निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03.08.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05.08.2010 तक्रार निकाल दिनांकः- 20.12.2010 कालावधी 4महिने15 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. प्रकरण क्रमांक 182/2010, 183/2010 आणि 184/2010 1 भिमराव पिता गणाजी डाढाळे अर्जदार- तक्रार क्रमांक182/2010 वय 50 वर्षे धंदा लेबर रा.पार्डी (खु) , ता.वसमत जि.परभणी 2 दत्ताबुआ पिता रामबुआ पुरी अर्जदार- तक्रार क्रमांक183/2010 वय 55 वर्षे धंदा लेबर रा.पार्डी (खु), ता.वसमत जि.परभणी 3 कुंडलिक पिता मारोती नरवाडे अर्जदार- तक्रार क्रमांक184/2010 वय 45 वर्षे धंदा लेबर रा.पार्डी (खु) , ता.वसमत जि.परभणी ( सर्व अर्जदारातर्फे अड आर.जी.जाधव ) विरुध्द 1 शाखा प्रबंधक गैरअर्जदार ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड , अड ए.डी.गिरगांवकर शाखा दौलत बिल्डींग शिवाजी चौक, परभणी. 2 मुख्याध्यापक स्वतः जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पार्डी (खु), ता.वसमत जि.परभणी. कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्य ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. अनिता ओस्तवाल सदस्या ) गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी त्रूटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारानी प्रसतूतच्या तक्रारी दाखल केल्या आहत. वरील सर्व प्रकरणातील अर्जदार पार्डी (खु) ता.वसमत जि.परभणी येथील रहिवासी आहेत. या सर्व प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 एकसमान आहेत. तसेच वादाचा विषय व मागणी सुध्दा समान असल्यामुळे या सर्व प्रकरणाचा संयुक्त निकालपत्रा व्दारे निर्णय देण्यात येत आहे. अर्जदारांच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. तक्रार अर्ज क्रमांक 182/2010 मध्ये अर्जदाराचा मुलगा कु. गंगाधर भिमराव डाढाळे हयाचा दिनांक 14.02.2009 रोजी मौजे पार्डी (खु) येथे साप चावल्यामुळे मृत्यू झाला. तक्रार अर्ज क्रमांक 183/2010 मध्ये अर्जदाराचा मुलगा कु. बद्रीनाथ दत्ताबुआ पुरी हयाचा दिनांक 26.08.2009 रोजी मौजे पार्डी (खु) येथे पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. तक्रार अर्ज क्रमांक 184/2010 मध्ये अर्जदाराचा मुलगा कु. आकाश कंडलिक नरवाडे हयाचा दिनांक 26.08.2009 रोजी मौजे पार्डी (खु) येथे पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. सर्व अर्जदारांचे पाल्य राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजने अंतर्गत लाभार्थी होते त्याच्या मृत्यू नंतर सदर योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत क्लेम व आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केली असता . गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी संगनमत करुन अर्जदारास विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली म्हणून अर्जदारांनी मंचासमोर तक्रारी दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी संयुक्तीकरीत्या प्रत्येक अर्जदाराना मानसिक , शारीरीक त्रासापोटी व्याजासह रक्कम रुपये 60,000/- दयावी अशी मागणी मंचासमोर केली आहे. प्रकरण क्रमांक 182/2010 मधील अर्जदाराचे तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि. 5/7. प्रकरण क्रमांक 183/2010 मधील अर्जदाराचे तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि. 5/11 तर प्रकरण क्रमांक 184/2010 मधील अर्जदाराचे तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.5/1 ते नि. 5/9 वर मंचासमोर दाखल केले आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ला तामील झाल्यानंतर त्यानी प्रकरण क्रमांक 182/2010 मध्ये लेखी निवेदन अनुक्रमे नि. 11 व नि. 12 वर, प्रकरण क्रमांक 183/2010 मध्ये लेखी निवेन अनुक्रमे नि. 11 व नि. 12 वर व प्रकरण क्रमांक 184/2010 मध्ये लेखी निवेन अनुक्रमे नि. 16 व नि. 12 वर व दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्रमाक 2 चे म्हणणे असे की, त्याने सदर योजनेची माहिती अर्जदाराना देउन विमा दावा मिळण्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्राची पूर्तता तत्परतेने करुन पंचायत समिती वसमत येथे प्रस्ताव दाखल केला होता यात कसलाही हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा त्याच्याकडून झालेला नाही. तकार अर्ज क्रमांक 182/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुराव्यातील कागदपत्र नि. 13/1 ते नि. 13/6 वर व शपथपत्र नि. 14 वर दाखल केले. तकार अर्ज क्रमांक 183/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुराव्यातील कागदपत्र नि. 13/1 ते नि. 13/5 वर व शपथपत्र नि. 15 वर दाखल केले. तकार अर्ज क्रमांक 184/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने पुराव्यातील कागदपत्र नि. 13/1 ते नि. 13/6 वर व शपथपत्र नि. 14 वर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, महाराष्ट्र शासनाशी फक्त दिनांक 26.08.2008 पर्यंतच करार झालेला असल्यामुळे त्या नंतरची प्रकरणे हाताळण्याचा अधिकार गैरअर्जदार क्रमांक 1 ला देण्यात आलेला नसल्यामुळे या सर्व प्रकरणात विमा दाव्याची रक्कम देण्यास तो बांधील नाही तसेच पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार अर्जदारानी घटना घडल्यापासून 7 दिवसाच्या आत कागदपत्राची पूर्तता अर्जदारानी केलेली नाही म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने केली मंचासमोर केली आहे. तकार अर्ज क्रमांक 182/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 15 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 17/1 वर तकार अर्ज क्रमांक 183/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 14 वर. व पुराव्यातील कागदपत्र नि. 17/1 वर. तकार अर्ज क्रमांक 184/2010 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 17 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 19/1 वर मचासमोर दाखल केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफीयतीवरुन खालील मुद्ये उपस्थित होतात. . मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदारानी त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- प्रकरण क्रमांक 182/2010, 193/2010 व 184/2010 मधील अर्जदाराचे पाल्य राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थी होते. त्याचा मृत्यू झाल्यानंतर अर्जदारानी विमा दाव्याची रककम मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली परंतू गैरअर्जदाराने विमा दाव्याची रककम देण्यास टाळाटाळ केली अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर त्याने त्वरीत प्रस्ताव पंचायत समिती वसमत येथे पाठवून दिला होता त्यात कसलाही हलगर्जीपणा झालेला नाही तर गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, त्याचा महाराष्ट्र शासनाशी झालेल्या कराराची मुदत दिनांक 26.08.2008 रोजी समाप्त झाल्यामुळे तदनंतरच्या प्रकरणे हातळण्याचा अधिकार त्याचा नाही. तसेच अर्जदारानी 7 दिवसाच्या आत कागदपत्र दाखल केलेली नाही व अद्याप ही मागणी करुनही कागदपत्राची पूर्तता अर्जदारानी केलेली नाही यावर मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ने घेतलेली भुमिका विसंगत आहे. एकीकडे करार समाप्त झाल्यामुळे या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा बचाव त्याने घेतला आहे तर त्याच वेळी अर्जदाराने 7 दिवसाच्या आत कागदपत्राची पूर्तता केली नाही व मागणी केलेल्या कागदपत्राची पूर्तता अद्याप ही केली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे व अर्जदारांना पत्र पाठवून कागदपत्राची पूर्तता करण्याविषयीची सुचना ही गैरअर्जदाराने केल्याचे स्पष्ट होते यावरुन गैरअर्जदाराचा गोंधळ उडालेला दिसतो जर त्याचा या प्रकरणाशी संबंध नव्हता तर त्याने स्पष्ट शब्दात अर्जदारस तसे कळावयास हवे होते व मंचासमोर ही हीच बाब प्रकर्षाने मांडावयास हवी होती परंतू गैरअर्जदाराने घेतलेली भुमिका नरो या कुंजरोवा या प्रकारची दिसते. त्यामुळे त्याने विनाकारण अर्जदाराचा क्लेम प्रलंबित ठेवला असे मंचाचे मत आहे. तसेच योग्य त्या विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करावयाची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 ची होती हे ही याप्रसंगी नाकारता येणार नाही म्हणून वरील सर्व विवेचनावरुन गैरअर्जदारानी त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाल्यामुळे मुद्या क्रमांक 1 उत्तर होकारार्थी देवून आम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत. आदेश 1 अर्जदारांची तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 याने निकाल कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रकरण क्रमांक 182/2010, 183/2010, 184/2010 मधील प्रत्येक अर्जदारांना मानसिक त्रासापोटी तक्रारीच्या खर्चापोटी एकूण रक्कम रुपये 1000/- व गैरअर्जदार क्रमांक 2 याने सेवा त्रूटीपोटी सदर प्रकरणातील प्रत्येक अर्जदाराना रक्कम रुपये 500/- आदेश मुदतीत द्यावी. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष. वरील सदस्याने दिलेल्या निकालांशी मी सहमत नाही. माझे स्वतंत्र निकालपत्र मी देत आहे. सौ.सुजाता जोशी सदस्या जिल्हा ग्राहक मंच, परभणी कारणे मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदारानी त्रूटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- वरील तिन्ही प्रकरणातील अर्जदारांनी त्यांच्या मुलांचे अपघाती निधनाची राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 ओरींएटल इन्शुरन्स कंपनी आणि गैरअर्जदार क्रमांक 2 मुख्याध्यापक जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पार्डी ( खु) यांचेविरुध्द दाद मागितलेली आहे. अर्जदाराने मुलांचा अपघाती मृत्यू झाला होता हे शाबीत करण्यासाठी पुराव्यात नि.5 लगत घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, मृत्यूचा दाखला दाखल केलेला आहे गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतच्या तक्रारी दाखल केल्यावर विमा कंपनीतर्फे जे लेखी म्हणणे (नि.16) सादर केले आहे त्यामध्ये त्यानी असे स्पष्ट नमूद केले आहे की, अर्जदाराचा मृत्यू ज्या तारखेस झाला त्या कालावधीची त्यांच्याकडे शासनाने विमा उतरविलेला नव्हता. त्या अगोदर त्यांच्याकडून उतरविलेला विमा पॉलीसीची मुदत दिनांक 27.10.2007 ते 26.08.2008 या कालावधीचा होता परतू मुदती नंतर त्यांच्याकडून विमा पॉलीसी पुर्नजिवीत केलेली नाही. अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू पॉलीसी मुदत संपल्यानंतर म्हणजेच दिनांक 14.02.2009 व 26.08.2009 या दरम्यान झालेला आहे. पॉलीसी मुदती नंतर एक वर्षानी घटना घडली असल्यामुळे आणि गैरअर्जदार विमा कंपनीकडून त्या मुदतीची पॉलीसी उतरवलेली नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार विमा कंपनी जबाबदार नाही. विमा कंपनीतर्फे पुराव्यात नि. 19/1 वर दाखल केलेली पॉलीसी शेडयूल चे अवलोकन केले असता विमा कंपनीने घेतलेल्या बचावास दुजारा मिळतो. गैरअर्जदार क्रमांक 2 ने विद्यार्थ्याचे क्लेम फॉर्म घटना घडल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 मुख्याध्यापक यानी नियमाप्रमाणे पंचायत समिती कडे पाठविला असला तरी पाठविण्यापूर्वी त्यानी विद्यार्थी सुरक्षा योजनेची पॉलीसी नेमक्या कुठल्या कंपनीची आहे याची खात्री करुन घेणे आवश्यक होते तशी खाली करुन घेतलेली दिसत नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या तीन क्लेमची जबाबदारी मुळातच गैरअर्जदार क्रमांक 1 या विमा कंपनीची येवू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून नुकसान भरपाई देण्याचे बाबतीत सेवा त्रूटी झाली होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने चुकीच्या विरुध्द पक्षकाराना पार्टी केले आहे तसेच विमा कंपनीने या संदर्भात लेखी जबाबात स्पष्ट खुलासा केल्यानंतरही अर्जदारानी योग्य त्या विमा कंपनीविरुध्द दाद मागण्यासाठी प्रकरणात आवश्यक त्या स्टेप्स घेतलेल्या नाहीत हे पुराव्यातून स्पष्ट दिसते त्यामुळे त्यानी तक्रार अर्जातून मागणी केलेला अनुतोष देता येणार नाही सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. आदेश 1 अर्जदारांची तक्रार क्रमांक 182/2010, 183/2010, 184/2010 फेटाळण्यात येत आहे. 2 निकालाची मुळ प्रत प्रकरण क्रमांक 182/2010 मध्ये ठेवावी व छायाप्रती इतर प्रकरणात ठेवाव्या. 3 संबंधीताना आदेशाच्या मोफत प्रती पुरावाव्यात. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |