Maharashtra

Ahmednagar

CC/15/58

Late Ramdas Bhaurao Avhad's Heirs-Smt.Suman Ramdas Avhad & Other - Complainant(s)

Versus

Branch Manager,HDFC Bank Ltd. - Opp.Party(s)

S.B. Mundada

10 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/58
( Date of Filing : 20 Jan 2015 )
 
1. Late Ramdas Bhaurao Avhad's Heirs-Smt.Suman Ramdas Avhad & Other
Avhad Vitbhatti,Kinetic Chowk,Arangaon Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,HDFC Bank Ltd.
Branch Office-Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Branch Manager,HDFC Bank Ltd.
Main Branch-Pune
Pune
Maharashtra
3. Manager,HDFC Bank Ltd.
Retail Asset Collection,Trade View,Ground Floor,Osis Compound,,130,Pandurang Budhakar Marg,Mumbai-400013
Mumbai
Maharashtra
4. Manager,Ratnaprabha Motors,
Plot No.E-32,MIDC-Chikalthana,Aurangabad
Aurangabad
Maharashtra
5. Manager,Ratnaprabha Motors,
Madhur Complex,Near Andhra Bank,Tarakpur,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
6. Manager,H.P.Kargo Movers Pvt.Ltd.
Cottage No.31,1st Floor,West Patel Nagar,New Delhi
New Delhi
7. Manager,J.C.B. India Pvt.Ltd.
B-1-I-1,2nd Floor,Mohan Co-operative Industrial Estate,Mathura Road,New Delhi-110 004
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:S.B. Mundada , Advocate
For the Opp. Party: P.M. Joshi, Advocate
 D.T. Kamble, Advocate
 Y.R. Hirve, Advocate
Dated : 10 Dec 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १०/१२/२०१९

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

_________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, कै. रामदास भाऊराव आव्‍हाड अहमदनगर येथील रहिवासी होते, ते दिनांक २६-१०-२०१२ रोजी मयत झाले असुन सदरील तक्रारदार क्र.१ ते ४ हे त्‍यांचे अनुक्रमे वारस आहेत. मयत रामदास आव्‍हाड यांनी हयातीत स्‍वतःसाठी तसेच शेतीच्‍या वापरासाठी उद्योग कामासाठी सन २०१० मध्‍ये जे.सी.बी. घेण्‍याचे ठरवुन त्‍यासाठी जे.सी.बी.चे डिलर सामनेवाले क्र.५ यांच्‍याकडे चौकशी केली. त्‍यानंतर जे.सी.बी. च्‍या खरेदीबाबत बोलणी झाल्‍यानंतर सदरील जे.सी.बी.ची किंमत रूपये २०,७१,०००/- ठरली त्‍याप्रमाणे खरेदी करतेवेळी कै.रामदास आव्‍हाड यांनी सामनेवाले क्र.१ ते ३ फायनान्‍स कंपनीकडून १६,०५,०००/- चे कर्ज घेतलेले होते व स्‍वतः रक्‍कम रूपये ४,६६,०००/- डाऊन पेमेंट केलेले होते. अशाप्रकारे मुळ कर्जदार कै. रामदास भाऊराव आव्‍हाड व सामनेवाले यांचेदरम्‍यान विक्रेता व सेवा देणार हे संबंध निर्माण झाले होते. मात्र दिनांक २६-१०-२०१२ रोजी सदर मुळ कर्जदार मयत झाले. त्‍यांना तक्रारदार क्र.१ ते ३ वारस असल्‍याने  तक्रारदार क्र.१ ते ३ च्‍या दरम्‍यान सेवा देणार व ग्राहक असे संबध निर्माण झाले होते व आहेत. सामनेवाले क्र.४ ते ७ यांच्‍याकडुन तक्रारदार यांना काहीही मागणे नसून सदर तक्रार अर्जास बाधा येवू नये म्‍हणुन त्‍यांना केवळ फॉर्मल पार्टी म्‍हणून सदरच्‍या अर्जात समाविष्‍ट केलेले आहे. सन २०१० मध्‍ये  कै. रामदास आव्‍हाड यांना सदरील जे.सी.बी. सामनेवाले क्र.५ व ७ यांनी सामनेवाले क्र.६ यांच्‍यामार्फत मूळ तक्रारदार यांच्‍याकडे पोहोच करून दिला. सदर जे.सी.बी.चे सेल्‍स सर्टीफिकेट सामनेवाले क्र.७ यांनी कै.रामदास आव्‍हाड यांच्‍या  नावे दिलेले होते. सामनेवाले क्र.१ व २ हे सामनेवाले क्र.३ यांचे अनुक्रमे नगर व पुणे येथील शाखा असुन अनुक्रमे नगर व पुणे येथे सामनेवाले क्र.३ यांचे काम पाहतात. तसेच सामनेवाले क्र.४ हे सामनेवाले क्र.५ रत्‍नप्रभा मोटर्स यांचे मुख्‍य  कार्यालय असून त्‍यांच्‍यामार्फत सामनेवाले क्र.५ चा कारभार चालतो. सामनेवाले क्र.६ डिलीव्‍हरी देणारी कंपनी असून सामनेवाले क्र.७ ही जे.सी.बी.ची कंपनी आहे. मूळ कर्जदार रामदास आव्‍हाड यांनी दिनांक २७-०९-२०१२ पर्यंत एकुण रक्‍कम रूपये १०,५०,०००/- वेळोवेळी भरलेले आहेत. मात्र दिनांक २६-१०-२०१२ रोजी मूळ कर्जदार रामदास आव्‍हाड यांचे आजाराने अचानक दुःखद निधन झाले. कै.रामदास आव्‍हाड हे घरातील कर्ते पुरूष होते. त्‍यांचे अचानक मृत्‍युनंतर त्‍यांचे वारस म्‍हणजेच तक्रारदार क्र.१ ते ४ यांना कुटुंबातील अनेक अडचणी आल्‍या  तसेच कै.रामदास आव्‍हाड यांच्‍या औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रूबी हॉस्‍पीटल, पुणे येथे खर्च झालेला होता. तसेच मुळ तक्रारदार रामदास आव्‍हाड यांचे बंधु नवनाथ आव्‍हाड, आई या देखील आजारपणाने मयत झाल्‍या. अशी सर्व परिस्थिती असतांनादेखील दि.३१-०८-२०१३ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍याकडे रक्‍कम रूपये २,४५,०००/- कर्जाच्‍या  हप्‍त्‍याची रक्‍कम एकरकमी रोख स्‍वरूपात भरलेली होती व आहे त्‍यावेळी उर्वरित रक्‍कम लवकरच भरण्‍याची तयारी देखील तक्रारदार यांनी दर्शविली होती. मूळ कर्जदार रामदास भाऊराव आव्‍हाड यांनी घेतलेल्‍या सदरील जे.सी.बी.चे त्‍यांच्‍या  मृत्‍युनंतर त्‍यांचे वारस म्‍हणजेच तक्रारदार क्र.१ ते ४ हे जे.सी.बी.चे. युझर व बेनिफिशीयरी झालेले होते. त्‍यामुळे मूळ तक्रारदार यांच्‍या मृत्‍युनंतरही घेतलेल्‍या  जे.सी.बी.चे वारसाहक्‍काने तक्रारदार क्र.१ ते ४ हे मालक व ताबेदार झालेले होते. दरम्‍यान नोव्‍हेंबर २०१३ मध्‍ये तक्रारदार यांचे जे.सी.बी. इंजिनीअर/ ठेकेदार अभय मुथा यांच्‍याकडे बालिकाश्रम रोड, अहमदनगर येथे चालू कामात असतांना सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे कर्मचारी/ इसम यांनी तक्रारदार यांचा जे.सी.बी. ड्रायव्‍हरलादम देवून त्‍याचे ताब्‍यातुन कुठलीही लेखी पुर्वसुचना, नोटीस, पावती न देता बेकायदेशीरपणे व अनधिकृतरीत्‍या ताब्‍यात घेवून निघुन गेले आहेत. त्‍यानंतर त्‍वरीत तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍या कार्यालयात जावून जे.सी.बी. विषयी चौकशी केली असता सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराशी बोलण्‍यात टाळाटाळ केली. अशाप्रकारे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी कुठलीही लेखी पुर्वसुचना, माहिती, नोटीस न देता तक्रारदार यांचे जे.सी.बी. बेकायदेशीररीत्‍या ताब्‍यात घेवून तक्रारदाराचे उत्‍पन्‍नाचे साधन हिरावून घेतलेले आहे. तेव्‍हापासुन तक्रारदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच मोठे उत्‍पन्‍न बुडाल्‍यामुळे तक्रारदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. सदरील जे.सी.बी. मशीनपासुन तक्रारदारांना दरमहा ९० ते ९५०००/- एवढे उत्‍पन्‍न मिळत होते. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍या कार्यालयात येवून जे.सी.बी. परत देण्‍याबाबत वारंवार विनंती केली. मात्र सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी सतत कुठलाही प्रतिसाद दिला नाही व बोलण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सदरील सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍याकडुन खाते उतारा मिळविला व त्‍यात सर्व माहिती नमुद आहे, असे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी सांगितले. मात्र तक्रारदार यांना सदर खाते उता-यावरून कोणताही बोध झाला नाही. मुळ तक्रारदार यंनी सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍याकडे वेळेमध्‍ये सर्व हप्‍ते फेडलेले होते व ते मयत झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी रक्‍कम रूपये २,४५,०००/- इतकी मोठी रक्‍कम एकरकमी सदरील कर्जापोटी भरलेली होती व पुढील रक्‍कम भरण्‍याचीही तयारी तक्रारदार यांनी दर्शविलेली होती. मात्र सामनेवाले यांनी बेकायदेशीररित्‍या  तक्रारदाराचे जे.सी.बी. मशीन ताब्‍यात घेतले आहे. सामनेवाले यांच्‍या अनुचित व्‍यापारी प्रथेमुळे व सदोष सेवेमुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणावर आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्‍यामुळे सदरचा तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले आहे.          

              तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, तक्रारदार यांचा जे.सी.बी. सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍या ताब्‍यातुन तक्रारदार यांच्‍या ताब्‍यात परत देण्‍याचा हुकुम व्‍हावा, तसेच जे.सी.बी. मशीन जप्‍त केल्‍याच्‍या तारखेपासुन दाखल करेपर्यंतचे दरमहाचे होणारे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये ९,९०,०००/- तसेच प्रत्‍यक्ष रक्‍कम ताब्‍यात मिळेपावेतोचे वेळोवेळी होणारे नुकसान सामनेवाले यांच्‍याकडुन देण्‍याचा हुकुम व्‍हावा, तसेच सदरील रकमेवर नोव्‍हेंबर २०१३ पासुन प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपावेतो द.सा.द.शे. १८% प्रमाणे व्‍याज मिळावे, सामनेवालेंकडे चकरा मारल्‍या, नोटीसा पा‍ठविल्‍या त्‍याचा खर्च रूपये १०,०००/- सामनेवालेकडुन तक्रारदारास मिळावा, मनस्‍तपापोटी आणि नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये २५,०००/- मिळवे, तक्रार अर्जाचा खर्च रूपये २०,०००/- मिळावा.

३.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.३ वर तक्रारदार क्र.४ ने  या तक्रार अर्जाशिवाय इतर कोठेही, कोणत्‍याही कोर्टात अथवा अधिका-यासमोर असाच किंवा तत्‍सम तक्रार अथवा अर्ज किंवा दावा दाखल केलेला नाही, याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. निशाणी ७ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ५ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे जे.सी.बी.चे सेल सर्टिफीकीट दि.०८-०६-२०१०, सामनेवालेंकडे पैसे भरलेले स्‍टेटमेंट, सामनेवाले यांना पाठविलेली वकिल नोटीस दि.०३-०९-२०१४, सामनेवाले क्र.१ यांची नोटीस पोहच दि.०९-०९-२०१४, सामनेवाले क्र.३ यांची नोटीस पोहच दाखल आहे दि.०९-०९-२०१४. निशाणी क्र.७/६ वर तक्रारदार क्र.१,२ ३ यांच्‍यावतीने या तक्रारीत कामकाज पाहणे संदर्भातील तक्रारदार क्र.४ यांना स्‍पेशल मुख्‍यत्‍यारपत्र दिल्‍याबद्दल दिनांक       ०५-११-२०१४ दाखल केले आहे.

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन मे.मंचामार्फत सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.४ ने निशाणी क्र.२० वर त्‍यांचा खुलासा,  लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.४ यांनी तक्रारीतील म्‍हणणे व मागणे चुकीचे असुन न्‍यायाच्‍या दृष्‍टीने सदरची तक्रार या मंचात चालु शकत नसल्‍याने या सामनेवाले क्र.४ चे संदर्भात खारीज करण्‍यास पात्र आहे. मयत रामदास आव्‍हाड यांनी जे.सी.बी. मशीन सामनेवाले क्र.४ तर्फे खरेदी केला होता हा परिच्‍छेद सत्‍य आहे. परिच्‍छेद क्रमांक १,३,४,५,६,७ मधील म्‍हणणे व मागणी सामनेवाले यांना मान्‍य व कबुल नाही. तक्रारदाराने विनाकारण सामनेवाले क्र.४ यांना सामनेवालेमध्‍ये समाविष्‍ट केले. त्‍यांच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र.२ मध्‍ये याविषयी नमुद आहे, म्‍हणुन सामनेवाले क्र.४ विरूध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी, असे सामनेवाले क्र.४ ने नमुद केले आहे. सामनेवाले क्र.४ यांनी कुठल्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. तक्रारदारास सदर तक्रार दाखल करणेबाबत locus standi नाही, असा सामनेवाले क्र.४ ने खुलासा केला आहे.     

५.   सामनेवाले क्र.५ यांनी नि.२३ वर पुरसीस दाखल केली की, सामनेवाले क्र.४ हे सामनेवाले क्र.५ चे मुख्‍य कार्यालय असल्‍याने सामनेवाले क्र.४ यांचे म्‍हणणे, मागणी, दस्‍तऐवज हेच सामनेवाले क्र.५ चे म्‍हणणे आहे असे समजण्‍यात यावे, याव्‍यतिरीक्‍त कुठलेही म्‍हणणे नाही.          

६.  सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी नि.२७ वर त्‍यांची कैफीयत दाखल केलेली असुन,  त्‍यामध्‍ये तक्रारदाराने केलेले सर्व कथन व त्‍यांची तक्रार ही व्‍यवसायीक, वाणिज्‍यीक प्रकारची असल्‍याने सदर तक्रार ही मे. जिल्‍हा मंचात चालु शकत नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार ही खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली आहे. तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक १ हा खरा व बरोबर असून तो या सामनेवाले यांना मान्‍य आहे. परंतु डाऊन पेमंटच्‍याबाबत या बॅंकेचा काहीही संबंध नाही. मयत रामदास आव्‍हाड यांनी हा जे.सी.बी. सन २०१० मध्‍ये खरेदी करण्‍यासाठी करारनामा करून दिलेला होता, हे तक्रारदाराने स्‍वतः म्‍हटलेले आहे आणि त्‍या  अनुषंगाने मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांना रक्‍कम रूपये १६,०५,०००/- कर्ज या सामनेवालेंनी दिले. मयत रामदास भाऊराव आव्‍हाड व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या कर्ज करारनामासोबत जोडलेला आहे. मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांनी कर्जाचे हप्‍ते नियमीतपणे फेडले नाही व त्‍यामुळे त्‍यांचे कर्ज खाते हे एन.पी.ए. झाले. त्‍यामुळे तक्रारदारास थकीत कर्ज भरणेसाठी दि.२०-११-२०१२ रोजी सामनेवाले यांच्‍यातर्फे नोटीस पाठविण्‍यात आली. तसेच दि.०५-०३-२०१३ रोजी नोटीस पाठविण्‍यात आली. सामनेवालेने सदरची नोटीस व त्‍याची पावती या कैफीयतीसोबत जोडलेली आहे. मयत रामदास भाऊराव आव्‍हाड हे नियमीत कर्ज फेडत नव्‍हते. दिनांक २७-०९-२०१२ पर्यंत २५ ई.एम.आय. थकले होते. तक्रारदार मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांनी रक्‍कम रूपये २,४५,०००/- ची परतफेड केली हे सत्‍य आहे. सामनेवालेने मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांचा कर्ज खाते उतारा सोबत जोडलेला आहे. तक्रारदार यांनी ते मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांचे कायदेशीर वारस आहेत, याबाबत कुठलाही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने रामदास भाऊराव आव्‍हाड हे मयत झालेबाबतचे तथ्‍य लपवुन ठेवले आहे. मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांना थकीत रक्‍कम रूपये ५,४२,०००/- भरणेबाबत वेळावेळी कळवुनसुध्‍दा कर्ज हप्‍त्‍याची परत फेड केलेली नाही. वेळेवर कर्ज फेड केली नाही, म्‍हणुन बॅंकेत व मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांच्‍यात झालेल्‍या करारनाम्‍यानुसार सामनेवालेने जे.सी.बी. मशीन परत मिळण्‍यासाठी सुचना, माहिती दिली होती. परंतु मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांनी कुठल्‍याही प्रकारे कर्जाची परत फेड केली नाही. वाहन मिळण्‍यासाठी व सामनेवालेमध्‍ये झालेल्‍या करारनाम्‍यानुसार सदर वाहन हे जप्‍त करणे हे सामनेवालेचे कायेदशीर योग्‍य आहे व या करारनाम्‍यामधील परिच्‍छेद क्रमांक १७ हा या सामनेवाले हे सदरील जे.सी.बी. मशीन जप्‍त करणेबाबत पुर्ण कायदेशीर योग्‍य असल्‍याचे नमुद आहे. सदरील तक्रारदाराने रक्‍कम रूपये ९०,०००/- प्रत्‍येक महिन्‍याला या मशीनपासुन कमावतात असे या तक्रारीतील म्‍हणणे खोटे व तथ्‍यहीन आहे. तक्रारदाराने त्‍याबाबत कुठलाही कायदेशीर पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्‍याचप्रमाणे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी असे म्‍हटले आहे की, मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांनी कर्जाचे हप्‍ते नियमीतपणे भरले नाही, त्‍याचप्रमाणे सदरची तक्रारदार यांनीसुध्‍दा उर्वरीत कर्जाची थकीत रक्‍कम अदा करण्‍याची तयारी दर्शविली नाही. त्‍यामुळे सामनेवालेने कायद्याच्‍या तरतुदीनुसार जे.सी.बी. मशीन जप्‍त करणे आवश्‍यक होते व त्‍याबाबत मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांना कळविण्‍यात आले होते. सामनेवाले हे पुर्व सुचना पत्र तसेच त्‍यानंतरचे सुचना पत्र आणि कर्ज परत फेड करण्‍याविषयी नोटीस इत्‍यादी दाखल करत आहे. तक्रारदाराने सामनेवालेविरूध्‍द पोलीस स्‍टेशन अहमदनगर येथे तक्रार नोंदविली असल्‍याबाबत कुठलेही पत्र सामनेवाले यांना मिळालेले नाही किंवा त्‍याबाबत आजपावेतो कुठल्‍याही प्रकारची माहिती या सामनेवाले यांना नाही. सदरील तक्रारदार हे बॅंकेच्‍या संदर्भात कुठल्‍याही व्‍यवहारासंदर्भातला भाग नाही. तसेच ते कुठल्‍याही प्रकारचे सामनेवालेचे ग्राहक नाहीत. त्‍यामुळे सदरची तक्रार ही या मे. मंचात चालणेस पात्र नाही. सामनेवाले बॅंकेला सदर मशीन हे सामनेवाले व मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांच्‍यात झालेल्‍या  करारनाम्‍याप्रमाणे जप्‍त करण्‍याचे पुर्ण अधिकार आहे.  या संदर्भात मशीन जप्‍तीबाबत दि.१४-१२-२०१३ रोजी सिनीअर इन्‍सपेक्‍टर तोफखाना पोलीस स्‍टेशन, अहमदनगर यांना मशीन जप्‍तीसंदर्भात पुर्व सुचना पत्र दिले होते. त्‍यानंतर या सामनेवाले यांनी या तक्रारदाराला दि.१६-१२-२०१३ रोजी रक्‍कम रूपये ८,९७,०१७.०४/- संपुर्ण कर्ज थकबाकी प्रकरणी मशीन जप्‍तीसंदर्भात सदरील तक्रारदाराला कळविण्‍यात आले होते, असे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी नमुद केले आहे. सामनेवाले यांनी मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचा पुढील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे. Revision Petition No.742/2014 20145(1) CPR (NC) Axis Bank Ltd. V/s. Shri. S. Venugopal Naidu ‘ As per the terms of loan cum hypothecated agreement OP in the event of any default on the part of complainant was entitled to recover the entire dues of the loan and take possession of the vehicle and in the light of aforesaid terms and conditions OP has not committed any deficiency in taking possession of the vehicle on the account of default in the payment of instalments and overdue amount.’    सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी आणि खोटी तक्रार दाखल केल्‍यामुळे या सामनेवाले यांना रक्‍कम रूपये १०,०००/- कॉस्‍ट देण्‍यात यावी, असे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीत म्‍हटले आहे.        

७.  सामनेवाले क्र.७ यांनी नि.३० वर त्‍यांची कैफीयत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, सामनेवाले कंपनी ही जे.सी.बी. मॅन्‍युफॅक्‍चरींग कंपनी असुन जे.सी.बी मशीन उत्‍पादन करण्‍याचे काम करते आणि सदरील कंपनीचे ऑफीस हे बल्‍लारगड, न्‍यु दिल्‍ली येथे असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ प्रमाणे सदरची तक्रार ही या मंचासमोर चालविण्‍यात कार्यक्षेत्र नाही. कारण या सामनेवालेचे ऑफीस हे अहमदनगर मे.मंचाचे कायदेशीर न्‍यायकक्षेत नाही. त्‍यामुळे तक्रार ही खारीज करण्‍यात यावी, व विनाकारण सामनेवाले यांना समाविष्‍ट केल्‍यामुळे रक्‍कम रूपये २५,०००/- कॉस्‍ट  तक्रारदाराकडुन मिळण्‍याचा हुकुम व्‍हावा, अशी विनंती केली आहे. निशाणी ३२ वर त्‍यांनी नोटरीकृत शपथपत्र दाखल केले आहे.

८.   सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी नि.३४ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.३६ वर सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराने या तक्रारीतील तक्रारदार वारस  यांनी वारस प्रमाणपत्र दाखल करावे, असा अर्ज दिला. तो मे.मंचाने रद्द करणेबाबत आदेश केला. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी नि.३७ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ८ कागदपत्रांच्‍या  छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये कर्ज खाते क्र.३३२७०५४ चा खाते उतारा, दिनांक २०-११-२०१२ रोजीची कर्ज थकबाकी मागणी नोटीस, नोटीस पाठविल्‍याचा प्रत पुरावा दिनांक २०-११-२०१२, कर्ज मागणी थकबाकीची नोटीस व त्‍याचा पुरावा प्रत दि.०५-०३-२०१३, वाहन ताब्‍यात घेण्‍यापुर्वी इन्‍सपेक्‍टर तोफखाना पोलीस स्‍टेशन, अहमदनगर यांना दि.१४-१२-२०१५ रोजी दिलेले सुचना पत्र व त्‍यासंदर्भात पोलीस स्‍टेशनला वाहन ताब्‍यात घेतल्‍यानंतर दिलेल्‍या पत्राचा पुरावा दि.१४-१२-२०१५ आणि वाहन विकण्‍यापुर्वी वाहन सोडविणे व तक्रारदार यांना दिलेले सुचना पत्र दि.१६-१२-२०१४ इत्‍यादी कागदपत्र जोडलेले आहेत. निशाणी ३९ वर अॅड. श्री. सुनिल मुंदडा यांचे वकिलपत्र तक्रारदारातर्फे दाखल करण्‍यात आले आहे. नि.४३ वर सामनेवालेचे अधिकारपत्र दाखल केलेले आहे. निशाणी ४४ वर आपसात तडजोड होणेबाबत तक्रारदार व सामनेवाले यांची पुरसीस दाखल आहे. परंतु दि.२८-०२-२०१९ रोजी तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात तडजोड होत नसल्‍याचे उभयपक्षाच्‍या वकिलांमार्फत सांगण्‍यात आले. निशाणी ४६ वर सामनेवाले यांनी एकुण ७ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांचा कर्ज खाते उतारा दाखल केला आहे दि.२२-०२-२०१७, कर्ज थकबाकी मागणी नोटीस  दि.२०-११-२०१२, कर्ज थकबाकी मागणी नोटीस पाठविल्‍याची प्रत दि.२१-११-२०१२, कर्ज थकबाकी मागणी नोटीस दि.०५-०३-२०१३, कर्ज थकबाकी मागणी नोटीस पाठविल्‍याची प्रत दि.०५-०३-२०१३, वाहन ताबा घेण्‍यापुर्वी पोलीस स्‍टेशन तोफखाना यांना दिलेले पत्र व पोहच दि.१४-१२-२०१५, वाहन ताब्‍यात घेतल्‍यानंतर संबंधीत तोफखाना पोलीस स्‍टेशन यांना दिलेले सुचनापत्र व पोस्‍टाची पावती, वाहन -विकण्‍यापुर्वी वाहन सोडवण्‍याचे कर्जदार यांना दिलेले पत्र व पोस्‍टाची पावती दि.१६-१२-२०१३ दाखल आहे.      

९.   उभयपक्षांतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच सामनेवाले क्र. १,२,३,४,५,७ यांची कैफीयत, खुलासा, म्‍हणणे व त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाले क्र.१ ते ३ यांचा लेखी युक्तिवाद व उभयपक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद याचा विचार करता या मंचासमोर न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे काय ?

नाही

(२)

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

१०.  मुद्दा क्र. (१) :  सामनेवाले क्र.१ ते ३ ने त्‍यांचे कैफीयीमध्‍ये व युक्तिवादात मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचा पुढील न्‍यायनिवाडा दाखल केला आहे. Revision Petition No.742/2014 20145(1) CPR (NC) Axis Bank Ltd. V/s. Shri. S. Venugopal Naidu ‘ As per the terms of loan cum hypothecated agreement OP in the event of any default on the part of complainant was entitled to recover the entire dues of the loan and take possession of the vehicle and in the light of aforesaid terms and conditions OP has not committed any deficiency in taking possession of the vehicle on the account of default in the payment of instalments and overdue amount.’ या न्‍यायनिवाड्यासंदर्भात फक्‍त कथन केलेले आहे. न्‍यायनिवाडा या मे.मंचात दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तो ग्राह्य धरता येत नाही.

११.  सामनेवाले क्र.४ ते ७ यांच्‍याविरूध्‍द तक्रारीत कोणतीही मागणी नसल्‍याने त्‍यांचेविरूध्‍द कोणताही आदेश करणे उचित ठरणार नाही. तसेच त्‍यांनी सेवेत त्रुटी दिली नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार व सामनेवालेने दाखल केलेल्‍या  कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या नि.७/२ तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज नि.४६ दस्‍त क्र.१ ते ८ यांचे अवलोकन केले असता मयत रामदास भाऊराव आव्‍हाड हे मुळ कर्जदार असुन त्‍यांचे कर्ज थकबाकी झालेले आहे. तसेच सदरील कागदपत्रावरून असे दिसुन येते की, कर्ज थकबाकी असल्‍यामुळे सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारास वेळोवेळी कर्ज थकबाकी मागणी नोटीस पाठविली आहे व सदरील दस्‍तावरून असेही दिसुन येत की, मयत रामदास भाऊराव आव्‍हाड यांचे वारस हे त्‍यांचेनंतर बेनफीशीअरी असल्‍याने कर्ज फेड करण्‍याची जबाबदारी ही तक्रारदार क्र.१ ते ४ यांची होती. परंतु त्‍यांनी मुदतीत पैसे भरले नाही किंवा संपुर्ण पैसे भरण्‍याची तयारी दर्शवीली नाही, असे दिसुन येते. करारनाम्‍यानुसार कर्ज वसुल करण्‍याचे अधिकार सामनेवाले यांना आहे. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या खाते उता-यामध्‍ये मुळ कर्जदाराची थकबाकी असल्‍याचे दिसुन येते. दिनांक १६-१२-२०१३ रोजी विकणेबद्दल वाहन सोडविण्‍याविषयी तक्रारदार यांना दिलेल्‍या  पत्रात रक्‍कम रूपये ८,९७,०१७.०४/- कर्ज थकबाकी जमा करण्‍याचे पत्र सामनेवाले यांनी दिलेले होते व ती थकबाकी भरल्‍याचे दिसुन येत नाही व त्‍या संदर्भात तक्रारदाराने उर्वरीत थकबाकी भरणेबाबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले दिसुन येत नाही. म्‍हणुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे डिफॉल्‍टर असल्‍याचे सिध्‍द होते. त्‍यामुळे तक्रारदार यांना सामनेवाले यांनी कुठल्‍याही प्रकारची त्रुटी दिली नाही व तक्रारदार इतर मागणी मिळण्‍यास पात्र नाही, असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

१२.  मुद्दा क्र. (२) :  मुद्दा क्र.१ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.