Maharashtra

Nanded

CC/10/47

Vittal Shankarrao Patil - Complainant(s)

Versus

Branch Manager,Kabal Insurance Service Prv. Ltd. - Opp.Party(s)

Adv. A.V. Choudhary

20 May 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/47
1. Vittal Shankarrao Patil ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager,Kabal Insurance Service Prv. Ltd. ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 20 May 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2010/47
                    प्रकरण दाखल तारीख -   06/02/2010     
                    प्रकरण निकाल तारीख    20/05/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्री.सतीश सामते.                   - सदस्‍य
 
विठठ्ल पि.शंकरराव पाटील,
वय 42 वर्षे , धंदा शेती,                                   अर्जदार.
रा. सोनारी ता.भोकर जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   शाखा अधिकारी,                                             गैरअर्जदार.
     कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रायव्‍हेट लिमीटेड,
शॉप नं.2, दिशा अलंकार कॉम्‍प्‍लेक्‍स,
टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद.
2.   शाखा अधिकारी,
रिलायन्‍स जनरल इन्‍शरन्‍स कं.लि.
19,रिलायन्‍स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट,मुंबई.
3.   तहसिलदार,
तहसील कार्यालय, मुखेड,
ता.मुखेड जि.नांदेड.
4.   व्‍यवस्‍थापक,रिलायन्‍स जनरल इंशुरन्‍स कंपनी लि,
उज्‍वल इंटरप्राईजेस, हिंगोली नाका, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील                 - अड.ए.व्‍ही.चौधरी.
गैरअर्जदार क्र. 1                   - स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 3                   - स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 व 4 तर्फे वकील  - अड.ए.जी.कदम.
 
 
 
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्‍यक्ष)
 
                   अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार हा पुष्‍पाबाई विठठलराव पाटील हिचा पती आहे. मयत पुष्‍पाबाई हिचा मृत्‍यु दि.21/09/2007 रोजी सापाने चावल्‍यामुळे (सर्प दंशाने) अपघाती मृत्‍यु झाला. मयत‍ हिस गट नं.208 एक हेक्‍टर 20 आर मध्‍ये मौजे सोनारी ता.भोकर येथे शेती आहे. सदरच्‍या घटने बाबत अपघात मृत्‍यु म्‍हणुन पोलिस स्‍टेशन भोकर येथे गुन्‍हा क्र. 38/07 अन्‍वये नोंद झाली आहे. सदर घटने संदर्भाय पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, वैद्यकिय प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे दाखल केलेले आहे. शासनाच्‍या परिपत्रकानुसार शेतक-यास अपघाती विमा मिळतो या बाबत कुठलीच माहिती नसल्‍यामुळे उशीरा अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍याकडे रितसर क्‍लेम फॉर्मसह शेतकरी अपघात विमा रक्‍कम मिळण्‍या करीता अर्ज केला त्‍यानुसार तहसिलदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍याकडे पाठविला. शेतकरी अपघात विमा योजना ही शासना मार्फत विमा मिळवून देण्‍याचा परिपत्रकानुसार आहे. त्‍याप्रमाणे योजनेतील परिपत्रकानुसार अशा अपघातातील ग्रस्‍त लोकांना तसेच गरजु लोकांना रु.1,00,000/- देण्‍याचा उपक्रम प्रस्‍तुत परिपत्रकात आहे. त्‍यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 योजनेचा लाभ मिळण्‍याची मागणी केली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍याकडे लेखी पत्र पाठवले ज्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र. 2 यांना त्‍यांनी माहिती दिली. टाळाटाळ करणे तसेच क्‍लेम मागणी देण्‍यास नाकरणे ही बाब चुकीच्‍या सेवेमध्‍ये तसेच निष्‍काळजीपणाची ठरते. अर्जदार यांनी वारंवार लेखी व तोंडी विनंती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना केल्‍या आहेत परंतु गैरअर्जदार यांनी क्‍लेम मंजुर करण्‍याऐवजी त्‍यास टाळाटाळ करुन क्‍लेम देण्‍यास नकार दिला आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्‍कम रु.1,00,000/-, 18 टक्‍के व्‍याजाने मिळावेत. अर्जदार यांना दिलेल्‍या चुकीच्‍या सेवेबद्यल व मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत.
 
     गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदाराच्‍या पतीच्‍या मृत्‍यु .दि.21/09/2007 रोजी अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे त्‍यांनी आमच्‍या कार्यालयाकडे दि.24/03/2008 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघाती विम्‍याचा मोबदला मिळण्‍यासाठी लागणारी आवश्‍यक ती कागदपत्रे आमच्‍या कार्यालयात क्‍लेम फॉर्म व अर्जासोबत दाखल केले आहे. सदरील विमा पॉलिसी ही नॅशनल इंशुरन्‍स कंपनी मुंबई दिलेली आहे.     क्‍लेम सेटल करण्‍यासाठी रिलायंन्‍स इंशुरन्‍स कंपनी मुंबई यांना दि.25/06/2009 पाठविलेले आहे. गैरअर्जदाराच काम फक्‍त मध्‍यस्‍थी करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारसीसह इन्‍शुरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
 
     गैरअर्जदार क्र. 3 हे हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, मुद्या क्र. 1 ते 14 च्‍या खुलाशावरुन अर्जदार यांनी सादर केलेल्‍या कागदपत्राच्‍या पुराव्‍यावरुन मयत पुष्‍पाबाई ही दि.21/09/2007 रोजी सर्प दंशामुळे अपघाती मृत्‍यु झाला. आकस्‍मात मृत्‍यु नं.38/08 पोलिस स्‍टेशन भोकर येथे गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. अर्जदारास   गट नं.208 मध्‍ये एक हेक्‍टर 20 आर मौजे सोनारी येथे शेत जमीन आहे. शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणुन प्रस्‍ताव कबाल इन्‍शुरन्‍स कं.प्रा.लि. औरंगाबाद यांचेकडे पाठविण्‍यात आला आहे. म्‍हणुन या कार्यालयात अर्जदार यांचा लाभ देण्‍या बाबतचा प्रस्‍ताव प्रलंबीत नाही. म्‍हणुन गैरअर्जदार क्र. 3 चा जबाब दावा स्विकारण्‍यात यावा व नियमाप्रमाणे अर्ज निकाली काढण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
 
     गैरअर्जदार क्र. 2 व 4 वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकत्रित रित्‍या दाखल केलेला आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, प्रस्‍तुत तक्रार खोटया माहीतीच्‍या आधारावर दाखल केलेली आहे. अर्जदारांनी त्‍यांच्‍या लग्‍नांबद्यचे विवाह प्रमाणपत्र दाखल केलेले नाही तसेच मयत हे सर्प दंशाने दि.21/09/2007 रोजी मृत्‍यु झाला याबद्यलचा पुरावा नाही. त्‍यामुळे एफ.आय.आर,पंचनामा,साक्षीदाराचे जबाब या सर्व बाबी गैरअर्जदार अमान्‍य करतात. अर्जदार यांनी तो त्‍यांच्‍य पत्‍नीवर अवलंबुन होते व तेच त्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते हे सिध्‍द केले पाहीजे. अर्जदार यांनी क्र. 3 यांच्‍या मार्फत मृत्‍यु दावा दाखल केले हे सिध्‍द केले पाहीजे. मयत ही गट क्र.208 मध्‍ये एक एकर 20 आर सोनारी ता.भोकर येथे शेती करत होते व ती कर्ता होती, याचा पुरावा नाही किंवा वर उल्‍लेख केलेले कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाही. गैरअर्जदारांनी आजपर्यंत दावा दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्रुटीची सेवा देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. संबंधीत तक्रार ही अपरिपक्‍व आहे. सरकारी परीपत्रकाप्रमाण दि.19/08/2004 याप्रमाणे क्‍लेम हा तलाठी यांच्‍या मार्फत एक आठवडयाच्‍या आंत अपघातानंतर आला पाहीजे. अपघात हा दि.21/09/2007 ला झाला व तहसिलदार यांनी तो दि.12/08/2008 ला पाठविला म्‍हणजे मृत्‍युच्‍यानंतर दाखल केले म्‍हणुन तो अपघात होत नाही. अर्जदाराने तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, एफ.आय.आर.खबरी जबाब, मृत्‍यु प्रमाणपत्र इ. महत्‍वाचे कागदपत्र दाखल केले नाही. त्‍यामुळे दावा अपुर्ण आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यात काही तक्रार निर्माण झाली तर ते समीतीकडे 15 दिवसांत द्यावयास पाहीजे असे न करता ते सरळ मंचात आलेले आहेत. सबब अर्जदाराचा दावा खर्चासह खारीज करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईन तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
 
     मुद्ये.                                       उत्‍तर.
 
1.   अर्जदार हे गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी सिध्‍द करतात काय?  होय.
2.   काय आदेश?                         अंतीम आदेशाप्रमाणे.
 
                           कारणे.
मुद्या क्र. 1 - 
 
    गैरअर्जदार यांचा आक्षेप क्‍लेम प्रस्‍ताव त्‍यांना मिळालेला नाही शिवाय तो मुदतीत नाही. यानंतर अर्जदाराचे जे वारस आहेत इतर वारसाची संमती नाही. संबंधीत कागदपत्र, एफ.आय.आर. पंचनामा त्‍यांचेकडे नाही. पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे अर्जदाराने वेळेच्‍या आत म्‍हणजे अपघातानंतर सात दिवसांच्‍या आंत प्रस्‍ताव पाठविलेले नाही. क्‍लेम प्रस्‍ताव हा अपरिपक्‍व आहे, अद्यापही गैरअर्जदारांनी यावर निर्णय घेतलेला नाही, काही वाद असेल तर जिल्‍हा समीती पुढे ठेवले पाहीजे होते ते न ठेवता अर्जदार हे सरळ मंचात आलेले आहेत. इ.आक्षेप घेत त्‍यांनी दावा अद्यापही नाकारलेला नाही असे म्‍हटलेले आहे.   येथे अर्जदाराने त्‍यांच्‍या पत्‍नीचे .दि.21/09/2007 रोजी सर्पदंशाने मृत्‍यु झाला व याबद्यल पोलिस स्‍टेशन भोकर येथे अपघात म्‍हणुन गुन्‍हा क्र.38/2007 नों‍दविलेला आहे. याबद्यल एफ.आयर.आर., पोलिस पंचनामा, पी.एम.रिपोर्ट दाखल केलेले आहे. तसेच तलाठया मार्फत अर्जदाराने प्रस्‍ताव फॉर्म भरुन तहसिलदार यांचेकडे दि.12/08/2008 रोजी पाठविलेले आहे.   वारसाबद्यल प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. वारस हे मयताचे पती असुन बाकीचे त्‍यांचे मुले आहेत. इ.सर्व कागदपत्र दाखल केलेले आहे. त्‍यामुळे येथे गैरअर्जदाराचा वरील आक्षेप मान्‍य करण्‍या सारखा नाही . आता प्रश्‍न राहीला हे पॉलिसीतील नियमाप्रमाणे व परीपत्रकाप्रमाणे  अपघातानंतर मृत्‍यु दावा हा तलाठयामार्फत पाठवीणे आवश्‍यक असतांना त्‍यांनी तो 9 ते 10 महिन्‍यांनी उशिरा दाखल केलेला आहे. यात अर्जदाराची मनस्थिती लक्षात घेतली असता हे स्‍पष्‍ट आहे की, पत्‍नीच्‍या मृत्‍युनंतर पती हा अतीशय दुःखात असतो घरातील व्‍यक्‍ती गेल्‍यानंतर सात दिवसांत इंशुरन्‍स कंपनीकडे पैसे मागायला जाणे हे शक्‍य होत नाही. किंवा समाजाच्‍या दृष्‍टीकोनातुन बरोबर दिसत नाही. यानंतर शासनाचे असे काही कल्‍याणकारी योजना आहे हे माहीती नसते किंवा अशा प्रकारचा क्‍लेम दाखल करण्‍यास विलंब होणे शक्‍य आहे. परीपत्रकात स्‍पष्‍ट म्‍हटलेले आहे की, अशा प्रकारचा क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर जरी झाला तरी तो बंधनकारक नाही. त्‍यामुळे याला विलंब जरी झाला असले तर माफी देण्‍यात येते व हा वेळेच्‍या आंत क्‍लेम मानन्‍यात येतो, असे समजण्‍यात येते. अर्जदाराची पत्‍नी ही शेतकरी होती, याबद्यल 7/12, नमुना 8, होल्‍डींग म्‍हणुन गट क्र.208 मध्‍ये एक एकर 20 सोनारी भोकर येथे शेती होते व शेतीच्‍या उत्‍पन्‍नातुन कुटूंबाचे पालनपोषन करत होती ही गोष्‍ट सिध्‍द होते. वर उल्‍लेख सर्व कागदपत्र या प्रकरणांत दाखल आहे. पी.एम.मध्‍ये मयत हीचा मृत्‍यु सर्प दंशाने झाला हे स्‍पष्‍ट असे म्‍हटले आहे म्‍हणजे तो अपघाती मृत्‍यु आह हे सिध्‍द होते. याबद्यल गैरअर्जदारांचा आक्षेप नाही. महाराष्‍ट्र शासनाचे परीपत्रक या प्रकरणांत दाखल केलेले. अपघाती मृत्‍यु हा विम्‍याचा कालावधीच्‍या आंत झालेले आहे. शासनाने नेमलेली समीती हा एक पर्याय आहे पण पर्यायाने शिवाय  अल्‍टीमेट रेमीडीने अर्जदार मंचात आपली तक्रार घेऊन येऊ शकतो. गैरअर्जदार यांनी तक्रार ही अपरीपक्‍व स्‍वरुपात आहे असे म्‍हटले आहे. व तक्रार ही त्‍यांनी कबाल इंशुरन्‍स कंपनी यांच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे तहसिलदार यांच्‍या मार्फत पुराव्‍यासह गैरअर्जदार यांचेकडे पाठविली आहे. गैरअर्जदार यांनी क्‍लेम मिळाल्‍यानंतर  30 दिवसात त्‍यावर नीर्णय घेणे आवश्‍यक आहे. म्‍हणुन ती तक्रार अपरीपक्‍व आहे असे म्‍हणता येणार नाही व अर्जदार म्‍हणतात सर्व कागदपत्र या प्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदार अजुनही प्रकरणांत दाखल असलेले क्‍लेम प्रस्‍ताव भाग 1 व वारस प्रमाणपत्र, 7/12, होल्‍हींग, एफ.आय.आर. पोलिस पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इलेक्‍शन कार्ड, एस.बी.एच. येथे खाते असल्‍याबद्यल पास बुक व फेरफार रजिस्‍टर इ.कागदपत्राचे सत्‍य प्रती घेऊन या प्रस्‍तावावर क्‍लेम देण्‍याचा नीर्णय घ्‍यावा. गैरअर्जदारांना अर्जदार यांनी या सर्व कागदपत्रसह क्‍लेम देण्‍यासाठी सहकार्य करावे, या सर्व कागदपत्रांच्‍या आधारे गैरअर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम देण्‍यास पुरेशी आहेत.
     वरील सर्व कागदपत्रांच्‍या अवलोकन करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                            आदेश.
 
1.   अर्जदार यांचा तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी हा निकाल लागल्‍या पासुन 30 दिवसांच्‍या आंत अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.25/06/2009 पासुन 9 टक्‍के व्‍याजाने पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत व्‍याजासह द्यावे असे न केल्‍यास यानंतर दंडनिय व्‍याज म्‍हणुन 12 टक्‍के व्‍याज पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत व्‍याजासह द्यावे.
3.   गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकालाच्‍या प्रती देण्‍यात याव्‍यात.
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                                                                      (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                                                                                सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार,लघुलेखक.

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER