निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 22/09/2010 तक्रार निकाल दिनांकः- 14/02/2011 कालावधी 04 महिने 23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. व्यंकट पिता लक्ष्मणराव डहाळे. अर्जदार वय 45 वर्षे.धंदा. अड.व्हि.एच.अडकिने. रा.त्रिमुर्ती नगर.परभणी ता.जि.परभणी. विरुध्द ब्रँच मॅनेजर. गैरअर्जदार. ओरियंटल इन्शुरन्स कं.लि. अड.ए.डी.गिरगांवकर. दौलत बिल्डींग. परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने टिप्पर (नो.क्र.-MH- 14-A5-7138) स्वंयरोजगारासाठी खरेदी केला होता.अर्जदाराने सदर टिप्परचा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलीसी कव्हरनोट क्रमांक 18200 3/31/2010/1267 अन्वये घेतला होता.त्या पॉलीसीची मुदत दिनांक 20/07/2009 ते दिनांक 19/07/2010 पर्यंत होती.दिनांक 11/01/2010 रोजी टिप्पर मधील मालचे Unloading करीत असताना कच्चा रस्ता असल्यामुळे टिप्परला अपघात झाला.सदर घटनेची माहिती गैरअर्जदाराला दिल्यानंतर गैरअर्जदार कंपनीच्या वतीने सर्व्हेअर श्री.विलास चंदन यांने क्षतीग्रस्त टिप्परचा सर्व्हे करुन सर्व्हे रिपोर्ट गैरर्जदार कंपनीकडे दाखल केला.अर्जदाराने विमाहमी पोटी क्षतीग्रस्त टिप्परची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार कंपनीकडे आवश्यक कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. अर्जदारने टिप्पर दुरुस्तीसाठी जॅकच्या खरेदीसह रक्कम रु.1,10,000/- चा खर्च आला.परंतु गैरअर्जदाराने फक्त रक्कम रु. 36000/- अर्जदारास देऊ केले. म्हणून अर्जदाराने हि तक्रार मंचा समोर दाखल करुन गैरर्जदारास क्षतीग्रस्त टिप्परच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,20,000/- अपघात तारखे पासून पूर्ण रक्कम देय होई पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने द्यावी.अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/9 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.12 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे टिप्परला अपघात झालेला आहे.तसेच गैरअर्जदाराने तज्ञाने दिलेल्या अहवालानुसार व बिलचेक रिपोर्ट नुसार अर्जदारास रक्कम रु. 36000/- द्यावयास गैरअर्जदार तयार होता, परंतु दुर्दैवाने अर्जदाराने ती रक्कम स्वीकारण्यास नकार दिलेला आहे.यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली असे मानता येणार नाही म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.13 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.15/1 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय काय ? होय. 2 अर्जदार कोणेती दाद मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा पमाणे.
कारणे मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराने स्वयंरोजगारासाठी टिप्पर खरेदी केला होता.त्याची पॉलीसी गैरअर्जदार विमा कंपनीकडून घेण्यात आली होती.दिनांक 11/01/2010 रोजी टिप्पर पलटी झाल्यामुळे अपघात झाला. क्षतीग्रस्त टिप्परची पॉलीसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन विमा दावा दाखल केला.टिप्पर दुरुस्तीसाठी रक्कम रु. 1,10,000/- चा खर्च अर्जदाराने केला होता. अर्जदाराला तेवढीच रक्कम गैरअर्जदाराकडून मिळणे अपेक्षीत होते, परंतु गैरअर्जदाराने फक्त रक्कम रु.36000/- देऊ केले अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर टिप्परला अपघात झाला.तसेच सर्व्हेअरच्या अहवालानुसार व बीलचेक रिपोर्ट प्रमाणे रक्कम रु. 36000/- अर्जदारास देण्यास गैरअर्जदाराने तयारी दर्शविली होती.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की, गैरअर्जदाराने देऊ केलेली उपरोक्त रक्कम योग्य होती काय ? यासाठी मंचासमोर नि.15/1 वर गैरअर्जदाराने सर्व्हे रिपोर्टची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे.त्याची पडताळणी केली असता सर्व्हेअर व लॉसअसेसर नितीन कळसेने क्षतीग्रस्त नुकसानीचे मुल्यांकन रक्कम रु. 47000.00 केलेले आहे. त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदारास उपरोक्त रक्कम द्यावयास काहीच हरकत नव्हती.परंतु गैरअर्जदाराने कोणत्याही ठोस आधारा शिवाय व अनावश्यक हेडखाली कपात दर्शवुन सर्व्हेअरने केलेल्या मुल्यांकना पेक्षा कमी रक्कम अर्जदारास देऊ केली.ही बाब नक्कीच गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याचे दर्शविते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. मुद्दा क्रमांक 2 अर्जदाराने क्षतीग्रस्त टिप्परच्या दुरुस्तीपोटी झालेला खर्च रक्कम रु. 1,10,000/- व इतर खर्च असे एकुण रक्कम रु. 1,20,000/- अपघात तारखेपासून 12 टक्के व्याज दराने द्यावी अशी मागणी तक्रार अर्जातून केली आहे.परंतु मंचाला अर्जदाराची मागणी मान्य करता येणार नाही.कारण टिप्पर हे 1997 चे मॉडेल आहे.तब्बल 12 ते 13 वर्षानंतर जेंव्हा वाहनाचे मुल्यांकन केले जाते तेव्हा घसारा मुल्याचाही विचार करणे गरजेचे असते.व वाहनाचे मुल्य वाहनाच्या वयानुसार ठरविण्यात यते.साधारणपणे वाहनाचे वय हे 10 वर्षापेक्षा जास्त असेलतर घसारा मुल्य हे 50 टक्क्यांपेक्षा जास्त असते.म्हणून सर्व्हेअरने क्षतीग्रस्त टिप्परचे केलेले मुल्यांकन योगय आहे.असे मंचाचे मत असल्यामुळे आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशत मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत रक्कम रु.47,000/-दिनांक 23/07/2010 पासून ते पूर्ण रक्कम देय होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजदराने द्यावी. 3 तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने मानसिकत्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रति मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |