Maharashtra

Jalna

CC/25/2012

Anjanabai Shivaji Pandit - Complainant(s)

Versus

Branch Manager,New India Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

Adv.R.V.Jadhav

18 Sep 2012

ORDER

 
CC NO. 25 Of 2012
 
1. Anjanabai Shivaji Pandit
At-Janefal Pandit,Tq-Jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,New India Insurance Co.Ltd
Lakdcoat,Bus stand,Jalna
Jalna
Maharashtra
2. Branch manager,Deccan Insurance And Reinsurance Broking Pvt.Ltd
6,Farkade Building,Bhanudas Nager,behind Big Bazar,Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:Adv.R.V.Jadhav, Advocate for the Complainant 1
 
अड.संदीप देशपांडे
......for the Opp. Party
ORDER

 

(घोषित दि. 18.09.2012 व्‍दारा श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)
      तक्रारदारांचे पती श्री.शिवाजी सखाराम पंडीत हे शेतकरी असून दिनांक 21.12.2010 रोजी त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाला. सदर अपघाता बाबतची माहीती जाफ्रबाद पोलीस स्‍टेशनला दिल्‍यानंतर पोलीसांनी घटनास्‍थळ पंचनामा, एफ.आय.आर ची नोंद केली. मयत व्‍यक्‍तीचे प्रेत पोस्‍टमार्टमसाठी घाटी रुग्‍णालय औरंगाबाद येथे पाठवले त्‍यानंतर संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी पोस्‍टमार्टम अहवाल दिला.
      तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव तहसील कार्यालय यांचेकडे दिनांक 03.02.2011 रोजी व वकीला मार्फत दिनांक 25.02.2012 रोजी गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे पाठवला. परंतू विलंबाच्‍या कारणास्‍ताव गैरअर्जदार यांनी विमा प्रस्‍ताव नामंजूर केला.
      सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 विमा कंपनी हजर झालेली असून लेखी म्‍हणणे दिनांक 25.06.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार 1 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यानूसार तक्रारदारांनी सदर प्रस्‍ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे दिनांक 25.02.2012 रोजी विलंबाने दाखल केला आहे.
      सदर प्रकरणात गैअर्जदार 2 हजर झाले असून लेखी म्‍हणणे दिनांक 25.06.2012 रोजी दाखल केले आहे. तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव शासन निर्णयानूसार जिल्‍हा कृषी अधिक्षकां मार्फत दाखल केला नाही. प्रस्‍तावा सोबत कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या असून तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांनी प्रस्‍ताव कबाल इन्‍शूरन्‍स कंपनीकडे दिनांक 03.02.2011 रोजी पाठवला आहे.
      तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्‍हणणे यांचे सखोल वाचन केले.
      तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदार 1 यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्‍तीवाद ऐकला.
      तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांनी गैरअर्जदार 2 डेक्‍कन इन्‍शूरन्‍स कंपनीकडे न पाठवता कबाल इन्‍शूरन्‍स कंपनीकडे दिनांक 03.02.2011 रोजी पाठवल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रांवरुन दिसून येते. शासन निर्णया नूसार सदर योजने अंतर्गत पॉलीसीचा कालावधी दिनांक 15.08.2011 रोजी संपूष्‍टात आलेला असून सदर कालावधी संपूष्‍टात येण्‍यापूर्वीच तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांचेकडे दाखल असल्‍याचे दिसून येते.
      तसेच तहसिल कार्यालयाने सदर प्रस्‍ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे न पाठवता कबाल इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठविल्‍यामूळे तक्रारदारांचा प्रस्‍ताव विहीत मूदतीत गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे प्राप्‍त होवू शकला नाही. शासन निर्णय दिनांक 10.08.2010 मधील कलम 8 नूसार विमा प्रस्‍ताव वि‍हीत मूदतीत सादर केले नाहीत या कारणास्‍तव विमा कंपनीला प्रस्‍ताव नाकारता येणार नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव विलंबाच्‍या कारणास्‍ताव नाकारल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार 1 विमा कंपनीच्‍या दिनांक 05.03.2012 रोजी पत्रानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली न केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतू गैरअर्जदार 2 यांच्‍या म्‍हणण्‍यानूसार तक्रारदारांच्‍या प्रस्‍तावा सोबत कागदपत्रांच्‍या मूळ प्रती दाखल करणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीने विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्‍तेवर निकाली करणे न्‍यायोचित होईल. असे न्‍याय मंचाचे मत आहे.  
सबब न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
       
आदेश
 
  1. तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नूकसान भरपाईची रक्‍कम मिळण्‍या करीता विमा प्रस्‍ताव आदेश मिळाल्‍यानंतर 30 दिवसात आवश्‍यक कागदपत्राच्‍या मूळ प्रतीसह गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे दाखल करावा.
  2. गैरअर्जदार 1 विमा कंपनीला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर 60 दिवसात विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली करावा.         
 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.