निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 08/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/10/2011 कालावधी 05 महिने 11 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सिंधु भ्र.बालाजी मिसे. अर्जदार वय 28 वर्ष.धंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.मसनेरवाडी ता.गंगाखेड.जि.परभणी विरुध्द शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि.दुसरा मजला. अड.जी.एच.दोडिया. दयावान कॉम्पलेक्स.स्टेशन रोड परभणी. ता.जि.परभणी.431401 ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या मृत पतीच्या मोटार सायकलचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या मयत पतीची मोटारसायकल क्रमांक एम.एच.22 – एम./ 1190 होती व सदरील मोटार सायकलचा विमा गैरअर्जदाराकडून घेतला होता ज्याचा पॉलिसी क्रमांक 16911/डि 9 हा 06/01/2010 ते 05/01/11 या कालावधीसाठी होता.दिनांक 24/05/2010 रोजी अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाले अर्जदाराने आवश्यकत्या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे मोटार सायकल नुकसान भरपाईचा विमा दाखल केला, परंतु मोटारसायकलवर तीन प्रवासी असल्यामुळे मोटार सायकलचा क्लेम नामंजूर करण्यात आल्याचे गैरअर्जदाराने दिनांक 30/03/2011 रोजी अर्जदारास सांगीतले,परंतु मोटार सायकलला समोरुन येणा-या ट्रक क्रमांक एन.एच.—12 ए.9/2125 ने धडक दिल्यामुळे घटना घडलेली आहे.म्हणून विमा कंपनीने मोटारसायकलचा क्लेम न देवुन त्रुटीची सेवा दिलेली आहे.व अर्जदारास तक्रार दाखल करावयास कारण घडले आहे.अर्जदाराने सदरील तक्रार दाखल करुन मोटारसायकलची नुकसान भरपाई रु.50,000/- मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, विमा दावा फेटाळल्याचे पत्र, हे कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात मोटारसायकलवर बसण्याची क्षमता 2 जणांची असते,परंतु त्यावर 3 जण बसलेले होते.ज्यामुळे पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन झाले म्हणून गैरअर्जदाराने योग्य त्या कारणानेच विमा दावा फेटाळलेला आहे.अर्जदाराचा विमा योग्य कारणानेच फेटाळलेला असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही,म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, विमा पॉलिसी, दोषारोप अहवाल,बील चेक रिपोर्ट, मोटारसायकलचे रजिस्ट्रेशन इ. कागदपत्रे दाखल केले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र वकिलांच्या युक्तीवादा वरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराच्या मृत पतीच्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.22—एम./1190 चा गैरअर्जदाराकडून विमा क्रमांक 230601/31/09/01/00016911 दिनांक 06/01/2010 ते दिनांक 05/01/2011 या कालावधीसाठी घेतलेला होता.ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या पतीच्या मोटार सायकलचा अपघात ट्रकने धडक दिल्यामुळे झाला हे नि.17/2 वरील पोलिसांच्या आरोप पत्रावरुन सिध्द होते. अर्जदाराने मोटारसायकलच्या नुकसान भरपाईचा दाखल केलेला विमादावा गैरअर्जदाराने फेटाळला (नि.5/1) कारण अपघाताच्या वेळी अर्जदाराच्या मोटारसायकलवर 3 जण बसलेले होते.व त्यामुळे पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन झाले,परंतु सदरील तक्रारीत दाखल नि.17/1 वरील मोटारसायकलच्या पॉलिसीमध्ये पॉलिसी कंडीशनचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. तसेच अर्जदाराचा अपघात हा मोटारसायकलवर 3 जण होते म्हणून झाला असाही पुरावा तक्रारीत दाखल नाही.तर अपघातग्रस्त मोटारसायकलला ट्रक क्रमांक MH – 12-AQ-3125 च्या ड्रायव्हरने ट्रक भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवुन धडक दिली व त्यात मोटारसायकल चालकाचा मृत्यु झाले असे नि.17/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.म्हणून अर्जदाराच्या पतीच्या मोटारसायकलचा विमादावा फेटाळून गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत मोटारसायकलची नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी अशी मागणी केलेली आहे,परंतु नि.17/4 वरील सर्व्हेअरच्या बीलचेक रिपोर्ट प्रमाणे रु.23,088/- होते.म्हणून खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदारास गैरअर्जदाराने निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत रु.23,088/-दिनांक 01/09/2010 पासून संपूर्ण रक्कम देय होई पर्यंत द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेच्या त्रुटीबद्दल रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,500/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |