Maharashtra

Ahmednagar

CC/16/13

Babasaheb Manikrao Dengle - Complainant(s)

Versus

Branch Manager,Cholamandalam MS General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Palve

12 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/13
( Date of Filing : 08 Jan 2016 )
 
1. Babasaheb Manikrao Dengle
Loni Khurd,Maniknagar,Talegaon Road,Tal Rahata,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager,Cholamandalam MS General Insurance Co.Ltd.
3rd Floor,Wellesly Court,Dr.Ambedkar Road,Camp,Pune-411 001
Pune
Maharashtra
2. Manager,Cholamandalam MS General Insurance Co.Ltd.
2nd Floor,Dare House,2 N.S.C.Bose Road,Chennai-6 00 001
Chennai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Palve, Advocate
For the Opp. Party:
Dated : 12 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडून रुपये 32,346/- प्रिमीयम भरुन त्‍यांचे फर्म असलेली बिल्‍डींग, फर्नीचर, फिक्‍चर, प्‍लॅन्‍ट आणि मशिनरी व स्‍टॉक इत्‍यादी कामाकरीता रक्‍कम रु.35,00,000/- चा विमा उतरविला होता. सदर विम्‍याचा कालावधी दिनांक 22.03.2014 ते 21.03.2015 पर्यंत होता. दिनांक 25.04.2014 रोजी तक्रारकर्ता यांचे उपरोक्‍त फर्मच्‍या ठिकाणी म्‍हणजे ऑफिसमध्‍ये असणा-या मशिनरीमध्‍ये आग लागून त्‍यामध्‍ये तक्रारकर्ता यांचे फर्नीचरचे व मशिनरीचे नुकसान झाले आहे. व ऑफिसमधील भिंती देखील आग लागल्‍यामुळे पुर्णपणे काळया पडल्‍या आहेत. तक्रारकर्ताने सदर घटना घडल्‍याची माहिती सामनेवालाना दिली व सामनेवालाने 29.04.2014 रोजी अधिकृत सर्व्‍हेअर सी.ए.आर.व्‍ही.सारडा यांना नियुक्‍त करुन तक्रारकर्ता यांचे घटनास्‍थळाचे ठिकाणी भेट दिली. संपुर्ण नुकसानीची पाहाणी करुन त्‍यांचे फोटोग्राफ्स घेवुन त्‍यांचा अहवाल सामनेवालाकडे सादर केला. तक्रारकर्ता यांचे एकुण नुकसान  2,08,818/- रुपये झालेले आहे. परंतू सामनेवालाने दिनांक 08.07.2014 रोजी तक्रारकर्ताचा विमा क्‍लेम बेकायदेशिररित्‍या नाकारला आहे. म्‍हणून तक्रारकर्ताने सदरील तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3.   तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, रक्‍कम रुपये 2,73,818/- सामनेवालाकडून नुकसान भरपाई म्‍हणून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटीचा खर्च व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले. व निशाणी 13 वर त्‍यांची लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला यांना नाकबूल आहेत. सामनेवालाने कैफियतीत असे मान्‍य केले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडून Standard Fire Policy  घेतली आहे. व त्‍याचा कालावधी दिनांक 22.03.2014 ते 21.03.2015 पर्यंत होता. सामनेवालाने कैफियतीत पुढे असे कथन केले आहे की, निरीक्षकानी त्‍यांचे अहवालात असे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे ऑफिसमध्‍ये ठेवलेले डी.व्‍ही.आर. मधून शॉर्टसर्कीट झालेमुळे त्‍यातून काळा धुर निघाला व त्‍या धुरामुळे टी.व्‍ही, ए.सी, कॅमेरा, प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरीसचे स्‍ट्रक्‍चरचे नुकसान झाले व काळे पडले. परंतु तक्रारदार यांचे ऑफिसमध्‍ये वास्‍तविक पाहाता आग लागली नव्‍हती व सामनेवालाने नियुक्‍त केलेले निरीक्षकानी एकुण 75,000/- रुपये नुकसान झालेले आहे असा अहवाल सामनेवालाला दिलेला आहे. तक्रारकर्ता याचेकडे फायर आग नियुक्‍त असल्‍याने वास्‍तविक तक्रारकर्ताकडे कोणतीही आग लागलेली नव्‍हती. म्‍हणून पॉलीसीचे शर्त व अट क्रंमाक क- 3 प्रमाणे तक्रारकर्ताचा विमा दावा देण्‍यात आला नाही. सदर बाब सामनेवालाने तक्रारकर्तास पत्राव्‍दारे कळविले होते. त्‍यात त्‍यांनी कोणताही अनुचित व्‍यवहार केला नाही किंवा सेवेत त्रुटी तक्रारकर्ता यांना दिलेली नाही. सदरील तक्रार खोटया स्‍वरुपाची आहे. म्‍हणून सदर तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पात्र आहे. सबब सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती सामनेवालातर्फे करण्‍यात आली आहे.

5.   सामनेवालाने कैफियतीसोबत श्री.सी.ए.आर.व्‍ही.सारडा यांचे शपथपत्र तसेच अहवाल सादर केलेला आहे. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, सामनेवालानी दाखल केलेली कैफियत /जबाब, दस्‍तावेज, साक्षीदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र व उभय पक्षांचे तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारकर्ताप्रति न्‍युनत्‍तम सेवा दर्शविलेली आहे काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  –  तक्रारकर्ता यांनी सामनेवालाकडून आग जळीत करीता विमा पॉलीसी घेतली होती. व त्‍याकरीता प्रिमीयम रक्‍कम भरली होती. व सदर विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 22.03.2014 ते 21.03.2015 पर्यंत होता, यात कोणताही वाद नसल्‍याने तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – तक्रारकर्ता यांनी सामनेवालाकडून आग जळीताकरीता पॉलीसी घेतली होती व तक्रारकर्ता यांचे ऑफिस कार्यालयात झालेली घटना घडली त्‍या संदर्भात सामनेवालाकडे विमा दावा सादर करण्‍यात आला होता. व सामनेवालाने त्‍या घटनेची पाहाणी करणेकरीता निरीक्षक श्री.सी.ए.आर.व्‍ही.सारडा यांना निरीक्षक म्‍हणून नियुक्‍त केले व त्‍यांनी निरीक्षण करुन त्‍यांचा अहवाल सामनेवालाकडे दाखल केला. सदर अहवालात सदर निरीक्षकानी फोटोग्राफ्स लावलेले आहेत. त्‍या फोटोग्राफ्सची पडताळणी करताना असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांचे डी.व्‍ही.आर.मध्‍ये शॉर्टसर्कीट झाले असल्‍याने डी.व्‍ही.आर.चे वरती असलेले छत काळे पडले आहे. त्‍या फोटोग्राफ्सची पडताळणी करतांना असे दिसून आले की, सोफा स्‍वच्‍छ आहे. त्‍याअर्थी तक्रारकर्ता यांचे ऑफिसमध्‍ये डी.व्‍ही.आर. याची यात उष्‍णता वाढत असल्‍याने धुर निघाला असल्‍यामुळे त्‍यावरचे छत व भिंती काळया पडल्‍या आहेत असे निष्‍पन्‍न व सिध्‍द होते. तसेच श्री.सी.ए.आर.व्‍ही.सारडा यांनी दिलेल्‍या निरीक्षण अहवालात असे नमुद केलेले आहे की, जे काही तक्रारकर्ताचे नुकसान झाले आहे ते शॉर्ट सर्कीट मध्‍ये झालेल्‍या धुरामुळे झालेले आहे. वास्‍तविक ती आग झालेली नव्‍हती. सामनेवालाने निशाणी 15 वर 14 चे खाली पॉलीसीतील शर्त व अट दाखल केलेले आहे त्‍यात पान क्र.1 मधील (C) Excluded property ची पडताळणी करताना असे दिसून आले की,

(C) Excluded property

1. Loss, destruction of damage to bullion or unset precious stones, any curios or works of art for an amount exceeding Rs.10000/-, goods held in trust or on commission, manuscripts, plans, drawings, securities, obligations or documents of any kind, stamps, coins or paper money, cheques, books of accounts or other business books, computer systems records, explosives unless otherwise expressly stated in the policy.

2. Loss, destruction or damage to the stocks in Cold Storage premises caused by change of temperature.

3. Loss, destruction or damage to any electrical machine, apparatus, fixture , of fitting arising from or occasioned by over-running, excessive pressure, short circuiting, arcing, self heating or leakage of electricity from whatever cause (lightning included) provided that this exclusion shall apply only to the particular electrical machine, apparatus, fixture or fitting so affected and not to other machines, apparatus, fixture or fittings which may be destroyed or damaged by fire so set up.

4. Loss or damage to property insured if removed to any building or place other than in which it is herein stated to be insured, except machinery and equipment temporarily removed for repais, cleaning, renovation or other similar purposes for a period not exceeding 60 days.

वरील नमुद पॉलीसीमध्‍ये अटी असल्‍याने तसेच विमा घेणारे व विमा करणारी कंपनी यात करार असल्‍याने सदर तक्रार शर्त व अट दोन्‍ही पक्षकारांवर बाध्‍य असते. म्‍हणून त्‍या शर्त व अटी नुसार सामनेवालाने तक्रारकर्ताचा विमा दावा नाकारुन कोणताही अनुचित व्‍यापारी प्रथा किंवा सेवेत त्रुटी दिलेली नाही असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.