Maharashtra

Bhandara

CC/16/99

CHABBILAL LAKHARAM RANE - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER,LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD - Opp.Party(s)

ADV D.Y.PATLE

20 Jul 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/99
( Date of Filing : 05 Jul 2016 )
 
1. CHABBILAL LAKHARAM RANE
R/O CHARGAON ,POST MADGI,TAH-TUMSAR
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER,LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD
BRANCH TUMSAR TAH TUMSAR
BHANDARA
MAHARASHTRA
2. REGIONAL MANAGER,LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD
WESTERN ZONE,YOGDAMA LIFE INSURANCE ROAD,
MUMBAI 400 021
MAHARASHTRA
3. DIVISIONAL MANAGER. LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:ADV D.Y.PATLE, Advocate
For the Opp. Party: Adv. Sushma Singh, Advocate
Dated : 20 Jul 2019
Final Order / Judgement

                                             (पारीत व्‍दारा श्री. भास्‍कर बी. योगी, मा. अध्‍यक्ष)

                                                               (पारीत दिनांक– 20 जुलै, 2019)   

 

01. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी विरुध्‍द  त्‍याचे मृतक पत्‍नी संबधात विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचा ती हयातीत असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम, शाखा तुमसर  जिल्‍हा भंडारा येथील कार्यालयातून जीवन बिमा काढला होता आणि त्‍याचा पॉलिसी क्रं-976173305 असा असून सदरचा विमा सन-2008 मध्‍ये काढला होता, सदर विमा पॉलिसी ही रुपये-50,000/- ची असून तिचा वार्षिक प्रिमीयमहा रुपये-2471/- एवढा होता. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे पॉलिसीचा शेवटचा विमा प्रिमीयम दिनांक-18.05.2009 रोजी भरला होता. अशाप्रकारे तिचे विम्‍याचे हप्‍ते नियमितपणे भरलेले आहेत.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याची पत्‍नी सौ.कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचे छातीमध्‍ये दम लागल्‍याने तिला सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथे वैद्दकीय उपचारार्थ भरती केले असता ती दिनांक-दिनांक-02.09.2009 रोजी दवाखान्‍यात मृत पावली. तिचे मृत्‍यू नंतर विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून 1) मृत्‍यू दाखला मिळविला त्‍याच बरोबर नागपूर येथून 2) फार्म 3) मेडीकल अटेन्‍डन्‍ट प्रमाणपत्र प्राप्‍त केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विहित नमुन्‍यात आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात  सादर केला परंतु वाट पाहूनही विमा दाव्‍या संबधी काहीही न कळविल्‍याने त्‍याने दिनांक-01/06/2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात पत्र सादर केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयास प्रत्‍यक्ष भेट देऊन विमा दावा रकमेची मागणी केली असता त्‍यांनी प्रकरण विभागीय प्रबंधक, भारतीय जीवन बिमा निगम नागपूर यांचेकडे पाठविले असल्‍याचे सांगितले. परंतु आज पर्यंत त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम मिळालेली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत असून त्‍याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्‍हणून शेवटी तक्रारर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(01)   विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू संबधात विमा पॉलिसी प्रमाणे विमा रक्‍कम रुपये-50,000/- वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला द्दावेत.

(02)   तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)  विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)   या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 भारतीय जीवन बिमा निगम या विमा कंपनी तर्फे एकत्रित लेखी उत्‍तर मंचा समक्ष पान क्रं 28 ते 33 वर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तरात असा प्राथमिक आक्षेप घेण्‍यात आला की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ. कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचा मृत्‍यू दिनांक-12.09.2009 रोजी (विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तरातील प्राथमिक आक्षेपामध्‍ये  त.क.चे पत्‍नीचा मृत्‍यू दिनांक हा चुकीचा नमुद केलेला असून तो मृत्‍यू प्रमाणपत्रा नुसार दिनांक-02.09.2009 असा आहे) झालेला असून त्‍या संबधात विमा दावा खारीज केल्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिनांक-15.04.2013 रोजी मिळालेले आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रार ही ग्राहक मंचा समोर दोन वर्षा पेक्षा जास्‍त कालावधी नंतर दाखल केलेली असल्‍याने ती ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार विहित मुदतीत दाखल केलेली नसल्‍याने खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केल्‍या प्रमाणे त्‍याचे पत्‍नीचे विमा पॉलिसीचे केलेले वर्णन (विमा पॉलिसी क्रमांक, विमा पॉलिसी काढल्‍याचे वर्ष, वार्षिक विमा प्रिमियम इत्‍यादी)  हा अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. तसेच शेवटचा विमा प्रिमियम दिनांक-18.05.2009 रोजी काढला असल्‍याची बाब सुध्‍दा अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. तक्रारीतील अन्‍य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे पत्‍नीचे विमा दाव्‍या संबधात विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवज दाखल केले असल्‍याची बाब मंजूर केली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीव्‍दारे तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू संबधातील विमा दावा हा दिनांक-15.04.2013 रोजीच्‍या पत्राव्‍दारे तक्रारकर्त्‍याला अगोदरच कळविले होते परंतु त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक-01/06/2013 रोजीचे पत्र पाठविले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍या संबधी तक्रारकर्त्‍याला सुचित केले नव्‍हते ही बाब नामंजूर केली. आपल्‍या विशेष कथनात विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीची विमा पॉलिसी जारी करण्‍याची तारीख ही 28.04.2008 अशी आहे आणि त्‍याचे पत्‍नीचा मृत्‍यू दिनांक-02.09.2009 रोजी म्‍हणजे पॉलिसी जारी केल्‍याचे दिनांका पासून 01 वर्ष, 04 महिने आणि 02 दिवसानी झालेला आहे.

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, विमाधारक हिने (तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छबीलाल राणे) दिनांक-30.04.2008 रोजी विमा दावा प्रस्‍तावा मध्‍ये तिचे आरोग्‍याचे संबधातील प्रश्‍न क्रं- 11(d) मध्‍ये विचारलेल्‍या  Are you suffering from or have you even suffered from ailments pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System? प्रशनास नकारार्थी (No) उत्‍तर दिले   तसेच प्रश्‍न क्रं  11( i ) What has been your usual state of health? ला दिलेल्‍या उत्‍तरात आरोग्‍य चांगले (Good) असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने स्‍पेशल क्‍युरी फॉर्म जो डॉ.संतोष कोचर, तुमसर यांनी भरुन दिलेला आहे त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी ही दिनांक-13.07.2007 पासून “Rheumatic Heart Disease” या आजाराने ग्रस्‍त होती असे नमुद केलेले आहे आणि सुपर स्‍पेशॉलिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी दिलेल्‍या मेडीकल अटेन्‍डन्‍ट प्रमाणपत्रात सुध्‍दा त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यूचे कारण “Rheumatic Heart Disease” असेच नमुद केलेले आहे. विम्‍याचा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो त्‍यामुळे नमुद दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होते की, विमा दावा प्रस्‍तावातील प्रश्‍नांना खोटी माहिती पुरवून सदर विमा पॉलिसी घेतलेली आहे. अशाप्रकारे  माहिती लपवून विमा पॉलिसी काढल्‍यामुळे विमा दावा प्रस्‍तावातील डिक्‍लरेशन नुसार (घोषणापत्रानुसार) विम्‍याचा करार हा बेकायदेशीर ठरुन विम्‍यापोटी भरलेल्‍या रकमा जप्‍त होतात, त्‍यामुळे  विमा दावा खारीज केलेला असल्‍याने तक्रार नामंजूर करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 09 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 10 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे पॉलिसीचा शेवटचा विमा प्रिमीयम दिनांक-18.05.2009 रोजी भरल्‍या बाबत पॉलिसीची पावती प्रत, शासकीय वैद्दकीय महाविद्यालय नागपूर येथील मृत्‍यू प्रमाणपत्र, मेडीकल अटेन्‍डन्‍स प्रमाणपत्र, दाह संस्‍कार प्रमाणपत्र, हक्‍क सांगणा-याचे निवेदन, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात दिलेला अर्ज, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-27.11.2011 रोजी दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याने विमा दावा राशी मिळण्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे मुंबई कार्यालयास पाठविलेले पत्र, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने डॉ.संतोष कोचर यांना दिनांक-13.10.2011 रोजी विचारलेले विशेष पुछताछ पत्राची प्रत अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 44 ते 46 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले.

05.  विरुध्‍दपक्ष क्रं 1  ते 3 विमा कंपनी तर्फे पान क्रं 34 वरील दसतऐवज यादी नुसार विमा दावा प्रस्‍ताव फार्म, स्‍पेशल क्‍युरी फॉर्म अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे.

06   तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री पटले तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती सुषमा‍ सिंग यांचा  मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

07.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र, विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर तसेच  उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-    

                                                           :: निष्‍कर्ष ::

08.  तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचा हयातीत असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम, शाखा तुमसर  जिल्‍हा भंडारा येथील कार्यालयातून जीवन बिमा काढला होता आणि त्‍याचा पॉलिसी क्रं-976173305 असा असून सदरचा विमा सन-2008 मध्‍ये काढला होता, सदर विमा पॉलिसी ही रुपये-50,000/- ची असून तिचा वार्षिक प्रिमीयम हा रुपये-2471/- एवढा होता. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे पॉलिसीचा शेवटचा विमा प्रिमीयम दिनांक-18.05.2009 रोजी भरला होता या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादीत नाहीत आणि या बाबी दाखल विमा पॉलिसीची प्रत तसेच   दाखल शेवटच्‍या विमा हप्‍त्‍याचे पावती वरुन देखील सिध्‍द होतात.

09. विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तरात असा प्राथमिक आक्षेप घेण्‍यात आलेला आहे की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ. कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचा मृत्‍यू दिनांक-12.09.2009 रोजी (विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तरातील प्राथमिक आक्षेपामध्‍ये त.क.चे पत्‍नीचा मृत्‍यू दिनांक हा चुकीचा नमुद केलेला असून तो मृत्‍यू प्रमाणपत्रा नुसार दिनांक-02.09.2009 असा आहे) झालेला होता आणि विमा दावा खारीज केल्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिनांक-15.04.2013 रोजी मिळालेले आहे त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष विहित मुदतीत दाखल केलेली नसल्‍याने  ती खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू संबधीचा विमा दावा दिनांक-15.04.2013 रोजीचे पत्रान्‍वये सुचित केले होते असा दर्शविणारा कोणताही पुरावा जसे सदर पत्राची प्रत, रजि.पोस्‍टाची पावती, पोच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नाही. याउलट तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 मुंबई कार्यालयास दिनांक-01/06/2013 रोजी पाठविलेल्‍या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे, त्‍याला जर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने 15.04.2013 रोजी दावा खारीज झाल्‍याचे पत्र पाठविण्‍यात आले असते तर त्‍याने दिनांक-01.06.2013 रोजीचे पत्राव्‍दारे विमा दावा रकमेची मागणी केली नसती, त्‍यामुळे मंचाव्‍दारे असा निष्‍कर्ष काढण्‍यात येतो की, तक्रारकर्त्‍याला त्‍याचा विमा दावा खारीज केल्‍या बद्दल शेवट पर्यंत सुचित न केल्‍याने त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दिनांक-05.07.2016 रोजी दाखल केलेली असल्‍याने ती मुदतीत असून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा प्राथमिक आक्षेप नामंजूर करण्‍यात येतो.

10.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे मुख्‍य आक्षेप असा घेण्‍यात आलेला आहे की, तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीची विमा पॉलिसी जारी करण्‍याची तारीख ही 28.04.2008 अशी आहे आणि त्‍याचे पत्‍नीचा मृत्‍यू दिनांक-02.09.2009 रोजी म्‍हणजे पॉलिसी जारी केल्‍याचे दिनांका पासून 01 वर्ष, 04 महिने आणि 02 दिवसानी झालेला आहे. विमाधारक हिने (तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छबीलाल राणे) दिनांक-30.04.2008 रोजी विमा दावा प्रस्‍तावा मध्‍ये तिचे आरोग्‍याचे संबधातील प्रश्‍न क्रं- 11(d) मध्‍ये विचारलेल्‍या  Are you suffering from or have you even suffered from ailments pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System? प्रशनास नकारार्थी (No) उत्‍तर दिले   तसेच प्रश्‍न क्रं  11( i ) What has been your usual state of health? ला दिलेल्‍या उत्‍तरात आरोग्‍य चांगले (Good) असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने स्‍पेशल क्‍युरी फॉर्म जो डॉ.संतोष कोचर, तुमसर यांनी भरुन दिलेला आहे त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी ही दिनांक-13.07.2007 पासून “Rheumatic Heart Disease” या आजाराने ग्रस्‍त होती असे नमुद आहे तसेच सुपर स्‍पेशॉलिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी दिलेल्‍या मेडीकल अटेन्‍डन्‍ट प्रमाणपत्रात सुध्‍दा त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यूचे कारण “Rheumatic Heart Disease” असे नमुद आहे. नमुद दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होते की, विमा दावा प्रस्‍तावातील प्रश्‍नांना खोटी माहिती पुरवून सदर विमा पॉलिसी घेतलेली आहे. विम्‍याचा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो त्‍यामुळे अशाप्रकारे  माहिती लपवून विमा पॉलिसी काढल्‍यामुळे विमा दावा प्रस्‍तावातील डिक्‍लरेशन नुसार (घोषणापत्रानुसार) विम्‍याचा करार हा बेकायदेशीर ठरुन विम्‍यापोटी भरलेल्‍या रकमा जप्‍त करण्‍याचा त्‍यांना अधिकार आहे.

11.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ दिनांक-30 एप्रिल, 2008 रोजीचा विमा दावा प्रस्‍तावाची प्रत दाखल केली. तक्रारकर्ता व त्‍याची पत्‍नी हे अशिक्षीत आहेत व तक्रारकर्ता हा रोजमजुरीची कामे करतो. सदर विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा एजंट     श्री संजय एस.मालेवार, राहणार तुमसर याने संपूर्ण इंग्रजी भाषेत भरलेला असल्‍याचे दिसून येते आणि खाली तक्रारकर्तीची मराठीतून स्‍वाक्षरी घेतल्‍याचे दिसून येते. परंतु विमा दावा प्रस्‍ताव फॉर्म आणि त्‍यातील घोषणापत्र तक्रारकर्तीला तिचे स्‍थानिक भाषेत समजावून सांगितल्‍याचे विमा दावा प्रस्‍तावात नमुद केलेले नाही.

12.   तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ. कलाबाई राणे ही तुमसर येथील डॉ.संतोष कोचर, एम.डी.मेडीसीन यांचेकडे औषधोपचार घेत होती, त्‍या संबधात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने, विमा कंपनीचेच विहित नमुन्‍यातील दिनांक-13.10.2011 रोजीचे विशेष पुछताछ प्रपत्र (Special Query Form) या दस्‍तऐवजावर आपली भिस्‍त ठेवली. आम्‍ही सदर पुछताछ प्रपत्राचे अवलोकन केले असता त्‍यावर डॉ.संतोष कोचर यांची स्‍वाक्षरी आहे. त्‍यांनी सदर प्रपत्रातील प्रश्‍न क्रं 1) मृतक बीमाधारक ने सर्वप्रथम किस तारीख को आपसे सलाह ली थी या मध्‍ये  प्रथम 02.06.2009 असे नमुद केले होते व त्‍यानंतर ती तारीख खोडून दिनांक-13.07.2007 असे नमुद केले. बिमारी का स्‍वरुप“Rheumatic Heart Disease”  असे नमुद केले. वह कितने दिनोसे बिमारीसे पीडीत थी या प्रश्‍नाचे उत्‍तराला “Not known exactly”  असे नमुद केलेले आहे. बिमारी के लक्षण क्‍या थे या प्रशनाला दिलेल्‍या उत्‍तरात “dyspnea on exertion”  असे नमुद केलेले आहे.( dyspnea on exertion- Shortness of breath on exertion is a term used to describe difficulty breathing when engaged in a simple activity like walking up stairs or going to the mailbox.) याचा अर्थ असा होतो की, पाय-या चढताना श्‍वासोश्‍वास घेण्‍यास अडचण निर्माण होणे. तसेच क्‍या आप मृतक के नियमित मेडीकल अटेंडंट है, यदी हॉ तो किस बीमारी तथा कितने दिनों के लिए तारीख सहीत इलाज किया तथा इलाज के अवधीका दिनांक- से दिनांक तक विवरण दे या प्रश्‍नाचे उत्‍तरास “No” असे उत्‍तर दिलेले आहे. डॉक्‍टर श्री संतोष कोचर यांचे विशेष पुछताछ प्रपत्रामध्‍ये  (Special Query Form) दिलेल्‍या उत्‍तरां वरुन तक्रारकर्ती ही हदय रुग्‍ण होती व ती बरेच कालावधी पासून तिचे बिमारी संबधात डॉ.श्री संतोष कोचर यांचे कडून वैद्दकीय उपचार घेत होती असा निष्‍कर्ष निघत नाही, तसेच पुछताछ प्रपत्रात मृतक विमाधारक हिने त्‍यांचेकडे वैदद्यकीय उपचार घेतल्‍याचा कोणताही कालावधी सुध्‍दा नमुद केलेला नाही,  त्‍यामुळे डॉ.संतोष कोचर यांचे विशेष पुछताछ प्रपत्र (Special Query Form) चा फायदा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला मिळू शकत नाही असे मंचाचे मत आहे.

13.   विमाधारक हिने (तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छबीलाल राणे) दिनांक-30.04.2008 रोजी विमा दावा प्रस्‍तावा मध्‍ये तिचे आरोग्‍याचे संबधातील प्रश्‍न क्रं- 11(d) मध्‍ये विचारलेल्‍या  Are you suffering from or have you even suffered from ailments pertaining to Liver, Stomach, Heart, Lungs, Kidney, Brain or Nervous System? प्रश्‍नाला नकारार्थी उत्‍तर देण्‍याचे कारण तिला नमुद केलेले गंभिर स्‍वरुपाचे आजार होते ही बाबच उघड झालेली नव्‍हती तसेच तिने गंभिर आजारा करीता विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वी दवाखान्‍यात भरती होऊन वैद्दकीय उपचार घेतले होते असे दर्शविणारा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने या प्रकरणात दाखल केलेला नाही. या ठिकाणी आणखी एक विशेष बाब नमुद करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा विमा दावा प्रस्‍ताव हा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंटने इंग्रजी भाषेत भरलेला असून तिला तो स्‍थानिक भाषेत समजावून सांगितला असून तिला तो समजला असल्‍या बाबत त.क.च्‍या पत्‍नीचे घोषणापत्र घेतलेले नाही तसेच विमा एजंट हा विमा कंपनीचा प्रतिनिधी असून एजंटचे दोषपूर्ण कृती बद्दल विमा कंपनी पूर्णपणे जबाबदार असते   त्‍यामुळे तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍तावा मध्‍ये तिचे आजारा संबधीत प्रश्‍नांना खोटी उत्‍तरे देऊन बेकायदेशीररित्‍या विमा पॉलिसी मिळविली या विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने घेतलेल्‍या आक्षेपाशी योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी ग्राहक मंच सहमत नाही.

14.   शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांनी तक्रारकर्तीची मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचे मृत्‍यूचे प्रमाणपत्रात ती दिनांक-02.09.2009 रोजी मरण पावल्‍याचे नमुद करुन तिचे मृत्‍यूचे कारण Rheumatic heart disease (RHD) असे जरी नमुद केलेले असले तरी तक्रारकर्त्‍याचे मृतक पत्‍नीला  विमा पॉलिसी काढण्‍याचे आधी पासून हृदयाचा त्रास होता तसेच ती हृदयरुग्‍ण असून त्‍यावर दवाखान्‍यात भरती होऊन तिने वैद्यकीय उपचार घेतले होते असे दर्शविणारा कोणताही सक्षम वैद्दकीय पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने या प्रकरणात दाखल केलेला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छब्‍बीलाल राणे हिने विमा पॉलिसी काढताना तिचे वैद्दकीय आजाराची माहिती लपवून ठेवली होती ही बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने योग्‍य तो पुरावा दाखल करुन सिध्‍द केलेली नाही आणि  कोणताही सक्षम असा वैद्दकीय पुरावा नसताना तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केला तसेच असा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत तक्रारकर्त्‍याला रजिस्‍टर पोस्‍टाने पत्र पाठविले होते असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची एकंदरीत कृती पाहता त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याचे पत्‍नीचे विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झाल्‍याची बाब दिसून येते. तक्रारकर्त्‍याने  दिनांक-09.05.2011 रोजीचे अधिष्‍ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांना दिलेल्‍या पत्रा नुसार तो एलआयसी फार्म क्रं 3784 आणि मृत्‍यूप्रमाणपत्राची झेरॉक्‍स प्रत विमा दावा मिळण्‍यासाठी दाखल करीत असल्‍याचे त्‍यात नमुद आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात पान क्रं 03 वरील परिच्‍छेद क्रं-06 मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 तर्फे दिनांक-15.04.2013 च्‍या पत्राव्‍दारे  मृत्‍यू दावा खारीज केल्‍याचे तक्रारकर्त्‍यास अगोदरच कळविले होते असे नमुद केलेले आहे परंतु हे सिध्‍द करण्‍यासाठी त्‍यांनी कोणतेही दस्‍तऐवज ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाहीत.

 

15.   INSURANCE REGULATORY AND DEVELOPMENT

                        AUTHORITY

NOTITICATION, the 16th October 2002

 

Insurance Regulatory and Development Authority (Protection of Policyholders’ Interests) Regulations, 2002.

 

8. Claims procedure in respect of a life insurance policy

 

(1) A life insurance policy shall ­state the primary documents which are normally required to be submitted by a claimant in support of a claim.

 

(2) A life insurance company, upon receiving a claim, shall process the claim without delay. Any queries or requirement of additional documents, to the extent possible, shall be raised all at once and not in a piece-meal manner, within a period of 15 days of the receipt of the claim.

 

(3) A claim under a life policy shall be paid or be disputed giving all the relevant reasons, within 30 days from the date of receipt of all relevant papers and clarifications required. However, where the circumstances of a claim warrant an investigation in the opinion of the insurance company, it shall initiate and complete such investigation at the earliest. Where in the opinion of the insurance company the circumstances of a claim warrant an investigation, it shall initiate and complete such investigation at the earliest, in any case not later than 6 months from the time of lodging the claim.

 

(4) Subject to the provisions of section 47 of the Act, where a claim is ready for payment but the payment cannot be made due to any reasons of a proper identification of the payee, the life insurer shall hold the amount for the benefit of the payee and such an amount shall earn interest at the rate applicable to a savings bank account with a scheduled bank (effective from 30 days following the submission of all papers and information).

 

(5) Where there is a delay on the part of the insurer in processing a claim for a reason other than the one covered by sub-regulation (4), the life insurance company shall pay interest on the claim amount at a rate which is 2% above the bank rate prevalent at the beginning of the financial year in which the claim is reviewed by it.

       विमा नियामक मंडळाचे उपरोक्‍त नमुद तरतुदी प्रमाणे विमा कंपनीने विमा दावा हा जास्‍तीत जासत 06 महिन्‍यात निकाली काढावा असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले असून विमा दावा निश्‍चीत करण्‍यासाठी जर विलंब झाला असेल तर त्‍या प्रकरणात विमा कंपनी ही संपूर्ण विमा रकमेवर बँकेच्‍या दरा नुसार 2% दर देण्‍यास जबाबदार राहिल असे नमुद केलेले आहे. उपरोक्‍त विमा नियामक मंडळाचे कायदेशीर तरतुदी नुसार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन तिला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

16.  उपरोक्‍त बिमा नियामक मंडळाच्‍या तरतुदी पाहता तक्रारकर्ता यास त्‍याची  मृतक पत्‍नी सौ.कलाबाई छब्‍बीलाल राणे हिचे विमा पॉलिसी क्रं-976173305  संबधात विमा दावा रक्‍कम रुपये-50,000/- आणि सदर रकमेवर (विमा दावा दाखल  केल्‍याचा दिनांक-09.05.2011 पासून 06 महिने नंतर म्‍हणजे दिनांक-09.11.2011) दिनांक-09.11.2011 पासून  ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. त्‍याच प्रमाणे या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि तक्रार खर्च म्‍हणून रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

17.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                         :: आदेश ::

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1  ते 3 भारतीय जीवन बिमा निगम यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याची मृतक पत्‍नीचे विमा पॉलिसी प्रमाणे विमा राशी रुपये-50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) आणि सदर रकमेवर  दिनांक-09.11.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 12% दराने व्‍याज सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसाच्‍या आत तक्रारकर्त्‍याला अदा करावी. विहित मुदतीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍याला विमा राशी न दिल्‍यास तक्रारकर्त्‍याला  विमा रक्‍कम रुपये-50,000/- आणि सदर रकमेवर दिनांक-09.11.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.- 15% दराने दंडनीय व्‍याज विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कपंनी देण्‍यास जबाबदार राहिल.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (3) विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच  हजार फक्‍त) द्यावेत.
  4. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  क्रं-(1) ते (3)  विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
  5. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.
  6. तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.