HARISH MOTIRAMJI MADAN filed a consumer case on 25 Feb 2015 against BRANCH MANAGER,NEW INDIA INSURANCE CO.LTD. in the Wardha Consumer Court. The case no is CC/103/2013 and the judgment uploaded on 13 Apr 2015.
निकालपत्र
( पारित दिनांक :25/02/2015)
( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर |
1 | विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीबाबतचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही |
2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार खारीज |
: कारणमिमांसा :-
7 मुद्दा क्रं.1, बाबत. त.क. मालवाहक वाहन टाटा 1109 नोंदणी क्रं. एम.एच.32/बी-3917 चा मालक असून त्यांनी सदरील वाहनाचा वि.प. कंपनीकडे दि. 04.06.2011 ते 03.06.2012 या कालावधीकरिता विमा काढला होता हे वादातीत नाही. तसेच दि. 22.10.2011 रोजी सदरील वाहन नागपूरकडे जात असतांना खापरी नाक्याजवळ भाग्यश्री इन्टरप्रायजेससमोर अपघात झाला व त्या अपघातात त.क.च्या वाहनाचे नुकसान झाले हे सुध्दा वादातीत नाही. सदर अपघाताची फिर्याद पोलिस स्टेशन हिंगणा येथे देण्यात आली व पोलिसांनी दि. 22.10.2011 रोजी घटना स्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्याची झेरॉक्स प्रत वर्णन यादी नि.क्रं. 4(4) प्रमाणे दाखल केलेली आहे. त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता घटना स्थळावर जाड पत्रे व जाड लांब एंगल भरलेला ट्रक उभा होता. त्याला त.क.च्या मिनी ट्रकने धडक दिली, त्यामुळे अपघात झाला व त.क.च्या मिनी ट्रकचे 30,000/- ते 35,000/-रुपयाचे नुकसान झाले असे दिसून येते.
8 त.क. ने सदर अपघातग्रस्त वाहनाची हिमाचल मोटर्स नागपूर व बेस्ट सो रिपेरिंग वर्क्स सोनबा नगर, भंडारा रोड, नागपूर यांच्याकडून दुरुस्ती करुन घेतली. त्याची पावती वर्णन यादी नि.क्रं. 21 सोबत दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता त.क. ला 99,750/-रुपये खर्च आल्याचे दिसून येते. दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, त.क.ने सदर नुकसान भरपाई मिळण्याकरिता वि.प. कंपनीकडे दावा दाखल केला. परंतु वि.प. कंपनीने अपघाताच्या वेळी त.क.कडे सदर वाहन चालविण्याचे रुट परमिट नसल्यामुळे विमा दावा नाकारलेला आहे. तसे पत्र वि.प.ने त.क.ला दि. 24.08.2012 रोजी दिलेले आहे. त्या पत्रावरुन असे दिसून येते की, त.क. कडे अपघाताच्या वेळेस सदर मालवाहक वाहनाचे रुट परमिट नव्हते व त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे वि.प.ने त्याचा विमा दावा नाकारलेला आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळेस त.क. कडे मालवाहक वाहन चालविण्याचे रुट परमिट होते किंवा नाही व ते त.क. ने वि.प. कंपनीकडे दिले होते काय हे पाहणे आवश्यक आहे.
9 त.क.च्या अधिवक्याने त्याच्या युक्तिवादात असे कथन केले आहे की, विमा पॉलिसी काढते वेळेस वि.प. कंपनीने त.क.चे कागदपत्रे पाहूनच सदरील वाहनाची विमा पॉलिसी दिलेली आहे. त्यामुळे वि.प. कंपनी त्या कारणावरुन विमा दावा नाकारु शकत नाही.
10 विमा पॉलिसीची झेरॉक्स प्रत वर्णन यादी नि.क्रं. 4(3) सोबत दाखल करण्यात आली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर पॉलिसी ही Commercial Vehicle Package Policy होती व वि.प. कंपनीने रु.2,95,000/-नुकसानाची हमी दिली होती. परंतु काही शर्ती व अटी सुध्दा त्यात नमूद करण्यात आल्या होत्या. त.क. चे वाहन हे मालवाहक वाहन असल्यामुळे सदरील वाहनाला मालवाहण्यासाठी रुट परमिट मोटर वाहन कायद्याप्रमाणे आवश्यक असते. त.क. ने वर्णन यादी नि.क्रं. 21 सोबत आर.टी.ओ.ने दिलेले फिटनेस सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता, सदरील वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण दि. 26.06.2012 रोजी करण्यात आले. वि.प.कंपनीने रुट परमिटची झेरॉक्स प्रत वर्णन यादी नि.क्र. 17 सोबत दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अपघातातील मालवाहक वाहनाचे रुट परमिट दि. 05.05.2005 ते 04.05.2010 या कालावधीकरिता होते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण दि. 11.05.2012 रोजी करण्यात आले व ते नूतनीकरण दि. 10.05.2017 पर्यंत होते. परंतु त.क.ने अपघाताच्या वेळेस त्याच्याकडे सदरील वाहनाचे रुट परमिट होते असा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त.क.ने फक्त वर्णन यादी नि.क्रं. 4(1) सोबत 1400/-रुपये मोटर वाहन विभाग वर्धा यांच्याकडे जमा केल्याची पावती दाखल केलेली आहे. व माल वाहनाच्या परवान्यासाठीचा अर्जाची झेरॉक्स प्रत वर्णन यादी नि.क्रं. 4(2) प्रमाणे दाखल केलेली आहे. परंतु त्याप्रमाणे सदरील वाहनाचा परवाना नूतनीकरण झाला असा कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही किंवा सदर अर्ज हा आर.टी.ओ. वर्धा यांच्याकडे देण्यात आला होता असा सुध्दा पुरावा मंचासमोर आलेला नाही. फक्त 1400/-रुपये दि. 25.11.2010 रोजी आर.टी.ओ.कडे जमा केले म्हणजेच नूतनीकरण झाले असे होत नाही. परवाना फी भरुन व आर.टी.ओ.कडे तसा अर्ज दिला असता तर निश्चितच रुट परमिट मिळाले असते व तसे नूतनीकरण झाले असते. परंतु नूतनीकरण हे दि. 11.05.2012 रोजी करण्यात आले, ते दि. 10.05.2017 पर्यंत valid होते.
11 तसेच वि.प.च्या साक्षीदाराच्या जबाबात सुध्दा अपघाताच्या वेळेस त.क.कडे रुट परमिट नव्हते असे नमूद केलेले आहे व त.क. ने विमा दाव्याची मागणी केली असता सुध्दा परमिट दाखल केलेले नाही. वरील सर्व कागदपत्रावरुन व वि.प. च्या शपथपत्रावरुन हे सिध्द होते की, अपघाताच्या वेळेस त.क.कडे त्याचे मालवाहक वाहन चालविण्याचे रुट परमिट नसतांना, त.क. ने वाहनाचा मालवाहण्यासाठी वापर केला व नागपूर येथे जात असतांना अपघात झाला. त्यामुळे निश्चितच त.क.ने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. म्हणून वि.प. कंपनीने त.क.चा विमा दावा नाकारलेला आहे व तो कायदेशीर योग्य आहे असे मंचास वाटते. तसेच वि.प.ने त.क.ला सेवा देण्यात कुठलाही कसूर केलेला नाही. त्यामुळे त.क. हा मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही या निष्कर्षाप्रत मंच येते.
12 त.क.च्या वकिलानी New India Assurance Co. Ltd. VS. Smt. Anita & Ors. 2014 (6) ALL MR (JOURNAL) 22 या प्रकरणातील निर्णयाचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की, जरी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला असला तरी विमा कंपनी नुकसान भरपाई त.क.ला देण्यास बांधिल आहे. वरील न्याय निवाडयात मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की, The Driver of offending vehicle having valid driving license on the date of accident – However, permit of vehicle was not on record- No other evidence available on basis of which vehicle could be said to have valid permit- Violation of policy terms- However in view of Sec. 149 (1) insurer is liable to make deposit of compensation awarded by Tribunal and recover same from owner of the vehicle. परंतु सदर न्याय निवाडयामध्ये तिस-या पक्षाने नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यामुळे परिणामतः विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी व वाहन मालकाकडून ती नंतर वसूल करावी असे मा. उच्च न्यायालयाने नमूद केलेले आहे. परंतु हातातील प्रकरणामध्ये त.क. हा सदर वाहनाचा नोंदणीकृत मालक असून त्याने अपघातात झालेल्या वाहनाची नुकसान भरपाईची मागणी विमा कंपनीकडे केलेली असल्यामुळे वरील न्याय निवाडयाचा फायदा त.क.ला मिळू शकत नाही.
13 वरील सर्व विवेचनावरुन मंच या निष्कर्षाप्रत येते की, अपघाताच्या वेळेस त.क. कडे सदरील वाहनाचे रुट परमिट नव्हते व रुट परमिट नसतांना त्यांनी वाहन चालविले व त्यात अपघात झाला. त्यामुळे सदर वाहनाचे नुकसान झाले. तसेच विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला म्हणून वि.प. कंपनी त.क.ला नुकसान भरपाई देण्यास बांधिल नाही. म्हणून त.क. मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही असे मंचाचे मत आहे. त्याप्रमाणे वरील मुद्दयाचे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2 उभय पक्षानी खर्चाचे वहन स्वतः सोसावे.
3 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
4 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.