(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने घरगुती वापरासाठी टाटा कंपनीची इंडिका डी.एल.एक्स.क्र.एम.एच.17,क्यु 1936 विकत घेतली होती. सदरील वाहनाचा गैरअर्जदार क्र.2 एजंट मार्फत गैरअर्जदार क्र.1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी (यापुढे (2) त.क्र.167/10 “विमा कंपनी” असा उल्लेख करण्यात येईल.) कडे दि.29.01.2009 पासून विमा उतरविण्यात आला होता. विमा पॉलीसीचा क्र.270600/31/08/6100002429 असा आहे. पॉलीसीची रक्कम ही नगदी रोख गैरअर्जदारास दिली होती. त्यावेळेस विमा कंपनीने पॉलीसी दि.29.01.2009 ते 28.01.2010 पर्यंत वैध असून पॉलीसीची कागदपत्रे व रक्कम भरल्याची पावती तुम्हाला पोस्टाने पाठविण्यात येईल असे सांगितले. पॉलीसी कालावधीत दि.20.03.2009 रोजी त्याचे वाहनाचे अपघातामधे नुकसान झाले आणि वाहन दुरुस्त करण्यासाठी त्याला रक्कम रु.1,30,072/- एवढा खर्च आला. तक्रारदाराने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल करुन विमा रकमेची मागणी केली, परंतू विमा कंपनीने त्याचा विमा दावा मंजूर केला नाही व कुठलीही चौकशी केलेली नाही. त्यानंतर त्याने दि.03.10.2009 आणि दि.11.01.2010 रोजी विमा कंपनीस पत्र देऊन विमा रकमेची मागणी केली असता, विमा कंपनीने तुम्ही पॉलीसी काढताना दिलेला धनादेश न वटता परत आल्याने तुमची पॉलीसी रदद करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला विमा रक्कम देता येणार नाही असे सांगितले. तक्रारदाराने विमा पॉलीसीचा हप्ता धनादेशाद्वारे न भरता रोख रकमेने भरलेला असल्याचे विमा कंपनीस सांगितले व सदर धनादेशासंबंधीच्या कागदपत्रांची मागणी केली, परंतू विमा कंपनीने कागदपत्र दिली नाही अशाप्रकारे विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा मंजूर केला नाही व त्यास त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्याला वाहनाचे अपघातामुळे झालेले नुकसान रु.1,30,072/-, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.1,00,000/- आणि व्यावसायिक नुकसानीपोटी रु.50,000/- असे एकूण रक्कम रु.2,90,072/- व्याजासह देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र.1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने वाहनाची विमा पॉलीसी काढताना कार्पोरेशन बँक, औरंगाबादचा दि.27.01.2009 रोजीचा रक्कम रु.6,815/- चा धनादेश क्र.560322 दिला. विमा कंपनीने तक्रारदारास दि.28.01.2009 रोजी विमा पॉलीसीच्या पहिल्या हप्त्याची पावती क्र.115965 दिली. सदर पावतीमधे धनादेशाद्वारे दिलेली रक्कम जो पर्यंत धनादेश वटणार नाही, तो पर्यंत ही पावती वैध समजण्यात येणार नाही असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने विमा हप्त्याची रक्कम धनादेशाद्वारे दिलेली असून, सदर धनादेश वटला गेला नाही, म्हणून तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर नाही. तक्रारदाराने विमा दाव्याची रक्कम मिळावी म्हणून ही खोटी तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली नाही, म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. (3) त.क्र.167/10 गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊन ते मंचात हजर झाले परंतू संधी देऊनही त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द “नो से” चा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराचे व गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्राची आणि तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड बी.डी.ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्याने वाहन क्र.एम.एच.17 क्यु 1936 चा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा हप्त्याची नगदी रोख रक्कम भरुन उतरविला होता. याबाबत विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याचे वाहनाचा विमा उतरविताना पहिल्या विमा हप्त्यापोटी कार्पोरेशन बँक औरंगाबाद यांचा दि.27.01.2009 रोजीचा धनादेश क्र.560332 द्वारे रक्कम रु.6,815/- दिलेली असून, विमा कंपनीने तक्रारदारास दि.28.01.2009 रोजी पावती क्र.115965 दिलेली आहे. आणि सदर पावतीमधे धनादेशाद्वारे दिलेली रक्कम जो पर्यंत धनादेश वटणार नाही, तो पर्यंत ही पावती वैध समजण्यात येणार नाही असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराने त्यांना पहिल्या विमा हप्त्यापोटी धनादेश दिला आणि सदर धनादेश बँकेतून न वटता परत आला, यासंबंधीचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विमा कंपनीने तक्रारदाराने त्यांना दिलेला धनादेश क्र.560322 आणि सदर धनादेश कोणत्या शे-यासह परत आला तसेच, त्यांनी तक्रारदारास दि.28.01.2009 रोजी दिलेली पावती क्र.115965 मंचात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दिलेला धनादेश न वटता परत आला या विमा कंपनीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. या उलट गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसी क्र.270600/31/08/6100002429 दिलेली असल्याचे तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा पॉलीसीवरुन दिसून येते. सदर पॉलीसी रु.2,00,000/- ची असून पॉलीसी कालावधी दि.29.01.2009 ते 28.01.2010 असल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर सदर वाहन न्यु युनिव्हर्सल ऑटो आणि समर्थ मोटर्स यांचेकडून दुरुस्त करुन घेतल्याचे आणि त्यांना वाहन दुरुस्तीसाठी एकूण रक्कम रु.1,30,072/- दिल्याचे पावत्यांवरुन दिसून येते. तक्रारदाराने दाखल केलेल्या वाहन दुरुस्तीच्या खर्चाच्या पावत्यांवर अविश्वास दाखविण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारदाराने कार्पोरेशन बँक औरंगाबादने त्याला दि.24.11.2010 रोजीचे पत्र दाखल केले आहे. या पत्रावरुन तक्रारदाराचे खाते सदर बँकेत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. (4) त.क्र.167/10 त्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीस विमा हप्त्याची रक्कम धनादेशाद्वारे दिलेली नसून रोख स्वरुपात दिलेली असल्यामुळेच विमा कंपनीने तक्रारदारास विमा पॉलीसी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. तसेच विमा पॉलीसी दिलेली असतानाही विमा कालावधीत तक्रारदाराने वाहनाचे नुकसानीचा विमा दावा दाखल केल्यानंतर विमा कंपनीने त्याच्या विमा दाव्याबाबत चौकशी करुन त्यास विमा दावा मंजूर केला किंवा नाही, अथवा तुम्ही दिलेला धनादेश न वटता परत आला आहे असे पत्राद्वारे कळविणे आवश्यक होते. गैरअर्जदार विमा कंपनीने विमा पॉलीसी रक्कम रु.2,00,000/- ची असतानाही तक्रारदारास वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.1,30,072/- न देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने त्यास विमा रक्कम मिळणेसाठी सिल्लोड ते औरंगाबाद चकरा माराव्या लागल्या म्हणून त्याचे रु.50,000/- चे व्यावसायिक नुकसान झाल्याची मागणी केली आहे. परंतू तक्रारदाराने याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही म्हणून सदर रक्कम मंजूर करणे न्यायोचित ठरणार नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.1,30,072/- द.सा.द.शे. 9% व्याजदराने पूर्ण रक्कम देईपर्यंत आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रास व तक्रारीचे खर्चापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.3,000/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |