जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी तक्रार क्रमांक 180/2010 घनश्याम पिता सखाराम चुडावकर अर्जदार वय 45 वर्षे धंदा शेती , ( अड.जे.बी.गिरी ) रा.आरखेड ता.पालम जि. परभणी. --विरुध्द – 1 शाखाधिकारी गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय.बॅक मर्यादीत, ( अड.अजय व्यास ) योगानंद मार्केट गांधी पार्क, परभणी. 2 शाखाधिकारी मॅग्मा फायनान्स लिमीटेड अदालत रोड रघुवीर हिरोहोंडा, एजन्सीच्या बाजूला आय.सी.आय.सी.आय.बॅकच्या बाजूला, औरंगाबाद. नि.1 वरील आदेश ( दिनांक 12.01.2011 ) अर्जदारातर्फे अड. गिरी यानी प्रकरणात नि. 16 चा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 2 ला मंचातर्फे पाठवलेली नोटीस अपू-या पत्यामुळे बजावली नसल्यामुळे फेर नोटीस काढण्या संबधी अर्ज दिला होता तो मंजूर केला. सदर अर्जाबरोबर नि. 17 चा अर्ज देवून गैरअर्जदार 2 यानी अर्जदाराची जीप जबरदस्तीने जप्त करुन ताब्यात घेण्याचे विचारात आहे म्हणून त्याना मनाई करावी असा अंतरीम आदेश मागणीचा अर्ज केला होता त्या अर्जावर मंचाने Statusquo ( जैसे थे ) आदेश पारीत केला होता. अर्जदाराला आदेशाची तातडीची गरज असताना ही प्रत्यक्षात त्याने आदेशाची प्रत दिनांक 04.12.2010 रोजी म्हणजे 10 दिवस उशीराने हस्त बडवडा ताब्यात घेतला. त्यानंतरही प्रकरणात दिनांक 09.12.2010, 21.12.2010, 31.12.2010 आणि 12.01.2011 अशा चार तारखा पडूनही अर्जदाराने प्रस्तूत प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 ला अंतरीम आदेशाची प्रत व नि. 1 वरील म्हणणे देण्यासाठी ची नोटीस हस्त पोहोच केल्याची डूप्लीकेट पोहोच पावती मंचात आजअखेर सादर केलेली नाही. अर्जदार व त्याचे वकिलास आज पुकारा करुनही ते हजर नव्हते या वरुन अर्जदार अगर त्याचे वकिलाना सदरची केस पुढे चालू ठेवण्याबाबत रस दिसत नाही. सबब अर्जदार व त्याचे वकिल यांचे सततच्या गैरहजरी या कारणास्तव प्रस्तूत प्रकरण काढून टाकण्यात येत आहे. ( Complaint is dismissed in default ) सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |