Maharashtra

Chandrapur

CC/21/35

Shri.Irshad Gafur Shaikh - Complainant(s)

Versus

Branch Manager,Hondamotor cycle and Branch Manager Scooter India Pvt.Ltd - Opp.Party(s)

Adv.B.P.Hiwarkar

29 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/35
( Date of Filing : 15 Feb 2021 )
 
1. Shri.Irshad Gafur Shaikh
R/o.Anchleshwar Ward no.3,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Hondamotor cycle and Branch Manager Scooter India Pvt.Ltd
Commercial Complex2 Sector 49-50 Golf course extinction Road,Gurugram,Hariyana-122028
Hariyana
Punjab
2. Branch Manager,Hondamotor cycle and Branch Manager Scooter India Pvt.Ltd
2 floor,Business Enclave,Lek New Enclave,Automic Energy road,wadi,Amrawati Road,Nagpur-44002
Nagpur
MAHARASHTRA
3. Prop.Pavansut Motor Pvt.Ltd
Vijay Vrigj Honda,107-63,Plot no-1,Near Machinala,Mul Road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Jul 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                      (पारीत दिनांक २९/०७/२०२२ )

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्‍वये दाखल केली

असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 

  1. तक्रारकर्ता यांनी दिनांक २५/५/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ निर्मित अॅक्‍टीव्‍हा ६ जी डी.एल.एक्‍स. क्रमांक एम.एच. ३४-बी.यु. ४१७४ चे वाहन कर धरुन एकूण रक्‍कम रुपये ६७,१०१/- ला विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ या अधिकृत विक्रेत्‍याकडून विकत घेतली. गाडीचा इंजीन क्रमांक JF91EG1040348 व चेसीस क्रमांक ME4JF914BLG042764 असा आहे. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त वाहन विकत घेण्‍याकरिता चोला मंडलम फायनान्‍स  कंपनीकडून अर्थसहाय्य घेतले असून तक्रारकर्ता त्‍या कर्जाची परतफेड करत आहे. वाहन खरेदी केल्‍यानंतर ८ ते १० दिवसांनी वाहनाच्‍या काही ठिकानातून आपोआपच रंग निघाला तसेच वाहन चालवितांना इंजीनचा आवाज येत होता. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे कार्यालयात संपर्क करुन तक्रार केली. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही. इंजिनमध्‍ये बिघाड असल्‍याचे सांगितल्‍यानंतरही विरुध्‍द पक्षाने पूर्ण दुरुस्‍ती न करता थोडीफार दुरुस्‍ती करुन दिली परंतु इं‍जीनमधून ऑईल गळणे सुरु झाले आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना सूचित करुनही त्‍यांनी दखल घेतली नाही आणि सदर बिघाड अद्यापही सुरुच आहे. तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या वाहनाचा रंग लगेच निघणे तसेच इंजीनचा मोठ्याने आवाज येणे व ऑईल गळणे यावरुन उपरोक्‍त वाहन जुने असल्‍यासारखे  जाणवते. तक्रारकर्त्‍यास चांगल्‍या स्थितीतले वाहन देण्‍यात आलेले नाही व त्‍या  वाहनामध्‍ये आधीपासून बिघाड आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची फसवणूक केली त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ८/८/२०२० रोजी विरुध्‍द पक्षांना नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा  त्‍यांनी दखल घेतली नाही व विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना दिनांक ८/८/२०२० व त्‍यानंतर परत दिनांक १/९/२०२० रोजी नोटीस पाठविली परंतु त्‍यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ विरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्षांनी  तक्रारकर्त्‍यास उपरोक्‍त विकत घेतलेल्‍या वाहनाची किंमत रुपये ६७,१०१/- परत द्यावे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई रक्‍कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  2. तक्रारकर्त्‍याची तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस प्राप्‍त होऊन ते आयोगासमक्ष उपस्थित होऊन विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे निर्मित अॅक्‍टीव्‍हा ६ जी डी.एल.एक्‍स. खरेदी केली ही बाब मान्‍य केली असून तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील उर्वरित कथन अमान्‍य करुन पुढे आपले विशेष कथनामध्‍ये नमूद केले की,‍ विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे अधिकृत विक्रेता आहे व तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले वाहन हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी उत्‍पादित केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने वादातीत वाहन खरेदी केल्‍यानंतर पहिल्‍यांदा दिनांक ३/७/२०२० रोजी  गाडीमध्‍ये आवाज येतो म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे आणली असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचे जॉबकार्ड बनविले व वादातीत वाहन विना मोबदला दुरुस्‍त करुन तक्रारीचे निवारण केल्‍यानंतर तक्रारकर्ता गाडी घेऊन गेले. वादातीत वाहनाची दिनांक ६/७/२०२० रोजी पहिल्‍या फ्री सर्व्हिसींग करिता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे आले तेव्‍हापण गाडीचे सर्व्हिसींग करुन दिले. त्‍यानंतर तक्रारकर्ता पुन्‍हा   दिनांक १३/८/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे वाहन घेऊन आले व गाडीच्‍या इंजिनचे ऑईल लिक होत आहे, पेंट निघत आहे व मागच्‍या चाकात आवाज येतो अशी तक्रारी केली तेव्‍हा विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ने त्‍याप्रमाणे जॉबकार्ड बनविले व विना मोबदला वाहनामध्‍ये गिअर बदलवून दिले. एक बेरींग, एक शॉफ्ट ड्राईव्‍ह टाकून दिले व समोरचे लेफ्ट साईड पॅनल बदलवून व त्‍याकरिता कोणतेही शुल्‍क आकारले नाही व  वाहनातील तक्रार दुर करुन दिली आणि तक्रारकर्त्‍याने त्‍याप्रमाणे ‘Satisfaction Note’  सुध्‍दा लिहून दिली व गाडी घेऊन गेले. त्‍यांनंतर तक्रारकर्ता हा एकदाही विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे आलेला नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे तक्रार दुर करण्‍याकरिता तयार आहे. तक्रारकर्त्‍याने वाहनामध्‍ये उत्‍पादित दोष आहे याबाबत कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने अर्थसहाय्य घेऊन वाहन विकत घेतले आहे व रक्‍कम न भरल्‍याने फायनान्‍स कंपनीने वादातीत गाडी घेऊन जाण्‍याची धमकी दिल्‍याने व तक्रारकर्त्‍याने स्‍वतःची जबाबदारी टाळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षांविरुध्‍द तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चे लेखी कथन, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ चे शपथपञ लेखी उत्‍तर यालाच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ चे शपथपञ समजण्‍यात यावे अशी पुर्सिस, यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                                                       निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे                 होय

        ग्राहक आहेत कायॽ        

    २.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्त्‍याप्रति          नाही             

       न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                                                        अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ता यांनी चोलामंडलम फायनान्‍स कंपनीकडून अर्थसहाय्य घेऊन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ उत्‍पादित अॅक्‍टीव्‍हा ६ जी डी.एल.एक्‍स. – बी.एस. VI, क्रमांक एम.एच.३४/बी.यु. ४१७४ चे वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे अधिकृत विक्रेता- विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडून, कर धरुन एकूण रक्‍कम रुपये ६७,१०१/- ला विकत घेतले त्‍याबाबतची पावती निशानी क्रमांक ४ सह दस्‍त क्रमांक ६ वर दाखल केलेली आहे. यारुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. प्रस्‍तुत तक्रारीत विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास उत्‍पादित दोष असलेले उपरोक्‍त अॅक्‍टीव्‍हा वाहन दिले याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारीत दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी उपरोक्‍त  अॅक्‍टीव्‍हा वाहन विरुध्‍द पक्षाकडून खरेदी केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे दिनांक ३/७/२०२० रोजी वादातील अॅक्‍टीव्‍हा गाडीमध्‍ये आवाज येतो अशी तक्रार केली असता त्‍यांनी विनाशुल्‍क गाडीतील तक्रार दुर केली. त्‍यानंतर दिनांक १३/०८/२०२० रोजी गाडीच्‍या इं‍जीनचे ऑईल लिक होत आहे, गाडीचा पेंट निघत आहे आणि मागच्‍या चाकात आवाज येतो अशी तक्रार केली असता गाडीचे गिअर बदलवून दिले, एक बेरिंग, एक शॉफ्ट ड्राईव्‍ह टाकून दिला तसेच समोरचे लेफ्ट साईड पॅनल विनाशुल्‍क बदलवून दिले. दोन्‍ही वेळेस विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी पहिले तक्रारकर्त्‍याचे जॉब कार्ड बनविले व विनाशुल्‍क  तक्रारीचे निवारण करुन दिले तसेच तक्रारकर्त्‍याने दिनांक ६/७/२०२० रोजी फ्रि सर्व्हिसींग करिता गाडी आणली असता विरुध्‍द पक्षांनी नियमाप्रमाणे गाडीचे फ्रि सर्व्हिसींग सुध्‍दा करुन दिले. तक्रारकर्त्‍याने तक्रार केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचे जॉब कार्ड मध्‍ये नोंद घेऊन नंतर त्‍याचे विनाशुल्‍क निवारण केले.  सदर जॉबकार्ड विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी प्रकरणात दाखल केलेले आहेत. तसेच गाडी संदर्भातील तक्रारीचे  निवारण झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना ‘Satisfaction Note’ सुध्‍दा लिहून दिली त्‍यामध्‍ये  तक्रारकर्त्‍याने गाडीच्‍या बाबत तक्रार व त्‍यावर विरुध्‍द पक्षाने केलेली कारवाई तसेच खाली “ I hereby confirm that my issues are resolved & I am satisfied  with the service provided” असे असून तक्रारकर्त्‍याने खाली स्‍वाक्षरी केलेली आहे. सदर ‘Satisfaction Note’ विरुध्‍द  पक्षांनी  प्रकरणात दस्‍त क्रमांक ८ वर दाखल केली आहे. यावरुन विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याचे गाडीतील तक्रारीचे विनाशुल्‍क निवारण केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने ‘Satisfaction Note’ लिहून गाडी घेऊन गेल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने आक्षेप घेतला की, विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास विवादीत वाहन विकतांना चांगल्‍या स्थितीतले वाहन दिलेले नाही तसेच त्‍यामध्‍ये उत्‍पादित दोष आहे परंतु ही बाब तक्रारकर्त्‍याने कोणताही तज्‍ज्ञ अहवाल/दस्‍तावेज पुरावा दाखल करुन सिध्‍द  केलेली नाही. उलटपक्षी दाखल दस्‍तऐवजांवरुन विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास विवादीत अॅक्‍टीव्‍हा गाडीच्‍या बाबत असलेल्‍या किरकोळ तक्रारीचे वॉरंटी कालावधीत विनाशुल्‍क निवारण करुन तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्‍युनतम सेवा दिली नाही, हे सिध्‍द होते, या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. ३५/२०२१ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.