निकालपत्र (पारीत दिनांक 29 सप्टेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्रीमती रुक्मीणीदेवी शंकरलाल अग्रवाल यांनी सदर ग्राहक तक्रार ही त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी विमा पॉलिसीची व बोनसची रक्कम न दिल्यामुळे दाखल केली आहे व मागणी केली आहे की, त्यांना विरुध्दपक्ष यांच्याकडून रुपये 50,000/- ही रक्कम 12% व्याजासह दिनांक 03/09/2005 पासून मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 10000/- मिळावेत. 2. तक्रारकर्ता यांचे पती श्री शंकरलाल लाडूलाल अग्रवाल यांचा दिनांक 03/09/2005 रोजी मृत्यू झाला. त्यांनी पॉलिसी क्रमांक 1735905 ही रुपये 7,000/- करीता विरुध्दपक्ष ..2.. ..2.. यांच्याकडून दिनांक 12/04/1954 च्या प्रपोजल व्दारे घेतली होती. 3. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात कबूल केले आहे की, ते पॉलिसी व बोनसची रक्कम म्हणून रुपये 18,959/- ही रक्कम तक्रारकर्ता यांना देण्यास तयार आहेत. लेखी जबाबात विरुध्दपक्ष असे ही म्हणतात की सदर पॉलिसीकरीता व्याज ही संज्ञा लागू नसून फक्त बोनसची रक्कम देय आहे. 4. तक्रारकर्ता यांनी दिनांक 07/10/2005 रोजी विमादावा विरुध्दपक्ष यांचेकडे सादर करुनही त्यांना विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे सदर ग्राहक तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे विरुध्दपक्ष हे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीचा खर्च देण्यास बाध्य आहेत. असे तथ्य व परीस्थिती असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विमा पॉलिसी व बोनसची रक्कम म्हणून रुपये 18,959/- ही रक्कम एक महिन्याचे आत दयावी. 2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- दयावेत. (श्रीमती अलका उ. पटेल) (श्री अजितकुमार जैन) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे) सदस्या, सदस्य, अध्यक्षा, जिल्हा ग्राहक मंच,गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |