नि.45 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 22/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.29/04/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.08/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या कु.शिल्पा चंद्रकांत ढवळे/ सौ.श्रीया सिध्दार्थ नार्वेकर रा.सुमित्रा निवास, साखरतर रोड, शिरगाव, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. आय.सी.एफ.ए.आय. संस्था करीता शाखाप्रमुख, कोल्हापूर शाखा, 2 रा मजला, रॉयल प्लाझा, युनिट नं.डी/2, सि.एस.नं.328, ई वॉर्ड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर – 416 001. 2. दि इन्स्टीटयुट ऑफ चार्टर्ड फायनान्सीयल ऍनॅलिस्ट ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी त्रिपुरा, जगन्नाथ बोरी रोड, बिदूरकोरटा, चौमुहानी, आगरतळा – 799 001. त्रिपुरा (वेस्ट) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.परुळेकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.कदम -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार यांनी विधिज्ञांसह उपस्थित होवून नि.44 वर पुरशीस दाखल केलेली आहे. ब) सदर पुरशीस खालीलप्रमाणेः- ‘‘मी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सामनेवाला मजकूर व माझेमध्ये तडजोड होऊन तक्रारीचे निवारण झालेले आहे त्यामुळे मला सदरची तक्रार पुढे चालवण्याची नाही म्हणून दिली पुरशीस.’’ येणेप्रमाणे पुरशिस आहे. क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदार समक्ष उपस्थित. पूरशिसमधील मजकूर मान्य व कबूल करतात. सदर पूरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येतो.’’ सदर नि.44 च्या पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 08/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |