Maharashtra

Beed

CC/14/84

Mahadeo Ganpati Gavane - Complainant(s)

Versus

Branch Manager,Futur general Insurance Co. - Opp.Party(s)

23 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/84
 
1. Mahadeo Ganpati Gavane
R/o Pargaon (Sirath) Ta Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Futur general Insurance Co.
India Plus Fininance Center,Tower No 3 Senapati Bapat Marg,Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                            निकाल

                       दिनांक- 23.09.2014

              (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

            तक्रारदार महादेव गणपती गव्‍हाणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी  शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत  नुकसान भरपाई देण्‍यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

            या मंचाने दि.20.05.2014 रोजी सदरील तक्रार या मंचापूढे दाखल होणेस पात्र आहे काय? या मुद्यावर तक्रारदार यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यासाठी ठेवलेले होते. तदनंतर तक्रारदार यांनी दि.27.06.2014 सदरील तक्रारीमध्‍ये  दुरुस्‍ती करण्‍यात यावी असा अर्ज दिला, सदरील अर्ज या मंचाने दि.17.07.2014 रोजी मान्‍य केला व तक्रारदार यांना तक्रारीत नविन मसूदा टाकण्‍यास व दुरुस्‍तीस परवानगी दिली. तदनंतर वेळोवेळी या मंचाने तक्रारदार यांना दुरुस्‍ती करणेकामी मुदती दिलेल्‍या आहेत. तक्रारदार व त्‍यांचे वकील हे नेहमीच या मंचासमोर गैरहजर राहिलेले आहेत. दि.07.08.2014 रोजी या मंचाने निशाणी 1 वर तक्रारदार यांनी तक्रारीत दुरुस्‍ती अद्याप पावेतो केली नाही तसेच दुरुस्‍त प्रत दाखल केली नाही. सबब तक्रार पुढील आदेशासाठी ठेवावी असा आदेश केलेला आहे. तदनंतर ही तक्रारदार व त्‍यांचे वकील मंचासमोर हजर झाले नाही व दुरुस्‍त तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार या मंचासमोर चालण्‍यास पात्र आहे याबाबत युक्‍तीवाद केला नाही. दि.01.09.2014 रोजी या मंचाने निशाणी 1 वर आदेश केला की, तक्रारदार यांनी तक्रारीत दुरुस्‍ती केली नाही, दुरुस्‍त प्रत दाखल केली नाही, तसेच तक्रार चालवणे कामी पुढे कोणतीही तजवीज केली नाही म्‍हणून तक्रार पुढील आदेशासाठी ठेवावी. तदनंतर ही तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर राहिले. सबब तक्रारदार सांना सदरील तक्रार चालवण्‍यास स्‍वारस्‍य दिसत नाही. तसेच तक्रारदार यांना संधी देऊनही त्‍यांनी तक्रारीत आवश्‍यक ती कार्यवाही केली नाही. सबब या मंचाचे मत की, तक्रारदार यांचे चुकीमूळे तक्रार रदद होणेस पात्र आहे.

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                   आदेश

      1) तक्रारदार यांच्‍या चुकीमूळे तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

      2) खर्चाबददल आदेश नाही.

      3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                   (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

 

                       श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

                            सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.