपनीकडे यांनी वेळोवेळी विमा उतरविला होता. सदरहु विम्‍याचा कालावधी     १९-०५-२०१६ ते १८-०५-२०१७ असा होता. विम्‍याची हप्‍याची रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे भरलेली होती व त्‍याची आय.डी.व्‍ही. व्‍हॅल्‍यु ३,९५,८३१/- एवढी होती. ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने प्रकरणात विम्‍याची पॉलिसीची कव्‍हर नोट दाखल केलेली आहे. तसेच सामनेवाले यांनी विमा उतरविल्‍याची बाब त्‍याच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये मान्‍य केलेली आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये ग्राहक व सेवा देणार नातेसंबंध निर्माण झाले आहेत. सबब मुददा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

६.  मुद्दा क्र. (२) :   तक्रादार यांनी वाहन खरेदी केल्‍यानंतर त्‍या वाहनाचा सामनेवाले यांच्‍याकडे विमा उतरविला होता. त्‍या विम्‍याचा कालावधी दिनांक  १९-०५-२०१६ ते १८-०५-२०१७ असा होता. या कालावधी दरम्‍यान दिनांक      १२-०७-२०१६ रोजी रात्री तक्रारदार हे त्‍यांच्‍या खाजगी कामासाठी श्रीरामपुरहुन राहुरी येथे जात असतांना वाहन बेलापुर खुर्द शिवारात नरसाळी येथे आले असतांन राहुरीकडुन येणा-या एका मालवाहु ट्रकने वाहनाला जोरात धडक दिली. त्‍यामुळे तक्रारदाराचा वाहनावरील ताबा सुटला व त्‍यावरून वाहन जोरात जाऊन आढळले. त्‍यामुळे वाहनाचे ब-याच प्रमाणात नुकसान झाले. या घटनेबाबतची खबर पोलीस स्‍टेशन श्रीरामपुरला देऊन गुन्‍हा रजिस्‍टर्ड करण्‍यात आला. सदरहु घटनेची खबर सामनेवाले विमा कंपनीला दिल्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांच्‍या सर्व्‍हेअरला  वाहनाची तपासणी करण्‍यासाठी पाठविले. तक्रारदाराने पुढे असे कथन केले की, सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा चुकीचे कारण देऊन नामंजुर केला.  तक्रारदाराच्‍या तक्रारीतील कथनाला सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये  असा बचाव घेतला की, तक्रारदाराने विमा दावा सादर केल्‍यानंतर सामनेवाले विमा कंपनीने त्‍यांच्‍या सवर्हेअरला तपासणीसाठी पाठविले व त्‍याच्‍या  अहवालानुसार तक्रारदाराने विमा दावा सादर करतांना जे वाहन नमुद केले ते तपासले असता दुसरेच वाहन होते. त्‍यामुळे अपघात झालेले वाहन कोणते आहे ही बाब स्‍पष्‍ट झाली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराला पत्र पाठवुन त्‍याबाबतचे स्‍पष्‍टीकरण मागितले. परंतु तक्रारदाराने स्‍पष्‍टीकरण दिले नाही.  दिनांक १४-०९-२०१६ रोजी तक्रारदाराचा विमा दावा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार त्‍यामधील अट क्रमांक ८ नुसार तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला. त्‍यामुळे अपघात झालेले वाहन व तपासणीसाठी दिलेले वाहन हे एकच आहे, ही बाब स्‍पष्‍ट झाली नाही. त्‍यामुळे विमा दावा नामंजुर केला. यासाठी मंचाने प्रकरणात दाखल करण्‍यात आलेले वाहनाचे छायाचित्राचे अवलोकन केले असता ते वाहन ००९५ नंबरचे आहे. मात्र अपघातग्रस्‍त वाहन कोणते आहे व त्‍याचे छायाचित्र दाखल नाहीत. तसेच तकारदाराने याबाबत सामेनेवाले यांच्‍या  कैफियतीला प्रतिउत्‍तर देऊन किंवा वाहनाचे कागदपत्र दाखल करून तपासणीसाठी दिलेले वाहन व अपघात झालेले वाहन हे एकच आहे स्‍पष्‍ट  करणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही. तक्रारदार यांनी खर्चाचे कोटेशन दाखल केले, मात्र त्‍याच्‍या वाहनाचे नुकसान झाले व नुकसान कशाप्रकारचे झाले, याविषयी तक्रारीत काहीही नमुद केले नाही. तसेच तक्रारदाराने अपघाती वाहनाचे छायाचित्र प्रकरणात दाखल करणे गरेजेचे होते. परंतु ते दाखल केलेले नाही. तक्रारदार तक्रार सिध्‍द करण्‍यासाठी आवश्‍यक कागदोपत्री पुरावा दाखल करण्‍यास असमर्थ ठरले, तक्रारदार त्‍यांची तक्रार सिध्‍द करू शकले नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात येते, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

      १.  तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

      २.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

      ३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

      ४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.