अर्जदाराना त्रुटीची सेवा दिली, म्हणून नुकसान भरपाई म्हणून 20,000/- रु. व तक्रारीचा खर्च 5,000/- गैरअर्जदाराने तक्रारदारास देण्याचे आदेश व्हावेत.
अशी मागणी केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ तक्रारदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
तक्रारदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 13 कागदपत्राच्या यादीसह 13 कागदपत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत. ज्या मध्ये खाते उतारा, पॉलिसी प्रत, नोटीसीची प्रत, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यास मंचाची नोटीस तामील होवुन मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात नाही, तसेच सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास कोणतेही कारण घडले नाही, त्यामुळे सदरची तक्रार खारीज होणे योग्य आहे. प्रस्तुतची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारी मध्ये मुख्य बाबी कोर्टा समोर आणल्या नाहीत, तक्रारदार हा मंचाची दिशाभुल करत आहे. तक्रारदाराने आमच्या बँकेत खाते उघडले होते, हे बरोबर आहे, परंतु तक्रारदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, बँकेने तक्रारदारास Credit कार्ड घेण्याकरीता बळजबरी केली, उलट तक्रारदाराने बँकेस विनंती अर्ज केल्यावरच बँकेने सदरचे कार्ड तक्रारदारास दिले आहे. व ज्याचा Credit Card No. 434678600149154 असा आहे.
बॅंकेचे म्हणणे की, तक्रारदाराने सदरचे क्रेडीटकार्ड घेते वेळी सदर क्रेडीट कार्डच्या नियम व अटी मान्य केल्या आहेत, व सदर नियमाच्या कागदावर तक्रारदाराने सही केली आहे. तसेच तक्रारदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे.
बँकेचे म्हणणे की, तक्रारदाराने त्याच्या तक्रारी मधील परिच्छेद क्रमांक 3 मधील केलेले कथन हे खोटे आहे. तक्रारदाराने स्वतः क्रेडीटकार्ड मिळवण्याकरीता बँकेकडे अर्ज केल्यानंतर बँकेने क्रेडीटकार्ड नं. 461786300223058 जारी केले व सदर क्रेडीटकार्ड जारी करते वेळी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी संमंती दिली होती, तक्रारदाराकडून सदरचे क्रेडीटकार्ड बंद करण्याकरीता बँकेस कोणतीही माहिती मिळाली नाही.
बँकेचे म्हणणे की, तक्रारदारास लावलेले चार्जेस हे बँकेच्या नियमा प्रमाणे लावलेले आहेत.
बँकेचे म्हणणे की, तक्रारदाराने स्वतः HDFC SL Classic Assurance Insurance Plan घेतलेले आहे, ज्याचा पॉलिसी क्रमांक 15007843 हा आहे. तक्रारदाराने सदरची पॉलिसी बंद करावे, म्हणून आमच्याकडे अर्ज केलेला नाही, सदरची पॉलिसी ही क्रेडीटकार्डशी संबंधीत आहे, त्यामुळे सदर पॉलिसीचा हप्ता क्रेडीटकार्डच्या अकाउंट वरुन वसुल केले जाते. आम्ही तक्रारदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, तक्रारदाराने केलेल्या सर्व मागण्या फेटाळून सदरची तक्रार खारीज करावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
बँकेने पुराव्या बाबत नि.क्रमांक 15 वर 6 कागदपत्राच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये Statement Of Account ची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदार क्रमांक 1 व 2 हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.
तक्रारादाराचे तक्रारीत म्हणणे की, गैरअर्जदाराने आवश्यक नसतांना गैरअर्जदाराने क्रेडीट डेबीट कार्ड ज्याचा क्रमांक 4617863002230058 दिले व अनेक चार्जेस बेकायदेशिरपणे तक्रारदारास लावले, व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दिनाक 09/07/2013 व 13/09/2013 रोजी पाठविलेली नोटीस रद्द ठरवावे. तक्रारची सदरची मागणी मंचास योग्य वाटत नाही, कारण गैरअर्जदाराने तक्रारदारास सदर कार्डच्या नियमा प्रमाणेच चार्जेस लावल्याचे नि.क्रमांक 15 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते, म्हणून सदरची नोटीस बेकायदेशिर ठरवणे योग्य होणार नाही, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीमध्ये विनंती क्रमांक 1 मध्ये अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदार क्रमांक 2 यास दिलेले बचत खाते क्रमांक 1789100005309 हे ATM सह बंद करण्याचे आदेश गैरअर्जदाराना द्यावेत, अशी मगणी केली आहे. सदरचे तक्रारदाराचे मागणी मंचास योग्य वाटत नाही, कारण तक्रारदाराने स्वतः तक्रारीमध्ये म्हंटले आहे की, त्याने सदरचे खाते 2013 पासून वापरणे बंद केले आहे. बँकेच्या नियमा प्रमाणे सदरचे खाते वापरात नसल्यास आपोआपच ते सदरचे खाते बंद होते, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
तसेच तक्रारदाराने सदरचे दोन्ही क्रेडीट कार्ड परत घेवुन गैरअर्जदाराने ते बंद करावे अशी मागणी केली आहे, ती सुध्दा योग्य नाही, कारण सदर क्रेडीट कार्डची चार्जेसची थकबाकी अर्जदाराकडे असतांना सदरचे कार्ड बंद करण्याचे आदेश देणे योग्य होणार नाही, असे मंचाचे मत आहे.
तसेच तक्रारदाराने सदर तक्रारीत विनंती क्रमांक 3 मध्ये केलेली मागणी देखील मंचास योग्य वाटत नाही, कारण बँकेने क्रेडीट कार्डच्या नियमा प्रमाणेच चार्जेस आकारल्याचे नि.क्रमांक 15 वरील सदर नियमाच्या प्रतीवरुन दिसून येते.
तसेच तक्रारदाराने विनंती परिच्छेद क्रमांक 4 मधील केलेली मागणी देखील वरील कारणास्तव योग्य वाटत नाही, असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे काढलेली पॉलिसी HDFC Classic Assurance Plan ज्याचा पॉलिसी क्रमांक 15007843 अन्वये भरलेली रक्कम रु. 1,50,000/- सदरची पॉलिसी बंद करुन 9 टक्के व्याजासह गैरअर्जदाराकडून मागणी केली आहे, सदरची तक्रारदाराची मागणी मंचास योग्य वाटत नाही, कारण पॉलिसीच्या नियमाचे मंचाने अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा पॉलिसीच्या नियम क्रमांक 4 प्रमाणे 1,50,000/- रु. मिळवणेस पात्र नाही, असे मंचाचे ठाम मत आहे, तसेच तक्रारदाराने सदर पॉलिसी अंतर्गत 3 हप्ते गैरअर्जदाराकडे भरले होते, या बाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. तसेच तक्रारदाराचे संपूर्ण तक्रारीत वारंवार हेच म्हणणे की, गैरअर्जदाराने बळजबरीने तिच्या पत्नीचे खाते उघडले व तसेच विमा पॉलिसी देखील गैरअर्जदाराने बळजबरीने तक्रारदारास दिली, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण प्रत्येक खाते उघडतांना वा पॉलिसी घेताना तक्रारदाराच्या अर्ज व संमंती असल्या शिवाय कोणतेही बँक खाते उघडत नाही, वा पॉलिसी जारी करीत नाहीत, असे मंचाचे ठाम मत आहे.
गैरअर्जदाराने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, तक्रारदार आपली तक्रार सिध्द करणेस पूर्णपणे असमर्थ ठरला आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
3 आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.