निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 27/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/09/2010 तक्रार निकाल दिनांकः- 27/01/2011 कालावधी 04 महिने 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. रुपम कलेक्शन. अर्जदार व्दारा-प्रोप्रायटर, अड.आर.एन.गायकवाड. भगिरथजी पिता गणेशलालजी अग्रवाल. रा.शिवाजी चौक.परभणी. विरुध्द 1 ब्रँच मॅनेजर, गैरअर्जदार. पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक कं.लि. अड.पी.व्हि.सराफ. हिंगोली ब्रँच,परभणी. 2 इफको टोकियो जनरल इन्शुरंस कं.लि. अड.अजय व्यास. व्दारा-जनरल मॅनेजेर. दुसरा माळा,एएफएल हाऊस,लोक भारती कॉम्प्लेक्स. मरोल मरोशी रोड.अँधेरी (ईस्ट) मुंबई- 400 059. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ.सुजाता जोशी. सदस्या. ) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने त्याच्या व्यवसायासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून कर्ज घेतलेले आहे.2001 ते 2004 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराच्या रीस्क कव्हरींग इन्शुरन्स पॉलीसीसाठी अर्जदाराच्या खात्यातून पॉलीसीचा हप्ता घेतला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 च्या परवानगीने अर्जदार स्वतः विमा पॉलीसीचा हप्ता चेकने भरावयाचा 2010 पर्यंत अर्जदाराची “ शॉप कीपर इन्शुरन्स पॉलीसी ” सुरु होती.दिनांक 14/05/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने रु.5074/- व दिनांक 07/05/2010 रोजी रु.5074/- अर्जदाराच्या खात्यातून काढून गैरअर्जदार क्रमांक 2 ला अर्जदाराच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी दिले.अर्जदाराच्या लक्षात ही बाब मे 2010 मध्ये लक्षात आल्यावर त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे रु.10,148/- परत मिळावेत अशी मागणी केली.गैरअर्जदार क्रमांक 2 ने दिनांक 22/07/2010 रोजी रु. 3277/- अर्जदारास परत केले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे उर्वरित रु.6871/- मिळावेत अशी मागणी केली.परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने पैसे देण्यास नकार दिला म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली.व रु.6871/- गैरअर्जदार क्रमांक 1 ने व्याजासकट द्यावेत. व मानसिक त्रासापोटी रु.5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, दिनांक 08/09/2005 ते दिनांक 04/09/2009 पर्यंत काढलेल्या इन्शुरन्स पॉलीसीच्या पावत्या, खाते उतारा हे कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने वेळोवेळी संधी देवुनही लेखी जबाब दाखल केली नाही म्हणून त्यांच्या विरुध्द “ Without say ” तक्रार चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराच्या तक्रारीतील सर्व बाबी नाकारुन त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 च्या सुचने नुसार अर्जदाराला पॉलीसी क्रमांक 47158070 दिनांक 14/05/2009 ते दिनांक 13/5/2010 या कालावधीसाठी रु. 5074/- घेवुन दिली होती हे मान्य केले आहे.तसेच ह्याच पॉलीसीचे नुतनीकरण करण्यात आले व पॉलीसी क्रमांक 47192808 दिनांक 14/05/2010 ते दिनांक 13/05/2010 या कालावधीसाठी रु.5074/- घेऊन देण्यात आला.दिनांक 13/07/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 ला पत्राने सुचना दिली की, अर्जदाराने दुस-या कंपनीकडून पॉलीसी घेतली असल्यामुळे ही पॉलीसी रद्द करुन त्याचे पैसे परत करावेत त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 ने पॉलीसी रद्द करुन रु.3277/- अर्जदारास परत केले. अर्जदाराच्या या खोटया मनगढंत तक्रारीमुळे गैरअर्जदाराच्या नियमित ग्राहकांवर परीणाम झाला व गैरअर्जदार क्रमांक 2 ला मानसिकत्रास झाला म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 ला रु. 10,000/- ची नुकसान भरपाई देण्यात येवुन तक्रार फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदार क्रमांक 2 ने विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबासोबत त्यांचे शपथपत्रा, “ ट्रेड प्रोटेक्टट पॉलीसी ” चे शेड्युल, रीफंड नोट इ.कागदपत्र दाखल केली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वकीलाच्या युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे अर्जदाराने त्याच्या व्यवसायासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून कर्ज घेतले व तो त्याच्या “ मे. रुपम कलेक्शन ” या दुकानाची पॉलीसी “ दी न्यु ईंडीया अश्युरंस कं.ली.” यांच्याकडून गैरअर्जदार क्रमांक 1 कडे असलेल्या त्याच्या खात्याचा धनादेश देवुन घेतो हे नि.5/1 ते नि.5/5 वर दाखल केलेल्या विमा हप्त्याच्या पावतीवरुन सिध्द होते. अर्जदाराने नि.5/6 वर दाखल केलेल्या त्याच्या खाते क्रमांक 500163 च्या खाते उता-यावरुन दिनांक 10/09/2005, दिनांक 09/09/2006, दिनांक 12/09/2007, दिनांक 11/09/2008, दिनांक 09/09/2009 रोजी न्यु ईंडीया अश्युरंसला चेकव्दारे पैसे दिल्याचे सिध्द होते.अर्जदार विमा हप्ता भरुन झाल्यावर त्याचे कागदपत्र गैरअर्जदार क्रमांक 1 ला द्यायचा असे त्याचे शपथेवर सांगितलेले आहे. दिनांक 14/05/2009 ला गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराच्या खात्यातून गैरअर्जदार क्रमांक 2 ला रु.5074/- व दिनांक 07/05/2010 रोजी रु.4682/5 व रु.392/- दिलेले दिसतात ( नि.5/6) अर्जदाराने नि.21/1 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ला 12/09/2009 ते 11/09/2010 चा दुकानाचा विमा काढलेला आहे त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ने काढलेला विमा रद्द करावा अशी विनंती केलेली आहे.त्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 13/07/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 ला विनंती करुन अर्जदाराचा विमा रद्द करावा व प्रिमीयमचा अर्जदाराला परतावा द्यावा अशी विनंती केल्याचे नि.18/3 वरुन सिध्द होते. त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास नियमानुसार रु. 3277/- दिनांक 22/07/2010 रोजी परत केल्याचे अर्जदारास मान्य आहे.परंतु दिनांक 14/05/2009 रोजी अर्जदाराच्या खात्यातून वजा केलेल्या रु.5074/- चा काहीही परतावा बँकेने वा विमा कंपनीने अर्जदाराला दिलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या बँकेचेच धनादेश “ दि न्यु ईंडीया अश्युरंस कंपनीला ” दिलेले असतानाही गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराच्या खात्यातून गैरअर्जदार क्रमांक 2 ला विम्यासाठी पैसे देवुन अर्जदाराला त्रुटीची सेवा दिली आहे असे आम्हांस वाटते.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास दिनांक 14/05/2009 पासून रु.5,074/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने व दिनांक 07/05/2010 पासून रु.1,797/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावेत. 3 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास मानसिक त्रासाबद्दल रु.4,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |