// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :295/2014
दाखल दिनांक : 30/12/2014
निर्णय दिनांक : 20/06/2015
सौ. राखी अजय हिरुळकर
वय 35 वर्षे, धंदा – नोकरी,
रा. जुनी वस्ती बडनेरा,
ता.जि. अमरावती.
तर्फे स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी
अजय देविदास हिरुळकर : तक्रारकर्ता
// विरुध्द //
शाखा व्यवस्थापक,
जयका मोटर्स लि. साईनगर,
अमरावती. : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. देव
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. सौ. राऊत
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 20/06/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, तक्रारदार हिचे टाटा सुमो 3551 वाहन होते. विरुध्दपक्षाने नवरात्री, दसरा उत्सव बुकीग एक्सचेंज ऑफर व बोनस नॅनो 2012 अशी जाहिरात दिली. व रु. १०,०००/- डिस्काऊंट तसेच लोन व सर्व्हीसिंगची सेवा देऊन त्यानुसार टाटा सुमो 3551 वाहनाचे बदल्यात नॅनो गाडी MH-27-AR 4049 वाहन घेतले. परंतु रु. १०,०००/- डिस्काऊंट दिले नाही टाटा फायनान्सला रु. ९०,०००/- डिपॉझीट भरले तसेच लोनचा भरणा रु. २०,७५०/- व चिल्लर खर्च रु. २०००/- असे एकूण रु. १,१२,७५०/- खर्च केले. दि. २५.१२.२०१२ ला गाडी विरुध्दपक्षाकडे सर्व्हीसिंगला टाकली तेव्हा 312 कि.मी. गाडी चालली होती. गाडी सर्व्हीसिंगला असतांनाच विरुध्दपक्षा
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..3..
कडून गाडीचा अपघात झाला व सदरील वाहन मुंबईला विरुध्दपक्षाने परस्पर पाठविले. दि. २५.१२.२०१२ ते १५.५.२०१३ पर्यंत विरुध्दपक्षाकडे सदरील वाहन होते. विरुध्दपक्षाने इन्शुरन्सची कागदपत्र दिले नाही व परस्पर वाहन रु. ६७,०००/- ला विकले. त्यामुळे तक्रारदाराने वकीला मार्फत नोटीस पाठवून रु. २,०६,०००/- व नुकसान भरपाई रु. २५,०००/- ची मागणी केली. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 14 दाखल केले आहेत.
3. विरुध्दपक्षाने त्यांचा लेखी जबाब निशाणी 13 ला दाखल करुन तक्रारदाराच्या परिच्छेद 1 हा रेकॉर्डचा भाग असून परिच्छेद 2, 3, 5 मधील म्हणणे मान्य करुन परिच्छेद 4 अंशतः मान्य केला आहे. इतर परिच्छेद 6,7,8,9,10,12 व प्रार्थना विनंती अमान्य करुन अतिरिक्त जबाबात नमूद केले की, Exchange offer योजनेमध्ये विरुध्दपक्षाने तक्रारदाराला टाटासुमो गाडीच्या बदल्यात नॅनो कार दिल्याचे मान्य करुन तक्रारदाराला रु. १,०४,२२७/- चा धनादेश दिला व वाहन कर्जापोटी रु. १,४५,२७५/-
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..4..
चा धनादेश तक्रारदाराच्या कर्ज खात्यावर जमा केला. तसेच सदर नॅनो कारच्या सर्व्हीसिंगच्या वेळी त्या वाहनाला किरकोळ स्वरुपाचा
मार लागल्यामुळे पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला नाही. तसेच सदर गाडीच्या विमा पॉलिसी अंतर्गत प्रावधान असल्याप्रमाणे काही रक्कम पॉलिसी कंपनी व इतर रक्कम विरुध्दपक्षानी जमा करुन सदर गाडीची दुरुस्ती काही आवश्यक पार्ट बदलवून केली. परंतु सदर पुर्णपणे दुरुस्त केलेली गाडी तक्रारदार घ्यायला तयार नसल्यामुळे व तक्रारदाराच्या इच्छे प्रमाणे विरुध्दपक्षाने ती दुस-याला विकुन टाकली. आलेले पैसे तक्रारदाराच्या कर्ज खात्यात जमा करुन कर्ज खाते निरंक केले. उर्वरीत रक्कम तक्रारदाराला अदा केली. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नसुन सेवेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी केल्या नाहीत. म्हणून सदर तक्रार खर्चासह रद्द होणेस पात्र आहे. विरुध्दपक्षाने निशाणी 14 प्रमाणे दस्त, 1 ते 7 दाखल केले आहेत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..5..
4. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद सादर करुन निशाणी 19 प्रमाणे अतिरिक्त दस्त 1 ते 4 सादर केले.
5. तक्रारदाराचा अर्ज व सोबत दाखल केलेले दस्तावेज, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब व दाखल केलेले दस्त, तसेच लेखी युक्तीवाद विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद, यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारात घेतली.
मुद्दे उत्तर
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केल्या
आहेत का ? ... होय
- तक्रारदार हा शारिरीक मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे का ? ... होय
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
6. तक्रारदारातर्फे अॅड. देव यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात त्यांच्या मुळ तक्रारीतील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..6..
म्हटले की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराच्या अर्जातील बरेच मुद्दे मान्य करुन, सर्व्हीसिंगच्या वेळी सदर गाडीला अपघात होऊन ती दुरुस्त
केल्या नंतर दुस-या व्यक्तीला विकल्याचे कबुल केले तसेच तक्रारदाराच्या मुळ अर्जातील मुख्य मुद्दे विरुध्दपक्षाने मान्य करुन, सदर नॅनो गाडी परस्पर दुस-या व्यक्तीला विकल्याचे मान्य केले म्हणून विरुध्दपक्षाने केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई प्रार्थनेत विनंती केल्याप्रमाणे मिळावी अशी विनंती केली. 7. विरुध्दपक्षातर्फे अॅड. सौ. राऊत यांनी त्यांच्या युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन म्हटले की, सदर दुरुस्ती केलेली नॅनो गाडी तक्रारदाराच्या सहमतीनेच दुस-या व्यक्तीला विकली व आलेल्या पैशातुन तक्रारदाराचे कर्ज खाते निरंक करुन शिल्लक रक्कम तक्रारदाराला अदा केली त्यामुळे तक्रारदार व विरुध्दपक्षाचा व्यवहार संपला असून, विरुध्दपक्षाकडून सेवेत त्रुटी किंवा अनुचित व्यापार
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..7..
पध्दतीचा अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती वि. मंचाकडे केली.
8. तक्रारदाराने निशाणी 2/2 प्रमाणे, विरुध्दपक्षाने नवरात्री, दसरा उत्सवात गाडी एक्सचेंज ऑफर्स अंतर्गत एक्सचेंज बोनस, गाडीचे मुल्य व इतर डिस्काऊंट योजना काढली व तक्रारदाराने सदर योजने अंतर्गत जुनी टाटा सुमो बदल्यात नॅनो गाडी विकत घेतल्याचे दिसुन येते. तसेच सदर नॅनो गाडीच्या प्रथम सर्व्हीसिंगच्या वेळी विरुध्दपक्षाकडे अपघात होऊन ती पुन्हा दुरुस्त करुन दुस-या व्यक्तीला विकली व आलेल्या पैशातुन तक्रारदाराचे कर्ज प्रकरण निरंक करुन शिल्लक रक्कम तक्रारदाराला धनादेशाव्दारे अदा केले. वरील मजकुर उभयपक्षांना मान्य असुन विरुध्दपक्षाने लेखी जबाबात तो कबुल असल्याचे म्हटले आहे.
9. नंतर सदर गाडी विरुध्दपक्षाकडे प्रथम सर्व्हीसिंगला दिली असता दि. २५.१२.२०१२ ते १५.५.२०१३ हया दरम्यान विरुध्दपक्षाकडे असतांना तिचा अपघात झाला व
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..8..
विरुध्दपक्षाने पोलिस मध्ये रिपोर्ट न देता ती परस्पर दुरुस्त करुन तक्रारदाराची सहमती न घेता विकुन टाकली. विरुध्दपक्षाने सदर
गाडीचा अपघात झाल्याचा व दुरुस्त करुन विकल्याचे नाकारले नाही.
10. वास्तविक सदर गाडी विरुध्दपक्षाकडे सर्व्हीसिंगला दिली असता एक किंवा दोन दिवसात सर्व्हीसिंग करुन ग्राहकाला परत करणे आवश्यक होते, परंतु तसे न करता सदर गाडीचा उपयोग स्वतःच्या कामाकरीता सर्व्हीसिंग कालावधीमध्ये वापरल्याचे सिध्द होते व ती गाडी निष्काळजीपणे किंवा अप्रशिक्षीत व्यक्तीने चालवुन अपघात घडल्याचे दिसुन येते. अपघात घडल्यानंतर पोलिस स्टेशनला रिपोर्ट न करता ती दुरुस्त करुन विकुन टाकली.
11. विरुध्दपक्षाने सदर दुरुस्त गाडी तक्रारदाराच्या संमतीने विकल्याचे म्हटले आहे. सदर गाडीचे आलेले पैसे तक्रारदाराने निषेध नोंदवुन स्विकारल्याचे म्हटले आहे व हे
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..9..
विरुध्दपक्षाने नाकारले नाही. तसेच गाडीचा अपघात झाल्यानंतर पोलिस स्टेशनला रिपोर्ट न करता व सदर गाडीच्या इन्शुरन्सचा
कोणत्याही लाभ तक्रारदाराला न देणे हया एक प्रकारच्या सेवतील त्रुटी विरुध्दपक्षाने केल्याचे सिध्द होते.
12. सदर गाडी फक्त 312 कि.मी. चालवुन तक्रारदाराने ज्या उद्देशासाठी गाडी घेतली तो उद्देश गाडीच्या अपघातामुळे सफल होऊ शकला नाही, हया तक्रारदाराच्या म्हणण्यात तथ्य दिसुन येते. तक्रारदाराच्या म्हणण्या प्रमाणे सदर गाडी दि. २५.१२.२०१२ ते १५.५.२०१३ हया दरम्यान विरुध्दपक्षाच्या अखत्यारीत होती. तक्रारदाराला गाडीचा ठावठिकाणा पण सांगितला नाही हे तक्रारदाराने दाखल केलेले दस्त 2/28 वरुन दिसुन येते. कारण विरुध्दपक्षाने सदर गाडी दि.१०.४.२०१३ रोजी श्री. विनय राजगुरे यांना विकल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर गाडीचा उपयोग तक्रारदार घेऊ शकले नाही हे सिध्द होते.
13. वरील सर्व विवेचनावरुन विरुध्दपक्षाने तक्रारदाराची गाडी योग्य कालावधीत सर्व्हीसिंग करुन न देता ती
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..10..
स्वतःच्या कामाकरीता वापरली व अशाप्रकारे सेवेत प्रचंड त्रुटी केल्या, हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असुन, मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
14. मुद्दा क्र. 2 चा विचार करता मुद्दा क्र. 1 मध्ये विषद केल्याप्रमाणे विरुध्दपक्षाने केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे व नविन गाडी घेऊनही ती वापरल्याचा आनंद किंवा समाधान तक्रारदाराला न मिळाल्यामुळे तक्रारदाराला खचितच मानसिक व शारिरीक त्रास झाला असणारच व त्यापोटी तक्रारदाराला झालेल्या नुकसानीस विरुध्दपक्ष हे सर्वस्वी जबाबदारआहे हे वि. मंचाचे एकमत होऊन मुद्दा क्र. 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
15. तक्रारदाराने अदलाबदल बोनस म्हणून रु. १०,०००/- विरुध्दपक्षाकडून मिळाले नसल्याचे म्हटले आहे. परंतु विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्त 14/3 प्रमाणे नॅनो गाडी घेते वेळी रु. १०,०००/- Exchange Bonus म्हणुन दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे तक्रारदाराची ही मागणी मान्य करता येत नाही. तसेच विरुध्दपक्षाने सदर नॅनो गाडी दि. १०.४.२०१३ रोजी श्री विनय
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..11..
राजगुरे यांना रु. १,७१,०००/- रकमेत विकली. त्यापैकी रु. १,४६,६००/- हे तक्रारदाराच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले. त्या व्यतिरीक्त रु. ६७,०००/- हे तक्रारदाराला दि. १०.४.२०१३ रोजी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. हयावरुन नविन नॅनो गाडीचा मुळ रक्कम रु. २,३८,०००/- पैकी (१,४६,६०० + ६७,०००/-) = २,१३,६००/- तक्रारदाराला मिळाले व उर्वरित रक्कम रु. २,३८,००० – २,१३,६००) = रु. २४,४००/- हे तक्रारदाराला मिळणे क्रमप्राप्त आहे.
16. तक्रारदाराला झालेल्या शारिरीक मानसिक त्रासापोटी रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु. ५,०००/- देणे योग्य राहील. कारण तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई रु. ५०,०००/- ही मान्य करणे न्यायोचित होणार नाही. सबब तक्रारदाराचा अर्ज अंशतः मान्य करुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांक : 295/2014
..12..
- तक्रारदाराला विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रुटीमुळे झालेली गाडीची नुकसान भरपाई म्हणून रु. २४,४००/-
(चौविस हजार चारशे फक्त) व त्यावर द.सा.द.शे. 10 टक्के दराने दि. १०.४.२०१३ ते रक्कम देय दिनांकापर्यंत अदा करावे.
- तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु. १०,०००/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त्) व तक्रार खर्च रु. ५०००/- (अक्षरी रु. पांच हजार फक्त्) असे एकूण रु. १५,०००/- (पंधरा हजार) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला द्यावे.
- वरील आदेशाचे पालन, निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. अन्यथा रु. २४,४००/- वर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देय होईल.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 20/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष