निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 23/09/2010 तक्रार नोदणी दिनांकः-24/09/2010 तक्रार निकाल दिनांकः-29/01/2011 कालावधी 04 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. कल्याण पिता शंकरराव काळे अर्जदार वय 32 वर्षे धंदा व्यापार रा.एरंडेश्वर, अड.मुजाहिद ता.जि.परभणी. --विरुध्द – शाखा व्यवस्थापक गैरअर्जदार ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी , अड.बि.ए.मोदानी दौलत बिल्डींग शिवाजी चौक, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या. ) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रूटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे अर्जदाराच्या जाती मालकीच्या जीप क्रमांक एम.एच.26 सी 4995 विमा गैरअर्जदाराकडून घेतला होता. दिनांक 02.07.2008 रोजी परभणीकडून बसमतकडे जात असताना नवोदय विद्यालयाच्या जवळ जिपचे मागील डाव्याबाजूचे टायर फुटल्याने जिप पलटी झाली. या अपघातात जिपमधील प्रवासी जख्मी झाले व जिपचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले. क्षतीग्रस्त वाहनाची पॉलीसी हमीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन गैरअर्जदाराकडे दावा दाखल केला. दिनांक 09.04.2009 रोजी सदर वाहनातून प्रवास करणा-या प्रवाश्याकडून अर्जदाराने भाडे घेतल्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उललघन झाल्याच्या कारणासतव गैरअर्जदाराने दावा फेटाळला. वास्तविक पाहता सदरील वाहनामध्ये प्रवास करणारे प्रवाशी अर्जदाराच्या परीचयाचे होते त्यामुळे त्याच्याकडून भाडे घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कोणत्याही सबळ कारणाशिवाय गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फेटाळल्यामुळे अर्जदाराने तक्रार अर्ज मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 35000/- शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 10000/- व तक्रारीच्या खर्चाबद्यल रक्कम रुपये 5000/- द.सा.द.शे 12 % व्याज दराने अर्जदारास द्यावे अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) दाखल केले आहे. पुराव्यातील कागदपत्रात नि.6/1 ते नि. 6/7 मंचासमोर दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटिस पाठविल्यावर तारीख 16/12/2010 रोजी गैरअर्जदारातर्फे (नि.13) वर लेखी जबाब दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराची जिप एम.एच.26. सी-4995 चा गैरअर्जदाराकडून काढलेला विमा हा खाजगी जिप साठीचा होता व आहे. अर्जदाराच्या सदर वाहनाचा अपघात झाल्यानंतर अर्जदाराने घटनेच्या दुस-या दिवशी गैरअर्जदार विमा कंपनीस कळविल्यानंतर गेरअर्जदाराने सर्व्हेअर श्री. एस.जी. परळीकर याची नेमणूक केली. सर्व्हेअरने घटनास्थळावर जाउन अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन अहवाल गैरअर्जदाराकडे दाखल केला. तदनंतर सर्व्हेअर विलास आर चंदन याने शेवटचा सर्व्हेरिपोर्ट व बिल चेक रिपोर्ट गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. पुढे गैरअर्जदार विमा कंपनीच्या चौकशी अधिका-याने वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करुन पोलीस तपासाची कागदपत्रे व त्या गाडीतील प्रवाशाचा जबाब नोंदविला. या सर्व कागदपत्रावरुन गैरअर्जदाराचा असे निदर्शनास आले की, अपघाताच्या वेळी सदर वाहनातून अवैध प्रवाशाची वाहतूक होत होती. पुढे सर्व्हेअरच्या बिल चेक रिपोर्टप्रमाणे क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्याकन फक्त रक्कम रुपये 24000/- केले आहे परंतू अर्जदाराचे पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लघन केल्यामुळे उपरोक्त रक्कम देण्यास गैरअर्जदार विमा कंपनी बाधील नाही म्हणून योग्य कारणास्तव अर्जदाराचा क्लेम फेटाळण्यात आलेला आह. तसेच गैरअर्जदाराने कायदेशीर मुद्या असा उपस्थित केला आहे की, अर्जदाराच्या कथनाप्रमाणे वाहनास अपघात दिनांक 02.07.2008 रोजी झाला आहे व अर्जदाराने सदरील दावा अपघात तारखेपासून दोन वर्षानंतर दाखल केलेला असल्यामुळे तो मुदत बाहय आहे. म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज रक्कम रुपये 10,000/- च्या नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि. 14 आणि पुराव्यातील कागदपत्राने नि. 16/1 ते नि. 16/3 मंचासमोर दाखल केली आहेत. दोन्ही पक्षाच्या कैफीयतीवरुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराचा वाद मुदत बाहय आहे काय ? नाही 2 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय 3 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 गैरअर्जदाराने कायदेशीर मुद्या असा उपस्थित केला आहे की, सदर वाहनास अपघात हा दिनांक 02.07.2008 रोजी झालेला आहे. त्यामुळे त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीनुसार अपघातातारखेपासून दोन वर्षाच्या आत म्हणजे दिनांक 02.07.2010 पर्यंत दाखल करणे आवश्यक होते परंतू अर्जदाराने सदरचा वाद दोन वर्षानंतर दाखल केलेला असल्यामुळे तो मुदतबाहय आहे. या मुद्याचा सविस्तरपणे उहापोह करणे गरजेच आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24 अ प्रमाणे तक्रारीस कारण Cause of action घडल्यापासून दोन वर्षाच्या आत मंचासमोर तक्रार दाखल करावी लागते. या प्रसंगी Cause of action म्हणजे नेमके काय आहे हे पाहणे गरजेचे आहे Cause of actionGenerally it is described as bundle of facts which it proved or admitted entitle the plaintiff to the relief prayed for Cause of action for which suit is brought Cause of action is Cause of action which gives occasion for and forms the foundation of the suit. सदील प्रकरणात गैरअर्जदाराने दिनांक 09.04.2009 रोजी च्या पत्राव्दारे ( नि. 6/1 ) अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. Limitation ची सुरुवात दिनांक 09.04.2009 पासून होते व अर्जदाराने तक्रार दिनांक 23.09.2010 रोजी दाखल केलेली असल्यामुळे ती निश्चीतपणे मुदतीत आहे म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले. मुद्दा क्रमांक 2 व 3 अर्जदाराने त्याच्या जाती मालकीच्या जिप क्रमांक एम.एच.26 सी 4995 चा दिनांक 08.11.2007 ते 07.11.2008 या कालावधीसाठी विमा गैरअर्जदाराकडून घेतला होता. सदर वाहनाला दिनांक 02.07.2008 रोजी परभणीहून बसमतकडे जाताना अपघात झाला. क्षतीग्रस्त वाहनाची पॉलीसी हमीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन गैरअर्जदाराकडे विमा दाखल केला असता सदर वाहनातून प्रवाशाची बेकायदेशीररित्या वाहतूक केल्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लघन झालेच्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदाराने नाकारला अशी धोडक्यात अर्जदाराची तक्रार अहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर वाहनातून प्रवाशची अवैध वाहतूक होत असल्याचे पोलीस तपासाची कागदपत्रे व वाहनातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाच्या जबाबातून शाबीत झाल्याने पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग अर्जदाराने केलेला आहे म्हणून योग्य कारणास्तव अर्जदाराचा क्लेम फेटाळलेला आहे. निर्णयासाठी महत्वाचा मुद्या असा उपस्थित होतो की, सदर वाहनातून अवैध प्रवाशाची वाहतूक होत असल्याचे गैरअर्जदाराने ठोस रित्या मंचासमोर शाबीत केले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल कारण गैरअर्जदाराने लेखी निवेदनात नि. 13 मधील पॅरा क्रमांक 8 मध्ये असे नमूद केले आहे की, गेरअर्जदाराने नेमलेल्या चौकशी अधिका-याच्या अहवालातून उपरोक्त बाब सिध्द होते परंतू गैरअर्जदाराने चौकशी अधिका-याचा अहवाल मंचासमोर दाखल करण्याची तसदी घेतलेली दिसत नाही पुढे अर्जदाराने घटनास्थळ पंचनाम्याची व पहिली खबर ची झेरॉक्स प्रत अनुक्रमे नि. 6/5 व नि. 6/4 वर लावली आहे त्या प्रतीचे पडताळणी केली असता फक्त सौ. सुमनबाई गोरे य महिलेचा जबाब घेतल्याचे दिसते तिने तिच्या जबाबात क्षतीग्रस्त वाहन हे काळीपिवळी जिप असल्याचे म्हटले आहे. ( नि. 6/4 ) वर घटनास्थळ पंचनामा (नि. 6/5) मध्ये सदर वाहन हे पांढ-या रंगाची मार्शल कंपनीची जीप असल्याचे नमूद केले आहे. पुढे गैरअर्जदाराचे सदर वाहनातून आणखी कोणत्या प्रवाश्याची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट केले नाही तसेच त्याचे जबाब नोंदविलेले दिसत नाही त्यामुळे गैरअर्जदाराने घेतलेला बचाव तकलादू व आधारहीन असल्याचे मानावे लागेल विनाकारण अर्जदाराचा वाजवी क्लेम गैरअर्जदाराने नामंजूर करुन त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाल्यामुळे मुद्या क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. आता फक्त मुद्या उरतो तो, अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे एवढाच. अर्जदाराने तक्रार अर्जातून रक्कम रुपये 35000/- ची नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे गैरअर्जदाराने सर्व्हेअर विलास चंदन याचा अंतिम अहवाल व बिल चेक रिपोर्ट च्या मुळ प्रती अनुक्रमे नि. 16/2 व नि. 16/3 वर मंचासमोर दाखल केले आहेत. त्यानुसार क्षतीग्रस्त वाहनाचे नुकसानीचे मुल्याकन हे रक्कम रुपये 28737/- व सालव्हेज व्हेल्यू रक्कम रुपये 700/- ठरविण्यात आले आहे व तज्ञाचा रिपोर्ट म्हणून सर्व्हेअरने क्षतीग्रस्त वाहनाचे केलेले मुल्याकनाप्रमाणे अर्जदारास नुकसान भरपाई देणे न्यायसंगत होइल म्हणून रक्कम रुपये 28737/- मधून सालर्व्हेज व्हल्यू रक्कम रुपये 700/- वजा जाता ( रक्कम रुपये 28737/- -- रुपये 700/- रक्कम ) = रुपये 28037/- अर्जदारास मंजूर करण्यात येउन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत अर्जदारास क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 28037/- दिनांक 09.04.2009 पासून पूर्ण रक्कम पदरी पडेपर्यत द.सा.द.शे. 9 % व्याजदराने दयावी. 3 तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत दयावा. . 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |