निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 16/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 18/11/2010 तक्रार निकाल दिनांकः- 21/03/2011 कालावधी 04 महिन 03 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. रावसाहेब पिता विश्वनाथ बल्लाळ अर्जदार वय. 30 वर्षे. धंदा.अटो चालक मालक ( अड.जे.बी.गिरी.) रा.ससपूर जवळा,ता.जि.परभणी. विरुध्द शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. (अड.बी.ए.मोदानी.) शाखा दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा वाहन क्रमांक एम.एच. 44 – ए-5160 चा मालक ताबेदार आहे.त्याने गैरअर्जदाराकडून सदरील वाहनाचा विमा पॉलिसी क्रमांक 182003/31/2009/4400 दिनांक 28/02/2009 ते दिनांक 27/02/2010 या कालावधीसाठी उतरविला होता. सदर वाहनाचा दिनांक 10/11/2009 रोजी परभणी गंगाखेड रोडवरील सिंगणापूर शिवारा मध्ये अपघात झाला.तदनंतर अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास दिली. तसेच पोलिस स्टेशन दैठणा यांनी ही गुन्हा क्रमांक 91/2009 दिनांक 10/11/2009 रोजी कलम 279, 337, 427, I.P.C. अन्वये गुन्हा नोंदविला. पुढे अपघाताची माहिती गैरअर्जदारास कळवुन देखील त्याने सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअर नेमण्याची तसदी घेतली नाही.त्यामुळे अर्जदाराने पुन्हा दिनांक 26/11/2009 रोजी गैरअर्जदारास पत्राव्दारे सर्व्हेअर नेमण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदाराकडून त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे अर्जदाराने प्रतिक्षा करुन त्याचा अटो दुरुस्त करुन घेतला.त्यासाठी त्याला एकुण रक्कम रु.1,00,000/- चा खर्च करावा लागला.अर्जदाराने योग्य त्या कागदपत्रासह स्वतः गैरअर्जदाराच्या कार्यालयात जावुन विलंब झाल्या बाबतचे स्पष्टीकरण दाखल करण्यासाठी दिनांक 15/12/2009 रोजी गेला असता गैरअर्जदाराने म्हणणे दाखल करुन घेतले नाही म्हणून शेवटी अर्जदाराने गैरअर्जदारास रजिस्टर्ड पोस्टाव्दारे लेखी स्पष्टीकरण द्यावे लागले.सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील गैरर्जदाराने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 1,00,000/- 18 टक्के व्याजदराने द्यावे तसेच शारिरीक मानसिकत्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- द्यावे. अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि.5/15 व नि.18/1 ते नि.18/7 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदार विमा कंपनीस तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.10 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने अपघाताची सुचना दिनांक 26/11/2009 रोजी दिली.गैरअर्जदाराने दिनांक 27/11/2009 रोजीच्या पत्राव्दारे या विलंबा बद्दल लेखी स्वरुपात खुलासा मागविला अर्जदाराने दिनांक 15/12/2009 रोजी झालेल्या विलंबा बाबतचा खुलासा पत्राव्दारे केला. व गैरअर्जदारांच्या परभणी येथील शाखा व्यवस्थापकास त्याने अपघातग्रस्त वाहन सर्व्हे करण्यापूर्वीच आपल्या जबाबदारीवर दुरुस्त करुन घेतल्याचे सांगितल्यामुळे विमा कंपनीवर क्लेम मंजूर करण्याची जबाबदारी येत नाही. तरी सुध्दा गैरअर्जदाराने त्याची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी एस.वे.चव्हाण यांची नेमणुक केली त्याने चौकशी करुन अहवाल गैरअर्जदाराकडे दाखल केला.चौकशी अहवाला नुसार अर्जदाराने सई गॅरेज कडून फक्त इस्टीमेट घेवुन गेल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याने साई गॅरेज मधून सदरील अटो दुरुस्त करुन घेतला नाही किंवा त्याने दुरुस्तीचे बिल हि दिलेले नाही फक्त इस्टीमेंट दाखल करुन व अटोची दुरुस्ती न करता विमा कंपनीकडून पैसे मिळविण्यासाठी क्लेम दाखल केल्याचे दिसत आहे.त्यामुळे विमा कंपनीने दिनांक 17/12/2009 रोजी अर्जदारास त्याची क्लेम फाईल क्लेम नाही म्हणून बंद करण्यात येत असल्याचे पंजीकृत पत्र पाठविले,परंतु अर्जदाराने ते पत्र घेण्यास इन्कार केला.तदनंतर अर्जदाराने नि. 01/08/2010 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठविली. त्या नोटीसीला गैरअर्जदाराने दिनांक 03/08/2010 रोजी उत्तर दिलेले आहे. तसेच अपघाताच्या वेळी सदर वाहनातून अवैध प्रवाशाची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे पुढे अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पुर्तता केलेली नाही म्हणून वरील कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज रक्कम रु. 10,000/- च्या नुकसान भरपाई रक्कमेसह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.11 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.13/1 ते नि. 13/4 मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन 1करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणुक न करुन कर्तव्यात कसूर 1केली आहे काय ? होय. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने पॅजो अटो नोंदणी क्रमांक एम.एस.-44 A –5160 चा 28/02/2009 ते दिनांक 27/02/2010 या कालावधीसाठी गैरअर्जदार विमा कंपनीकडून उतरविला होता.दिनांक 10/11/2009 रोजी सदर वाहनास अपघात झाला.तदनंतर गैरअर्जदारास सदर अपघाताची माहिती कळविल्यानंतर देखील त्याने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणुक केली नाही म्हणून शेवटी अर्जदारास स्वतःच सदर वाहनाची दुरुस्ती करुन घ्यावी लगाली त्यासाठी त्याला रक्कम रु.100,000/- चा खर्च आला पुढे आवश्यक कागदपत्रासह व गैरअर्जदाराने विचारलेल्या विलंबा बाबतचा खुलासा अर्जदाराने स्वतः गैरअर्जदाराच्या कार्यालयात जावुन करण्याचा प्रयत्न केला,परंतु गैरअर्जदाराने त्याचे म्हणणे ऐकुन घेतले नाही म्हणून त्याने रजि.पोस्टाव्दारे गैरअर्जदाराकडे त्याचा खुलासा पाठवावा लागला. आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन देखील गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम अर्जदारास दिलेली नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.निर्णयासाठी मुद्दा असा आहे की, गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सर्व्हेअर नेमण्याची गरज होती काय ? याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल मंचासमोर दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन ( नि.5/15) अर्जदाराने दिनांक 20/11/2009 ला लेखी सुचनाव्दारे सदर अपघाताची माहिती गैरअर्जदारास कळविली होते व ही बाब गैरअर्जदाराने स्वतःच मान्य केलेली असल्यामुळे दिनांक 26/11/2009 पर्यंत अर्जदाराने अपघाताची सुचना दिलेली नव्हती हे गैरअर्जदाराचे म्हणणे मान्य करता येणार नाही.दिनांक 26/11/2009 ला ( नि.5/3) अर्जदाराने गैरअर्जदारास पत्र पाठवुन पुन्हा सर्व्हेअर नेमण्याची विनंती केलेली दिसते.त्यावर गैरअर्जदाराने सर्व्हे करण्यासाठी औरंगाबाद ऑफिसला कळविल्याचे व सर्व्हेअर नेमणुक होवुन सर्व्हे होई पर्यंत गाडीचे काम न करण्याची सुचना गैरअर्जदाराने अर्जदारास दिल्याचे दिसते,परंतु त्यानंतरही गैरअर्जदाराने सर्व्हेअरची नेमणुक केल्याचे दिसत नाही. वास्तविक पाहता गैरअर्जदाराने क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी त्वरित सर्व्हेअर नेमण्याची गरज होती.अर्जदाराने अपघाताची माहिती कळविण्यास झालेल्या विलंबाबाबतचा खुलासा गैरअर्जदारास दिलेला होता त्या संदर्भात उदार दृष्टीकोनातून गैरअर्जदाराने अर्जदाराची विनंतीचा स्विकार करुन सर्व्हेअरची लवकरात लवकर नेमणुक करावयास हवी होती असे मंचास वाटते सदर वाहनास अपघात पॉलिसीच्या कालावधीमध्ये झाल्याचे कागदोपत्री शाबीत झालेले असतांना फक्त तांत्रिक कारणामुळे पॉलिसी धारकाची अडवणुक करणे उचित होणार नाही.गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, अर्जदाराने सर्व्हे करण्या आधीच सदर वाहनाची दुरुस्ती स्वतःच्या जबाबदारीवर करुन घेतल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम देण्यास गैरअर्जदार बांधील नाही,परंतु या बाबतचा ठोस पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही,उलटपक्षी अर्जदाराने शपथपत्राव्दारे गैरअर्जदाराचे म्हणणे अमान्य केलेले आहे.(नि.18/7) म्हणून गैरअर्जदाराचा हा बचाव देखील ग्राह्य धरण्याजोगा नाही.पुढे गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, अर्जदाराने आवश्यक कागदपत्राची पुर्तता केलेली नाही,परंतु मंचासमोर अर्जदाराने कागदपत्र दाखल केलेली आहे.तसेच दिनांक 26/11/2009 च्या पत्रात ही ( नि.5/3) अर्जदाराने आवर्जुन सर्व कागदपत्र गैरअर्जदाराकडे दाखल केल्याचे नमुद केलेले आहे.म्हणजे गैरअर्जदाराचा हा ही बचाव निष्फळ ठरतो.पुढे अपघाताच्या वेळी सदर वाहनातून अवैध प्रवाशांची वाहतुक होत असल्याचे गैरअर्जदारास ठोसरित्या शाबीत करता आलेले नाही,तसेच अर्जदाराने सुध्दा सदर वाहनाची पाहणी करण्यासाठी ते कुठे ठेवण्यात आले आहे ? किंवा साध्य परिस्थिती काय आहे ? या संदर्भातील योग्य माहिती गैरअर्जदारास द्यावयास हवी होती असेही मंचास वाटते म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. च्2 अर्जदाराने आदेश कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत वाहन दुरुस्तीचे बील गैरअर्जदाराकडे दाखल करावीत व गैरअर्जदाराने दुरुस्तीचे बील मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत बील चेक रिपोर्ट नुसार अर्जदाराचा क्लेम मंजूर करुन क्षतीग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईची रक्कम अर्जदारास द्यावी. 3 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सा.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |