Maharashtra

Ahmednagar

CC/15/514

Shital Ashok Ghodake - Complainant(s)

Versus

Branch Manager,Max New York Life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Mule

31 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/514
( Date of Filing : 03 Dec 2015 )
 
1. Shital Ashok Ghodake
Shivaji Nagar,Pipeline Road,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Max New York Life Insurance Co.Ltd.
Mauli Sankul,Zopadi Canteen,Nagar-Manmad Road,Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Mule, Advocate
For the Opp. Party: palve, Advocate
Dated : 31 Jan 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारकर्तीने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारकर्तीची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारकर्ती हया वर नमुद केलेल्‍या पत्‍त्‍यावरील कायमच्‍या रहिवासी असुन सामनेवाले यांची विमा कंपनी ही अत्‍यंत नावाजलेली विमा कंपनी आहे. सामनेवाले यांच्‍या विमा कंपनीचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण भारतभर आहे. त्‍याच प्रमाणे सामनेवाले यांचे विमा कंपनीची अहमदनगर येथे देखील शाखा आहे. त्‍या शाखेतून विमा धारकाकडुन विमा पॉलीसीची रक्‍कम घेऊन सामनेवाले पॉलीसी देतात. सामनेवाले यांच्‍या कंपनीच्‍या नावावर व सामनेवाले पुरवित असलेल्‍या सेवेवर विश्‍वास ठेवून तक्रारकर्तीने सामनेवाला यांचे कडून दिनांक 23.12.2001 रोजी बेसलाईफ इन्‍शुअर्ड पॉलीसी घेतलेली होती व आहे. तीचा पॉलीसी नंबर 100881309 असा आहे. सदर पॉलीसीचा तपशिल खालील प्रमाणे.

Plan

Sum Insured

Premium

Whole life participating plan

3,00,000/-

2912= 52

Dread disese 30 yrs Rider

2,00,000/-

292= 24

Personal accident Rider

3,00,000/-

210= 60

 

8,00,000/-

3412= 36

3.   सदर पॉलीसीचा कालावधी हा सहा महिन्‍याकरीता होता व आहे. सदर पॉलीसी आजपावेतो तक्रारकर्तीने बंद केलेला नाही. तसेच तक्रारकर्तीस सामनेवाला यांनी सन 2001 पासुन वेळोवेळी सदर पॉलीसीचे नुतनीकरण करुन दिलेले आहे.

       दिनांक 06.06.2009 रोजी तक्रारकर्तीस अचानक हृदयाचा त्रास सुरु झाल्‍याने तक्रारकर्तीस नोबल हॉस्‍पीटल अहमदनगर येथे अॅडमिट करण्‍यात आले. त्‍यावेळी त्‍यांच्‍यावर हृदय शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यावेळी हॉस्‍पीटलसाठी झालेला सर्व खर्च रक्‍कम रुपये 2,00,000/-  सामनेवाले यांच्‍या विमा कंपनी मार्फत देण्‍यात आलेला आहे. म्‍हणजेच सामनेवाले यांनी तक्रारदार हिस ड्रेड डिसीजचा क्‍लेम रुपये 2,00,000/- मंजुर केलेला आहे.

4.   तदनंतर तक्रारदार हिने होल लाईफ पार्टीसिपेटीग प्‍लॅन आणि पर्सनल अॅक्‍सीडेड रायडर चा क्‍लेम सन 2014 पर्यंत वेळोवेळी प्रिमीयम स्विकारुन सामनेवाले यांनी पॉलीसीचे नुतनीकरण करुन दिलेले आहे. परंतू सन 2014 नंतर सामनेवाले यांनी तक्रारदार हिस पॉलीसी बंद करत असुन ती चालु ठेवावयाची असल्‍यास रक्‍कम रुपये 10,083/- चा चेक देण्‍याबाबत कळविले. त्‍याप्रमाणे तक्रारदार हिने सामनेवाला यांना दिनांक 16.12.2014 रोजी सदर रकमेचा चेक नंबर 53 बँक ऑफ इंडिया चा दिला व सदरचा चेक सामनेवाले यांनी वटवुन रक्‍कम स्विकारलेली आहे. तसेच दिनांक 22.06.2015 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्‍याकडून पॉलीसी नुतनीकरणाची रक्‍कम रुपये 13,611/- चा चेक देण्‍याबाबत कळविले अन्‍यथा तक्रारदार हिची पॉलीसी बंद केली जाईल असे सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदार हिने सामनेवाला यांना परत बँक ऑफ इंडिया चा चेक नंबर 116 रक्‍कम रुपये 13,661/- चा दिलेला असून तो सामनेवाले यांना मिळालेला असुन तशी पावती देखील तक्रारदार हिस सामनेवाला यांनी दिलेली आहे. सदर पॉलीसी नुतनीकरण करतेवेळेस सामनेवाले यांनी तक्रारदार हिस कंपनीचे पॅनल डॉक्‍टराकडुन योग्‍य व आवश्‍यक त्‍या चाचण्‍या करण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदार हिने डॉ.शिंदे डायग्‍नोस्टिक यांचेकडे सर्व तपासण्‍या केल्‍या. सदर तपासण्‍याचा मेडीकल रिपोर्ट हा नॉर्मल असल्‍याबाबत सामनेवाले यांच्‍या कंपनीचे पॅनल डॉक्‍टर यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे. असे असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदार हिची पॉलीसी नुतनीकरण करुन देण्‍यास टाळाटाळ करुन तक्रारदार हिस दिनांक 02.07.2015 रोजी लेखी पत्र पाठवून कोणतेही योग्‍य व संयुक्‍तीक कारण न देता पॉलीसी नुतनीकरण करुन देण्‍याचे नाकारलेले आहे व दिनांक 30.06.2015 रोजी तक्रारदार हिचेकडून विम्‍याचे प्रिमीयमपोटी घेतलेली रक्‍कम तक्रारदार हिस परत चेकने पाठविलेली आहे. परंतु तक्रारदार हिने त्‍यांचे कोणत्‍याही हक्‍कास बाध न देता सदरचा चेक स्विकारलेला असुन अद्याप पावेतो सदरचा चेक वटविलेला नाही.

5.   अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार हिच्‍याकडून प्रिमीयमची रक्‍कम स्विकारुन यदाकदाचित तक्रारदार हिचे काही बरेवाईट झाल्‍यास जास्‍त पैसे दयावे लागु नये म्‍हणुन कोणतेही यांग्‍य व संयुक्‍तीक कारण नसतांना पॉलीसीचे नुतनीकरण करुन देण्‍यास टाळाटाळ करुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे व तक्रारदार हिस दुषित सेवा देऊन तक्रारदार हिची अडवणुक व फसवणूक केलेली आहे.

सदर घटनेबाबत तक्रारदार हिने त्‍यांचे वकीलामार्फत दिनांक 14.08..2015 रोजी नोटीस पाठवुन पॉलीसी नुतनीकरण करुन देण्‍याबाबत कळविले असता सदर नोटीसीस आजपावेतो कोणतेही योग्‍य व संयुक्तिक कारण सामनेवाले यांनी कळवलेले नाही.

6.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, अर्जात सविस्‍त नमुद केलेल्‍या कारणास्‍तव तक्रारदार हिने सामनेवाले यांच्‍याकडुन घेतलेल्‍या विमा पॉलीसी नंबर 100881309 ही सामनेवाला यांनी तक्रारदार हिस नुतनीकरण करुन देणेबाबत आदेश व्‍हावा. तक्रारदार हिस सामनेवाला यांनी दिेलेला शारीरीक, मानसिक त्रास याबाबत नुकसान भरपाई म्‍हणुन रुपये 20,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. या अर्जाचा संपुर्ण खर्च तक्रारदार हिस सामनेवालाकडून देण्‍यात यावा.

7.   तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले आहे. निशाणी 6 ला अर्जदाराने घेतलेली पॉलीसीचे अटी व नियमाची प्रत दाखल केली आहे. पाच वर्षाचे हप्‍त्‍याची रकमेचा तक्‍ताची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. पॉलीसीचे पैसे भरल्‍याची पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाला कंपनीने दिलेले पॉलीसीचे पत्राची झेरॉक्‍स प्रत, पॉलीसी स्‍टेटमेंटची झेरॉक्‍स प्रत, अर्जदाराने पैसे भरल्‍याचे पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने मागणी केल्‍याप्रमाणे अर्जदाराने दिलेल्‍या रकमेच्‍या चेकची झेरॉक्स प्रत, सामनेवाले कंपनीने पॉलीसी नुतनीकरणास असमर्थता दर्शविल्‍याचे लेखी पत्राची झेरॉक्‍स प्रत, अर्जदाराने पैसे भरल्‍याची पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने अर्जदारास पाठविलेल्‍या चेकची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले यांनी अर्जदारास पाठविलेल्‍या पत्राची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने अर्जदारास पाठविलेल्‍या पत्राची झेरॉक्‍स प्रत इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत.

8.   तक्रारदार हिची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाला यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाला हे मे.मंचात हजर झाले. व त्‍यांनी निशाणी 10 ला म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत तक्रारदाराचे म्‍हणणे खोडून काढलेले असून तक्रारदार हिचे तरुणपणी तिने हृदयाचे व्‍हॉल्‍व रिप्‍लेसमेंट केलेले आहे. आणि तक्रारदार हिच्‍या शरीरातील रक्‍तशर्करा मर्यादेपेक्षा जास्‍त असल्‍यामुळे तक्रारदार हिची विमा पॉलीसी नुतनीकरण केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिला विमा पॉलीसीचे अटी व शर्तीप्रमाणे विमा पॉलीसी सरेंडर करणे आवश्‍यक होते, परंतु तक्रारदार हिने विमा पॉलीसी सरेंडर केली नाही. तसेच सामनेवाला यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हिने दिनांक 17.12.2014 रोजी विमा पॉलीसी नुतनीकरण करण्‍यासाठी सामनेवाला कंपनीकडे विनंती केली होती. परंतू संबंधीत माहितीनुसार, सामनेवाला विमा कंपनीने विनंती करण्‍यापुर्वी आजाराने ग्रस्‍त असल्‍यामुळे तक्रारदार हिची विमा पॉलीसी नुतनीकरण करण्‍याची मागणी नाईलाजाने फेटाळावी लागली. सामनेवाला यांनी तक्रारदार हिने पॉलीसी नुतनीकरण करण्‍यासाठी दिलेली रक्‍कम रुपये 10,083/- सामनेवाला यांनी तक्रारदार हिस परत केलेली होती व याबाबत दिनांक 29.12.2014 रोजी एका पत्रान्‍वये सामनेवाला यांनी तक्रारदार हिस कळविले होते. तक्रारदार हिने पुन्‍हा 22.06.2015 रोजी एक विनंती पत्रान्‍वये सामनेवाला यांचेकडे विमा पॉलीसी नुतनीकरण करण्‍यात यावी या संदर्भात विनंती अर्ज दिला. सामनेवाला कंपनीने तक्रारदार हिस पॉलीसी क्र.100881309 या बाबत विमा पॉलीसी नुतनीकरण करण्‍यासाठी केलेल्‍या अर्जाचे पुनर्विलोकन सामनेवाला तर्फे करण्‍यात आले. परंतू तक्रारदार हिचे वैद्यकिय आरोग्‍य आणि इतर माहितीनुसार सामनेवाला यांनी तक्रारदार हिची पॉलीसी नुतनीकरण अमान्‍य केले. आणि सामनेवाला यांनी तक्रारदार हिस रक्‍कम रुपये 13,661/- परत केले. सदरील कागदपत्राची माहिती दिनांक 02.07.2015 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारास पुढे एक पत्राअन्‍वये माहिती दिली. सामनेवाला यांनी विमा पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार सदरील पॉलीसी पुनर्स्‍थापित करावी किंवा नाही हे ठरविण्‍याचे अधिकार हा सामनेवालाना आहे.

9.   या सर्व कारणास्‍तव तक्रारदार हिने संदीग्‍ध ; निराधार व दुष्‍ट हेतूने तक्रार दाखल केली आहे म्‍हणून तक्रारदारहिची तक्रार खारीज करण्‍यात यावी. आणि सामनेवालाला योग्‍य न्‍याय मिळावा अशी विनंती केली आहे. सामनेवालाने निशाणी 12 ला पुराव्‍याचे अॅफिडेव्‍हीट दिलेले आहे, त्‍यात सुध्‍दा वर नमुद कलम 8 मधील बाबी स्‍पष्‍ट केलेल्‍या आहेत आणि तक्रारदार हिस सामनेवाला विमा कंपनीचा विमा पॉलीसी नियम व अटी माहित होत्‍या. तक्रारदार हिने स्‍वतःहुन दिनांक 25.12.2001 रोजी अर्ज क्र.100881309 ची प्रस्‍तूत अर्ज स्‍वतःहुन भरुन दिला आहे. त्‍यानुसार Dead Deceased Personal Accident  पॉलीसी घेतली आहे. परंतू वर नमुद बाबीवरील तक्रारदार हिचा विमा दावा नाकारला असे नमुद केलेले आहे. सामनेवाला यांनी खुलासा सोबत मा. सुप्रीम कोर्ट यांचे न्‍याय निवाडयाचा फक्‍त उल्‍लेख केलेला आहे.

1) Supreme Court in the case of Vikram Greentech India Ltd., V/s. New India Assurance Co Ltd repotede in (2009) 5 SCC 599. त्‍याच बरोबर

2)National Commission in the case of Lifr Insurance Corporation of India V/s.  Anil P.Tadkalkar 1(1996) CPJ 159 (NC) इत्‍यादी न्‍याय निवाडे दाखल केले नाहीत. सामनेवाला यांनी त्‍यांचे खुलाशासोबत परीशिष्‍ट 1 ला विमा पॉलीसी दाखल केली असून त्‍यासोबत विमा पॉलीसीचे अटी व शर्तीची झेरॉक्‍स जोडलेली आहे. त्‍याच प्रमाणे सोबत विमा पॉलीसी नं.100881309 दिनांक 17.12.2014 रोजी तसेच सामनेवाला कंपनीचे दिनांक 29.12.2014 रोजीचे विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, तसेच परीशिष्‍ट 5 ला विमा हप्‍ता पॉलीसी चेक लिस्‍ट निशाणी 6 ला, दिनांक 2 जुलै 2015 रोजी विमा नुतनीकरण नाकारुन रुपये 13,661/- परत करण्‍याचे पत्र दाखल केलेले आहे. तसेच परीशिष्‍ट 7 ला तक्रारदार हिने पाठविलेली नोटीसची झेरॉक्‍स प्रत जोडलेली आहे.

10.  तक्रारदार व सामनेवाला यांचा युक्‍तीवाद ऐकला, तसेच उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या युक्‍तीवादाचे अवलोकन केले. व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक आहे काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारदार ही तक्रारीत नमुद केलेली मागणी मिळणेस पात्र आहे?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

11.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार हिने सामनेवाला कंपनीकडून Whole life participating plan Personal accident  पॉलीसी कलम सन 2014 पर्यंत वेळोवेळी प्रिमियम स्विकारुन सामनेवाला यांनी पॉलीसी नुतनीकरण करुन दिलेली आहे. तक्रारदार हिने निशाणी 6 ला तक्रारदार हिने घेतलेली पॉलीसीचे अटी व नियमाची प्रत दाखल केली आहे. पाच वर्षाचे हप्‍त्‍याची रकमेचा तक्‍ताची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. पॉलीसीचे पैसे भरल्‍याची पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाला कंपनीने दिलेले पॉलीसीचे पत्राची झेरॉक्‍स प्रत, पॉलीसी स्‍टेटमेंटची झेरॉक्‍स प्रत, अर्जदाराने पैसे भरल्‍याचे पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने मागणी केल्‍याप्रमाणे अर्जदाराने दिलेल्‍या रकमेच्‍या चेकची झेरॉक्स प्रत, सामनेवाले कंपनीने पॉलीसी नुतनीकरणास असमर्थता दर्शविल्‍याचे लेखी पत्राची झेरॉक्‍स प्रत, अर्जदाराने पैसे भरल्‍याची पावतीची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने अर्जदारास पाठविलेल्‍या चेकची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले यांनी अर्जदारास पाठविलेल्‍या पत्राची झेरॉक्‍स प्रत, सामनेवाले कंपनीने अर्जदारास पाठविलेल्‍या पत्राची झेरॉक्‍स प्रत इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत. तक्रारदार हिने तक्रारी सोबत दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले. त्‍याचप्रमाणे तक्रारदार हिने तिच्‍या तक्रारीतील कलम 2 मध्‍ये असे कथन केले आहे की, दिनांक 06.06.2009 रोजी तक्रारदार हिस अचानक हृदयाचा त्रास सुरु झाल्‍याने तक्रारदार हिस नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अॅडमिट करण्‍यात आले. तक्रारदार हिचेवर हृदयाची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यावेळी हॉस्पिटलचा झालेला सर्व खर्च रक्‍कम रुपये 2,00,000/- सामनेवाला विमा कंपनी मार्फत देण्‍यात आला आहे. म्‍हणजेच सामनेवाला यांनी अर्जदार हिस ड्रेड डिसीजचा क्‍लेम रुपये 2,00,000/- चा मंजुर केलेला आहे असे कथन केलेले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा व निशाणी 12 चे पुराव्‍याचे अॅफिडेव्‍हीट तसेच त्‍यांनी दाखल केलेला युक्‍तीवाद, तक्रारदार हिची तरुणपणी तिचे हृदयाची व्‍हॉल रिप्‍लेसमेंट केले होते. आणि तक्रारदार हिचे शरीरातील रक्‍तशर्करा मर्यादेपेक्षा जास्‍त असल्‍यामुळे तक्रारदार हिची विमा पॉलीसीचे नुतनीकरण केलेले नाही, तक्रारदार हिला विमा पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार विमा पॉलीसी सरेंडर करणे आवश्‍यक होते. परंतू तक्रारदार हिने विमा पॉलीसी सरेंडर केलेली नाही. तक्रारदार ही पुर्वीपासून आजारानेग्रस्‍त असल्‍यामुळे तक्रारदार हिची विमा पॉलीसी नुतनीकरण करणेची मागणी सामनेवाला यांनी फेटाळली. तसेच तक्रारदार हिची विमा पॉलीसी नुतनीकरण करण्‍यासाठी दिलेल्‍या रकमेचे चेक परत केलेला आहे. सामनेवाला यांनी असे नमुद केलेले आहे की, तक्रारदार हिची विमा पॉलीसी नुतनीकरण करुन देण्‍याविषयीचा अधिकार संपुर्णपणे सामनेवालाचे अखत्‍यारीतील असून विमा पॉलीसीचे नुतनीकरण करुन देण्‍याविषयी सामनेवालाला आदेश देण्‍याचा बाध्‍य करता येऊ शकत नाही. तक्रारदार हिचा विमा नुतनीकरण करण्‍यास सामनेवाला यांनी स्विकारला नसल्‍यामुळे तसेच विमा नुतनीकरण झाले नसल्‍यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचे ग्राहक व सेवा देणार नाते होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणून तक्रारदार ही सामनेवालाचे ग्राहक नसल्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

     सामनेवाला यांनी खुलासा सोबत मा. सुप्रीम कोर्ट यांचे न्‍याय निवाडयाचा फक्‍त उल्‍लेख केलेला आहे.

1) Supreme Court in the case of Vikram Greentech India Ltd., V/s. New India Assurance Co Ltd repotede in (2009) 5 SCC 599. त्‍याच बरोबर

2)National Commission in the case of Lifr Insurance Corporation of India V/s.  Anil P.Tadkalkar 1(1996) CPJ 159 (NC) परंतू सदरील न्‍याय निवाडे दाखल केले नाहीत.

12.   मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 प्रमाणे तक्रारदार ही सामनेवालाची ग्राहक होत नसल्‍यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचे नाते ग्राहक व सेवा देणार असे होत नाही. त्‍यामुळे तक्रारदार ही तक्रारीत नमुद केलेली मागणी मिळण्‍यास पात्र ठरत नाही, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

13.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदार हिची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

4.   तक्रारदार हिस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.